Sunday, 22 August 2021

द रेस्क्यू... विनीत वर्तक ©

 द रेस्क्यू... विनीत वर्तक ©

एकीकडे लोक विमानाच्या चाकावर चढून अफगाणिस्तानातून आपल्या जीवाची पर्वा न करता पळ काढत आहेत. जिकडे विमानतळावर विमान उतरवणं अमेरिका सारख्या २० वर्ष वास्तव्य करणाऱ्या देशाला भारी जाते आहे. तिकडे भारताने गेल्या आठवड्याभरात तब्बल ५९० लोकांना सुखरूप भारतात परत आणलं आहे. ज्यात भारताच्या नागरिकांसोबत इतर देशांच्या नागरिकांचा ही समावेश आहे.

भारताने आपल संपूर्ण राजनैतिक वजन मग ते अफगाणिस्तान सोबत असो किंवा अमेरिका, तजाकिस्तान, ओमान सारखे देश त्यांना समजते ती सर्व भाषा मग ती साम, दाम, दंड, भेद कशीही असो वापरून आपल्या लोकांची सुटका भारताने केली आहे.

राजनैतिक पातळीवर अनेक बाजूने भारताचे अधिकारी या सुटकेसाठी प्रयत्न करत आहेत. ज्या काबुल विमानतळावर अफरातफरी माजलेली आहे, गोळीबार होतो आहे. ज्या विमानतळाला तालिबानी सैनिकांनी वेढा घातलेला आहे. अश्या ठिकाणी आपलं सैनिकी विमान असो अथवा व्यावसायिक विमान असो भारताने सुखरूप उतरवून त्यात जाणारी सगळी लोक सुखरूप विमानतळावर पोहचून सुरक्षिततेने उड्डाण भरतील. यासाठी अनेक गोष्टी पडद्यामागे केलेल्या आहेत.

एकीकडे जिकडे इतर देश आपल्या नागरिकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यासाठी अडचणीत सापडले आहेत तिकडे भारतीय लोक तालिबानी गोळीचे लक्ष्य झालेले नाही? भारतीय विमानांना उतरण्यासाठी परवानगी कशी काय देण्यात आली? इंधन कसं काय देण्यात आलं? तसेच भारतीय लोकांना विमानतळावर जाण्याची तसेच लागणाऱ्या कागदपत्रांची व्यवस्था कशी काय झाली? या प्रश्नांची कोडी अजून अनेक देश सोडवत आहेत.

काल जवळपास ४०० लोकांना मृत्यूच्या खाईतून भारताने बाहेर काढलं असून भारताच्या या कामगिरीमुळे अनेक देशांनी भारताला त्यांच्या नागरिकांना बाहेर काढण्याची विनंती केली आहे.
सर्व भारतीयांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणारं भारत सरकार, विदेश मंत्री आणि पंतप्रधानांचे सुरक्षा सल्लागार तसेच सगळे राजनैतिक अधिकारी, भारतीय वायू दल, एअर इंडिया, इंडिगो आणि त्यांचे सर्व कर्मचारी यांच अभिनंदन. पुन्हा एकदा भारताने दाखवून दिलं आहे की भारताच्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी भारत नेहमीच सर्वात पुढे असतो.

जय हिंद!!!

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


12 comments:

  1. लोकं कितीही नावं ठेवोत.. मोदींसारखा नेता मिळणे हे भारताचे खरोखरीच भाग्य आहे... सुटका झालेल्या सर्वांचे खूप अभिनंदन 👏👏👏 आणि संपूर्ण चमू चे खूप कौतुक..


    तुमचे शब्दांकन फारच मार्मिक अबी स्पष्ट आहे.. खूप आभार 🙏👏👏

    ReplyDelete
  2. आणी इकडे मुनव्वर राणा सारखे विद्वान अफगाणीस्तान अमेरिकेच्या पाशातून मुक्त झाल्याचे बरळताहेत. तालीबनला जन्माला घातले अमेरिकेने पोसले अमेरिकेने शस्त्र, पैसे ओतले अमेरिकेने आणी आता हे म्हणतात मुक्ती मिळाली ती पण अमेरिकेपासून. अमेरिकेची कावीळ झालेली माणसे आहेत. अशीच कावीळ मोदींची झालेली माणसेपण भारतात आहेत

    ReplyDelete
  3. A stupendous apccomplishment for a country often treated Under-Developed & now a Super-Performer be it Development of Vaccine or Donation Globally or GDP Growth

    ReplyDelete
  4. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला जे जमले नाही ते भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनी शिताफीने व कुशलतेने करून दाखवले आहे.तेही तालीबान्याच्या नाकावर टिच्चून.तालीबान्यांनी जरी भारतीयाबाबत सहानुभूती दाखवली असली तरी भारताने आपल्या परराष्ट्रीय धोरणात बदल केला नाही..की भविष्यात त्याचा जागतिक पातळीवर भारतास मोठा फायदा होईल असे वाटते.अफगाणीस्तानात यादवीला तर सुरूवात झाली असून त्याचा भारत निश्चितच फायदा उठवणार

    ReplyDelete
  5. सार्थ अभिमान.

    ReplyDelete
  6. Very basic understanding of the issue in the blog.
    Also seems like an opinion blog patting once own back

    Real question is what did India had to give away to get our people back? Is it short term ? long term? Money?

    Not trying take credit away from the hard working Indian officers but Why did Indians stayed till the end which made us spend our influence?

    Unless we discuss these issues and just keep celebrating the rescue efforts, our Indian citizens will have to loose everything during rescue

    ReplyDelete
    Replies
    1. हो ना!सुखासुखी तालिबानी का सोडतील?

      Delete
  7. बचेंगे तो और भी लढेंगे!हे दत्ताजी शिंदेंनी शिकवलय ना!आज आपल्या शूर टीमने तेच ठरवलय.खूप खूप कौतुक आहे आमच्या rescue operation च्या सगळ्यांचेच.देशभक्ती याहून काय वेगळी असते? Salute मनापासून

    ReplyDelete
  8. येथेही कांही छिद्रान्वेषी महाभाग भेटावेत, हे महाआश्चर्यच आहे! मोदी का विरोध दो तरह के लोग ही करते हुए मिलेंगे। एक वो जिनकी पीछे से फ़टी है और दूसरे वो जिनकी आगे से कटी है! 💣🔥

    ReplyDelete
  9. येथेही कांही छिद्रान्वेषी महाभाग भेटावेत, हे महाआश्चर्यच आहे! मोदी का विरोध दो तरह के लोग ही करते हुए मिलेंगे। एक वो जिनकी पीछे से फ़टी है और दूसरे वो जिनकी आगे से कटी है! ����

    ReplyDelete
  10. खूपच अवघड कामं भारताच्या स्टाफ नि केलेले आहे.त्यांना मानाचा मुजरा आणि भारत सरकारचे मनापासून धन्यवाद

    ReplyDelete