झटपट श्रीमंत होताना... विनीत वर्तक ©
काल फेसबुक मेसेंजर वर एका मेसेज ने लक्ष वेधुन घेतलं. उत्पादित झालेल्या मालाला थेट विक्रेत्या पर्यंत विकणाच्या व्यवसाया बद्दल माहिती आहे का? असा एक प्रश्न समोरून विचारला होता. मला लगेच लक्षात न आल्याने थोडी अजुन चौकशी केली व 'इ-कॉमर्स' पद्धतीच्या व्यवसायाशी हा प्रश्न संबंधित होता. पाश्च्यात देशात झालेल्या क्रांतीला आपल्या देशात घडवण्यासाठी भागीदार होण्यासाठी रचलेल्या एका जाळ्यात समोरची व्यक्ती जाता जाता थांबली होती. भारतातील लोकांना अमेरिका,युरोप अथवा इतर प्रगत देशांच इतकं आकर्षण आहे की त्याच्या बळावर कोणतिही योजना आपण अगदी डोळे बंद करून स्विकारतो. प्रगत देशात 'ई-कॉमर्स' ने क्रांती घडवली असुन ह्या व्यवसायाने अनेकांना करोडपती केलं. आता भारतात इतर कोणी करोडपती बनण्याआधी तुम्हाला ते बनण्याची संधी आहे. तुमच्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवा. एका महिन्यात दहा लाख कमवा. एका वर्षात जॅग्वार चे मालक व्हा. असं सांगत करोडपती बनलेले लोकं मिळालेल्या चेक चे फोटो दाखवत मोठ्या मोठ्या हॉटेल आणि कॉन्फरन्स मध्ये सरळ सांगायचं तर बकरे शोधतं असतात. त्यांच्या ह्या दिखाव्यात हरवून झटपट श्रीमंत होण्याची स्वप्न बघणारे अनेकजण बळी पडतात. आजकाल हा बिझनेस फेसबुक वर पण सुरु आहे. अश्याच एका व्यक्तीचा मेसेज आल्यावर ह्यावर थोडसं लिहावं वाटलं.
चेन मार्केटिंग, ई- कॉमर्स बिझनेस ह्या सारख्या अनेक योजना आपल्या आजुबाजुला सुरु आहेत. ह्यांची मुख्य गिऱ्हाईक ही झटपट श्रीमंत होण्याची स्वप्न बघणारी लोकं असतात. कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त पैसे कसे मिळतील ह्या विवंचनेत असलेल्या लोकांना हेरून मग त्यांना आपली स्वप्न साकारण्यासाठी आमचीच योजना कशी मदत करेल ते बिंबवण्यात येते. हे इतक्या सफाईने केलं जाते की आपण कसे अडकलो हे कळे पर्यंत खुप उशीर झालेला असतो. आमची कंपनी तयार झालेला माल सरळ विक्रेत्या पर्यंत देईल आणि मधलं कमिशन जे रिटेल वाले कमावतात ते कमिशन सरळ तुमच्या खात्यात. ह्यामुळे अगदी महिन्याला तुम्ही लाखो रुपयांचे मालक. अमेरीका सारख्या देशात आजकाल सगळे व्यवहार अश्याच पद्धतीने होतात. भारतात येत्या वर्षात होतील. त्यामुळे आजच मेंबर व्हा. ३ जणांना अजुन मेंबर करा तुमच्या मेंबरशिप चे पैसे परत. तुम्ही बनवलेले मेंबर जे कमावतील त्यावर तुम्हाला पैसे म्हणजे ते काम करतील तुम्हाला बसुन पैसे. असे बसुन पैसे खाणारे लोक अनेक चेक घेऊन मी हे सगळं करतो आहे हे सांगत समोर येतात. आपल्या समोर स्वप्नांचा एक महाल उभा करतात.
खर सांगायचं तर म्हणतात तसं, 'पैसे कधी झाडाला लागत नाही. ते कमावण्यासाठी मेहनत करावी लागते. फुकटात मिळालेले पैसे ना पचत आणि ना पचवता येतात' लाखो रुपये पगार देणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्या ते पैसे असेच देत नाहीत. त्यासाठी ज्याला ते मिळतात त्याच्याकडून कंपनी ने दहा पट कमावलेले असतात. हा सरळ बिझनेस आहे. काहीही फुकटात आणि झटपट मिळत नाही. कोणीच कोणाला फुकट देतं नाही तर कोणती कंपनी तुम्हाला काहीही न करता लाखो रुपये देणार आहे? हा सरळ प्रश्न आपल्याला का पडत नाही? बरं अमेरीकेत हे झालं ते झालं सांगितल्यावर आपल्या फोन वर असलेल्या गुगल वरून आपण ती माहिती बघु आणि वाचु शकत असताना आपण तितके ही कष्ट का घेत नाहीत? रीटेल बिझनेस मधल्या जगातील पहिल्या पाच कंपनी मध्ये ४ अमेरीकन कंपनी आहेत. वॉलमार्ट सारखी कंपनी आज रीटेल मार्केट चा दादा आहे. खरच जर ई- कॉमर्स क्रांती झाली असेल तर आज अमेरीकन वॉलमार्ट मधुन खरेदी करत नसता.
पैसे मिळाले म्हणुन चेक दाखवणारे आपला गेल्या ३ वर्षाचे इनकम टॅक्स रिटर्न्स का दाखवत नाहीत? कारण आज कोणी कोणाला लाखाचा चा चेक देऊ शकते पैसे अकाउंट ला असो वा नसो हे साधं गणित आपल्याला कळत नाही की ती समजुन घेण्याची आपली मानसिकता नसते? १ किलो कांद्याच्या भावासाठी घासाघीस करणारे लाखो च्या चेक वर पटकन विश्वास कसे ठेवतात? खरे जरी कोणाला पैसे मिळाले असतील तर अश्या पैश्याने समाधानाची झोप लागते का? आपण अडकवलेले (मामा बनवलेले) मेंबर हे नेहमीच आपल्या जवळचे मित्र, मैत्रीण, कुटुंबीय अथवा आप्तेष्ट असतात. आपल्या संबंधांचा मान ठेऊन त्यांनी पैसे गुंतवले असले तरी त्यात फसवल्याची भावना असते. फरक इतकाच की ते ही गोष्ट बोलुन दाखवत नाहीत. झटपट श्रीमंत होणाच्या स्वप्नांच्या राज्यात आपण असे अडकलेलो असतो की आपण आपल्या नात्यांच्यी पायमल्ली करतो आहोत हे धान्यात पण येतं नाही. ते धान्यात आलं तरी आपले पैसे सोडवण्यासाठी दुसऱ्याला खड्यात घालणे गरजेचे बनते. शेवटी हे सगळं करून आपण श्रीमंत तर बनत नाहीच पण जवळ असलेली माणसं पण गमावून बसतो.
झटपट श्रीमंत होण्याच्या मायाजाला पासुन लांब राहणं सगळ्यात उत्तम. आपल्या मेहनतीने, जिद्दीने, सचोटीने केलेला कुठलाही व्यवसाय, नोकरी अथवा इतर गोष्ट नेहमीच आपल्याला पैश्याने तर श्रीमंत करतेच पण समाधानाने ही श्रीमंत करते जे कुठेही विकत मिळत नाही. एका रात्रीत यश मिळायला अनेक रात्रींचा दिवस करायला लागतो हे आपण कधी विसरता कामा नये. तेव्हा शक्यतो ह्या अश्या नवीन वेष्टनात येणाऱ्या झटपट श्रीमंत बनवणाऱ्या योजनांपासुन राहुन आपला उत्कर्ष करण्याची प्रगल्भता आपण शिकायला हवी.
सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

No comments:
Post a Comment