चेवांग रिंचेन ब्रिज एका पराक्रमी सैनिकाला दिलेली मानवंदना... विनीत वर्तक ©
ऑक्टोबर २०१९ ला भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग ह्यांनी भारत- चीन सिमेजवळ लडाख मधल्या एका ब्रिजला राष्ट्राला अर्पण केलं. तैमुर च्या उठण्या बसण्याची नोंद ठेवणाऱ्या मिडियाला मात्र अश्या छोट्या मोठ्या उद्धघाटनाच्या बातम्यातुन टी.आर.पी. मिळत नसल्याने त्यांनी ह्या बातमीकडे दुर्लक्ष केलं आणि त्याचसोबत आपल्या सुजाण नागरीकांनी. अवघी १४०० फुट लांबी असणाऱ्या ब्रिज मध्ये असं काय विशेष की खुद्द देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी, लष्कर प्रमुखांनी जातीने जाऊन त्याच उदघाटन करावं? ह्या ब्रिज ला ज्यांच नावं दिलं गेलं ज्यांना 'लायन ऑफ लडाख' म्हणुन ओळखलं जाते ते कर्नल चेवांग रिंचेन. खेदाची गोष्ट अशी की कर्नल चेवांग रिंचेन कोण? हेच माहीत नसल्याने त्यांच नाव, त्यांचा पराक्रम ह्या बद्दल भारतीय अनभिज्ञ आहेत.
चेवांग रिंचेन ब्रिज श्योक नदीच्या पात्रावर बांधण्यात आला असुन समुद्र सपाटी पासुन ह्याची उंची जवळपास १४,६५० फुट आहे. चेवांग रिंचेन ब्रिज भारतातील सर्वात उंचीवर बांधलेला ब्रिज असुन अवघ्या १५ महीन्यात तो बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ने बांधला आहे. ज्या उंचीवर श्वास घेताना पण धाप लागते त्या उंचीवर अति उंचीवरील सर्व प्रकारच्या तपमानाला तोंड देण्यास सक्षम असलेला ९०-१०० टन वजनाचे रणगाडे, तोफा, दारुगोळा ह्यांचं वजन पेलणारा ब्रिज बांधणं तो ही अवघ्या १५ महीन्यात हे खुप मोठं कठीण काम बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन अगदी सहजतेने पुर्ण केलं त्यासाठी त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे.
चेवांग रिंचेन ब्रिज हा फक्त उंचीसाठी महत्वाचा नाही तर तो ज्या ठिकाणी बनवला ते महत्वाचे आहे. चेवांग रिंचेन ब्रिजपासुन भारत- चीन सीमा फक्त ४५ किलोमीटर वर आहे. ह्या ब्रिजमुळे आता सरहद्दीवर रसद आधी लागणाऱ्या वेळेपेक्षा अर्ध्या वेळेत पोहचवता येणार आहे. लेह आणि काराकोरम ह्यांना जोडणाऱ्या ह्या ब्रिजचं सामरिक महत्व खुप आहे. ह्या ब्रिज ला ज्यांचं नाव दिलं गेलं त्या कर्नल चेवांग रिंचेन ह्यांची मुलगी ह्या उद्घटनाला उपस्थित होती.
कर्नल चेवांग रिंचेन ह्यांचा जन्म सुमूर, नुब्रा इकडे १९३१ ला झाला. वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी लडाख गार्ड्स मध्ये प्रवेश केला. १९४८ मध्ये नुब्रा व्हॅली इकडे १७,००० फुटावर असणाऱ्या लामा हाऊस वर तिरंगा फडकवण्यात महत्वाची भुमिका बजावली. त्यानंतर २१,००० फुटावर असणाऱ्या टुक्कार हिल वर त्यांनी तिरंगा फडकावला. ह्यासाठी सतत ३ दिवस त्यांची टीम बर्फातुन चालत होती. अश्या परीस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी आपल्या पराक्रमाने तिरंगा फडकावला. त्यांच्या ह्या पराक्रमा बद्दल त्यांना भारत सरकारने महावीर चक्र देऊन त्यांच सन्मान केला. हा पुरस्कार १७ व्या वर्षी मिळवणारे ते सर्वात कमी वयाचे मानकरी आहेत.
१९७१ च्या युद्धात मेजर असणाऱ्या चेवांग रिंचेन ह्यांनी लिडिंग फ्रॉम द फ्रंट ह्या उक्तीला सार्थ करत त्यांच्यावर दिलेल्या जबाबदारी ला आपल्या पराक्रमाने पुर्ण केलं. प्रतापपूर सेक्टर मध्ये चालुंक कॉम्प्लेक्स ला ताब्यात घेण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी ह्यावर तिरंगा फडकवताना आपल्या पराक्रमाची शर्थ केली. त्यांच्या ह्या पराक्रमासाठी त्यांना पुन्हा महावीर चक्राने सन्मानित करण्यात आलं. दोन वेळा महावीर चक्र मिळवणाऱ्या मोजक्या ६ सैनिकात कर्नल चेवांग रिंचेन ह्यांचा समावेश आहे. अश्या ह्या पराक्रमी सैनिकाची आठवण ठेवताना ह्या ब्रिज चं नाव कर्नल चेवांग रिंचेन ब्रिज असं करण्यात आलं. लेह शहरात त्यांचा पुतळा उभारला आहे. अश्या लायन ऑफ लडाख असणाऱ्या सैनिकाचं नावं देशाच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असणाऱ्या ब्रिज ला देणं ही खरी त्या सैनिकाला मानवंदना होती.
अश्या पराक्रमाची गाथा न आमच्या पुस्तकात येतं न आम्हाला काही देणंघेणं असते अश्या गोष्टींचं. आम्हाला पुस्तकातले शिवाजी महाराज माहीत असल्याने आमची मजल जय हो बोलण्यात आणि आमची ऊर्जा त्यांचे वारस आणि त्यांच्या नावाचा थप्पा एकमेकांवर मारण्यात जाते. कोणी कोणता चित्रपट बघावा अथवा बघु नये ह्यासाठी आम्ही जिवाचं रान करतो. पण ज्यांनी आमच्यासाठी रक्त सांडल त्यांच्या नावाकडे आश्चर्याने बघतो. कर्नल चेवांग रिंचेन आणि अनेक पराक्रमी सैनिकांच्या पराक्रमामुळे आज लोकशाही बद्दल बोलणारे आम्ही आणि आमचा मिडिया त्यांना किती मान देतो ते आपल्या प्रत्येकाला चांगलं माहित आहे.
कर्नल चेवांग रिंचेन ह्यांच्या पराक्रमाला सॅल्यूट आणि चेवांग रिंचेन ब्रिज भारताच्या सीमांना सुरक्षित ठेवण्यात नक्कीच मोलाची भुमिका बजावेल ह्याबद्दल माझ्या मनात शंका नाही.
सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
फोटो स्रोत:- गुगल

अशी माहिती मिळालीच पाहिजे. पुढे सुद्धा अशा प्रकारच्या माहितीचा वापर होत राहील. धन्यवाद...
ReplyDeleteHats off to the colonel and the Border Road Organization.
ReplyDeleteकर्नल चेवांग रिंचेन यांना लक्ष लक्ष प्रणाम...
ReplyDeleteJay hind&salute
Deleteजय हिंद
Deleteकर्नल चेवांग रिचेंन यांना अनेक प्रणाम 👌👌👍👍👌👌
ReplyDeleteSalute 🙏
ReplyDeleteKarnal Chevang Rechen...hyana Salute..
ReplyDeleteHats off to our armed forces
ReplyDeleteVery good event celebrated by government of India. I respect you of all for ever by hearty.
ReplyDeleteCan i share this on Facebook please??
ReplyDeleteMy salute to this brave , winner of two Mahavir Chakras.
ReplyDeleteMy Salute to Col.Chevang,BRO & officials of Ministry of Defence.
ReplyDeleteUtterly shameful on the part of Indian Media.For them money is important than National interest.
I request this post to be published in Hindi and English also so that large population acrobat our Bharat come to know about this Great Warrior. Thanks.
ReplyDeleteI am proud of our defence forces....
DeleteSalute to this brave soldier
DeleteHats of
Ek mahtvachi mahiti milali dhanyawad vinayji!
DeleteMy salute to the brave Col.ChevangRinchen and BRO very good information hats off to you.
Deleteशतशः प्रणाम अशा शूरवीर भारतसुपूत्रास 🙏🙏🙏
DeleteMy salute to this brave , winner of two Mahavir Chakras.
ReplyDeleteजय हिंद!!
ReplyDeleteMy Salute to this brave, Winner of to Mahavir Chakras.
ReplyDeleteजय हिंद.
ReplyDeleteअशाच प्रखर देशभक्तांमुळे आम्हाला भारतीय म्हणताना जास्त अभिमान वाटतो.
Salute
ReplyDeleteJai Hind Colonel Chewang Raincheck.
ReplyDeleteWe will be in debt and remember you
हि खूप खेदाची गोष्ट आहे की, मिडीया वाले फक्त राजकीय नेते मंडळी च्या मागे असते.
ReplyDeleteखुप संवेदनशील माहीती आहे उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद
ReplyDelete😍😍
Salute,pranam,sastang dandavat
ReplyDeleteThanks. A very timely post.
ReplyDeleteJai Ho, salutes
ReplyDeleteभारतमातेच्या शूर वीर पुत्राला त्रिवार वंदन आणि अवघ्या १५ महिन्यात पूल बांधणाऱ्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ला सुद्धा त्रिवार वंदन. आम्हाला या लोकांमुळेच भारतीय म्हणून घेताना सार्थ अभिमान वाटतो.
ReplyDeleteThousands of Salutes
ReplyDeleteप्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे
ReplyDeleteGood knowledge. One of the greatest thing our indian made and salute to Col. Chewang Rinchen
ReplyDeleteKadak Salute to this Bravest Soldier and Lots of love and affection to him and his family.
ReplyDeleteही व अशा प्रकारची महत्वाची माहीती प्रसारीत केल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
ReplyDeleteकर्नल चेवांग रिंचेन यांच्या समोर प्रत्येक भारतीयाने नतमस्तकच असायाला हवे. 🌹🙏
Excellent ...Tributes to Col. Chewang Richen
ReplyDeleteSalute to brave soldier
ReplyDeleteविनीत जी आपले मनापासून आभार.
ReplyDeleteसुंदर माहिती दिलीत. धन्यवाद
ReplyDeleteSalute to brave soldier
Hat's off to that great personality and thanks to our government for naming the bridge. And also lots of thanks to the people who constructed the same.
ReplyDeleteकर्नल चेवांग यांना मानाचा मुजरा! माहितीबद्दल आपले अभिनंदन.
ReplyDeleteकर्नल चेवांग यांना मानाचा मुजरा
ReplyDeleteकर्नल चेवांग यांना शतशत प्रणाम
ReplyDeleteHats off
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDeleteअशी ऐतिहासिक माहिती भारतातील प्रत्येक नागरिकांनी वाचायला हवी.धन्यवाद विनीत.
ReplyDeleteभारतभूमीच्या या कर्तृत्ववान अजरामर सुपुत्राच्या जबरदस्त जीवनपटाचे वाचन करताना मन गौरवास्पद अभिमानाने भरून आले. त्रिवार वंदन !!
ReplyDeleteदृढसाहसी योद्धा कर्नल चेवांग रिंचेन यांचे शौर्य आपल्यामुळे मला माहित झाले याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.
ReplyDeleteअशा शुरवीर योद्यांची माहिती व्हायलाच पाहिजे फालतु चे मेसेज वाचण्या पेकक्षा
ReplyDelete