थोडं मनातलं... विनीत वर्तक ©
गेल्या आठवड्यात तीन घटनांनी मन थोडं हेलावून गेलं आहे. दोन घटना साहसी खेळातील तर एक घटना आपल्या घरात घडेल अशी आहे. तिन्ही घटनांमध्ये तीन वेगवेगळ्या लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ह्या तिन्ही घटनांच्या पोस्ट फेसबुक आणि व्हाट्स अप वर खुप ठिकाणी शेअर झाल्या. या तिन्ही घटनांमध्ये नक्की काय घडलं ह्याचा उपापोह त्यात झाला पण आपण ह्या घटनांमधून काय शिकायला हवं हे मात्र कुठेच दिसले नाही. त्याचसाठी थोडं मनातलं लिहावसं वाटलं.
ज्या दोन घटना ट्रेकिंग ह्या साहसी खेळात घडल्या त्या नक्कीच ह्या खेळातील जोखीम दाखवणाऱ्या होत्या. ट्रेकिंग हा खेळ साहसी क्रीडाप्रकारात येतो. त्यामुळे ट्रेकिंग मध्ये जोखीम ही खुप जास्ती आहे. योग्य काळजी न घेतल्यास एक क्षण पण आपला जीव घेऊ शकतो. तुम्ही कितीही अनुभवी असला किंवा एखाद्या चढाई वर अनेक वेळा आरोहण केलं असलं तरी प्रत्येक वेळी जोखीम ही तीच असते हे कोणीच विसरता कामा नये. जेव्हा एखादा अपघात अथवा वैद्यकीय आणीबाणी चा प्रसंग उद्धभवतो तेव्हा मिळणाऱ्या मदतीवर प्रचंड मर्यादा आहेत हे आपण नेहमीच लक्षात ठेवायला हवं. जेव्हा अशी एखादी परीस्थिती येते तेव्हा मदत पोचायला अनेक तासांचा किंवा दिवसाचा ही अवधी लागु शकतो. इतका वेळ वैद्यकीय मदती शिवाय राहणं जिवावर येऊ शकते. अपुरी सुरक्षा साधने, सुरक्षा नियमांनकडे दुर्लक्ष अथवा त्यातलं गांभीर्य लक्षात न घेणं, आपल्या शारिरीक क्षमतानंबद्दल असलेली अनास्था अथवा त्या कडे दुर्लक्ष ह्या गोष्टी ट्रेकिंग सारख्या साहसी खेळात एखाद्या अपघाताला आमंत्रण देणाऱ्या आहेत.
कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे पाऊस पडला की ट्रेकिंग करणाऱ्या संस्था प्रत्येक वर्षी बाहेर येतात. अपुरी साधने, अपुरा अनुभव, आपत्कालीन स्थितीत काय करायचे ह्याचा विचार आणि त्यावर काम करणारी यंत्रणा ह्या सगळ्या गोष्टी कुठेही लक्षात न घेता शेकडोच्या संख्येने ट्रेक आयोजित करणाऱ्या ह्या संस्थेनी साधा फर्स्ट एड बॉक्स ही तपासलेला नसतो. शेकडोंनी तरुण मुलांच्या सह्याद्री मध्ये भरलेल्या जत्रेचे फोटो आपण प्रत्येकांनी पाहिले असतील पण ह्यापैकी हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या संस्था सोडल्या तर बाकीच्यांनी ह्या गोष्टींचा कधी विचार केलेला नसतो. ह्यातील अनेक संस्था आणि ग्रुप हे ट्रेकिंग आयोजित करण्यासाठी रजिस्टर पण झालेले नसतात. तेव्हा कोणत्या संस्थेसोबत आपण जातो आहोत त्या संस्थेची माहिती तसेच आपत्कालीन यंत्रणेची माहिती आपण जाणुन घेणं गरजेचं आहे.
आजकाल मॅरेथॉन च वेड आहे. ५,१०, २१ किंवा ४२ किलोमीटर धावण्याच्या अनेक स्पर्धा होतं असतात. अनेकदा मागचा पुढचा विचार न करता सकाळी उठुन लोक २१ किलोमीटर धावतात. इकडे एक लक्षात ठेवायला हवं की धावणं आरोग्यासाठी अतिशय गरजेचं आणि उपयुक्त असलं तरी योग्य तो सराव न करता आपल्या शारीरिक क्षमतांचा अंदाज न घेता फेसबुक पोस्ट च्या फोटोसाठी धावणं जिवावर बेतू शकते. ट्रेकिंग, सायकल चालवणं, धावणं ह्या गोष्टी सरावाच्या आहेत. एखाद्या मोठ्या स्पर्धेच्या अथवा मोहिमेच्या आधी काही दिवस, महिने त्याची तयारी गरजेची आहे. ह्याशिवाय प्रत्येक ६ महिने ते वर्षातुन आपली वैद्यकीय चाचणीमुळे आपल्या शरीराच्या आत घडणाऱ्या अनेक सुप्त गोष्टींचा अंदाज आपल्याला आधीच मिळु शकतो. एखाद्या मोठ्या घटनेआधी आपलं शरीर नेहमीच आपल्याला सिग्नल देते आपण जर ह्या सिग्नल ना पकडू शकलो तर कदाचित हार्ट अटॅक सारख्या घटना टाळू शकतो.
आपल्या घरात असणाऱ्या अनेक गोष्टींच्या सुरक्षा निकषांबाबत आपण हेळसांड करतो. ही हेळसांड जेव्हा आपल्या जिवावर बेतते तेव्हा आपण खडबडून जागे होतो. नुकतीच गॅस गिझर च्या बाबतीत अश्या एका घटनेत जीव गेल्यावर गॅस गिझर वापरू नका अश्या आशयाच्या पोस्ट फिरत आहेत. पण खरच ग्यास गिझर दोषी आहे का? गेली जवळपास २० वर्ष मुंबईतील अनेक घरात ह्याचा वापर केला जातो. इलेक्ट्रिक गिझर पेक्षा स्वस्त आणि सुरक्षित म्हणुन हे गिझर सगळीकडे लोकप्रिय झाले. त्यामुळे त्यांच्या वापरा संदर्भात असणाऱ्या सुरक्षा निकषांचा विचार न करता त्यांचा वापर केल्यावर अपघात घडणार हे ओघाने आलं. आता ह्यात गॅस गिझर चुकीचा की त्याच्या सुरक्षा निकषांचे पालन न करणारे आपण ह्याचा विचार प्रत्येकाने करावा.
गॅस गिझर लावताना काही गोष्टी नेहमीच लक्षात ठेवायला हव्यात त्या म्हणजे आपल्या बाथरूम मध्ये वायुविजन (ventilation) अतिशय महत्वाचे आहे. बाथरूम हे मुंबई सारख्या ठिकाणी नेहमीच लहान असते. त्यासाठीच त्याच्या खिडक्या तिरप्या पद्धतीने असतात की ज्यामुळे हवा येतं जातं रहावी. पण प्रायव्हसी ते सुशोभीकरणाच्या नादात अनेकदा तिकडे स्लायडिंग विंडो बसवून त्या पुर्ण बंद ठेवल्या जातात. मग वायुविजन च्या नावाने बोंबला. मग ह्या अश्या ठिकाणी गॅस गिझर चा वापर केला तर ऑक्सीजन कमी होणार नाहीतर काय होणार? ह्या शिवाय जिकडे गॅस गिझर लावला आहे त्या ठिकाणी शक्यतो हवा बाहेर फेकणारा पंखा बसवल्यास वायुविजन योग्य तऱ्हेने होण्यास मदत होते. ते शक्य नसेल तर निदान गॅस गिझर चा वापर बाथरूम चा दरवाजा उघडा ठेवून करावा. ह्या साध्या गोष्टी गॅस गिझर च्या सुरक्षित वापरासाठी गरजेच्या आहेत. सुरक्षा निकषांना आपण जर आपण पाळत नसु तर घरातील प्रत्येक साधन आपला जीव घेण्याची ताकद बाळगून आहे. ह्याची जाणीव आपल्याला हवी.
काय घडलं, कसं घडलं, कोणाच्या बाबतीत घडलं ह्या पेक्षा आपण त्यातुन काय शिकलो ह्याचा विचार आपल्यापैकी प्रत्येकाने करायला हवा. धोका सगळीकडेच आहे. आनंदासाठी थोडा धोका पत्कारणं ह्यात चुकीचं काही नाही पण ते करताना आपण जर सुरक्षितेचे सगळे निकष बाजुला टाकले तर जिव जाण्यासाठी एक क्षण पुरेसा आहे.
सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

No comments:
Post a Comment