ब्राह्मोस चं ब्रह्मास्त्र... विनीत वर्तक ©
ब्राह्मोस क्षेपणास्त्र सध्या चर्चेत आहे ते त्याला विकत घेण्यासाठी लागलेल्या जगातील इतर देशांच्या रांगांवरून. जवळपास डझनभर देश सध्या ब्राह्मोस विकत घेण्यासाठी इच्छुक आहेत. ह्यातील प्रामुख्याने देश हे साऊथ इस्ट आशिया मधले आहेत. चीन च्या वाढत्या नौदल ताकदीला जश्यास तसं उत्तर देण्याची ताकत सध्या फक्त ब्राह्मोस क्षेपणास्त्राकडे आहे. ह्या क्षेपणास्त्र मध्ये असं काय आहे की अमेरीका सारख्या देशाकडे ही ह्याच्या पासुन बचाव करण्याची यंत्रणा नाही. ब्राह्मोस हे भारत आणि रशिया ह्यांची संयुक्त निर्मिती आहे. खाली ह्या क्षेपणास्त्रची काही वैशिष्ठ,
१) ह्या क्षेपणास्त्र चं वजन ३००० किलोग्रॅम असुन ८.४ मीटर लांब आहे.
२) हे क्षेपणास्त्र 'युनिवर्सल लाँच' तंत्रज्ञान असलेलं आहे. जमीन, हवा, पाणी तसेच पाण्याखालुन ही डागता येते.
३) ह्याचा वेग माख ३ इतका आहे. १ किलोमीटर च अंतर कापायला फक्त १ सेकंदाचा कालावधी ब्राह्मोस घेते. बंदुकीतुन निघालेल्या गोळी पेक्षा अधिक वेगाने आपल्या लक्ष्याचा वेध घेते. ब्राह्मोस च्या स्वनातीत वेगामुळे त्याला रोखण्यासाठी मिळणारा वेळ अतिशय कमी मिळतो.
४) ब्राह्मोस आपल्या सोबत फक्त २०० -३०० किलोग्रॅम ची स्फोटके घेऊन जाते. पण ब्राह्मोस चा वेग त्याला प्रचंड घातक बनवतो. ही ३०० किलोग्रॅम ची स्फोटके सर्वसाधारण क्षेपणास्त्रपेक्षा ९ पट अधिक नुकसान करतात. ( ब्राह्मोस ची कायनेटिक ऊर्जा बाकी क्षेपणास्त्रांपेक्षा ९ पट जास्त असल्याने होणाऱ्या विध्वंसाची तिव्रता तितकीच जास्ती आहे.)
५) ब्राह्मोस च्या केलेल्या चाचण्यांमध्ये असं दिसुन आलं आहे की ब्राह्मोस एका घावात भल्या मोठ्या युद्ध नौकांचे अक्षरशः दोन तुकडे करण्यात सक्षम आहे. ह्या चाचण्यांत दिसलेल्या ब्राह्मोस च्या क्षमतेने जगातील भल्या भल्या राष्ट्रांची झोप उडाली आहे.
६) ब्राह्मोस हवेतुन प्रवास करताना एका सरळ रेषेत प्रवास करत नाही. आपल्या शेवटच्या टप्प्यात इंग्रजी एस ह्या या अक्षराप्रमाणे ते हवेतुन वळण घेतं असल्याने त्याला निष्प्रभ करणे जवळपास अशक्य आहे.
७) ब्राह्मोस आपल्या लक्ष्याचा वेध घेण्यासाठी भारत आणि रशियाच्या दोन्ही संपर्क प्रणाली चा वापर करते. आय.एन.एस., ग्लोनास, गगन आणि जी.पी.एस. त्यामुळे कोणत्याही एका प्रणाली ला जॅम केलं तरी ब्राह्मोस ला रोखणं अशक्य आहे.
८) ब्राह्मोस ची अचुकता १ स्केवर मीटर इतकी अचुक आहे. (३०० किलोमीटर वरून १ स्केवर मीटर च्या आत ठरलेल्या लक्ष्यावर अचुकतेने मारा करू शकते.)
९) भारत आधी एम.टी.सी.आर. ग्रुप चा सदस्य नसल्याने ब्राह्मोस ची क्षमता ३०० किमी ठेवण्यात आली होती. पण आता भारत ह्या ग्रुप चा सदस्य झाल्याने आता ६०० किमी लांब मारा करू शकणाऱ्या ब्राह्मोस ची निर्मिती सुरु आहे. ह्या क्षमतेमुळे अगदी लांबुनपण ब्राह्मोस डागता येऊ शकणार आहे.
भारत आणि रशिया ब्राह्मोस च्या हायपर सॉनिक व्हर्जन वर काम करत आहे. हे क्षेपणास्त्र हवेतुन माख ७- माख ८ वेगाने जाण्यास सक्षम असणारं आहे. त्यामुळे ब्राह्मोस ब्रँड जगात अनेक देशांच्या पसंतीस उतरत आहे. भारत आणि रशिया हे तंत्रज्ञान मित्र राष्ट्र, त्यातलं अर्थाजन, त्याचा सामरिक परीणाम ह्याचा विचार करून विकणार आहे. ह्याची सुरवात ह्याच वर्षी होतं असुन भारत ब्राह्मोस मिसाईल फिलिपाइन्स ह्या देशाला विकण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या येत्या काही महिन्यात करेल.
फोटो स्रोत :- गुगल

No comments:
Post a Comment