दोन चाकांना संशोधनाचे पंख देणारा ह्रिदयेश्वर सिंग भाटी... विनीत वर्तक ©
'Intelligence is the ability to adapt to change' - Stephen Hawking
प्रत्येक माणुस जन्माला येताना आपल्या नशिबाने एक निरोगी आयुष्य घेऊन जन्माला येतो पण सगळेच तसे नशिबवान नसतात. काही लोकांच्या आयुष्याची सुरवात अंधारात होते. पण त्या अंधारात आपलं आयुष्य कुढत बसून काढायचं कि व. पु. म्हणतात तसं आयुष्याचा महोत्सव करायचा हे मात्र ज्याच्या त्याच्या हातात असते. ३ सप्टेंबर २००२ साली जन्माला आलेल्या ह्रिदयेश्वर सिंग भाटी ह्याच्या आयुष्याची सुरवात ही अशीच एका अंधारात झाली. वयाच्या चौथ्या वर्षी त्याला 'Duchenne muscular dystrophy (DMD) हा स्नायूंचा उपचार नसलेला आजार झाल्याचं निदान झालं. ह्यात स्नायूंमध्ये शक्ती नसल्याने शरीराच्या हालचालीवर मर्यादा यायला सुरवात होते. काही काळानंतर माणुस स्वतःच्या पायावर ही उभा राहु शकत नाही. ह्रिदयेश्वर सिंग भाटी मात्र ह्याने खचला नाही. त्याच ८०% शरीर खचलं तरी मनातून तो ह्या परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करत होता.
ह्रिदयेश्वर सिंग भाटीला लहानपणापासुन बुद्धिबळाची गोडी निर्माण झाली. पण हा खेळ एकाच मित्रासोबत खेळता येतं असल्याने त्याने गणिताचे शिक्षक असणाऱ्या आपल्या वडिलांकडे मोठा बुद्धिबळ पट आणण्याचा हट्ट धरला. ज्यात एकाचवेळी अनेक मित्रांसोबत बुद्धिबळ खेळता येऊ शकेल. वडिलांनी त्याला अश्या प्रकारचा बुद्धिबळ पट कुठेही नसुन हा खेळ फक्त दोघात खेळता येतो असं समजावून सांगितलं. पण त्याने ह्रिदयेश्वर सिंग भाटीच समाधान झालं नाही. एकाचवेळी अनेक लोकांसोबत बुद्धिबळ खेळता येईल असा पट तयार करण्याचं त्याने ठरवलं. आपल्या वडिलांच्या मदतीने ह्रिदयेश्वर सिंग भाटीने वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी ६ लोकांना एकत्र खेळता येईल असा बुद्धिबळ पट निर्माण केला. २०१२ साली जागतिक पटलावर (Patent) एकस्व हक्काची नोंद त्याच्या नावाने झाली. वयाच्या अवघ्या १२ व्या (Patent) एकस्व हक्क घेणारा तो सगळ्यात कमी वयाचा भारतीय ठरला तर जागतिक पटलावर सगळ्यात कमी वयाचा (Patent) एकस्व हक्क घेणारा दिव्यांग व्यक्ती ठरला.
ह्या संशोधनासाठी त्याला (CavinKare Ability Special Recognition Award) ने जागतिक पटलावर सन्मानित करण्यात आलं. ह्या नंतर ह्रिदयेश्वर सिंग भाटी थांबला नाही. आपल्या संशोधनाला पुढे नेताना एकाच वेळी १२ ते ६० व्यक्ती बुद्धिबळ खेळू शकतील अश्या बुद्धिबळ पटलाची त्याने निर्मिती केली असुन त्याची (Patent) एकस्व हक्काची प्रक्रिया सुरु आहे. सुडोकू ह्या खेळात ही त्याने १६-१६ घरांच्या खेळाच्या पटलाची निर्मिती ह्याशिवाय दिव्यांग व्यक्तींसाठी रॅम्प ची निर्मिती त्याने केली आहे. ह्या रॅम्पमुळे दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेअर ने गाडीत प्रवेश करणे सहज सुलभ झाले आहे. ह्रिदयेश्वर सिंग भाटीने नुकतीच मारुती मोटर्स सोबत मारुती इको गाडीची निर्मिती केली असुन त्याच्या ह्या निर्मितीची (Patent) एकस्व हक्क प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. (Cheapest wheel chair accessible mobility vehicle of world.)
लहानपणी एका अंधारमय आयुष्याला सामोरे गेलेल्या ह्रिदयेश्वर सिंग भाटी वर महान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग ह्यांचा खुप प्रभाव आहे. माझ्याप्रमाणे त्यांना ही अश्याच एका दुर्धर आजाराने ग्रासलं होतं पण विश्वाची कोडी सोडवण्यापासुन त्यांना त्यांचा आजार थांबवू शकला नाही. मला ही त्यांच्या प्रमाणे एक वैज्ञानिक बनायचं आहे असं तो आवर्जुन सांगतो,
"I want to be like Hawking who become a famous scientist despite suffering from motor neuron disease."
नुकतचं ह्रिदयेश्वर सिंग भाटीला भारतातील प्रतिष्ठित अश्या 'Bal Shakti Award' ने राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं आहे.
"Bal Shakti Award is given to children in the fields of innovation, social service, education, sports, arts and culture and bravery. Under this, a medal, a cash prize of Rs one lakh, a certificate and a citation are given".
आपल्या व्हीलचेअर च्या दोन चाकांना संशोधनाचे पंख लावून महान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग ह्यांचा वारसा पुढे नेणाऱ्या ह्रिदयेश्वर सिंग भाटी ह्याला माझा सलाम. त्याची जिद्द, चिकाटी आणि अंधकारमय आयुष्याचा महोत्सव करण्याची वृत्ती नक्कीच त्याच्या सोबत भारताचे नाव जागतिक पटलावर मोठं करेल ह्या बद्दल माझ्या मनात शंका नाही.
फोटो स्रोत :- गुगल
सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

देश अश्याच लोकांच्या खांद्यावर बसून प्रगती करीत असतो.
ReplyDelete