Sunday 4 April 2021

ज़रा आँख में भर लो पानी... विनीत वर्तक ©

 ज़रा आँख में भर लो पानी... विनीत वर्तक ©

आज हा फोटो बघितला आणि एकाच वेळी दोन्ही डोळ्यातून वेगळ्या कारणांसाठी अश्रू आले....  

एकीकडे काल झालेल्या हमल्यात २२ जवान हुतात्मा झाले आहेत तर ३१ जवान जखमी झाले आहेत. एकाचवेळी तिन्ही बाजूने जवळपास ४०० नक्षल आतंकवादी आपल्या जवानांना घेरून मशिनगन ने हल्ला करतात. त्यांच्यासमोर हाताच्या बोटावर मोजता येतील इतके जवान आपल्या प्राणाची पर्वा न करता लढा देतात आणि धारातिर्थी पडतात. काल  झालेला हल्ला हा भारताच्या बाहेरच्या शत्रूंनी केलेला नाही तर घरातील घरभेदी लोकांनी केलेला आहे म्हणून त्याची तीव्रता जास्त आहे. या नक्षल लोकांना पाठिंबा देणारे आणि त्यांच्या नावाने टाहो फोडणारे सगळेच आज गुपचूप लपून बसले आहेत. आज त्यांना रक्ताचा पडलेला सडा दिसणार नाही. आज त्यांना त्या जवानांच्या घरच्यांचा आक्रोश दिसणार नाही, आज ते लोक त्या जवानांची जात, धर्म शोधायला जाणार नाहीत. आज ते लोक मेणबत्ती चा मोर्चा काढणार नाही. आज ते लोक या गोष्टीचा निषेध करणार नाहीत. आज ते लोक कोण्या आंतरराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्त्याला भारताची परिस्थिती सांगून ट्विट करायला सांगणार नाहीत. आज मानवाधिकार समितीचे लोक यावर काही बोलणार नाहीत. आज ना कोणी याचा निषेध करणार. ना आज कोणी आपले पुरस्कार परत करणार. कारण शांतीची कबुतरे उडवणारे आज आपले डोळे, कान आणि तोंड त्या ३ माकडांसारखे बंद करून बसले आहेत. 

हे घरभेदी लोक आपल्या आजूबाजूलाच आहेत. छुप्या पद्धतीने राजकारण करून समाजात तेढ वाढवायची आणि मग मी नाही त्यातलाच म्हणत आपलं तोंड लपवायचं हीच पद्धत आजतागायत ते वापरत आलेले आहेत. एकाने कोणीतरी आत्महत्या केली म्हणून त्याची जात शोधून त्याला भेटायला जाणारे राजकारणी लोकशाही मेली म्हणून सुतक मनवतात पण तेच लोकशाही चे रक्षणकर्ते आज साधं निषेध करू शकत नाही हाच त्यांचा खरा चेहरा आहे. काल आर.आय.पी. आणि भावपूर्ण श्रद्धांजली लिहून अनेकांनी एक पान पुढे केलं असेल. कारण ते २२ कोण हे जाणून घ्यायची जाणीव होण्याइतपत ना आम्हाला गरज आहे ना आमची तशी तयारी आहे. लढलेले तिकडेच निघून गेले आणि जखमी झालेले पुन्हा येतील पण आम्हाला त्याच काहीच नाही. संवेदना आणि दुःख हे आमच्या अंतर्मना पर्यंत कधी जात नाही. याला कारण आमचा तिकडे फायदा नाही. आज या न त्या कारणासाठी मोर्चा ते काढणार नाहीत. आज ते उपोषणाला बसणार नाहीत. आज सरकारला त्या बद्दल जाब विचारणार नाहीत. कारण जिकडे जीव टांगणीला तिकडे आम्हाला काहीच देणं घेणं नाही.

इतका मोठा हल्ला हा घरभेदी लोकांशिवाय शक्यच नाही. पण उद्या त्याचा बदला घेतला तर हेच आज लपलेले साप फुत्कारत बिळातून बाहेर येतील. संविधानाची पुंगी वाजवत आणि मानवी हक्कासाठी लढा उभारतील. जातीचं, धर्माचं जे हत्यार उपसता येईल ते म्यानातून बाहेर काढतील. कारण आमच्या संवेदना या सुद्धा आजकाल फायदा, राजकारण, आणि पैसे बघून निर्माण होतात. लाल झेंडा घेऊ की भगवा की  हिरवा हे आजकाल विचारांनी नाही तर आमच्या फायद्याने ठरवतो. त्यामुळे त्या २२ जवानांन बद्दल आम्ही काही वाटून घेण्याचं कारण नाही. 

पण या सगळ्यात ते मात्र वेगळे आहेत..... 

डेप्युटी कमांडंट संदीप द्विवेदी सरांसारखे आमचे जवान आणि ऑफिसर वेगळे आहेत. अंगावर दोन गोळ्या झेलून सुद्धा त्याच आम्हाला कसलीच भीती नाही. आज त्यांचा फोटो बघितल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरअसणार ते स्मित हास्य खूप काही सांगून जाते. मी जखमी आहे पण मी लढलो आहे. मी पुन्हा लढेन या आशेवर थम्प्स अप करत त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना आत्मविश्वास दिला आहे. काही भारतीयांच्या घाणेरड्या राजकारण आणि विचारांना बळी न पडता या घरभेदी शत्रुंना ठोकूच हा तो आत्मविश्वास आहे. तो आत्मविश्वास बघून आज माझ्या दुसऱ्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. आज गरज आहे ती प्रत्येक भारतीयांनी हा आत्मविश्वास दाखवण्याची आणि जे कोणी अश्या पिलावळीच समर्थन करतात त्यांच्या विचारांना जागीच ठेवण्याची. बंदुकीच्या गोळ्यांनी याचा बदला घेतला जाईलच पण शब्दांनी या कुत्सित विचारांना ठोकण्याची जबाबदारी एक भारतीय म्हणून आपण स्विकारायला हवी. त्यासाठी कोणत्या पक्षाचा झेंडा हातात घेण्याची गरज नाही. विचारांना विचारांनी ठेचायचं असते ते समजण्याची प्रगल्भता जरी आपण आत्मसात केली तर त्या २२ जवानांना ती श्रद्धांजली असेल असं मला वाटते. 

वीरगतीला प्राप्त होऊन हुतात्मा झालेल्या त्या २२ जवानांना माझा कडक सॅल्यूट. 

"We didn't start this war, but we will bloody hell finish it,” 

जय हिंद!!!

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 



94 comments:

  1. जय हिंद...भारत माता की जय..

    ReplyDelete
    Replies
    1. सलाम तुमच्या शौर्याला सलाम तुमच्या धैर्याला आपणच भारतमातेचे सच्चे सुपुत्र आहात.धारातिर्थी पडलेल्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करायला शब्द अपुरे आहेत.फितुरी करणारे नीचतेची परिसीमा भारतीय सैनिक त्यांना सोडणार नाहीत हे निश्चित.

      Delete
  2. जय हिंद
    भारत माता की जय 🇳🇪🇳🇪

    ReplyDelete
  3. जय हिंद
    भारत माता की जय 🇳🇪🇳🇪

    ReplyDelete
  4. जयहिंद। 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

    ReplyDelete
  5. It's time to finish the war

    ReplyDelete
  6. Great 👍 Heroes of India

    ReplyDelete
  7. 🙏🙏जय हिंद 🙏🙏
    भावपूर्ण श्रद्धांजली

    ReplyDelete
  8. Jai Hind
    भावपूर्ण श्रद्धांजली

    ReplyDelete
  9. Jai hind ..Jai Jawan....Bharat mata ki jai ...we all salute u 🙏🙏🙏🙏

    ReplyDelete
  10. लेख मनाला भिडणारा आहे. संताप आणणारा आहे.आपल्या नावासह पुढे पाठवू का?

    ReplyDelete
  11. अतुलनीय साहसी जवान आहेत आपले

    ReplyDelete
  12. जय जवान तुमचे बलिदान व्यर्थ जाणार नाही

    ReplyDelete
  13. भावपूर्ण श्रद्धांजली... तूमच आर्टिकल शेअर करू शकतो काय...

    ReplyDelete
  14. अतिशय दुःखद,💐🙏😔

    ReplyDelete
  15. We proud of u and salute to u

    ReplyDelete
  16. Jai hind ..Jai Jawan....Bharat mata ki jai ...we all salute u 🙏🙏🙏🙏

    ReplyDelete
  17. भारत माता की जय

    ReplyDelete
  18. सूड सूड सूड, बदला लवकरच 🙏

    ReplyDelete
  19. ह्यांचा चुरा करून टाका. आता हे अति होतय

    ReplyDelete
  20. हम होंगे कामयाब।जय हिंद।

    ReplyDelete
  21. Oh. Very Sad brutal attack .

    ReplyDelete
  22. जय हिंद. भारत माता की जय. Salute to the brave heart. 👍

    ReplyDelete
  23. जय हिंद भारत माता की जय!

    ReplyDelete
  24. Zabardast write up...👏👏

    Our salute to the brave fighters of Indian Security Forces...
    🇮🇳
    🙏🙏🙏

    I fully agree with the Author....👏👏👍👍

    "We didn't start this war,
    but we will bloody hell finish it"...😡😡👍👍

    ReplyDelete
  25. Zabardast write up...����

    Our salute to the brave fighters of Indian Security Forces...
    ����
    ������

    I fully agree with the Author....��������

    "We didn't start this war,
    but we will bloody hell finish it"...��������

    ReplyDelete
  26. खरच हे बलिदान अलौकिक आहे पण आम्ही यास पात्र आहोत का?
    फलकको चाहँ है जहाँ बिजलियाँ गिरानेकी
    हमेभी जिद है वही आशियाँ बनानेकी
    जयतु भारतम्

    ReplyDelete
  27. खरच हे बलिदान अलौकिक आहे पण आम्ही यास पात्र आहोत का?
    फलकको चाहँ है जहाँ बिजलियाँ गिरानेकी
    हमेभी जिद है वही आशियाँ बनानेकी
    जयतु भारतम्
    डाॕ स्मार्ता पवार

    ReplyDelete
  28. Jai Hind. Salute to our brave soldiers. 🙏

    ReplyDelete
  29. Who so ever they are, who so ever their supporters are, take them out from theie hidden holes and teach them a lesson which should set a detteren example for all such people.

    ReplyDelete
  30. शब्द....निशब्द

    ReplyDelete
  31. शब्द.....निशब्द

    ReplyDelete
  32. जय हिंद

    ReplyDelete
  33. Mere bhartiya javan apna balidan yuhi kabtak dete rahenge sarkar ko jaha jaha bakshal aria ya ugravad hai vaha human rights kayda hatakar javano ko khuli sut deni chahiye mere Shahid javano ko bhavpurna shrdhanjli 🙏🙏💐💐 jai hind

    ReplyDelete
  34. जय हिंद, व्यर्थ न जाओ बलिदान या शूर विरांचे भारतमत्ता कि जय

    ReplyDelete
  35. शहीद जवानांना विनम्र श्रध्रदांजली!या हल्ल्ल्यामागे लपलेल्या नराधमांना वेचून मारले पाहिजे.जवानांचामार्ग हल्लेखोरंना आधीच कळवणारे,त्यांना हत्ययारे पुरवणारे घरभे शोधून ठेचले पाहिजेत.v

    ReplyDelete
  36. माझाही कडक सॅल्यूट. जय हिंद!

    ReplyDelete
  37. माझाही कडक सॅल्यूट. जय हिंद!

    ReplyDelete
  38. जय हिंद 🙏🇮🇳🙏

    ReplyDelete
  39. मनाला भिडणारा अतिशय संवेदनशील लेख.
    खूप प्रामाणिक भावना. Salute

    ReplyDelete
  40. भारत मातेच्या रक्षणासाठी बलिदान दिलेल्या माझ्या शूरवीर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अतिशय दुःखद घटना आहे

    ReplyDelete
  41. शहीद भारतीय जवानांच्या आत्म्यास सद्गती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🏻. भारतीय सेनादलाच्या जवानांच्या अतुलनीय कामगिरीसाठी सॅल्युट हवाई मार्गाने हल्ला करून माओवाद्यांची ठिकाणे उध्वस्त करण्याची परवानगी शासनाने द्यावी

    ReplyDelete
  42. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
    भारत माता की जय

    ReplyDelete
  43. आपला लेख वाचला. सकाळी नुसती बातमी वाचली होती हा लेख वाचून मागील बर्‍याच घटना आठवल्या. तुमच्या मतांशी सहमत आहे.

    ReplyDelete
  44. Humare jaanbaz nidar sipahee. Salute.

    ReplyDelete
  45. JAY HIND SIR GI
    💐💐💐💐💐💐💐💐💐

    ReplyDelete
  46. धारातीर्थी पडलेल्या जवानांना श्रद्धांजली. जखमी जवानासाठी ईश्वराकडे प्रार्थना m

    ReplyDelete
  47. जय हिंद 👍👌भारत माता की जय 👍जय जवान 👍

    ReplyDelete
  48. जय हिंद 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

    ReplyDelete
  49. जय हिंद! जय जवान! जय भारत माता!!

    ReplyDelete
  50. जय हिंद! भारत माता कि जय!

    ReplyDelete
  51. Jay Hind Veer Jawan Amar Rahe 🙏🙏🙏
    And Grand Salute My Dear Fighetr Soldiers...Your Not Only Humen your Actual God... Thanks For You And Get Well Soon Sir...

    ReplyDelete
  52. Jayhind Bharatmata ki jay hum San ok hai🇪🇬🇪🇬

    ReplyDelete
  53. DHAN NIRANKARJI JAI HIND JAI BHARAT JAI HINDUSTAN HON LORD SADGURU NIRANKARJI MATAJI BLESS YOU AND YOUR FAMILY BEST WISHES BY JHANHVI SANDIP DESHMUKH FAMILY THANKS DHAN NIRANKARJI

    ReplyDelete
  54. Jay hind jay bharat sir selute

    ReplyDelete
  55. शेवटचा नक्शली आणि त्यांचे बाप शोधून काढून त्यांचीही अशीच गत शासनाने करावी म्हणजे यांची पूढे अशी हिंमत होणार नाही.
    जयहिंद!! वंदेमातरम्!!!

    ReplyDelete
  56. सरजी, ना हम हर कर भी जित है आज उनका दिन है कल हमारा दिन होगा ओभि खतरनाक ,,नक्सल मुर्दाबाद,,
    जय हिंद सर,,

    ReplyDelete
  57. 🌹🙏🌹सर्व प्रथम माझे शाहिद झालेल्या बांधवाना मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो!🌹🙏🌹जख्मी झालेल्या बांधवाना ईश्वर चरणी प्रार्थना करतो कि त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी!🌹🙏🌹आणि त्यांच्या परिवाराला ह्या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो!🌹🙏🌹
    आपण अतिरेक्यांसाठी बाहेर देशात जाऊन सर्जिकल स्ट्राईक द्वारे सर्व उध्वस्त करून येतो!येथे तर माओवादी, नक्षलवादी देशांतर्गत असल्याने आपल्याला बरेच काही करून कायमचे नष्ट करता येते!🤔 मग वेळ का गमवायचा!!👁️‍"जय-हिंद"

    ReplyDelete
  58. Jay Hind. Jay Hindki Sena. Salute to all "Shahids”. Salute to Sandip Dwivediji. Get well soon sirji.

    ReplyDelete
  59. सर्व प्रथम माझ्या शाहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण करतो
    जय हिंद . पंतप्रधान मोदींना हात जोडून विनंती यांचा बदला जरूर घ्या.तरच शहिद जवानांच्या आत्मयास शांती लाभेल

    ReplyDelete
  60. शतशः प्रणाम। धन्य ते मातापिता।धन्य शूरवीर।

    ReplyDelete
  61. Swatahachya jivachi parva n karatach fakt ya matrubhumichach vichar karanarya ya veer javananna shat koti pranam...
    Bharat Mata ki Jai
    Vande Mataram...

    ReplyDelete
  62. शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली

    ReplyDelete
  63. या जवानांना ज्यांनी मारलं त्यांना पकडून शिक्षा देने हीच खरी श्रद्धांजली होईल. 🙏🙏 भावपूर्ण श्रद्धांजली🌹🌹🌹🌹

    ReplyDelete
  64. याचा बदला घेतलाच पाहिजे.

    ReplyDelete
  65. जय हिंद, जय जवान

    ReplyDelete
  66. जय हिंद !,🙏😔🌹

    ReplyDelete