Monday, 25 July 2016

उंचच उंच... विनीत वर्तक

माणसाला उंचीच कायम आकर्षण राहील आहे. अगदी पाच हजार वर्षापूर्वी पिऱ्यामिड बांधताना ते उंच असतील अस बघितल गेल. जवळपास १५० मीटर इतके उंच ते उभारले गेले. आजही इतक्या शतकानंतर माणसाची उंचच उंच जाण्याची शर्यत सुरु आहे. अश्या काही उंचच उंच वास्तू जवळून बघण्याचा तसेच त्या उंचीवर जाऊन जमिनीकडे बघण्याचा योग कामाच्या निमित्ताने आला. प्रत्येक वास्तू हि मानव निर्मित असली तरी प्रत्येकाच एक वेगळच वैशिष्ठ आहे. त्यातील दोन वास्तू माझ्या खूप जवळच्या आहेत. थ्रिलिंग वाटेल आणि उंचीचा किंवा खोलीचा एक वेगळ्याच अनुभव देणाऱ्या वास्तू आयुष्यात प्रत्येकांनी शक्य असेल तर एकदा तरी नक्कीच अनुभवाव्यात.

जगातील उंच बिल्डींग म्हणजे पेट्रोनास टॉवर (कौलालंपूर- मलेशिया), एम्पायर स्टेट ( न्यू योर्क- अमेरिका ), वर्ल्ड ट्रेड सेंटर किंवा आताचा फ्रीडम टॉवर ( न्यू योर्क- अमेरिका), बाययोके टॉवर – टू (ब्यांग्कोक -  ह्या वास्तू बघतानाचे क्षण नक्कीच अविस्मरणीय असेच होते. पायथ्याशी उभ राहून पूर्ण मान वर करून उंचीचा अंदाज घेताना माणसाच्या कौशल्य किती प्रचंड आहे ह्याची जाणीव होते. पण उंचीची सगळ्यात जास्ती जाणीव किंवा धाकधूक कुठे जाणवली असेल तर ते म्हणजे बुर्ज खलिफा ( दुबई- यु ए ई ).

मला भावलेली आणि आवडलेली जगातील सर्वात उंच मानव निर्मित वास्तू अशी बिरुदावली मिरवणारी हि बिल्डींग खरोखरीच अदभूत अशी आहे. तब्बल ८२९.८ मीटर उंच असणारी हि बिल्डींग तिच्या वेगळ्याच आकारामुळे खूप आवडली. बंडल ट्यूब अशी रचना असणारी हि बिल्डींग दुबईच्या कोणत्याही कोपर्यातून उठून दिसते. १४८ मजल्यावरून म्हणजे तब्बल ५५५ मीटर वरून दुबई बघताना स्तिमित व्हायला होते. चांगल्या वातावरणात आणि ओहोटीच्या वेळी इराण चा समुद्र किनारा हि दिसतो. दुबईतले रस्ते, बिल्डींग्स, कारंजे वरतून बघताना खूपच रोमांचित करणार आहे.

उंचीचा जाणवलेला दुसरा रोमांच मात्र वेगळाच आहे. उंचावर तर जाऊन आलो. पण आपल्या खाली प्रचंड खोल अशी दरी असेल तर. आपण चालताना खाली काहीच नाही असा भास झाला तर. एक क्षण अस वाटेल कि अस कस शक्य आहे. पण अस शक्य आहे ते ग्र्यांड केनियन स्काय वॉक येथे. घोडाच्या नालीच्या आकाराप्रमाणे असणारे हे स्काय वॉक पूर्णतः पारदर्शक आहे. कोलोऱ्याडो नदी पासून ह्याची उंची आहे ३५० मीटर. ह्यावरून चालत जाताना आपण हवेतून चालतो असाच भास होतो. तुटेल ह्या भीतीने लोक रेलिंग चे हात पण धरतात. तब्बल २४० मीटर उंचावरून आपण हवेतून चालत असतो. ग्र्यांड केनियन च्या दरीवरून चालताना चा क्षण हा मला सगळ्यात जास्ती रोमांचित करणारा वाटला. एक अनामिक भीती नक्कीच वाटत होती. क्यामेरा नेण अलाउड नसल्याने काही ते क्षण फोटोत बंदिस्त नाही करता आले पण मनात मात्र ते कायम कोरले गेले.


माणसाच्या अत्युच्य अश्या अभियांत्रिकीचे दाखले देणाऱ्या ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे माणसाच्या उंचच उंच स्वप्नांना दिलेले पंख आहेत. हवेत तरंगण्याचा आणि खूप उंचावरून खाली बघण्याचा आनंद लुटायचा असेल तर ह्या दोन्ही उंचीनां आपण एकदा तरी आयुष्यात भेट द्यायलाच हवी. 
विसात एक .. विनीत वर्तक

कालपासून उत्सुकता ताणली गेली होतीच. तब्बल एक - दोन नाही तर २० उपग्रह एकाच वेळी प्रक्षेपित करण्यासाठी भारतीय अंतराळ संस्था अर्थात इस्रो ने कंबर कसली होती. २००८ ला तब्बल १० उपग्रह एकाच वेळी प्रक्षेपित करून इस्रो ने एक जागतिक विक्रम केला होता. त्या नंतर नासा, रशियन स्पेस एजन्सी नि तो मोडला पण तरीही अश्या प्रकारे एकाच रॉकेट मधून वेगवेगळ्या कक्षेतील उपग्रहाना त्यांच्या योग्य त्या कक्षेत स्थापन करणे खरोखर रॉकेट सायन्स म्हणजेच अतिशय किचकट अशी प्रक्रिया आहे.

एकाच रॉकेट च्या सहायाने वेगवेगळ्या वजनाच्या, आकाराच्या, वेगवेगळ्या उपयोगाच्या भारतीय नव्हे तर तब्बल ४ वेगवेगळ्या राष्ट्रांच्या उपग्रहाना त्यांना हव्या असलेल्या कक्षेत स्थापन करणे हे आपल्या रॉकेट डिझाइन च खूप मोठ यश आहे. आपल्या घरातील वस्तू आपण आपल्याला हव्या तश्या किंवा घराला पूरक होतील अश्या डिजाइन करू शकतो. पण दुसर्यांच्या वस्तू आपल्या घरात सामावून घेऊन त्यांना समोरच्याला हव्या त्या ठिकाणी ठेवण जितक कठीण तितकच जगाच्या दोन टोकांवर निर्माण झालेल्या उपग्रहाना एकाच रॉकेट वरून प्रक्षेपित करण.

२० उपग्रहान पेकी १ भारताचा २ भारतातील युनवरसिटी चे त्यातील एक पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग चा स्वयंम तर सत्याबामा स्याट हा सत्याबामा युनवरसिटी चेन्नई चा होता. तब्बल १७ उपग्रह अमेरिका, क्यानडा, जर्मनी, इंडोनेशिया चे होते. १७ उपग्रह कमर्शियल मार्केट मध्ये इस्रो चा वाढत चाललेला दबदबा दाखवून देतात. आत्तापर्यंत १००% यश मिळवणाऱ्या इस्रो ची किमत जगातील सर्वात स्वस्त आहे. त्यामुळे अनेक प्रायवेट उपग्रह पाठवणार्या संस्था जश्या एरियन, स्पेस एक्स वगरे ह्यांना प्रचंड अशी स्पर्धा निर्माण करत आहे. एकाच वेळी अनेक उपग्रह पाठवल्याने त्यामागचा खर्च प्रचंड कमी करण्यात इस्रो ला यश आल आहे.

अनेक उपग्रह पाठवताना अनेक गुंतागुंतीच्या प्रक्रिया असतात. ह्यातील एक म्हणजे एकाच वेळी सगळ्या उपग्रहांच प्रक्षेपण होऊ नये तसच त्यांची एकमेकांशी टक्कर होऊ नये म्हणून प्रक्षेपित करताना अंतर ठेवावे लागते. तसेच वेगवेगळ्या कक्षेत जाण्यासाठी वेगवेगळ्या अंतरावर अग्निबाण प्रज्वलित होणे गरजेचे असते. समजा ४ उपग्रह ५०० किमी च्या कक्षेत स्थापन केले तर पुढचे ५ कदाचित ५४२ किमी च्या कक्षेत असू शकतात अश्या वेळी अग्निबाण पुन्हा प्रज्वलित होऊन रॉकेट च्या सहायाने उरलेल्या ५ उप्ग्रहण ५४२ किमी च्या कक्षेत नेणे क्रमप्राप्त असते. अग्निबाणाला पुन्हा प्रज्वलित करून पुन्हा बंद करणे हि प्रक्रिया अतिशय जोखमीची असते. कारण हि उंची गाठायला ३-४ सेकंदाच प्रज्वलन फक्त गरजेचे असते. ते हि योग्य वेळेत म्हणजे गाडीच इंजिन नेमक्या वेळी फक्त ४ सेकंद चालू करायचं म्हंटल तर किती कठीण असेल ते हि चावी आपल्या हातात असताना तर मग काहीच कंट्रोल नसताना जमिनीवरून अवकाशात हे इंजिन सुरु करण किती क्लिष्ठ असेल ह्याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो.    

जर उपग्रहांची मांडणी बघितली तर ती वर्तुळाकार स्वरूपात असते. म्हणजे हे २० उपग्रह वर - खाली गोलाकार पद्धतीने ठेवलेले असतात. ह्याचा अर्थ प्रत्येक उपग्रहाला कक्षेत सोडण्यासाठी रॉकेटला स्वताला ओरीयंट करावे लागते. म्हणजे जो उपग्रह सोडणार तो त्या दिशेने वळवावा लागतो. कक्षेची उंची आणि उपग्रहाची दिशा ह्याचा योग्य तो समन्वय साधल्या नंतरच त्याच प्रक्षेपण केल जात. अवघ्या २६ मिनिटात उड्डाण ते सगळ्या उपग्रहांची त्यांच्या कक्षेत मांडणी केली गेली. ह्यावरून किती प्रचंड गुंतागुंतीच्या प्रक्रिया पूर्ण केल्यावर हे यश मिळते. म्हणूनच विसात एक हे यश इस्रो , भारत आणि अवकाश संशोधनाच्या प्रचंड मोठा टप्पा आहे. येत्या काळात पी. एस. एल. व्ही च्या मदतीने एकाच वेळी अतिशय जास्त तफावत असणार्या कक्षेत उपग्रहांची मांडणी करण्याचा इस्रो च संशोधन चालू आहे. त्याच वेळी १००% यशासह पी. एस. एल. व्ही ने भारताची पताका अवकाशात खूप उंचीवर फडकत ठेवली आहे. 
The Man Who Knew Infinity... विनीत वर्तक

श्रीनिवास रामानुजन म्हणजे गणिताला पडलेल अदभूत स्वप्न. अवघ्या ३२ वर्षाच्या आयुष्यात त्यांनी तब्बल ३९०० प्रमेय त्यांनी मांडलीत. त्यातील जवळपास सगळीच प्रमेय आता गणिताच्या भाषेत बरोबर आहेत हे आता सिद्ध झाल आहे. १८८७ ते १९२० अश्या छोट्या आयुष्यात त्यांनी जे गणितामध्ये काम केल. ते अजूनही कोणाला जमलेलं नाही. वयाच्या अवघ्या ३१ वर्षी लंडन येथील रॉयल सोसायटी ची फेलोशिप मिळाली. असा बहुमान मिळवणारे ते दुसरे भारतीय होते. १९१८ साली ट्रिनिटी कॉलेज केंब्रीज ची फेलोशिप सुद्धा त्यांना मिळाली. हा बहुमान मिळवणारे ते पहिले भारतीय होते.

गणित आणि अवकाश ह्या दोन्ही क्षेत्रात भारत नेहमीच अग्रेसर राहिला आहे. भारतीयांच्या ह्या बुद्धिमत्तेचे अटकेपार झेंडे जर कोणी लावले असतील तर श्रीनिवास रामानुजन ह्यांनी. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी गणितातील ५००० थियरम वाचून काढली होती. पुढल्याच वर्षी म्हणजे अवघ्या १७ व्या वर्षी त्यांनी बर्नोली नंबर तसेच युरल- मास्चोरेनी कोन्सटट त्यांनी १५ डेसिमल प्लेसेस पर्यंत आकडेमोड केला होता. ह्या वयात अश्या अदभूत बुद्धिमत्तेने त्यांनी जगात आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. त्यांनी सबमिट केलेले पेपर तर त्या काळातील गणिती विद्वानांना हि बुचकळ्यात टाकत होते.

पण ह्या बुद्धिमत्तेला जी. एच. हार्डी ह्या इंग्लिश गणित तज्ञाने ओळ्खल आणि त्यांना संशोधनासाठी इंग्लंड ला बोलावलं. रामानुजन जे कार्य केल त्यांच्या विद्वत्तेला हार्डी ह्यांनी आपल्या एका वाक्यात सगळ स्पष्ट केल आहे.

Hardy's personal ratings of mathematicians. Suppose that we rate mathematicians on the basis of pure talent on a scale from 0 to 100, Hardy gave himself a score of 25, J.E. Littlewood 30, David Hilbert 80 and Ramanujan 100.'"

रामानुजन ह्यांनी गणितातील असे शोध लावले ज्यावर प्रचंड अस संशोधन आजही चालू आहे .

His original and highly unconventional results, such as the Ramanujan prime and the Ramanujan theta function, have inspired a vast amount of further research.”

हार्डी आणि रामानुजन नंबर १७२९ हा हि एक गणिती शोध रामानुजन ह्यांनी लावला. ह्याच्या मागची कथा मोठी मजेशीर आहे.

The number 1729 is known as the Hardy–Ramanujan number after a famous visit by Hardy to see Ramanujan at a hospital. In Hardy's words:[94]
I remember once going to see him when he was ill at Putney. I had ridden in taxi cab number 1729 and remarked that the number seemed to me rather a dull one, and that I hoped it was not an unfavorable omen. 'No', he replied, 'it is a very interesting number; it is the smallest number expressible as the sum of two cubes in two different ways.'
Immediately before this anecdote, Hardy quoted Littlewood as saying, "Every positive integer was one of [Ramanujan's] personal friends."[95]
The two different ways are
1729 = 13 + 123 = 93 + 103.
Generalizations of this idea have created the notion of "taxicab numbers".


असा हा भारतीय गणितज्ञ आपल्या मागे एक खूप मोठा वारसा ठेऊन गेला. पण आपल्याच पूर्वजांना विसरण्यात धन्यता मानणारे आपण जेव्हा जगाने नोंद घेतली जाते. तेव्हा जागे होतो. सलमान खान, शाहरुख खान आणि आमीर खान मध्ये डूबलेल्या त्यांचे तद्दन फालतू आणि टुकार पिक्चर बघण्यासाठी तिकीटबारीवर गर्दी करणाऱ्या सो कोल्ड सुजाण प्रेक्षकांना ह्या उत्तुंग व्यक्तिमत्वावर एक चांगला सिनेमा येऊन गेला हे माहित हि नसेल.


ज्यांच्या स्मरणार्थ आपण २२ डिसेंबर हा दिवस गणिती दिवस साजरा करतो. त्या भारताच्या अदभूत गणिती तज्ञावर हॉलीवूड ने एक सिनेमा काढला. देव पटेल चा हा चित्रपट चुकवू नये असाच होता. पण टुकार खानांच्या गर्दीत जगाला गणित शिकवणाऱ्या गणित तज्ञाच्या आयुष्य जवळून अनुभवण्याचा योग मात्र आपण हरवून बसलो. म्हणून कदाचित फायनाइट मद्धे रमणाऱ्या लोकांना कस कळणार... “The Man Who Knew Infinity
हे विश्व आमुचे घर...  विनीत वर्तक

मनुष्य प्राणी कितीहि मोठा झाला तरी तो ह्या विश्वाच्या मानाने किती सूक्ष्म आहे. ह्याचा विचार केला तर भोवळ येईल. ज्या पृथ्वीवर आपण नांदतो. ती एका सोलार सिस्टीम चा भाग आहे. ह्यातील सगळ्यात मोठा ग्रह गुरु आहे. पृथ्वी तब्बल १२० पट गुरुपेक्षा लहान आहे. आपली पूर्ण सोलार सिस्टीम ज्या आकाशगंगेचा भाग आहे त्या मिल्की वे च्या मध्य भागापासून आपली सोलार सिस्टीम तब्बल ३०,००० प्रकाश वर्ष दूर आहे. (एक प्रकाशवर्ष म्हणजे एका वर्षात प्रकाश कापेल ते अंतर. प्रकाशाचा वेग आहे तब्बल ३ लाख किमी प्रती सेकंद) म्हणजे आता जो प्रकाश आपल्याला दिसतो आहे आपल्या आकाशगंगेतील तो तब्बल ३०,००० वर्षापूर्वीचा आहे. म्हणजे तिकडे आता काय चालू असेल ते समजायला अजून ३०,००० वर्ष जावी लागतील. आपल्या आकाशगंगेत अश्या किती सोलार सिस्टीम असतील. ज्याच्या बद्दल आपण पूर्णतः अनभिज्ञ आहोत.

हि तर झाली आपली आकाशगंगा आता आपल्या शेजारील सगळ्यात जवळची आकाशगंगा आहे स्पायरल अन्द्रोमेडा. ती तब्बल २.५३७ मिलियन प्रकाशवर्ष लांब आहे. ( तेथून निघालेला प्रकाश हा २.५३७ मिलियन वर्षा पूर्वीचा आहे. ). अश्या छोट्या आकाशगंगेचा मिळून एक ग्रुप तयार केला आहे. त्याला वर्गो सुपर क्लस्टर अस म्हंटल जाते. त्यात मिल्की वे, अन्द्रोमेडा सारख्या हजारो आकाशगंगा आहेत. प्रत्येक आकाशगंगेत बिलियन सूर्य आहेत आणि अगणित ग्रह. म्हणजे हजारो आकाशगंगेत किती सूर्य असतील ह्याची मोजदाद करायला अंक कमी पडतील.

आता हे प्रचंड वर्गो सुपर क्लस्टर विश्वाचा एक छोटा भाग पण नाही. असे १०० बिलियन सुपर क्लस्टर आहेत. सध्यातरी इतकच विश्व आपण बघू शकलो आहोत. त्या विश्वाची व्याप्ती अजून किती मोठी आहे कि तिथवर आपण जाउच शकलेलो नाहीत. ह्याच कारण तिकडून निघालेला प्रकाश आपल्यापर्यंत अजून पोहचू शकलेला नाही. १३.५ बिलियन वर्षापूर्वी विश्वाची उत्पत्ती झाली अस म्हणतात. कदाचित तिकडून निघालेला प्रकाश पोचायला अजून काही मिलियन, बिलियन वर्ष लागतील. हे सगळ वाचून स्तिमित व्हायला होत नाही का? आपण ह्या सर्वात किती क्षुद्र आहोत नाही का?

मानव निर्मित सगळ्यात दूरवर गेलेली गोष्ट म्हणजे वोयेजर १ हे यान. सप्टेंबर ५ , १९७७ सोडलेलं यान आता जून २०१६ पर्यंत तब्बल सूर्यापासून फक्त २.०२ X १० च्या १० व्या घाता इतक लांब गेल आहे. ज्याला इंटलस्टेलर स्पेस अस म्हणतात. अवकाश अंतराच्या मानाने हे अंतर काहीच नाही. ३८ वर्ष तब्बल १५-१६ किमी / सेकंद ह्या वेगाने प्रवास केल्यानंतर अजून सुद्धा हे यान संदेश पाठवत आहे. २०२५ पर्यंत पाठवत राहील अस नासा च म्हणन आहे. त्या नंतर जर काही आदळल नाही तर ह्याचा प्रवास असा सुरु राहील. ३०० वर्षानी ते ओर्ट क्लाउड मध्ये प्रवेश करेल. तब्बल ३०,००० वर्षांनी त्यातून बाहेर पडेल. ह्यानंतर सुद्धा त्याचा प्रवास सुरु राहिला तर ४०,००० वर्षांनी ग्लीसे ४४५ ह्या तार्या जवळ पोचेल. जो आपल्या पासून १.६ प्रकाश वर्ष दूर आहे. विश्वाचा पसारा किती प्रचंड आहे त्यात आपण एक थेंब सुद्धा नाही आहोत.


ज्या सर्व गोष्टीचा मोठेपणा आपण बाळगतो, अभिमान बाळगतो त्या ह्या विश्वाच्या पसार्यात किती क्षुद्र आहेत हे वाचल्यावर स्पष्ट झालच असेल. विश्वाची उत्पत्ती हे क्यालेंडर मानल. म्हणजे ज्या दिवशी विश्व जन्माला आल तो दिवस १ जानेवारी मानला आणि शेवट ३१ डिसेंबर ठरवला. प्रत्येक महिना १ बिलीयन वर्ष प्रत्येक दिवस ४० मिलियन वर्ष तर मानव उत्पत्ती पासून ते आजपर्यंतचा आपला इतिहास. ३१ डिसेंबर च्या रात्री ११ वाजून ५९ मिनिटे आणि ५६ सेकंद. म्हणजे अवघ्या ४ सेकंदात सामावला आहे. ज्या मानव असण्याचा आपल्याला गर्व आहे. तो ह्या विश्वाचा किती क्षुद्र भाग आहे. तेव्हा विश्वाच वैश्विक रूप खूप प्रचंड आहे. आपण तिकडे कधी पोहचू शकत नाही. पण निदान ते समजून घेतल तरी ते हि नसे थोडके. 
बदललेली कार्यालय... विनीत वर्तक

कार्यालय किंवा ऑफिस म्हंटल कि आपल्यासमोर येतात फाईल्स चा ढीग. जळमटानां सोबत घेऊन रडत फिरणारे पंखे. नॉयलॉन च्या उसवलेल्या खुर्च्या आणि घड्याळाकडे बघत काम करणारी लोक. अस ८०-९० च्या दशकात असणार साधारण कार्यालयीन चित्र कॉम्प्यूटर च्या प्रवेशाने हळू हळू बदलून गेल. पंख्यांची जागा वातानुकुल हवेने घेतली. टेबलांची जागा क्युबिकल्स नि घेतली. फाईलींच्या जागी आता इमेल्स चे ढीग जमू लागले. षंढ चेहऱ्याने काम करणारे आता प्रेझेंटेशन साठी धावू लागले. घड्याळाचे काटे आता रात्र झाल्यावर दिसू लागले. उसवलेल्या खुर्च्यांची जागा आता रोलिंग चेअर ने घेतली.

पण हरवले ते चेहरे. लंच टाईम ला आज डब्यात काय? अस विचारत डल्ला मारणारे हात आखडले. कोबीच्या भाजी चा सुगंध आता हरवून गेला. टेबला शेजारी बसून एकमेकांनां चिमटा काढणारे ते हास्याचे बोल आता बंदिस्त झाले. सुख दुःखाचे चे शेअर आता तोंडाने नाही तर फेसबुक, व्हात्स अप च्या भिंतीमागून होऊ लागले. माणस बदलली पण व्यक्त होण्याची, काम करण्याची साधन, कार्यालय बदलली. तरी काम तीच. उलट वाढलेली टेन्शन, न संपणारे कामाचे तास, सतत कनेक्टेड राहण्याचा फार्स नकळत कुठेतरी हे सगळ माणसाच्या कार्य करणाच्या पद्धतीवर अतिशय वाईट पद्धतीने आपला ठसा उमटवायला लागल.

ह्याची सुरवात आत्ता आपल्याकडे झाली असली तरी अमेरिकेत ती आधीच झाली होती. म्हणूनच कुठेतरी ह्याला उत्तर शोधण्याची कसरत सुरु झाली. कार्यकुशलता कशी वाढवता येईल. ऑफिस हे ऑफिस न राहता कुठेतरी त्याला आपलेपणाचा, निसर्गाशी एकरूप करण्याचा प्रयत्न केला गेला. लोकांना कार्यालय-ऑफिस मध्ये  आल्यावर घराची आठवण होऊ नये इतक. त्यांनी स्वताला इतक गढून घ्यावं कि फक्त काम आणि काम. ह्या सर्वांचा परिणाम लगेच दिसून येऊ लागला. कंटाळवाण्या ऑफिस, कार्यालयाची जागा प्रशस्त जागे ने घेतली. अगदी भिंतीच्या रंगापासून बिल्डींग च्या आकारा पर्यंत सगळ्याचा विचार केला गेला.

काम करण्याची जागा, आजूबाजूचा निसर्ग, हवेचे तापमान, रंगसंगती, काम करण्याच्या वेळा, ह्यात सगळ्यात बदल झाले. स्पेशली काही कोर्पोरेट ऑफिस तर प्रेमात पडण्याची ठिकाण झाली. कारण शहराच्या भाऊ गर्दीत निसर्गाच्या सानिध्यात काम करता करता प्रेम करता आल तर अजून काय हवे. गुगल च्या ऑफिस बद्दल ऐकून होतो कि तिथला परिसर एकूणच ऑफिस हे निसर्गाला जोडलेलं आहे. २०१० साली जेव्हा अमेरिकेला गेलो तेव्हा माझ अमेरिकेतील ऑफिस बघून सर्दच झालो. प्रचंड असा एकरोवारी परिसर. पूर्ण हिरवळीने नटलेला. उंच उंच झाडांची गुंफण. जेवणाची जागा तर शब्दात मांडता येणार नाही इतकी सुंदर. एक छोटा तलाव त्याला चोहोबाजूने वेढलेली हिरवळ आणि झाडे. त्यात असणारे मासे, कासव त्याच्या अगदी बाजूला जेवण करण्याची व्यवस्था. जेवताना आपण कोणत्यातरी वनभोजनासाठी आलो आहोत असच वाटायचं.

पूर्ण अर्ध्या दिवसाचा क्षीण त्या एका तासात कुठे पळून जायचा कळायचा नाही. आसपासच्या त्या सौंदर्याने खरच कार्यकुशलतेवर परिणाम होतो ह्याचा अनुभव मी घेतला. अनेक लोकांशी बोलल्यावर सगळ्यांना ह्याचा अनुभव येत होता. जेवणापेक्षा त्या सुंदर तलावाकाठी नुसत बसून राहण हा एक अविस्मरणीय अनुभव होता. ऑफिस- कार्यालय इतक हि सुंदर असू शकते ह्यावर तेव्हा विश्वास बसला. हळू हळू हीच प्रथा भारतात हि येत आहे. मुंबई सारख्या शहरात हे कठीण असल तरी अश्यक्य नाही. बेंगलोर, हैद्राबाद मधील आय.टी कंपन्यांची ऑफिस हि अश्या तर्हेने आहेत.

बीइंग स्पेशल ... विनीत वर्तक

आपण बरेचदा कोणतही कार्य किंवा क्रिया करतो तेव्हा कोणाकडून तरी त्याचा उल्लेख व्हावा. ते बघितल जाव किंवा कुठेतरी त्या व्यक्तीने आपल्याला त्याची दाद द्यावी किंवा त्याची कदर करावी अस आपल्याला नेहमीच वाटते. अगदी छोट्यात छोटी गोष्ट का असेनात. पण ज्या व्यक्तीसाठी आपण ते करत आहोत त्या व्यक्तीचा प्रतिसाद आपल्याला खूप महत्वाचा असतो. परीक्षेत खूप चांगले मार्क मिळाल्यावर सगळ्यात जास्त छान वाटते. जेव्हा आपल्या पालकांची, शिक्षकांची कौतुकाची थाप आपल्या पाठीवर पडते. एखाद्या कलाकाराला सगळ्यात जास्ती आनंद होतो जेव्हा प्रेक्षकांकडून त्याच्या कलेची पावती मिळते. एखाद्या खेळाडूला सगळ्यात जास्ती आनंद होतो ऑलम्पिक मध्ये पदक मिळते तेव्हा. ह्या सर्व वेळी एकच फिलिंग असते ती म्हणजे बीइंग स्पेशल.

प्रत्येक वेळी माणस, कार्य बदलू शकेल पण फिलिंग तीच रहाते. आपण केलेल्या मेहनतीच चीज म्हणा किंवा आपल्या प्रयत्नांच यश हे तेव्हाच आपल्याला समाधान देते जेव्हा त्याचा आपल्याला अपेक्षित असलेल्या व्यक्तींकडून त्याचा सन्मान होतो. त्याची नोंद घेतली जाते. आयुष्यात अनेक शिखरे पादाक्रांत केली अगदी एवरेस्ट सुद्धा पार केला. तर तो क्षण, ती वेळ , ते यश शेअर करणार किंवा ज्याच्याशी शेअर करावस वाटणार बरोबर असेल तर त्याच वेळी त्याच समाधान मिळते. एवरेस्ट सर करून सुद्धा त्याची दखल घेणार कोणी नसेल तर त्या यशाला काहीच अर्थ नसतो. चंद्रशेखर गोखल्यांच्या चारोळी प्रमाणे

डोळे पुसणार कोणी असेल
तर डोळे भरून यायला अर्थ आहे.
कोणाचे डोळे भरणार नसतील
तर मरण सुद्धा व्यर्थ आहे.


प्रेमात, नात्यात मग ते कोणताही नात असो. त्या माणसाला आपल्या छोट्या गोष्टीची जाणीव असावी हीच आपली माफक अपेक्षा असते. एक बंगला, गाडी, सोने जे करू शकणार नाही ते एका मिठीत असते. हाताने पकडलेल्या मुठीत असते, खांद्यावर ठेवलेल्या डोक्यावर असते अन पुसलेल्या अश्रूत असते. बीइंग स्पेशल हि फिलिंग इतकी सुंदर असते कि त्या साठी माणूस काही पण करू शकतो. प्रेमात अजून काय असते? ज्या प्रेमासाठी माणस कोणत्याही टोकाला जाऊ शकतात. ती ह्याच फिलिंग साठी तर. प्रेम म्हणजे तरी काय? तो एक कटाक्ष, ती एक नजर, ते दिलेली साथ. सगळच बीइंग स्पेशल.

पण नेहमीच आपण रीसिविंग एंड ला का रहाव. आपण हि होऊन शकतो कि कोणाच्या आयुष्यात ते बीइंग स्पेशल. त्याची एक वेगळीच मज्जा असते. कधी तरी अनुभवून बघा. विश्वासाने दिलेली साथ मित्र, बायको ते मैत्रीण, नवरा सगळ्या नात्यात. तुझ्यामुळे आज हे शक्य झाल. किंवा तू होतास / होतीस म्हणून मी इथवर पोहचू शकले / शकलो. ह्यात त्या व्यक्तीला तर समाधान देतेच पण आपल्याला त्याहून जास्ती वेगळी अनुभूती देते. आपण हि कोणासाठी तरी स्पेशल आहोत हि फिलिंग आपलाच उत्कर्ष करणारी आहे.


त्यासाठी काही जास्ती कराव लागत नाही. कोणताही क्लिमिष मनात न ठेवता देत राहिलो कि हळूच ते येत. ते न विकत घेता येत, ना ओरबाडून घेता येत, न कोणाला सांगून मागता येत. ते कमवाव लागते आपल्या कृतीतून. ती कशी, केव्हा, कुठे करावी हे ज्याच त्यान ठरवावं. ती व्यक्ती कोणती हे सुद्धा. सगळच आपल्या मनाप्रमाणे होईल अस नक्कीच नाही. पण समोरून जरी परत नाही मिळाल तरी आपली निष्पक्ष भावनेने केलेली कृती आपल्याच मनात स्वताला बीइंग स्पेशल करतच असते नाही का?         
ह्युमन डिव्हाईन रिलेशन .. विनीत  वर्तक

माणूस हा कळपात राहणारा प्राणी आहे. जन्मल्यापासून जी नाळ जोडली जाते ती मरेपर्यंत कोणाशी न कोणाशी जोडलेली असते. आई पासून होणारी सुरवात मग बहिण – भाऊ ते मित्र- मैत्रीण अशी होत जोडीदारा पर्यंत कधी येऊन पोहचते आपल्यालाच कळत नाही. जोडीदार आयुष्यात आल्यावर मात्र तोच आपल सर्वस्व मानून कित्येक जण आयुष्य काढतात. खूप जणांच्या बाबतीत खरे हि असेलच पण सगळ्यांच्या बाबतीत मात्र ते कुठेतरी त्या सत्यापासून खूपच लांब असते.

आयुष्यात जोडीदार कसा असावा ह्याचे ठोकळे प्रत्येकाचे वेगळे असतात. खूप सारे कोन त्याला असतात. प्रत्येक कोन जुळेल अस नाही. त्यामुळे कुठेतरी फट रहातेच. बर्याचदा आपण स्वतःला किंवा जोडीदाराला बदलवून ती फट कमी करत असतोच. पण पूर्ण बसलेल्या कोनाची मज्जा त्याला येत नाही. अर्थात आयुष्य हेच तर असते. जुळलेले कोन आणी न जुळलेल्या फटी ह्याची जुळवाजुळव करण्यात ते कसे निघून जाते आपल्याला समजत हि नाही.

पण कधी सगळेच कोन जुळणारा ठोकळा मिळाला तर? विचार करूनच खूप वेगळ वाटत असेल नाही का? असा कोणीतरी किंवा अशी कोणीतरी जी आपल्याला सगळ्याच लेवल वर समजून घेईल. आपण जसे आहोत तस अगदी सेम. विचारांची बैठक, स्वभाव, एकूणच व्यक्तिमत्व अगदी आपल्यासारखच. ज्याच्याशी बोलताना समाजाने लावलेली सगळी झापड विरगळून पडतील. ते नात दिसण, रंग , रुप आणि इतर तत्सम जाणीवेपलीकडे असेल.

असा जुळणारा ठोकळा मिळतो तेव्हा ते रिलेशन डिव्हाईन असते. म्हणजे आपण विचार करू शकतो त्या पलीकडे. ती व्यक्ती जोडीदार असेलच अस हि नाही. आपल्या वयाची असेल अस हि नाही. आपल्याला प्रत्यक्ष भेटेल असही नाही. भेटली तरी ती प्रत्येक वेळी आपल्या सोबत असेल अस हि नाही. पण तरीसुद्धा तीच असणं आपल्याला पदोपदी जाणवते. तीच असण आपल्याला आधार देते. त्या व्यक्तीचा एक शब्द सुद्धा आपला मूड चेंज करू शकतो. ती व्यक्तीच्या अस्तित्वाने आपल्याला छान वाटते. ती व्यक्ती आपल्याला सगळ्या अस्तित्वाच्या पलीकडे एक डिव्हाईन ब्लिस देऊ शकते. जर ते नाते बनले तर ती रिलेशनशिप आपल्याला परमोच्च समाधान देऊ शकते. सुख आपल्याला कोणत्याही रिलेशनशिप मद्धे मिळू शकते पण आपल्याला समजून घेणार, समजून सांगणार कोणी असेल तरच समाधान मिळते.

कोणी हेच प्रेम असही म्हणेल पण प्रेमात अपेक्षा येतात सगळ्याच बाबतीत मग त्या इमोशनल असो, फिजिकल असो. प्रेमात तिसर कोणी स्वीकारता येत नाही. प्रेमात हेतू असतात. मग ते कोणत्याही पातळीवरचे असू शकतात. प्रेम हे एकांगी पण असू शकते बऱ्याचदा असतेही. प्रेम नेहमीच सुख देते अस  हि नाही. प्रेम खुपदा अव्यक्त असू शकते आणि त्याचे ठोकताळे आयुष्याच्या अनेक पातळीवर बदलत राहतात. पण डिव्हाईन रिलेशनशिप ह्या पलीकडे आहे. ती ह्या सगळ्या पलीकडे असते. तिसरी व्यक्ती असो वा चौथी त्याने आपल्याला ठोकळ्याच्या कोनात कोणताच बदल होत नाही. काळाच्या परिणामावर हि ते जूळलेले कोन तसेच राहतात. त्यात कोणतेही हेतू नसतात. फक्त त्याचं जुळण आपल्याला आत्मिक, अत्युच्य अस समाधान देते. अपेक्षा नसल्याने अपेक्षा आणि प्राप्ती ह्यातल अंतर शून्य असते. त्यामुळे गैरसमज, भांडण किंवा हेवेदावे ह्याला काही जागाच नसते.

डिव्हाईन रिलेशन समजणे तस सोप्प आहे. देव किंवा परमात्म्या सोबत तर आपल नात डिव्हाईन असतेच कि. तो कुठेच दिसत नाही. तो कधीच काही बोलत नाही. पण त्याच अस्तित्व आपल्याला जाणवत रहाते. त्याची साथ, सांगत किंवा नुसत्या विचारांची सांगत सुद्धा अत्युच्य अस समाधान देते. ज्या वेळेस तो आपल्याशी बोलतो किंवा समजून घेतो तेव्हा मिळणार समाधान दुसर्या कोणत्याच गोष्टीत येत नाही. तिकडे फक्त असते ब्लिस. एक अत्युच्य समाधानाचा क्षण पण हेच सगळ एखाद्या माणसात आपल्याला मिळाल तर ते नात ह्युमन डिव्हाईन रिलेशन असेल. एक वेगळच पण संपूर्ण असलेल. कदाचित तुमच्या आयुष्यात असेल हि, किंवा असून हि तुम्हाला जाणवलेल नसेल, किंवा अजून यायचं हि असेल. पण तस जर कोणी आपल्या हयातीत आपल्याला भेटल तर आपण स्वताला खूप भाग्यवान समजावं. कारण जिकडे ५० वर्ष बरोबर राहून संसार होतात तिकडे अस कोणीतरी एका क्षणात त्या ५० वर्षाचं समाधान देत.    



    

Friday, 24 June 2016


तू लढ आम्ही आहोतच... विनीत वर्तक

तू लढ आम्ही आहोतच
तू जीवाची पर्वा करू नकोस आम्ही आहोतच
सियाचीनच ग्लेशियर असो वा कन्याकुमारीच रामेश्वर...
मुंबईचा अरबी समुद्र असो वा विशाखापट्टणम चा उपसागर


तू लढ आम्ही आहोतच.

आम्ही आहोतच फक्त फायद्यासाठी
आम्ही आहोतच फक्त बोलण्यासाठी
आम्ही आहोतच फक्त स्वातंत्र्यासाठी
आम्ही आहोतच फक्त बघण्यासाठी

तू लढ आम्ही आहोतच.....

मतांसाठी आम्ही काही करू
शत्रूला मित्र म्हणून जवळ करू
फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन हे तर आमचे ब्रीदवाक्य

तू लढ आम्ही आहोतच

मरताना काळजी करू नकोस
आरक्षणाची लढाई आम्ही करतोच आहोत
किती मोठे झालो तरी खुजे बनण्याची आमची स्पर्धा चालूच आहे.

तू लढ आम्ही आहोतच

जय हिंद म्हणायला आम्ही आहोतच
भगवा फडकवायला आम्ही आहोतच
शहीद म्हणायला आम्ही आहोतच

तू लढ आम्ही आहोतच

आम्हाला आरक्षण हवे फी माफी हवी
बोलण्याच स्वातंत्र हव संविधानाचे हक्क हवे
पण शत्रूची गोळी मग ते आपले का असोनात
मात्र तूच घ्यायचीस

मेलेल्या आम्हाला काय जागवणार
संवेदना गेलेल्या मुर्दाडानां काय जाणवणार
आम्ही मात्र असेच राहणार
कारण ..............................

तू मात्र लढ आम्ही आहोतच..

धर्मांध... विनीत वर्तक

कालच पाकिस्तान मध्ये बॉमस्फोट झाले. अनेक निष्पाप जीवांचा बळी गेला. काल इस्टर च्या निमित्ताने अनेक ख्रिश्चन धर्मियांना निशाणा करता येईल अस समजून मुलांच्या बागेत हा स्फोट करण्यात आला. ५३ लोकांचा निष्पाप बळी १०० हून अधिक जण जखमी करून कोणत्या धर्माचा विजय झाला हा तो धर्म आणि त्याला मानणारे लोकच जाणो. पाकीस्तानांत झाला म्हणून अनेक भारतीयांना आनंद हि झाला असेल. बर झाल त्यांना आता कळेल. पण कोणाला आणि काय कळेल? त्या निष्पाप जिवांनी काय केल होत? राजकारणाच्या, ...देशाच्या, सीमेच्या भांडणात त्या लोकांचा काय दोष? तुमच्या आमच्या सारखेच सर्व सामान्य पण हा विचार आम्ही कधीच बाजूला ठेवला आहे.

स्वताच्या पलीकडे, माझ्या अस्तित्वा पलीकडे अजून काही आहे समजण्याची दृष्टीच आपण गमावून बसलो आहे आहे नाही का? देश तर दूरच राहिला. सुरवात आपल्या घरापासून करू. बायको, बहिण, भाऊ, काका, मामा अश्या अनेक नात्यात आपल्यापलीकडे आपला विचार जातच नाही. कधी कधी असेल हि बरोबर. पण दुसर्याला खड्डा खोदताना आपण हि त्यात बुडत जातो हे कळून सुद्धा असुरी आनंदासाठी आसुसलेले आपण दुःखाच्या खाईत स्वताला लोटताना त्याच आनंदाचा विचार करत स्वताला झोकून देतो. त्याच वाईट झाल न! त्याला शिक्षा मिळाली न! त्याला चांगला धडा शिकवला गेला न! ते त्याची चांगली जिरली. पण ह्या सगळ्यात मला काय मिळाल?, क्षणिक मानसिक समाधान कि जिंकल्याचा आनंद कि स्व ला मोठ केल्याच समाधान.

हीच छोटी पण स्वताच्या घरापासून झालेली सुरवात मग जात, धर्म, देश अस उग्र रूप धारण करते. शेवटी आपण एका क्षणाला त्या पासून स्वताला वेगळ करतो. जाऊ दे न माझ काही वाईट झाल नाही न जोवर मला त्या ज्वाळा लागत नाही तोवर मी नामानिराळा. मेले ते गेले. काल कोहली किती छान खेळला न तो विचार केला कि मला अलिप्त व्हायला वेळ लागत नाही. पाकिस्तानात झाला न मग जाऊन दे भारतात नाही न, भारतात झाला न मुंबईत नाही न मग जाऊन दे, ठाण्यात झाला न मग बोरिवलीत नाही न मग जाऊन दे, नंतर तो प्रवास ठाणे पश्चिम ते पूर्व अस करत तो प्रवास आपल्या दाराशी नाही न येत तोवर आपण अलिप्त राहतो.

संवेदनांची होळी आपण कधीच करून मोकळे झालो आहोत. कारण धर्माची झापड आपल्या डोळ्यावर इतकी घट्ट बसत चालली आहेत कि आपल्याला प्रकाशात पण अंधाराची सवय लागली आहे. मी काय करू शकतो? ह्याची अनेक उत्तर आहेत. आपल्या परीने शोधली कि सापडतील हि. जातीची , धर्माची , देशाची जोखड निदान स्वतापासून सुरवात करून आपल्या घरापर्यंत थांबवू शकलो तरी खूप काही होईल. जेव्हा जात, धर्म, देश ह्या पलीकडे माणूस म्हणून आपण आधी स्वतला प्रश्न विचारू तेव्हा देशापासून सुरु होऊन दिशे पर्यंत संपणाऱ्या प्रवासाचा उलट प्रवास सुरु होईल. कदाचित तेव्हा मग “ कोणता झेंडा घेऊ हाती”? हा प्रश्न विठ्ठलाला विचारायची गरज भासणार नाही.

कालच्या स्फोटात धर्म, जात, देश न बघता निष्पाप जीव बळी गेले. ज्यांनी हे कृत्य केले त्यांना आपल्या फसलेल्या धर्माची जाणीव लवकरच झाली असेल अशी अपेक्षा. कारण दुसऱ्या धर्मासाठी खोदलेल्या खड्यात त्याचं धर्म बुडाला आहे हे आपसूक समोर आलच आहे. आज तिकडे आहे उद्या आपल्याकडे असेल तेव्हा थांबवायचं आपल्या हातात नसेल तरी घडवायचं आपण आपल्यापुरती थांबवूया.

नाविक.... विनीत वर्तक
‘‘Navic’’ (Navigation with Indian Constellation)

गेल्या आठवड्यात इस्रो ने आपला शेवटचा आय आर एन एस एस ह्या मालिकेतील शेवटचा उपग्रह प्रक्षेपित केला. पंतप्रधान मोदी नी ह्याच प्रणाली च नाविक अस नामकरण केल. खरे तर हि प्रणाली आधीच चालू झाली होती पण अपेक्षित सुसूत्रता येण्यासाठी हा सातवा उपग्रह गरजेचा होता. अमेरिका, रशिया, चीन आणि युरोपियन युनियन नंतर अशी जी पी एस प्रणाली असणारा भारत हा जगातील ५ देश ठरला आहे. कारगिल युद्धात अमेरिकेने मदत देण्यास नकार दिल्यावर आपण आपले रस्ते शोधले पाहिजेत हा विचार पुढे आला. गेल्या आठवड्यात आपण तो पूर्णत्वाला नेला. मोदी नि ह्या इस्रो च्या यशानंतर ट्विट केलेल वाक्य खूप काही अधोरेखित करून जाते “आता आपण आपला मार्ग ठरवू जो कि आपण आपल्या तंत्रज्ञाने विकसित केला आहे”. भारतीय खलाशी आणि कोळी बांधव जसे समुद्राच्या क्षितिजावर नवीन मार्ग शोधून काढतात. अनेक माहित नसलेल्या रस्त्यावरून परिक्रमा करतात त्याच प्रमाणे भारत आता स्व बळावर हे करू शकतो म्हणूनच नाविक हे नाव खूप समर्पक वाटते.

१४२० कोटी रुपयांची हि मालिका जगातील सर्वात स्वस्त जी पी एस प्रणाली आहे. भारतासोबत भारताच्या आजूबाजूच्या जवळपास १५०० किमी च्या टप्प्यातील प्रत्येक गोष्टीचा मागोवा आपल्याला आता घेता येणार आहे. आख्खा आशिया खंड ते अगदी ऑस्ट्रेलिया पर्यंत ह्याची रेंज आहे. त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या देशांना हि ह्याचा फायदा घेता येणार आहे. तसेच ह्यात दोन भाग असल्याने एक भाग हा सामरिक गोष्टींसाठी राखून ठेवण्यात आला आहे. ज्याचा उपयोग युद्ध, नैसर्गिक आपत्ती, टेहळणी ह्या सर्वासाठी करता येणार आहे. १९८० पर्यंत उपग्रह पाठवण्यासाठी धडपडणाऱ्या इस्रो ची २०१६ पर्यंत स्वताच जी पी एस बनवण्याची वाटचाल भारतीयांसाठी नक्कीच अभिमानाची आहे.
१९६९ सुरु झालेल्या इस्रो ने खूप मोठा टप्पा गाठला आहे. मेक इन इंडिया, मेड इन इंडिया विथ जुगाड ह्या तीनही शब्दांना जागत इस्रो ने जगात फ्रुगल इंजिनियरिंग ची सुरवात केली आहे. इस्रो चे स्पेस प्रोग्राम जगातील सर्वात स्वस्त पण त्याच वेळेस सगळ्यात भरवश्याचे मानले जातात. मग ते मार्स मिशन असो वा नाविक. सर्वात कमी खर्चात, कमी वेळेत आपल्या भरवश्याच्या रॉकेट प्रणालीने इस्रो ने जगात आपला दबदबा केला आहे. ३५ मिशन एका पठोपाठ एक यशस्वी करणारी पी एस एल व्ही रॉकेट प्रणाली कोणत्याही आंतरराष्ट्रीय रॉकेट पेक्षा उच्च तोडीची आहे. सध्या इस्रो कडे उपग्रह पाठवण्यासाठी वेटिंग लिस्ट आहे. जवळपास जगातील सर्व देश आपले उपग्रह इस्रो तर्फे पाठवू इच्छित आहेत. म्हणूनच गेल्याच आठवड्यात अमेरिकेतील काही संस्थांनी ह्या बाबत अमेरिकन प्रशासनाकडे तक्रार केली होती. इस्रो च्या बजेट मध्ये आम्ही उपग्रह पाठवू शकत नाही. इस्रो स्वस्तात हे करत असल्याने आता अमेरिकन संशोधक, प्रयोगशाळा आणि संस्था इस्रो कडे वळत आहेत. ह्यामुळे अमेरिकन उपग्रह बनवणार्या संस्था तोट्यात जाऊ शकतात.

येत्या काळात इस्रो चे प्रोग्राम बघितले तर थक्क व्हायला होईल. आदित्य हा सूर्याचा अभ्यास करण्यासाठी प्रोग्राम आहे, चांद्रयान २ वर काम चालू आहे, जी एस एल व्ही माख ३ हा ४ टन वजन वाहून नेणारा उपग्रह अभ्यासात आहे. (व्हीनस) शुक्र ग्रहावर जाण्यासाठी प्रणाली विकसित करत आहे, निसार The Nasa-Isro Synthetic Aperture Radar (NISAR) ह्या प्रणाली वर काम सुरु आहे. तसेच री एन्ट्री करणारे स्पेस शटल व माणसाना घेऊन जाऊन शकणारी प्रणाली ह्या वर सुद्धा काम चालू आहे. त्याच्या जोडीला अनेक स्वदेशी बनावटीचे उपग्रह जे वेगवेगळ्या कारणांसाठी उपयोगी पडतील त्याचं निर्माण तसेच प्रक्षेपण व ह्या सगळ्यावर मात म्हणून अनेक विदेशी उपग्रह जे वेटिंग लिस्ट मध्ये आहेत रॉकेट मिळण्यासाठी. हा अश्या अनेक पातळीवर काम करून आणि एक सरकारी उपक्रम असून सुद्धा भारताची पताका इस्रो ने नुसतीच तळपत नाही ठेवली आहे तर त्याचा आता दबदबा स्थापन केला आहे.

नाविक हा एक पाडाव आहे. भारतीय शास्त्रज्ञ, अभियंते ह्याचं अभिनंदन कराव तेवढ थोडच आहे. ये तो ट्रेलर हे पिक्चर अभी बाकी हे म्हणत सगळे पुन्हा एकदा आपल्या कामात गुंतले आहेत. अजून एका नवीन न शोधलेल्या रहस्याचा शोध घेत नाविक बनून.

ब्रिक्स एक उगवता सूर्य.... विनीत वर्तक

ब्रिक्स नाव आहे नवीन सूर्याच जो जागतिक क्षितिजावर उगवला आहे. अमेरिकेची जागतिक अर्थव्यवस्थेतील दादागिरी मोडून काढण्यासाठी भारत, चीन, रशिया, ब्राझील, साउथ आफ्रिका ह्यांनी एक ग्रुप स्थापन केला तो म्हणजेच ब्रिक्स (BRICS).

जगाच्या लोकसंखे पेकी तब्बल ४२% लोकांच प्रतिनिधित्व ब्रिक्स करतो आहे. १६ ट्रीलीयन अमेरिकन डॉलर पेक्षा जास्त जी डी पी आणि तब्बल ४ ट्रीलीयन पेक्षा जास्ती फॉरेन रिझर्व्ह असणार्या देशांची हा ग्रुप आहे. २००९ साली पहिल्या मि...टिंग पासून सुरु झालेल्या ह्या प्रवासाने खूप मजल मारली आहे.

अर्थाशास्त्रांच्या मते येत्या काळात अमेरिकेची मक्तेदारी संपुष्टात आणायची ताकद ब्रिक्स मध्ये आहे. जगातील प्रमुख नाणेनिधी संस्था तसेच आय एम एफ वर असलेली अमेरिकेची मक्तेदारी सर्वश्रुत आहे. ह्याला एक समांतर अशी ब्यांक म्हणून ब्रिक्स ने न्यू डेवलपमेंट ब्यांक स्थापन केली आहे. सुरवातीला ५० बिलियन क्यापिटल असलेली हि ब्यांक आय एम एफ ला पर्याय मानली जात आहे.

शांघाई इकडे आपल मुख्य ऑफिस असलेल्या ह्या ब्यांक च्या अध्यक्षपदी भारताचे के व्ही कामत आहेत. आत्ताच ब्रिक्स ने रीनेवेबल एनर्जी साठी भारताला तब्बल २५० मिलियन डॉलर दिले आहेत. येत्या काही काळात ब्रिक्स जगातील सर्वात शक्तिशाली ब्यांक होईल अस भाकीत अनेक अर्थतज्ञानी वर्तावल आहे.

हे सगळ लिहण्याच कारण इतकच ह्या ब्रिक्स च वार्षिक संमेलन यंदा गोव्यात होत आहे. १५ -१६ ऑक्टोबर २०१६ रोजी ह्याची ८ वि वार्षिक सभा होत आहे. क्षितिजावरचा उगवता सूर्य तेजाने तळपणार आहेच. ब्रिक्स ला अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. आत्ताशी सुरवात आहे. येत्या काळात ब्रिक्स जगाच्या नकाशावर सगळ्यात ताकदवर देशाची सगळ्यात ताकदवर ब्यांक असेल ह्यात शंका नाही

सैराट ... विनीत वर्तक

सध्या झिंग झिंग झिंगाट चा धुमाकूळ चालू आहे. नागीण डान्स ची आठवण करून देत पुन्हा एकदा अजय अतुल च्या गाण्यांनी महाराष्ट्राला ठेका धरायला लावला आहे. हे गाण आहे सैराट चित्रपटातील. झी मराठी च्या पुरस्कारापासूनच सैराट चित्रपटाभोवती वलय निर्माण झाल होत. नागराज पोपटराव मंजुळे सारखा दिग्दर्शक, झी स्टुडीओ चा ब्यानर सोबतीला अजय- अतुल च संगीत आणि दोन फ्रेश चेहरे ह्यामुळे सैराट बद्दल उत्सुकता होतीच. सैराट बघण्याची १७ कारणांपासून ते चित्रपटाच्या प्रोमोज मुळे काहीतरी... वेगळ आणि चांगल मराठी चित्रपटात घडते आहे ह्याची जाणीव होत होती.

पण अनेक विरुद्ध प्रतिक्रिया बघून आश्चर्य वाटते आहे. संस्कार, बालवयात वाईट संस्कार, संस्कृती ह्या सर्वांचा अनेकांना झालेला साक्षात्कार बघून कीव वाटली. अव्यक्त प्रेम, किशोरवयीन वयात हवीहवीशी वाटणारी प्रेमाची अनुभूती सगळ्यांनीच अनुभवली आहे. जे लोक गरळ ओकत आहेत त्यांनी स्वतः सुद्धा हा अनुभव घेतलाच असेल. कधीतरी बस च्या थांब्यावर, रेल्वेच्या प्ल्याटफोर्म वर तर कधी क्यानटीन च्या बाकावर तर कधी शाळा कॉलेज मध्ये तो कटाक्ष सगळ्यांना हवाहवासा वाटायचा आणि आजही वाटतोच. ह्या प्रेमासाठी कित्येकांनी किती खास्त्या खाल्ल्या हे प्रत्येकालाच ठाऊक. सगळ्याच प्रेम कथा यशस्वी होत नाही तसा प्रत्येकाचा शेवट वाईट होतो अस हि नाही न? आजही त्या क्षणाची आठवण झाली तर प्रत्येकाच मन आनंदी होतच. भले शेवट हवा तसा नसेल किंवा त्यात अनेक बोचरे अनुभव हि असतील पण ते क्षण स्पेशल असतात ह्यात वाद नसेल.

संस्कार, आदर्श समाज ह्या व्याख्या चित्रपटावरून ठरवायचा काळ कधीच मागे पडला अशी ओरड करणारी लोक आज त्याच चित्रपटाचा आधार घेऊन संस्कारांची बोंब करत आहेत. मुलांची मानसिकता घडवायला टीवी च माध्यम आज न च्या बरोबर आहे. इंटरनेट, फेसबुक, व्हात्स अप च्या जाळात अडकलेली पिढी टीवी पासून खरे तर दूर गेली आहे. चित्रपट तर त्याही पलीकडे आहे. त्यातून मराठी चित्रपट संस्कार ठरवणार असेल तर उद्या नैवैद्य काढायला हवा तो ह्याच साठी कि मराठी बोलत नाही, जगत नाही म्हणून तरुण पिढी वर कितीतरी रोष टाकून झाले. त्याच पिढीवरच्या संस्काराची परिभाषा एक मराठी चित्रपट ठरवतो ह्यावरून हे बोंब किती तकलादू आहे ते सिद्ध होते.

मराठी माणूसच मराठी माणसाला खाली खेचतो खेकड्या सारख ते खरेच आहे. एक चांगली कलाकृती समोर आलेली असताना तिचा आस्वाद घ्यायचा सोडून आपण संस्कारांच्या गाळात डुंबण्यात आणि चिखलफेक करण्यात धन्यता मानतो आहोत. मला रिंकू राजगुरूच उदाहरण द्यावस वाटते. तिच्या मते तिने केलेल्या बुलेट स्वारी मुळे अकलूज सारख्या ठिकाणी मुलींकडे बघण्याच्या दृष्टीकोन किंबहुना मुलींच्या आत्मविश्वासात बदल झाला आहे (रिंकू राजगुरू ला ह्या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे). बुलेट सारखी बाईक पुरुषी रांगड समाजच प्रतिनिधित्व करत असताना एका मुलीने ती चालवावी हा मला वाटते तृप्ती देसाई नि १०० मंदिरात शिरून सुद्धा स्त्रियांच्या मानसिकेत आणि एकूणच समाजाच्या मानसिकतेत जो बदल होणार नाही तो झाला आहे.
चित्रपट सगळाच चांगला असेल असे नक्कीच नाही, सगळे मुद्दे पटतील असेहि नाही. प्रत्येकाच्या अपेक्षा त्यातून पूर्ण होतील असेही नाही पण नुसतच काहीही बघून मनोरंजन करण्यापेक्षा अव्यक्त प्रेम, किशोरवयीन प्रेम, त्यातील प्रवास, समाजाची मानसिकता, जातीपातीच राजकारण ह्या वर परखड भाष्य करणारा सैराट मला तरी चित्रपटगृहात जाऊन बघावासा वाटतो

हरवलेली सुट्टी... विनीत वर्तक

मे महिना उजाडला कि कधी न्हवे ते लवकर उठायची घाई असायची. एरवी शाळेत जाण्यासाठी उठायला कंटाळा यायचा पण मे महिना आला रे आला कि दिवस कधी उजाडतो अस व्हायचं. सकाळी सकाळी उठून जवळच्या एका शाळेच्या प्रांगणात क्रिकेट खेळण्यासाठी असलेली ती लगबग. लवकर गेल हि हव ते मैदान मिळायचं. ८ नंतर इतकी मुल तिकडे खेळायची कि कोणाचा कोण क्षेत्ररक्षक आणि कोण कोणाला बोलिंग करतो आहे हे ओळखून नक्की आपल्याच चेंडू मागे धावायचं हे मोठ कठीण काम व्हायचं. उन्हाचा चटका, घाम येण्याआ...धी आपली हौस भागवायची हा तो कटाक्ष. ११ रुपये सिल लावून म्याच खेळायची मग जिंकल्यावर ५० रुपयाची पार्टी करायची. फाफडा आणि जिलेबीच्या सोबत सकाळचे १० ते ११ कधी वाजून जायचे ते कळायचे नाही.

आंघोळ करून परत क्रिकेट किंवा बैठकीचा फड. दुपारच सत्र मात्र चित्रपट किंवा बैठे खेळ खेळण्यात जायचं. संध्याकाळी मात्र डबा आईस पाईस, लगोरी ते लंगडी आणि ब्याटमिंटन पासून क्रिकेट सगळच असायचं. रात्री ८ वाजले तरी अंधुक प्रकाशात खेळ सुरूच राहायचे. आईच बोलावण किंवा बाबांचा ओरडा खात घरात शिरायचं हा शिरस्ता ठरलेला असायचा. त्यात मग बाजार, पोहणे, पतंग ते अगदी एक टप्पी आउट पर्यंत अनेक पर्याय असायचे. असा प्रचंड उत्साह भरलेली सुट्टी लवकर का संपते असच नेहमी वाटत राहायचं. त्यात भर म्हणून मामाकडची ट्रीप बोनस असायचीच. पण कधीच हि सुट्टी लवकर संपावी अस अजिबात वाटल नाही.

आज सुट्टी असते काय? हेच मुळी मुलांना माहित नाही. रिकामी मैदान जी काही थोडी फार उरली आहेत ती. ओस पडलेल्या विहरी, बिल्डींग च्या न फुटलेल्या काचा ते पिवळ्या फुलांनी भरलेले ते रस्ते जी आम्ही वेचून बाजार बाजार खेळायचो ते सर्वच शांत झाल आहे. गेल्याच आठवड्यात त्या शाळेच्या मैदानावरून गेलो. सकाळीच कोणीही नव्हते. एकेकाळी मुलांची इतकी गर्दी असणार आणि आवाजाने, चेंडूंच्या षटकाराने ओसंडून वाहणार ते मैदान भयाण वाटत होत. कुठेतरी माझ बालपण शोधात होतो. त्या सकाळच्या फापड्या जिलेबीच्या सुगंधाला आज कोणीच गिऱ्हाईक नव्हत. उनो, सापशिडी, व्यापार, चोर-पोलीस, पत्ते खेळायची चौकडी आज खेळाडूच हरवून बसली आहे अस न राहून वाटत होत.

समर क्याम्प, चार भिंतीच्या आत व्यायाम, घाम न येता एसी क्लब हाउस ला जायची हौस आज सुट्टीच्या मुळावर उठली आहे. मैदाने आहेत कुठे पेक्षा आज खेळणारे आहेत कुठे हा सर्वात मोठा प्रश्न असतो. सर्वच सुखकर करण्याच्या नादामुळे आपण मुलाचं बालपण हिरावून घेतल आहे. फुटलेले अंगठे, घामाने भिजलेल अंग, उन्हात काळी पडलेली त्वचा हेच तर खर बालपण. आपण सर्व खड्डे बुजवले आणि राजमार्ग दिला खूप लवकर मोठ होण्याचा. पण त्या नादात मे महिन्याची सुट्टी मात्र आपण हरवून बसलो आहोत

इन्क्रेडिबल इंडिया - (अंगकोर वाट).... विनीत वर्तक

देऊळाचे द्वारी बघितल्यानंतर अंगकोर मंदिराने मनाचा ताबा घेतल्यागत झाल होत. विकिपीडिया आणि तत्सम लिंक वरून जी माहिती मिळाली ते वाचून तर सर्दच झालो. इतका मोठा अविष्कार तो हि भारतीय संस्कृतीच प्रतिनिधित्व करणारा इतका कसा काय दुर्लीक्षित राहू शकतो. इतकी मोठी प्रतिभा ह्या मंदिरात आहे कि वाचाव तेवढ अजूनच स्तिमित होत जातो. इतक प्रचंड असा सांस्कृतिक वारसा आजही तितक्याच दिमाखाने उभा आहे पण भारतीय त्या बद्दल अगदी अनभिज्ञ आहेत हे बघून क्लेश हि होतोच.

सहज विचार केला आणि एका चित्रकाराला आपण मंदिर चित्रित करायला सांगितल. त्याने ते केल ज्यात आपली संस्कृती दिसेल. आता आपण एका स्थापत्य शास्त्राला बोलावून त्याची खरोखरची मापे करून त्याचा प्लान तयार केला. आता एका गणिती ला बोलावून त्याच काळाच्या, सूर्याच्या, अंतराच्या मापाने प्रूफिंग केल. आता एका अभियंत्याला बोलावून त्याला हे बनवायला सांगितलं. आता कारागिरांना बोलावून जे चित्रकाराने दाखवलं आहे ते जिवंत करायला सांगितल. हे सगळ झाल्यावर कामगारांना हे बांधायला सांगितल. हे करताना अभियांत्रिकीच्या जवळपास सगळ्याच शाखेच्या विद्वान लोकांनी एकत्र येऊन कला, संस्कृती, त्या मंदिराचा आत्मा ह्याला धक्का न पोचवता त्याच निर्माण करायचं. बर नुसत बांधून नाही तर काळाच्या कसोटीवर म्हणजे उन, पाउस, वारा ह्या सोबत वादळ, भूकंप, स्तुनामी अश्या नैसर्गिक आपत्ती चा विचार करून जागा शोधायची. त्या जागे मध्ये तोच खडक, बांधकामाच साहित्य ह्याचा साठा निर्माण करायचा. मंदिर चोहोबाजूने पाण्याने वेढलेल आहे. तेव्हा माती भुसभुशीत होऊन मंदिराच्या वजनाने ते न धसता काळाच्या कसोटीवर उभ राहील हे बघायचं. हे सर्व पेलताना त्याची भव्यता राहिली पाहिजे. (फुटबॉलची तब्बल अडीचशे मैदाने सहज मावतील, एवढे प्रचंड मोठे क्षेत्रफळ असलेले मंदिरआहे. याच्या बाह्यभिंतींचा परीघ चार किलोमीटर आहे.)

इतकच नाही तर काळाच्या परिमाणावर वर पण हे मंदिर अगदी खरे उतरते. मग तो सूर्योदय असो किंवा वर्षातील कोणता दिवस चालू आहे हे अचूक रित्या ओळखण्याची शिल्पा द्वारे केलेली मांडणी असो. किती प्लानिंग आणि र्रीसोर्सेस ह्या साठी लागले असतील. बर त्या काळी कॉम्प्यूटर नसताना सगळी गोळा बेरीज डोक्यात करून मग समोरच्याला ते सांगणे किती अवघड असेल. म्हणजे बघा आपल्या डोक्यात असलेली एक साधी घराची कल्पना सांगण्यासाठी आज किती पर्याय आहेत. फोटो, थ्री डी मोडेल, थ्री डी व्यू ह्या सगळ्याचा उपयोग करू तेव्हा आपण कुठे जाऊन आपल्याला काय हवे आहे हे इंटिरियर डिझायनर ला कळते. तर तेव्हाच्या लोकांनी हे कस केल असेल. राजा च्या मनात असलेली प्रतिकृती तशीच्या तशी उतरवणे आणि हे दिव्य पेलणे म्हणजे प्रचंड अशी कलासाधना आहे. आपल्याला अवगत असेलल्या शास्त्राची ती पूजा आहे त्या शिवाय हे शक्यच नाही.

एक अभियंता असून माझ मन सुन्न झाल. हि भव्यता आज १००० पेक्षा जास्त वर्ष टिकून आहे. हे सगळ उभ केल अवघ्या ३५ वर्षात... आज सगळी टेक्नोलोजी उभी केली तरी ह्या भव्यतेची कलाकृती उभारायला कमीत कमी ६०- ७० वर्षाचा कालावधी लागेल. हे सगळ आम्हा भारतीयांना अजून माहित नाही. अंगकोर ला ४० लाख लोक दरवर्षी भेट देतात. त्यात १० हजार सुद्धा भारतीय नाहीत. हि गोष्टच कुठेतरी प्रचंड लागते. ज्या जगाला आम्ही शून्य दिल. ज्याच जग नाव काढते पण आम्ही मात्र त्याची वाट लावण्यात धन्यता मानतो. ज्यावर एक अमेरिकन बाई २५ वर्ष अभ्यास करून पुस्तक लिहिते पण आपण भारतीय कुठेच नाहीत. एक साधी डोक्युमेंट्री पण ह्यावर नाही हेच बरच काही सांगून जाते. कोहिनूर हिर्या साठी धडपडणाऱ्या आणि भारतीय अस्मितेचा ठेवा म्हणून त्या हिर्याची भिक मागण्यापेक्षा कलेचे, संस्कृतीचे, गणिताचे, विद्वत्तेचे विद्यापीठ असणारे अंगकोर वाट भारताची प्रतिभा जास्ती उजळवते ह्यात शंका नाही. हा वारसा आपण हरवून बसलो आहोत तो मिळवण्यासाठी पुन्हा एकदा अभ्यासाची गरज आहे. जगातील सात आश्चर्यात ताजमहाल सामील व्हावा म्हणून आम्ही वोट करतो पण त्या ताजमहाल पेक्षा १००००% पट प्रतिभा गेले १०० दशके दाखवून ठेवणाऱ्या अंगकोर बद्दल आम्ही अनभिज्ञ आहोत हि सगळ्या भारताची शोकांतिका आहे.

काही नाही करता आल तरी ब्यांग्कोक, सिंगापूर, मलेशिया अशी साउथ इस्ट एशिया टूर करून धन्य पावणाऱ्या भारतीयांनी त्याच्याच बाजूला असलेल्या कंबोडिया ला भेट देऊन अंगकोर वाट सोबत तिथल्या मंदिरांबद्दल जाणून घेतल तर खर्या अर्थाने ती सहल इन्क्रेडिबल इंडिया विथ पास्ट, प्रेझेंट, फ्युचर ऑफ साउथ इस्ट एशिया अशी होईल

इमशोनल फर्स्ट एड.. विनीत वर्तक

फर्स्ट एड च शिक्षण आपण शाळेपासून घेतच येतो. शाळा, कोलेज ते अगदी व्यावसाईक आयुष्यात ते अनिर्वार्य आहेच. त्याच महत्व हि तितकच. अगदी वेळीच मिळालेली मदत एखाद्याच आयुष्य बदलू शकते. लहान मुलांना सुद्धा अगदी त्याची जाणीव असते. म्हणजे अगदी थोडस खरचटल तरी ब्यांड डेड ते बर्नोल आणि डेटोल पर्यंतची नाव शेंबड्या मुलांना पण ठाऊक असतात. ते कुठे ठेवल आहे इथवर ती माहिती अगदी तोंडपाठ असते.

पण शरीराच्या फर्स्ट एड साठी इतके जागरूक असणारे आपण मनाच्या फर्स्ट एड साठ...ी काय करतो? मुळात फिजिकल फर्स्ट एड ठाऊक आहे पण हे इमोशनल फर्स्ट एड काय प्रकार आहे ह्याचा आपण कधी विचार तरी केला आहे का? मानसिक धक्का हा शारीरिक व्याधी आणि आजारापेक्षा अधिक धोकादायक असतो शिवाय त्याचे दूरगामी परिणाम हि खूप क्लेशदायक असतात. हे विज्ञानाने सिद्ध करून सुद्धा आपण इमोशनल फर्स्ट एड बद्दल पूर्णतः अनभिज्ञ आहोत.

खरचटल्या पासून ते अगदी फ्र्याक्चर पर्यंत फर्स्ट एड काय आणि कस करायच ह्याच शिक्षण दिल जाते. पण मनाच्या हिंदोळ्यावर होणार्या अपघातासाठी काहीच नसते. इमोशनली आपण जास्ती धडपडतो राग, रुसवा, फसवल जाणे, अपमान ते कमी लेखण ह्या सगळ्याचा भडीमार रोज इकडून, तिकडून होत असतो. त्यामुळे निर्माण होणारा स्ट्रेस, निगेटीविटी , कमीपणाची भावना, आपला सेल्फ एस्टीम, इगो ह्याला कस म्यानेज करायचं ह्याबद्ल काहीच माहिती नसते. त्याला क्युअर करण्यासाठी फर्स्ट एड काय करतो आपण तर उत्तर काहीच नाही असच येईल.

शारीरिक व्याधींच्या मानाने मानसिक व्याधी सतत आपल्यावर परिणाम करत असतात. पण त्याकडे आपण बघत सुद्धा नाही. त्याचे परिणाम दिसल्यावर मग आपण मलमपट्टी करतो जी बर्याच वेळा तात्पुरती असते. वेळ निघून गेल्यावर केलेले उपाय योग्य तो परिणाम दाखवत नाहीच. इमोशनल फर्स्ट एड म्हणजे नक्की काय? ह्याच उत्तर खरे तर सोप्प आहे पण साधन आणि परिणाम खूप वेगळे आहेत.

आपल्याला असे कधी प्रसंग आले कि जिकडे तुम्हाला अपमान, त्रास, मानसिक डीस्टरबर्न्स जाणवला अश्या वेळी स्ट्रेस , नैराश्य, निगेटीव विचार ह्यांच्या खोल गर्तात न जाण्यासाठी आपण कसे स्वताला सावरू शकतो ह्याची एक यादी. जी आपल्याजवळ अगदी फर्स्ट एड बॉक्स प्रमाणे तत्काळ मिळेल. मग ते काही असेल एखाद गाण, एखाद्या जवळ मन मोकळ करणे, एखाद पुस्तक, चित्र, पिक्चर, किंवा आवडता टाईमपास किंवा अगदी काहीही जे आपल्याला ह्या नकारात्मक विचार आणि चक्रात जाण्यापासून रोखेल. कारण जर आपण हि लिंक त्याच वेळी ब्रेक केली तर आपण जास्ती चांगल्या रीतीने स्वतला सावरू शकू. प्रोफेशनली आणि पर्सनली पण. काही वेगळ करण्याची हि गरज नाही. फक्त स्वस्थ असताना आपल्याला नक्की काय, कोण, कसे सावरू शकते ते समजून घ्यायचं.

इमोशनल फर्स्ट एड आजची सगळ्यात मोठी गरज आहे. तेव्हा बनवूया एक इमोशनल फर्स्ट एड बॉक्स कदाचित तुमच्या पेटीत मी असेन आणि माझ्या पेटीत तुम्ही.अशी हि पेटी आपल्या बर्नोल, डेटोल सारखी जवळ ठेवूयात. काय माहित त्याची कधी गरज लागेल..

आनंदाचे डोही आनंद तरंग... विनीत वर्तक

आनंद काय? अस कोणी आपल्याला विचारल तर आपली उत्तर किती वेगळी असतात. आजचा दिवस आनंदात जावा असे वाटते का? हा प्रश्न स्वताला विचारला विचारला तर अगदी काही विचार न करता आपण होच बोलू. कोणाला वाईट दिवस जावासा वाटेल? पण मग उद्याच काय? परवाच काय? सोमवार , मंगळवार आणि पुढल्या आठवडयाच काय ते पुढल्या वर्षाच काय? सगळच आनंदात जाव अशीच इच्छा प्रत्येकाच्या मनोमनी असेलच. पण खरच अस शक्य आहे का? तर ह्याची दोन्ही उत्तरे आहेत. एक तर हो आणि नाही पण.

आनंदाची व्याख्या जर का बाहेरील घटनांवर, लोकांवर, प्रतिक्रियेवर किंवा बाह्य स्वरूपावर असेल तर प्रत्येक दिवशी आपण ते कंट्रोल करू शकू का? आजच ठीक आहे पण उद्या लोक माझ्याशी कसे वागतील? किंवा माझा सहकारी मला हव तस वागेल? उद्या घडणाऱ्या सगळ्या घटना मला आनंद देणाऱ्या असतील ह्याबद्दल मी पूर्णतः शाश्वत आहे का? माझी आनंदाची व्याख्या जर त्यावर आधारलेली असेल तर नक्कीच ह्याच उत्तर नाही असेच येईल. त्यामुळे दुःख, नैराश्य हे आपल्या आसपास सतत असणार आहे आज न उद्या ते आपल स्वरूप घेऊन समोर येणारच.

हाच आनंद जर आतून आलेला असेल तर म्हणजे माझ्या आनंदी राहण्याचा रिमोट कंट्रोल माझ्याकडे असेल तर कदाचित मी ह्याच उत्तर शाश्वत देऊ शकेन. हो मी आनंदी असेन आज, उद्या , परवा आणि वर्षांनी सुद्धा. पण हे आनंदी राहण आजच्या युगात शक्य आहे का? तर उत्तर होच अस आहे. आपल्या मनाला सुखाच्या आणि आनंदाच्या सामाजिक आणि शिकवलेल्या बंधनातून मुक्त करता आल तर नक्कीच. मेडीटेशन हेच तर सांगते मेडीटेशन आणि साधना मग ती कोणत्याही प्रकारची जी तुम्हाला आंतर मनाशी जोडते ती आपल्या आनंद आणि दुःखाच्या संकल्पना मोडीत काढून एक अती उच्च कोटीच समाधान देते. जे समाधान असते आतून आलेल आणि म्हणून ते निरंतर आणि काळाच्या पलीकडे असते.

अनेक रस्ते आपल्याला तिकडे नेतात योग, ओशो, मेडीटेशन, झेन विचारसरणी, बुद्दीझम ते कदाम्पा ट्रेडीशन जिकडे तुम्ही आनंद समजून घेतात. त्याच रिमोट कंट्रोल स्वताजवळ ठेवायला शिकतात. म्हणूनच कदाचित आज सेकंदावर धावणाऱ्या जगाला काळाच्या पलीकडे असणार्या ह्या रस्त्यांची गरज आहे कारण आनंदाचे डोही आनंद तरंग...

Meditation is just a courage to be silent and alone. Slowly slowly, you start feeling a new quality to yourself, a new aliveness, a new beauty, a new intelligence-which is not borrowed from anybody, which is growing within you. It has roots in your existence.
~ Osho