Sunday 9 August 2020

अटल बोगदा... विनीत वर्तक ©

 अटल बोगदा... विनीत वर्तक ©


पुढल्या महिन्यात प्रसिद्ध अश्या रोहतांग पास च्या खालून जाणारा रोहतांग बोगदा ज्याचं नामकरण 'अटल बोगदा' असं केलं गेलं तो सामान्य नागरिकांसाठी आणि देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या क्षणी वाहतुकीसाठी खुला होतो आहे. भारताला लेह-लडाख शी जोडणारा मनाली- लेह महामार्ग जवळपास ८ महिने अति- बर्फ़वृष्टीमुळे बंद असतो. त्यामुळे ह्या भागाचा संपर्क पूर्णपणे तुटून जातो. संपुर्ण वर्षभर लेह- लडाख शी संपर्कात राहण्यासाठी ह्या महामार्गावर सगळ्या काळात वाहतूक करण्यास सक्षम असेल असा बोगदा असावा असा क्रांतिकारी विचार १८६० मध्ये मांडला गेला होता. पण भारताच्या स्वातंत्र्यानंतर ही ह्याकडे कोणत्याच राजकारण्याने लक्ष दिलं नाही. तब्बल १४० वर्षांनी भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी ह्यांनी ३ जून २००० रोजी ह्या बोगद्याची घोषणा केली. पण राजकीय नेतृत्व बदलल्यामुळे हवी तशी गती ह्या कामाला आली नाही. ह्या शिवाय अनेक तांत्रिक अडचणी ह्या कामात समोर उभ्या राहिल्या पण  मात करत पुढल्या महिन्यात हा बोगदा वाहतुकीसाठी खुला होतो आहे. 


समुद्र सपाटीपासून जवळपास ३१०० मीटर (१०,१७० फूट) उंचीवर असणारा आणि तब्बल ८.८ किलोमीटर लांबीचा आहे. जगातील १०,००० फुटापेक्षा जास्त उंचीवर इतका लांब असणारा हा एकमेव बोगदा आहे. पीर- पांजाल च्या पर्वत रांगानखालून जाणारा हा बोगदा मनाली बाजूने धुंडी गावापासून सुरु होऊन पलीकडच्या बाजूला जुन्या लेह- मनाली रस्त्याला तेलींग इकडे जोडतो. ह्या बोगद्यामुळे मनाली ते केलोंग ह्या मधील अंतर जवळपास ४६ किलोमीटर ने कमी झालं आहे. हे अंतर वाचल्यामुळे मनाली ते लेह- लडाख हा प्रवास वर्षातील जवळपास सगळ्या महिन्यात शक्य होणार आहे. रोहतांग पास ओलांडण्यासाठी होणाऱ्या अडथळ्यातून सुटका होणार आहे. वेळ बचतीमुळे इंधन वाचणार आहे. ह्याशिवाय प्रदूषण कमी होणार आहे. ह्या सर्वाचा फायदा पर्यायाने सगळ्यात जास्ती भारताच्या सैन्याला होणार आहे. वर्षभर सैन्याची वाहने रसद, दारुगोळा लेह- लडाख मध्ये नेऊ शकणार आहेत. ह्याशिवाय रोहतांग ला भेट देणाऱ्या पर्यटकांमुळे होणाऱ्या ट्राफिकला बाजूला सारून सैन्याला वाहतूक करता येणार आहे.  


हा बोगदा बांधायला ३८०० कोटी रुपये खर्च आला आहे. जवळपास ३००० कंत्राटी कामगार आणि ६५० बी.आर.ओ. चे कर्मचारी २४ X ७ ह्या रस्त्याचं बांधकाम करत होते. २८ जून २०१० ला ह्या बोगद्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली. ह्या बोगद्याच्या निर्मितीत अनेक अडचणी अभियांत्रिकीच्या दृष्टीने समोर आल्या. एकतर इतक्या उंचीवर हिमालयाच्या पर्वतरांगांना पोखरून बोगदा बांधणं खूप जोखमीचं होतं त्यात ह्या बोगद्याच्या मार्गात असलेल्या पाण्याच्या वाहिनीमुळे खूप मोठा धोका समोर उभा राहिला होता. पोखरून काढलेली ८००,००० घन मीटर दगड माती कुठे टाकायची हा प्रश्न ही मोठा होता. ह्याशिवाय रोज जवळपास ३ मिलियन लिटर प्रति दिवस निघणार पाणी नियंत्रित करणं खूप मोठी अडचण ह्या बोगद्याच्या निर्मितीत होती. पण ह्या सगळ्यावर मात करत ह्या बोगद्याचे अशक्य वाटणारे काम भारतीय अभियंतांनी पूर्ण तर केलं पण हा बोगदा अतिशय नाविन्यपूर्ण सुरक्षतेतीच्या क्षमतेने निर्माण केला गेला आहे. 


ह्या बोगद्यात प्रत्येक १५० मीटर वर टेलीफोन ची सोय आहे. प्रत्येक ६० मीटर वर आग विझवण्यासाठी नळ बसवलेला आहे. प्रत्येक ५०० मीटर वर आपात कालीन निकास आहे. प्रत्येक किलोमीटरवर हवेच प्रदूषण मोजण्याची आणि नियंत्रण करण्याची सोय आहे. प्रत्येक २५० मीटरवर सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवलेले आहेत. ज्यामुळे वाहतुकीवर पूर्णपणे लक्ष ठेवता येणार आहे. ह्या बोगद्यातून वाहनांचा वेग ८० किलोमीटर/ तास इतका नियंत्रित करण्यात आला आहे. दररोज जवळपास ३००० कार आणि १५०० ट्रक ह्यांची वाहतूक होणार आहे. जवळपास वर्षभर हा बोगदा बर्फाने झाकलेला असणार आहे. हिमस्खलन अथवा दरड कोसळून अपघात होऊ नये म्हणून ह्या बोगद्याच्या दोन्ही बाजूला सेन्सर बसवण्यात आले आहेत ज्याची यंत्रणा डी.आर.डी.ओ. ने विकसित केली आहे. ह्या सर्व गोष्टींमुळे अटल बोगदा देशातील अभियांत्रिकीचा एक मैलाचा दगड ठरणार आहे. ह्याच्या निर्मितीत योगदान देणाऱ्या सर्वच अभियंते, कामगार, आणि ह्याचे स्वप्न बघून ते प्रत्यक्षात तयार करणाऱ्या सर्व यंत्रणा ह्यांना माझा सलाम. 'अटल बोगदा' देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने येणाऱ्या काळात भारतीय सेनेसाठी वरदान ठरणार आहे. 


फोटो स्रोत :- गुगल 


सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  


50 comments:

  1. Incredible 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

    ReplyDelete
  2. May I know which company has constructed this ?

    ReplyDelete
    Replies
    1. BRO means Border Roads Organisation, under the Defence Ministry.

      Delete
  3. खूपच सुंदर माहिती दिली याबद्द्ल मनापासून धन्यवाद. भारतीय तंत्रज्ञ कमी नाहीत हे यातून जगासमोर सिद्ध होईल. सर्व भारतीयांना नक्कीच अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे.👍👍👍💐💐💐

    ReplyDelete
    Replies
    1. खरच आहे अशा अलौकीक गोष्टि भारतभुमीत तयार करणारे अभियंते व त्याना प्रोत्साहीत करणारे अटलजी सारखे देशभक्त आहेत व केवळ अशा व्यक्ती व व्यक्तीसमुहा मुळेच एक दिवस हिंदुस्थान महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे.
      या सर्वाचा सर्व हिंदवासीयाना ग्रर्व असलाच पाहीजे

      Delete
  4. "जवळपास वर्षभर हा बोगदा बर्फाने झाकलेला असणार आहे"
    कारण काय आहे?

    ReplyDelete
    Replies
    1. वर्षभर झाकलेला म्हणजे त्याचा वर जे डोंगर आहेत त्यांच्या वर जवळजवळ वर्षभर बर्फ असते

      Delete
  5. भारतीय इंजिनियर खूप हुशार आहेत.पण राज्यकर्ते बरोबर नाहीत.

    ReplyDelete
  6. जबरदस्त काम आहे .
    सैन्याची हालचाल अधीक जलद होईल
    चिनला हा आणखी एक धक्का आहे .

    ReplyDelete
  7. I have been there while it was under the construction. It is amazing site,If you go through this you are going to miss the thrill of the Rohtang pass.

    ReplyDelete
  8. खूप छान माहिती. धन्यवाद.

    ReplyDelete
  9. खूप छान माहिती. धन्यवाद.

    ReplyDelete
  10. जबरदस्त ,, खूप च मस्त माहिती आणि बातमी

    ReplyDelete
  11. जबरदस्त ,, खूप च मस्त माहिती आणि बातमी

    ReplyDelete
  12. स्वर्गीय अटलजींना साष्टांग दंडवत आणि बोगदा व सडक निर्मिती चे यशस्वी कार्य करणार्या सर्व तंत्रज्ञ,कर्मचारी,कामगार यांचं अभिनंदन!जय हिंद!जय श्री राम!🙏⚘

    ReplyDelete
  13. सलाम अटलजी यांच्या विचारांचा सलाम ईऺडीयन इंजिनिअर आनी कामगार यांना सलाम सर्व भारतीय जनतेला

    ReplyDelete
  14. Fantastic example of engineering and mor importantly political will and determination.

    ReplyDelete
  15. पहिला मानाचा मुजरा, ज्या leadership ने हे स्वप्न पाहिले त्यांना...
    दुसरा, भारतीय अभियंत्यांना & Executors ना..
    जय हिंद...
    वंदे मातरम्...

    ReplyDelete
  16. अप्रतिम पोष्ट...


    अतिशय महत्वपूर्ण माहिती, तसेच भारताला अत्यंत भूषणास्पद आहे. विशेष म्हणजे वर्षभर मनाली वरून लेहला जाता येईल.

    या पोष्ट मधील एका वाक्याचा खुलासा होत नाही...

    जवळपास वर्षभर हा बोगदा बर्फाने झाकलेला असणार आहे.

    कृपया अधिक माहिती द्यावी

    ReplyDelete
  17. Very nice project
    I am happy this tunnel

    ReplyDelete
  18. खूप छान भारतीय अभियंत्यांनी निसर्गाशी सामना करत बोगद्याचे काम पूर्ण केलं सर्व अभियंतेच खूप खूप अभिनंदन 👌💐🙏

    ReplyDelete
  19. आम्हाला भारतीय अभियंते आणि समस्त कामगार यांचा अभिमान आहे. अशक्य आहे ते शक्य करुन दाखवले.
    जय हिंद.. वंदेमातरम.. जय हिंद सेना

    ReplyDelete
  20. Complements for very useful information & important landmark achievement by India.
    Last line of last but one para has one word wrongly spelt. Please correct.

    It should be "सुरक्षतेच्या" instead of "सुरक्षतेतीच्या".

    ReplyDelete
  21. Great achievement and success by the Indians those involved in the construction field.

    ReplyDelete
  22. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  23. Very nice project I proud of iam indian

    ReplyDelete
  24. बरोबर शब्द 'सुरक्षिततेच्या' असा आहे.

    ReplyDelete
  25. देशाच्या सुवर्ण युगाकडे वाटचाल होत आहे.

    ReplyDelete
  26. 2010 म्हणजे ममो सिंह सरकारने चालू केलेला. चला, अटलजींचे काही तरी का होई ना एखादे काम सुरु केले / ठेवले.

    ReplyDelete
  27. It is a very useful for our military.and it is a great achievement and success of our BRO.
    JAI HIND!!!
    👍👍👍🌹🌹🌹🙏🙏🙏

    ReplyDelete
  28. भारत माता की जय !

    ReplyDelete
  29. छान सर,
    तुमच्या या कामगिरीला सलाम जय हिंद!

    ReplyDelete
  30. अटलजींच्या प्रेरणेतून साकारलेला व भारतीय अभियंते आणि कुशल, कष्टाळू कामगारांनी पूर्णत्वास नेलेला असा हा उत्तम व उपयुक्त प्रकल्प. सगळ्यांचेच मनापासून अभिनंदन आणि कौतुक !
    💐॥ जय हिन्द ...जय भारत ॥ 💐

    ReplyDelete
  31. अटलजी ने शुरु किया मोदीजी ने पूरा किया. इसीलिये कहते की मोदी हे तो मुमकिन है.

    ReplyDelete
  32. अटलजी ने शुरु किया मोदीजी ने पूरा किया. इसीलिये कहते की मोदी हे तो मुमकिन है.

    ReplyDelete
  33. अटलजी ने शुरु किया मोदीजी ने पूरा किया. इसीलिये कहते की मोदी हे तो मुमकिन है.

    ReplyDelete
  34. देश का नेता कैसा हो नरेंद्रभाई मोदीजी जैसा हो

    ReplyDelete