ब्युटी विथ बिस्ट... विनीत वर्तक ©
भारताची राफेल विमान आज काही वेळाने भारताच्या भूमीवर उतरतील. राफेल विमान येण्याचा इतका आनंद भारतात साजरा होतो आहे त्याचवेळी शत्रू देशात मातम सुरु झालेला आहे. जवळपास १८ वर्षानंतर भारतात एक नवीन लढाऊ विमान येते आहे ह्याचा आनंद आहेच पण त्याचसोबत येणार विमान हे शत्रूला कर्दनकाळ ठरणार आहे त्यामुळे आनंद द्विगुणित होतो आहे. अजून भारतात राफेल विमान आलेली नाही तोवर शत्रूच्या गोटात घाम आणि जाळ, धूर एकत्रच सुरु झालेला आहे. ह्याच कारण राफेल विमानं तर आहेतच पण त्याच्या जोडीला भारताच्या सीमेवर जे कॉम्बिनेशन होते आहे त्याचा धसका सर्वानी घेतला आहे. जगात असं कॉम्बिनेशन कोणत्याच देशात तूर्तास नाही. तर नक्की असं काय आहे? ज्यामुळे शत्रूची पाचावर धारण बसली आहे.
भारताकडे चौथ्या पिढीतील किंबहुना ४ थ्या पिढीपेक्षा थोडं जास्ती प्रगत असं सुखोई एम.के.आय. ३० हे लढाऊ विमान आहे. हे विमान माख २ किंवा तब्बल २१२० किमी/ तास वेगाने उडू शकते. ३००० किमी नॉर्मल तर जवळपास १०००० किमी अंतर हवेतल्या हवेत इंधन भरून गाठू शकते. ह्यावर प्रगत रडार आहे आणि जवळपास ८,००० किलोग्रॅम वजनाची शस्त्रास्त्र घेऊन ते उडू शकते आणि पुगाचेव्ह कोब्रा सारखी हवाई कसरत करण्यात जगात सर्वोत्तम समजले जाते.
In aerobatics, Pugachev's Cobra (or Pugachev Cobra) is a dramatic and demanding manoeuvre in which an airplane flying at a moderate speed suddenly raises the nose momentarily to the vertical position and slightly beyond, before dropping it back to normal flight.
ह्याच्या जोडीला ब्राह्मोस हे स्वनातीत क्षेपणास्त्र सुखोईवर बसवण्यात आलं आहे. ब्राह्मोस हे जगातील सगळ्यात वेगवान रयामजेट सुपर सॉनिक क्रुझ मिसाईल आहे. ध्वनीच्या २.८ पट ते ३ पट जवळपास ३६०० किमी/तास वेगाने जाणारे म्हणजे बंदुकीच्या गोळी पेक्षा हि जास्त असणारा हा वेग ब्राह्मोस ला जगातील सगळ्यात घातक मिसाईल मध्ये घेऊन जातो. अति प्रचंड वेगामुळे हे मिसाईल प्रचंड अशी कायनेटिक उर्जा निर्माण करते. त्याचमुळे ह्याचा प्रहार म्हणजे शत्रूचा सुपडा साफ.
भारत लवकरच एस ४०० एअर डिफेन्स सिस्टीम सीमेवर तैनात करत आहे. एस ४०० ची एक बटालीयन म्हणजे शत्रूच्या चारी मुंड्या चीत. ह्यातील सर्व मिसाईल सुपर सॉनिक व हायपर सॉनिक वेगाने म्हणजे तब्बल १४ माख वेगाने ( ध्वनीपेक्षा १४ पट जास्ती वेगाने) १७,००० हजार किमी / तास वेगाने शत्रूकडे झेपावतात. एक उदाहरण द्यायचं झाल तर हलवारा एअर बेस मध्ये असलेल्या एस ४०० कडून निघालेलं क्षेपणास्त्र पाकिस्तान मधल्या लाहोर वर उडणाऱ्या एफ-१६ विमानाचा फक्त ३४ सेकंदात वेध घेऊ शकते. १२० ते ६०० किमी पर्यंतच्या टप्यात येणार कोणतही विमान, क्षेपणास्त्र किंवा ड्रोन ह्याच्या पासून वाचू शकत नाही. एकाच वेळी ६०० किमितील ३०० वेगवेगळी टार्गेट शोधून तब्बल ८० टार्गेट वर एकाच वेळी खातमा करू शकते. १६० वेगवेगळ्या मिसाईल न एकाच वेळी गाईड करू शकते. ह्यातील स्याम सिस्टीम एफ-३५ सारख्या पाचव्या पिढीतील स्टेल्थ ( रडार वर न दिसणाऱ्या ) फायटर प्लेन ला सुद्धा मारू शकते.
जगातील सध्याच्या घडीला ४.५ पिढीतील सर्वोत्तम समजलं जाणार राफेल लढाऊ विमान २२०० किमी/ तास वेगाने ३७०० किलोमीटर चा पल्ला गाठू शकते. जवळपास १५०० किलोमीटर चा परीसर ह्याच्या टप्यात येतो. ह्याशिवाय राफेल स्काल्प आणि मेटोर, हॅमर क्षेपणास्त्र नी सुसज्ज आहे. ह्याच्या निर्मितीत अतिशय प्रगत तंत्रज्ञान वापरलं गेलं आहे. अंबाला इथून उडालेले राफेल अवघ्या ८ मिनिटात पाकिस्तान चं लाहोर गाठू शकते तर हसीमारा इथून उडालेले राफेल अवघ्या ३ मिनिटात चीन मध्ये दाखल होऊ शकते. तब्बल ६०० किलोमीटर अंतरावरून राफेल लक्ष्यभेद करू शकते. भारताच्या हद्दीत राहून जवळपास पुर्ण पाकीस्तान त्याच्या टप्यात आहे.
आता विचार करा जेव्हा राफेल विथ स्काल्प आणि मेटोर, हॅमर, त्याच्या जोडीला सुखोई ३० विथ ब्राह्मोस हवेत उड्डाण करतील आणि ह्यांना जमनीवरून शत्रूच्या विमानापासून, क्षेपणास्त्रापासून, द्रोण पासून संरक्षण देणारी एस ४०० यंत्रणा काम करत असेल तेव्हा कोणता शत्रु भारतात येण्याची हिंमत करेल? ह्यामुळेच पाकीस्तान ची एफ १६ आणि जे एफ १७ आता अंडी उबवायला कामाला येणार आहेत. तर तिकडे चीन ची जे २० सह जे ७, जे १० , आणि सगळेच जे फक्त हवेतल्या हवेत गिरक्या घेण्याइतपत उरणार आहेत. राफेल च्या येण्यानं भारताच्या हवाई दलाला नुसती ताकद मिळालेली नाही आहे तर भारताचं हवाई दल अभेद्य होणाच्या दिशेने पावलं टाकत आहे. ह्यामुळेच शत्रु देशात आग, जाळ, धूर निघायला लागला आहे. राफेल च्या ब्युटी मागे भारताच्या हवाई दलाचं अभेद्य बिस्ट त्यांच्या मानगुटीवर बसलं आहे. ह्याच राफेल वरून खालच्या दर्जाचं राजकारण करून काही घरभेदी शत्रूंनी भारताची इज्जत वेशीवर टांगली होती. भारताच्या संरक्षणासाठी अतिशय महत्वाच्या असणाऱ्या गोष्टींना हाताशी धरून त्याच राजकारण करून आपली पोळी भाजणाऱ्या घरभेदी लोकांकडून भारताला जास्त भीती आहे. कारण सीमांच्या आत निदान हवेतून घुसण्याची हिंमत भारताच्या दोन्ही शत्रूंकडे नाही हे उघड झालेलं आहे.
फोटो स्रोत :- गुगल
सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

काय क्रमांक आहे copyright चा आणि कुठे आहे certificate?
ReplyDelete