पृथ्वीचा दुसरा चंद्र... विनीत वर्तक ©
गेल्या आठवड्यात १५ फेब्रुवारी २०२० ला सकाळी ४ वाजता अमेरीकेतील दोन खगोलशास्त्रज्ञ काचपेर विरजचोस आणि थिओडोर पृयने आकाशाच निरीक्षण करत असताना त्यांच्या कॉम्प्युटर स्क्रीन वर एक एक ठिपका त्यांना दिसला. आकाशात लघुग्रहांच्या स्वरूपात अनेकवेळा असे ठिपके दिसतात. हे लघुग्रह अवकाशात सूर्याच्या भोवती प्रदक्षिणा करत असतात. मंगळ आणि गुरु ग्रहांच्या मध्ये लघुग्रहांचा एक पट्टा आहे. आपल्या सौरमालेतील सगळ्यात मोठा ग्रह गुरु आपल्या सौरमालेत घुसलेल्या अश्या एकट्या लघुग्रहांना आपल्याकडे खेचून बंदिस्त करतो. अनेकदा गुरूच्या गुरुत्वाकर्षणात होणारे बदल ह्या लघुग्रहांना आपल्या आतल्या सौरमालेतील ढकलतात. आत हे लघुग्रह घुसले की सूर्याच्या भोवती फिरताना अनेकदा पृथ्वीच्या परिक्रमेच्या रस्त्यात येतात. पण ह्या वेळेस आलेला उपग्रह मात्र वेगळा होता. ह्या उपग्रहाने सूर्याची साथ सोडत पृथ्वीशी सलगी करताना पृथ्वीच्या भोवती चंद्राप्रमाणे आपलं भ्रमण सुरु केलं.
आत्ता दिसलेल्या ह्या दुसऱ्या चंद्राच नामकरण सध्या 2020 CD3 असं करण्यात आलेलं आहे. ह्या उपग्रहाला साधारण १८ महिन्यापूर्वी पृथ्वीने आपल्या कक्षेत पकडलं असावं असा अंदाज ह्याचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. 2020 CD3 हा साधारण एखाद्या कार एवढा मोठा आहे. त्यावर नक्की काय आहे हे सांगणं सध्या तरी कठीण असलं तरी तो नक्कीच कोणत्याही रॉकेट चा भाग अथवा मानवाने पाठवलेली वस्तू नाही ह्यावर शास्त्रज्ञांच एकमत आहे. हा दुसरा चंद्र गेली दीड वर्ष पृथ्वी भोवती सगळ्या उपग्रहांच्या, दुर्बिणीच्या आणि शास्त्रज्ञांच्या नजरेला चुकवून पृथ्वीभोवती फिरत होता. आता येत्या दोन आठवड्यात तो पृथ्वीचा निरोप घेऊन आपल्या पुढल्या प्रवासाला मार्गस्थ होणार आहे.
2020 CD3 आता निरोप घेतल्यावर आपल्या पृथ्वीला पुन्हा भेट द्यायला साधारण २०२८ साली परत येईल. 2020 CD3 हा पहिला आणि शेवटचा असा लघुग्रह नाही की जो पृथ्वीच्या रस्त्यात आलेला आहे. आपलं नशीब इतकं बलवत्तर आहे की गुरु सारखा महाकाय ग्रह आपलं संरक्षण करण्यासाठी वाटेत बसला आहे. ह्या गुरूच्या नजरेला चुकवून पृथ्वीला भेट देणाऱ्या लघुग्रहांची संख्या कमी नाही. अनंत पसरलेल्या ह्या विश्वाच्या पसाऱ्यातून कोण, कधी, कसा आपल्या वाटेत आडवा येईल हे आज तरी आपण सांगू शकत नाही. कारण तंत्रज्ञानातील प्रगतीने कितीही प्रगती करून डोळे दिले तरी आपल्या नजरेची क्षमता खूप सिमीत आहे. ह्याचमुळे आज जवळपास १८ महिने पृथ्वीच्या वास्तव्याला असणाऱ्या दुसऱ्या चंद्राला आपण ओळखू शकलेलो नाही. जेव्हा त्याची ओळख पटली तेव्हा त्याचे जायचे दिवस जवळ आलेले होते.
आपल्या सभोवती पसरलेल्या ह्या अथांग विश्वात अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या आजही मानवाच्या बुद्धिमत्तेपलीकडे आहेत. त्याची उत्तर शोधण्याचा प्रयत्न आजही मानव करत आहे पण त्याची व्याप्ती ह्या विश्वाच्या मानाने खूप कमी आहे. पृथ्वीच्या ह्या दुसऱ्या चंद्राला शोधणाऱ्या खगोलशास्त्रज्ञांना माझा सलाम आणि जाता जाता त्यांच्यासाठी काही शब्द,
“Once we lose our fear of being tiny, we find ourselves on the threshold of a vast and awesome Universe which dwarfs -- in time, in space, and in potential -- the tidy anthropocentric proscenium of our ancestors.”
― Carl Sagan
फोटो स्रोत :- गुगल
सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.