एक नवा उदय... विनीत वर्तक ©
आजवर इतर देशांकडून शस्त्रास्त्रे विकत घेणारा भारत आज क्षेपणास्त्र निर्यात करणारा देश म्हणून जगाच्या क्षितिजावर उदयाला आला आहे. भारत- रशिया यांनी संयुक्त रित्या निर्माण केलेलं आणि भारताच्या ब्रह्मपुत्रा नदीच्या नावावर असलेलं जगातील सगळ्यात वेगवान आणि अचूक स्वनातीत क्षेपणास्त्र 'ब्राह्मोस' च्या खरेदीची ऑर्डर फिलिपाइन्स ने भारताकडे दिलेली आहे.
फिलिपाइन्स ने २ बॅटरीची ऑर्डर भारताला दिलेली आहे. एका बॅटरी मधे ४ लॉन्चर असून एका लॉन्चर मधे ३ ब्राह्मोस क्षेपणास्त्र असतात. अश्या २४ ब्राह्मोस क्षेपणास्त्रांसाठी फिलिपाइन्स ने तब्बल ३७४,९६२,८०० अमेरिकन डॉलर मोजलेले आहेत. या शिवाय अजून ब्राह्मोस खरेदी करण्याचा मार्ग ही मोकळा ठेवला आहे.
भारतासाठी ब्राह्मोस हुकमाचा एक्का ठरला आहे. एकट्या फिलिपाइन्स सोबत झालेला करार हा ३७४ मिलियन अमेरिकन डॉलर चा आहे. इतक्या प्रचंड प्रमाणात परकीय चलन भारताला यामुळे मिळणार आहे. भारत फिलिपाइन्स ला देत असलेल्या ब्राह्मोस ची क्षमता ही २९० किलोमीटर पर्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे. फिलिपाइन्स हा एम.टी.सी.आर. Missile Technology Control Regime (MTCR) चा सदस्य नसल्याने ३०० किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावरची क्षेपणास्त्र भारताला विकता येणार नाहीत.
या कराराचे अधिकृत पत्रक पोस्ट च्या खाली जोडत आहे. फिलिपाइन्स कडे ब्राह्मोस च्या येण्याने साऊथ चायना सी मधे चीन च्या वर्चस्वाला खूप मोठा धक्का मानला जात आहे. हा करार रोखण्यासाठी चीन ने केलेले सर्व प्रयत्न वाया गेले आहेत. फिलिपाइन्स पाठोपाठ जवळपास १०-१२ देश ज्यातील ७०% पूर्व आशियामधील आहेत. त्या सर्वानी ब्राह्मोस च्या खरेदीसाठी रांगा लावल्या आहेत.
चीन च्या समुद्रावरील वर्चस्वाला आव्हान जर का क्षमतेने देता येत नसेल तर त्याला प्रतिकार करण्याची क्षमता एकट्या ब्राह्मोस कडे आहे. कारण ब्राह्मोस ला रोखण्याच किंवा त्याचा रस्ता अडवण्याचं कोणतही तंत्रज्ञान चीन काय अजून जगातील कोणत्याच देशाकडे उपलब्ध नाही. एकाचवेळी ३ पेक्षा जास्ती ब्राह्मोस ना एकाच वेळी रोखण्यात जगात सर्वोत्तम मानली गेलेली एस ४०० ही प्रणाली ही निष्प्रभ ठरते. तिकडे इतर प्रणाली बद्दल न बोललेलं बर .
एकूणच ब्राह्मोस च्या या कराराने भारताच्या क्षितिजावर एका नव्या सूर्याचा उदय झाला असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
जय हिंद!!!
फोटो शोध सौजन्य :- ट्विटर
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
नमस्कार,
ReplyDeleteआपले ब्रम्होस विषयीचे शब्दांकन फार छान आहे. ते इंग्लिश मध्ये माझ्या WhatsApp group वरील अमराठी मित्रांसाठी टाकले तर चालेल का? तुमचा संपर्क क्रमांक मिळाला तर तो इंग्रजी अनुवाद आपल्या मान्यतेसाठी पाठवेन.
देवदत्त चंदावरकर, पुणे
मोबाईल क्रमांक 9822619815
Yes go ahead. No issue.
Deleteअतिशय छान आणि उपयोगी माहिती.अभिनंदन..
ReplyDeleteGood news . Jai hind
ReplyDeleteआई तुळजाभवानी मातेच्या आशिर्वादाने अशीच ऊंच भरारी घेत राहो आपला भारत🇮🇳🇮🇳
ReplyDeleteजय हिंद भारत
ReplyDeleteJai Hind
ReplyDeleteI am proud of my country and all scientists
Jay हो Namo.
ReplyDeleteसुंदर माहिती...आणी विकसित तंत्रज्ञानचा....लेख..पाठवल्या बद्दल मनापासून आभार....जय हिंद..
ReplyDeleteखूप छान माहिती अशा माहिती सहज मिळत नाही तुम्ही मराठीत केल्यामुळे छान समजले भारत माता की जय
ReplyDeleteखूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
ReplyDeleteभारत सरकारचे व आपल्या वैद्यानिका चे मनापासून आभार
जय हिंद.
जय हिंद
ReplyDeleteजय हो! आमचा भारत देश असाच दिवसेंदिवस प्रगती करो
ReplyDeleteव या देशातील व परदेशातील विरोधकांचे तोंड बंद करो
जय हिंद
सारे जहाँ से अच्छा ।
ReplyDeleteहिन्दोस्ता हमरा ।।
अत्यंत अभिमानास्पद कार्यक्रम. मोदींच्या राज्यात अशा कितीतरी गोष्टी घडत आहेत. भारतात जन्माला आलो याचा गेल्या सात वर्षात अभिमान वाटत आहे.
ReplyDeleteअशी उत्तुंग भरारी आम्ही घेऊन पूर्ण जगावर आम्ही राज्य करो
ReplyDeleteसगळ्या वाचकांचा आभारी आहे.
ReplyDeleteबलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो!
Deleteवर्तक सर,
Deleteब्राम्होस मिसाईल सिस्टम ही एस ४00 या सर्वोत्तम मिसाईल डिफेन्स सिस्टमला जुमानत नाही, हे ऐकून खूप अभिमान व गंमत देखील वाटली...
आपल्या post साठी मनापासून आभार..
very good Naya Bhart
ReplyDeletevery good NAYA BHARAT
ReplyDeleteमेरा भारत महान हैं और रहेगा भी.. good news
ReplyDelete