Saturday, 9 May 2020

जेनेरिक आधार... विनीत वर्तक ©

जेनेरिक आधार... विनीत वर्तक ©

जेनेरिक आधार ही कंपनी आणि तिची स्थापना करणारा ठाण्याचा अर्जुन देशपांडे सध्या खूप चर्चेत आहेतह्याला कारण की जेनेरिक आधार ह्या कंपनी मधला जवळपास ५०इतका हिस्सा भारतातील सगळ्यात नावाजलेले उद्योगपती आणि आदरयुक्त व्यक्तिमत्व असणाऱ्या रतन टाटा ह्यांनी खरेदी केला आहेरतन टाटा हे नाव उद्योगजगतात जसं नावाजलेलं आहे त्याहीपेक्षा एक भारतीय म्हणून प्रत्येक भारतीयाच्या मनात त्यांच्याविषयी आदर आहेनेहमीच भारतातल्या प्रत्येक तळागाळातल्या लोकांच्या जीवनाचा स्तर उंचावण्यासाठी आजवर त्यांनी केलेले प्रयत्न मग ते अगदी तोट्यात जाणारी नॅनो कार असो वा आत्ता कोरोना च्या लढ्यात सगळ्यात जास्ती तब्बल १५०० कोटी रुपयांची मदत असो नक्कीच त्यांची एक वेगळीच छाप जनमानसावर पडलेली आहेइतक्या उत्तुंग व्यक्तिमत्वाने एका १८ वर्षाच्या मराठी मुलाच्या स्टार्ट अप कंपनी मधील जवळपास ५०हिस्सा खरेदी करावा ही बाब अर्जुन देशपांडे साठी जितकी महत्वाची आहे तितकीच ती प्रत्येक भारतीयासाठी येत्या काळात महत्वाची ठरणार आहेकारण अर्जुनाच्या बाणांना आता रतन टाटांच्या रूपाने श्रीकृष्णा सारखा सारथी लाभला आहे असं म्हंटल्यास चुकीचं ठरणार नाहीनक्की जेनरिक आधार काय आहेरतन टाटा सारख्या मोठ्या उद्योजकाला भुरळ पाडणाऱ्या ह्या बिझनेस मॉडेल मध्ये नक्की असं काय आहे ते जाणून घेणं खूप महत्वाचं आहे.

जेनेरिक औषध म्हणजे कायहे आपण आधी समजून घेणं गरजेचं आहेकोणत्याही रोगावर औषध शोधण्यासाठी औषध बनवणाऱ्या कंपन्या खूप सारे पैसे शोधकार्यात गुंतवतातत्या रोगावर मग औषधांच्या रूपाने उपाय मिळाल्यावर ह्या गोळ्यालसीइंजेक्शनक्रीम अथवा ड्रॉप्स बाजारात आणतातबाजारात आणताना ह्या औषधांची बनवण्याची किंमत जरी कमी असली तरी त्यांच्या शोधासाठी गुंतवलेल्या पैश्याचा परतावा म्हणून ही औषध बाजारात चढ्या भावाने विकायला येतातह्यामागे त्यांच्या निर्मितीचा खर्चशोधाचा खर्च आणि बनवणाऱ्या कंपनीचा नफा तसेच त्याची विक्री करणाऱ्या रिटेलरकेमिस्ट ह्यांच कमिशन हा सगळं अधिभार औषध विकत घेणाऱ्या ग्राहकाच्या माथ्यावर मारला जातोप्रत्येक नवीन औषधाच्या निर्मितीत गुंतवलेले पैसे परत मिळवता यावेत ह्यासाठी प्रत्येक सरकार अश्या प्रकारच्या नवीन औषधाला काही वर्षासाठी पेटंट हक्क ( स्वामित्व हक्कदेतेह्याचा अर्थ असतो की ह्या सारखं औषध दुसरी कोणतीही कंपनी बनवू शकत नाहीएकच कंपनी औषध बनवत असल्याने किमती ठरवण्याचा हक्क कंपनीकडे जातोस्पर्धक नसल्याने कंपनीला औषधांच्या विक्रीतून नफा कमावता येतोपण जेव्हा अश्या एखाद्या औषधाचं पेटंट संपते तेव्हा ते औषध दुसऱ्या कंपन्या ही बनवू शकतातफक्त ते बनवताना मूळ औषधाच्या जवळपास सारखेच घटक आणि काही मार्गदर्शक तत्व त्या कंपनी ला पाळावी लागतातजी नवीन कंपनी औषध बनवणार तिच्याकडे ते बनवण्यासाठी लागणारा फॉर्मुला आणि लागणारे घटक आधीच माहित असतातत्यामुळे नवीन कंपनीला फक्त बनवण्याचा खर्च करावा लागतोह्यामुळे औषधांची किंमत प्रचंड प्रमाणात कमी करता येतेकमी किमतीत ही रिटेलर आणि केमिस्ट  कमिशन,कंपनी आपला नफा कमावून ही औषधे जवळपास ५०%-८०कमी किमतीत ग्राहकांना उपलब्ध करून दिली जाऊ शकतातअश्याच औषधांना जेनेरिक औषध असं म्हणतात.

भारत अशी जेनेरिक औषध बनवणारा जगातील सगळ्यात मोठा उत्पादक आहेजगातील ६०जेनेरिक औषध आणि लसींचा वाटा एकट्या भारताकडे आहेआजमितीला जेनेरिक औषधांची भारतातील बाजारपेठ ३८ बिलियन अमेरीकन डॉलर इतकी प्रचंड आहेएकट्या भारताने २०१९-२०२० मध्ये एका वर्षात २०  बिलियन अमेरिकन डॉलर किमतीची जेनेरिक औषधे अमेरिका आणि युरोपियन देशात आयात केली आहेतएकट्या अमेरिकेत जेनेरिक औषधांचा वाटा जवळपास ८८इतका प्रचंड आहे. ( ग्राहकांकडून औषधांच्या झालेल्या मागणीत जेनेरिक औषधांचा वाटा ८८म्हणजे फक्त १२औषध ही पेटंट केलेली होती. ) ही बाजारपेठ ज्या वेगाने अमेरिकेत वाढते आहे त्यापेक्षा कित्येक पट अधिक वेगाने भारतात ती येत्या वर्षात वाढणार आहेभारत सरकारने सप्टेंबर २०१८ मध्ये 'आयुष्यमान भारतही योजना आणली आहेही जगातील सगळ्यात मोठी आरोग्य सेवा देणारी कोणत्याही सरकारची योजना आहेह्याच्या कक्षेत येणाऱ्या लोकसंख्येचा विचार करायचा झाला तर अमेरिकाकॅनडामेक्सिको अश्या तिन्ही देशांची मिळून जितकी लोकसंख्या होईल त्याहीपेक्षा जास्ती लोक ह्या योजनेअंतर्गत आरोग्य सेवेच्या छत्राखाली येणार आहेतभारतातील गरीबअतिशय गरजू लोकांपर्यंत जाणाऱ्या ह्या योजनेचं यशअपयश हे ह्याच जेनेरिक औषधांच्या उपलब्धतेवर ही अवलंबून आहेभारतात अजूनही जेनेरिक औषध तितकीशी रुळलेली नाहीतह्याच कारण ग्राहकांना औषधांची नसलेली माहिती आणि ग्राहकांकडून ब्रॅण्डिंग च्या नावावर उकळण्यात येणारे पैसे ह्यामुळे जेनेरिक औषध ही पेटंट औषधांच्या भावाने विकली जातातत्यामुळे भारतीय ग्राहकांच्या मनापर्यंत तो पोहचत नाहीत.

अर्जुन देशपांडे च्या त्या तरुण मनाने वयाच्या १५-१६ व्या वर्षात भारतातील जेनेरिक औषधांच्या बाबतीतली उदासीनता आणि ह्यातले कच्चे दुवे ओळखले होतेऔषधांच्या सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्या आई सोबत उन्हाळाच्या सुट्टीत अनेक देशात फिरताना अर्जुनला जाणवलं की भारतात अजूनही जेनेरिक औषधांचे फायदे तळागाळातील लोकांपर्यंत पोहचलेले नाहीतत्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा त्याने बोलून दाखवलीत्यातून जन्म झाला जेनेरिक आधार चाजेनेरिक औषधऔषध कंपन्यान कडून घेऊन ते थेट रिटेलरकेमिस्ट कडे पोहचवल्याने जवळपास १५%-१८ची बचत होत होती आणि हा सगळा फायदा रिटेलर आणि केमिस्ट चा नफा काढूनही ग्राहकांपर्यंत औषध कमी किमतीत पोहचवण्याचं शिवधनुष्य अर्जुन देशपांडे ने उचललंजेनेरिक औषधांच्या किमती कमी झाल्याने समाजातील गरीब व्यक्तींच्या अवाक्यात ही औषधे यायला लागलीअवघ्या दोन वर्षात जेनेरिक आधार चा टर्न ओव्हर  करोड पर्यंत वाढलाआपल्या वाटचालीच एक प्रेझेंटेशन अर्जुन देशपांडे ने उद्योगमहर्षी रतन टाटा ह्यांना दाखवलं होतंभारतातील प्रत्येक व्यक्ती पर्यंत औषध पोहचवण्याची क्षमता आणि त्याचवेळी त्यातील सहभागी व्यक्तींना योग्य तो मोबदला देणारं बिझनेस मॉडेल रतन टाटांनी नेमकं हेरलं.

जवळपास ६० वर्षापेक्षा जास्ती काळ टाटा ग्रुप सारख्या जगातील नावाजलेल्या ग्रुप ची धुरा आणि उद्योगजगताचा अनुभव रतन टाटांकडे आहेस्वतःची जवळपास ७५०० कोटी रुपये संपत्ती असणाऱ्या रतन टाटांनी जेनेरिक आधार मध्ये पैसे गुंतवण्याची दोन करणे म्हणजे जेनेरिक आधार ची वाढती लोकप्रियता आणि भारतातील तळागाळातील प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहचणारं आणि भारतीयांच आयुष्य समृद्ध करणारं जेनेरिक आधार चं बिझनेस मॉडेलयेत्या वर्षभरात जेनेरिक आधार जवळपास १००० रिटेलर आणि केमिस्ट ह्यांच्या मार्फत भारतातील - राज्यात विस्तार करणार आहेत्याचसोबत आय.टीआणि ऑनलाईन सेवा देण्याच्या बिझनेस मध्ये ही उतरणार आहे वर्षात जेनेरिक आधार ने आपला रेव्हेन्यू जवळपास १०० ते १५० कोटी पर्यंत नेण्याचं लक्ष ठेवलं आहेआता रतन टाटा सारख्या खऱ्या भारतीयाचं पाठबळ मिळाल्यावर अर्जुन देशपांडे ह्या १८ वर्षीय मराठी मुलाची घोडदौड येत्या काळात भारतातील जेनेरिक औषधाचा चेहरामोहरा तर बदलावणार आहेच पण त्या सोबत प्रत्येक भारतीयाला औषध स्वस्तात मिळण्याची सोय करणार आहे.

अर्जुन देशपांडे ला त्याच्या पुढच्या वाटचालीस माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि श्री रतन टाटा ह्यांचे पुन्हा एकदा आभार की त्यांनी पुन्हा एकदा भारतीयांसाठी एका नवीन पंखांना आपलं बळ दिलं आहेधन्यवाद सरभारत आणि भारतीय नेहमीच तुमचे आभारी आहेत.   
    
जय हिंद !!!

फोटो स्रोत :- गुगल   

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

No comments:

Post a Comment