स्पर्शाचा स्पर्श... विनीत वर्तक ©
शाळेतून आजकाल सगळ्याच विद्यार्थ्यांना गुड टच आणि बॅड टच शिकवलं जाते. आपल्या शरीराला होणारा कोणत्याही व्यक्तीचा स्पर्श आपण चांगला का वाईट कसा ओळखायचा हे सांगण्याची वेळ आज आपल्या ढासळलेल्या समाज व्यवस्थेमुळे वयात येणाऱ्या मुलांना सांगणं ही काळाची गरज बनली आहे. माणसाच्या इंद्रियांनी आणि त्यांच्यावर वचक ठेवणाऱ्या मेंदूने सगळ्या सजीवात माणसाला एक वेगळी ताकद दिली आहे. प्रत्येक सजीवात थोड्याफार फरकाने स्पर्शाची जाणीव असली तरी भावनांची आदान- प्रदान करण्याची मानवाची उंची इतर सजीवांपेक्षा खूप उच्च प्रतीची आहे. त्यामुळेच प्रत्येक स्पर्श हा भावनांची आदान प्रदान अतिशय तिव्रतेने करतो. ह्याचा चांगला आणि वाईट असे दोन्ही परीणाम आपल्याला दिसून येतात. ढासळलेल्या समाजात आणि त्याच्या नीतीमूल्यात ह्याच स्पर्शाचा वापर वासनेची भूक भागवण्यासाठी केला जाऊ लागला. आज अशी परिस्थिती आहे की वयोमानाच्या सगळ्या मर्यादा त्याने पार केल्या आहेत म्हणूनच ह्या स्पर्शाला ओळखण्याचा अभ्यास आणि ज्ञान शाळेतून कोवळ्या वयात दिलं जाणं गरज बनली आहे.
स्पर्शाच्या वाईट प्रवृत्तीबद्दल नेहमीच लिहिलं जाते. पण चांगल्या स्पर्शाच्या अनुभूतीत खूप ताकद असते. जेव्हा त्याचा वापर चांगल्या वृत्तीसाठी केला जातो तेव्हा त्यातून मिळणारं समाधान हे शब्दांपलीकडे असते. अशी कित्येक उदाहरण आपल्याला आयुष्यात बघायला मिळतात. कोणत्याही चांगल्या कामाच्या सुरवातीला मिळालेला स्पर्शरूपी आशीर्वाद ते काम नेटाने पूर्ण करण्याची प्रेरणा देतो. काम पूर्ण झाल्यावर कौतुकाने पडणारी पाठीवरची थाप आपल्याला एक वेगळचं समाधान देऊन जाते. कारण त्या स्पर्शातून भावनांचा एक वेगळा स्पर्श आपल्या मनाला होतं असतो. त्याची अनुभूती ही सगळ्यात जास्ती समाधान देणारी असते. आयुष्यात एखाद्या क्षणी हरलो असताना एकटे पडलो असताना पाठीवर असणारा एक हात आपल्या सोबत कोणीतरी आहे ह्याची जाणीव करून देतो. आपल्यासाठी त्या क्षणी फक्त कोणाची तरी सोबत हवी असते. पुन्हा एकदा उंच झेप घेण्यासाठी, आपल्या वाटेला आलेल्या दुःखाला पचवण्यासाठी आणि कधी कधी फक्त शब्दांशिवाय साथ देण्यासाठी.
प्रेमाच्या आणि आपल्या जवळच्या नात्यात तर स्पर्शाची ताकद जास्ती असते. एखाद्या प्रेमिकेला प्रियकराच्या होणाऱ्या निसटत्या स्पर्शाने पण प्रेमाला अनेक नवीन धुमारे फुटतात. आपल्या जोडीदाराने हातात घेतलेला हात, त्याच्या खांद्यावर ठेवलेलं डोकं किंवा त्याच्या बाहुपाशात मिळणारी उब ही शब्दात मांडता येतं नाही. कारण ती त्याच स्पर्शाने अनुभवायची असते. त्या क्षणात शब्द नेहमीच निशब्द होतात फक्त स्पर्शाने स्पर्शाची भाषा एकाकडून दुसऱ्याकडे आत खूप खोलवर जात असते. त्या क्षणाच्या आठवणी मनाच्या कोपऱ्यात नेहमीच बंदिस्त होतात. हे फक्त जोडीदार, नवरा, बायको, प्रियकर अथवा प्रेयसी इथवर ही मर्यादित नसते. आपल्या नात्यांच्या जवळपास सगळ्याच कप्यात स्पर्शाच्या स्पर्शाची भूमिका खूप मोठी असते. धडपडल्यावर मित्राने दिलेला हात, दुःखाच्या वेळी मैत्रिणीने मारलेली मिठी किंवा कधीतरी आपल्या हातावर हात ठेवून निशःब्दपणे व्यक्त केलेल्या भावना सगळच कुठेतरी आतून आलेलं असते आणि आत खोलवर जाते.
ह्या स्पर्शाच्या स्पर्शात खूप ताकद असते अगदी एखाद्या आजाराला बरं करण्याची, एखाद्याच्या आयुष्यात आलेल्या वादळाला शांत करण्याची. व्यक्ती ओळखीची असो वा अनोळखी पण त्या स्पर्शात सगळं काही सामावलेलं असते. कधी कधी अनोळखी माणसाला सुद्धा आपला स्पर्श खूप काही देऊन जातो. अश्या व्यक्ती ज्यांच्या स्पर्शात जादू असते त्या अनेकांसाठी त्या परीस असतात. त्या आयुष्यात अचानक येतात. त्या क्षणात त्यांनी दिलेला तो स्पर्शाचा आधार आयुष्याची विसकटलेली घडी पुन्हा एकदा रुळावर आणण्याचं काम करतात. त्या आल्या तश्या निघून ही जातात पण जाताना आपल्या आयुष्यावर त्यांची छाप सोडून जातात. स्पर्शाच्या स्पर्शाची अनुभूती होणं हे जितकं समाधान देणारं आहे त्याहीपेक्षा आपण कोणासाठी ते परीस होणं हे अत्युच्य समाधान देणारं आहे. त्यासाठी कधीतरी आपण परीस बनायला हवं. आजवर आयुष्यात धावताना आपण आपल्याच माणसांना खूप बाजूला टाकलेलं होतं. लहानपणी आईच्या कुशीत बसून गप्पा मारणारे आपण आजकाल बेडरूम मध्ये वेगळा टी.व्ही. बघायला लागलो आहोत. एकेकाळी बाबांकडे त्यांचा हात पकडून हट्ट करणारे आपण आज त्यांच्याशी बोलायला कचरत आहोत.
आज कोरोनामुळे गेले २ महिने आपल्यातील प्रत्येक जण घरात जवळपास बंदिस्त आहे. आज निसर्गाने पुन्हा एकदा त्या स्पर्शाच्या स्पर्शाना आपल्या माणसांसोबत अनुभवण्याची संधी दिली आहे. त्याचसोबत आपल्याला आपल्या माणसांसाठी परीस बनण्याची संधी दिली आहे. प्रश्न इतकाच आहे की आपण ती स्विकारणार आहोत की नाही? स्पर्शाची अनुभूती गुड टच आणि बॅड टच पलीकडे आहे हे आपल्या पुढल्या पिढीपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी ही आपलीच आहे. जेव्हा स्पर्शाचा स्पर्श त्यांना कळेल तेव्हा कोणता टच कसा आहे? ह्याचा अभ्यास करण्याची गरज खरे तर भासणार नाही. माणसाचा मेंदूच इतका कार्यक्षम आहे की एका निर्जीव सुईच टोचणं तो ओळखू शकतो तिकडे माणसाच्या सजीव स्पर्शाच तो किती अवलोकन करू शकतो ह्याचा अंदाज पण आपण लावू शकत नाही. गरज आहे ती त्याला कार्यक्षमतेने वापरण्याची त्यासाठीच स्पर्शाच्या स्पर्शाला ओळखण्याची.
सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

Sir,खूपच छान आणि समर्पक शब्दात मांडले आहे. एक चुकीचा स्पर्श पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो, तसा एक चांगला स्पर्श अख्खं आयुष्य घडवू शकतो.आणि खरोखर तुम्ही म्हणालत तसे पुढील पिढी पर्यंत स्पर्शाचा स्पर्श पोहोचवणे गरजेचे आहे.मे स्वतः शाळांमधून लहान मुलांना गुड टच bad टच या विषयी ट्रेनिंग देते. पण त्या आधी मे शिक्षक आणि पालक यांची कार्य शाळा घेऊन त्यांना हीच स्पर्शाची महती माझ्या परीने सांगण्याचा प्रयत्न करतेय.कारण मुलांच्या मनात माणसांविषयी अविश्वास ची भावना निर्माण होऊ नये, हीच भीती माझ्या पण मनात असते .
ReplyDelete