काही गोष्टी... विनीत वर्तक ©
विसरायच्या तरी विसरता येत नाही काही गोष्टी
समजून घ्यायच्या म्हंटल तरी समजून घेता येत नाही काही गोष्टी
आपण ठरवतो की आता नाही पडायचं
आपण ठरवतो की आता नाही हरायचं
आपण ठरवतो की आता नाही रडायचं
आपण ठरवतो की आता नाही थांबायचं
पण सगळच थोडीच आपल्या हातात असते
काही गोष्टींमध्ये आपलं काही स्थान नसते.
गेलेले क्षण परत येत नाही
तोंडातून निघालेला शब्द परत मागे येतं नाही
अनुभवलेल्या आठवणी परत येत नाही
पण तरीही काहीतरी निसटल्याची जाणीव समोरच्याला होतं नाही.
आपला जपलेला स्व खूप मोठा होतो
आता काय बदलायचं म्हणून आपण सोडून देतो
कोणी आलं काय गेलं काय आपल्याला काय फरक पडतो
काही गोष्टींचा आपल्याला काय फरक पडतो.
हाताशी आलेल्या गोष्टी कधीतरी जपायच्या असतात
तडा गेलेल्या भेगा बुंजवायच्या असतात
सगळच सोडून चालत नाही
मोडलेलं घर पुन्हा उभं रहात नाही.
काही गोष्टी खूप लहान असल्या तरी मोठ्या असतात
राखेतून उडणाऱ्या फिनिक्स सारख्या असतात
'पण' नेहमीच आपला आडवा येतो
काही गोष्टींना आपण सोडून देतो.......
सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment