एका नव्या युगाची सुरवात... विनीत वर्तक ©
आज सकाळी एका नव्या युगाची सुरवात अवकाश क्षेत्रात झाली आहे. अमेरीकेच्या भूमीवरून माणसाच्या अवकाश सफारीला सुरवात झाली आहे. शीत युद्धाच्या काळात अमेरिकेने रशियावर कुरघोडी करण्यामागे अमेरिकेचा 'स्पेस प्रोग्रॅम' कारणीभूत होता. पूर्ण जगात तंत्रज्ञानाच्या बाबतीत आघाडी घेण्यासाठी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष 'निक्सन' ह्यांनी ५ जानेवारी १९७२ ला अमेरिका पुन्हा वापरता येतील अशा स्पेस शटल प्रोग्रॅम वर काम करत असल्याचं जाहीर केलं. जवळपास ९ वर्षांनी नासा ने १२ एप्रिल १९८१ ला कोलंबिया स्पेस शटलचं पहिलं उड्डाण करून आपण ह्या क्षेत्रात दादा असल्याचं पूर्ण जगाला दाखवून दिलं! 'स्पेस शटल प्रोग्रॅम' अंतर्गत कोलंबिया, चॅलेंजर, डिस्कवरी, अटलांटीस, एन्डेव्हर अशा पाच स्पेस शटलची निर्मिती केली. २१ जुलै २०११ ला शेवटचं उड्डाण भरेपर्यंत ह्या पाच स्पेस शटलनी जवळपास १३५ मिशन पूर्ण केले होते. पण कुठेतरी हा प्रोग्रॅम अमेरिका आणि नासा ह्या दोघांनाही डोईजड होता. ह्यातील प्रत्येक शटल हे १०० वेळा उड्डाण करण्यासाठी बनवलं गेलं होतं; पण चॅलेंजर, कोलंबिया ह्यांच्या अपघातातून ह्या स्पेस शटल वर असलेला विश्वास कमालीचा कमी झाला. १४ अंतराळवीरांना आपले प्राण गमवावे लागले ज्यात भारताच्या कल्पना चावला चा ही समावेश होता. पूर्ण स्पेस शटल प्रोग्रॅम मागचा नासाने केलेला खर्च जवळपास १९६ बिलियन अमेरिकन डॉलर इतका प्रचंड होता!! गणित केल्यास प्रत्येक मिशनसाठी जवळपास ४५० मिलियन अमेरिकन डॉलर नासाला मोजावे लागत होते. इतके पैसे मोजूनही जुनी झालेली शटल आणि त्यात वाढत्या अपघातांचं प्रमाण हे नासा ला अस्वस्थ करत होतं. नासा च्या पूर्ण बजेट मधील मोठा हिस्सा हा स्पेस शटल प्रोग्राम आणि आय.एस.एस. वर खर्च होतं होता.
'स्पेस शटल' सारखा पांढरा हत्ती जोपासणं नासाला भारी पडत होतं. त्यामुळे नाईलाजाने नासा ने हा प्रोग्रॅम बंद करत असल्याची घोषणा केली. पण ह्यामुळे नासा आणि अमेरिका आपल्या भूमीवरून पुढील एक दशक माणसांना अवकाशात घेऊन जाऊ शकणार नाहीत हे सत्य नासाला आणि पर्यायाने अमेरिकेला स्वीकारावं लागलं. आपला शत्रू राहिलेल्या रशियाकडे पैसे मोजून आपल्या वैज्ञानिक आणि संशोधकांना 'आय.एस.एस.'वर ने आण करण्यासाठी रॉकेट भाड्यावर घेण्याची नामुष्की नासा वर ओढवली. नासा सद्य स्थितीला एका माणसाला रशियाच्या सोयूझ रॉकेटमधून अवकाशात पाठवण्यासाठी जवळपास ७६,०००,००० अमेरीकन डॉलर मोजत होती. ह्यासाठीच नासा ने स्पेस शटल नंतर माणसांना अवकाशात ने- आण करणाऱ्या वाहनांच्या निर्मितीसाठी २०१४ साली 'स्पेस एक्स' ला २.६ बिलियन अमेरिकन डॉलरचं काम दिलं. एकदा मानवी उड्डाणासाठी सज्ज झाल्यावर तूर्तास नासा ने ६ उड्डाणाचं काम 'स्पेस एक्स' ला दिलं आहे.
२०१४ ला स्पेस एक्सला काम मिळाल्यावर स्पेस एक्सने ड्रॅगनच्या निर्मितीवर काम सुरु केलं. ड्रॅगन मध्ये दोन भाग करण्यात आले, 'एक जे सामान वाहून नेईल आणि एक जे माणसांना घेऊन जाईल.' एकदा उड्डाण भरून आय.एस.एस. ( इंटरनेशनल स्पेस स्टेशन ) ला डॉकींग झाल्यावर ते सोयूझप्रमाणे जास्तीत जास्त २१० दिवस राहून मग पृथ्वीवर पुन्हा परतणार आहे. पृथ्वीवर परत आल्यावर पुन्हा ते पुढच्या उड्डाणासाठी वापरता येणार आहे. 'स्पेस एक्स ड्रॅगन' हे ४ मीटर व्यासाचं असून ह्याची उंची ८.१ मीटर इतकी आहे. एका वेळेस ७ माणसांना अवकाशात नेण्याची ह्याची क्षमता आहे. उड्डाण भरताना हे आपल्या सोबत ६ टन वजन नेऊ शकतं.तर परत येताना ३ टन वजन सोबत घेऊन पृथ्वीवर उतरू शकतं. ह्यात 'कॅप्सूल' आणि 'ट्रंक' असे दोन भाग असून पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करण्याआधी ट्रंक मेन कॅप्सूल पासून विलग होतो. ड्रॅगन मध्ये आर.पी.१ इंधन म्हणून वापरण्यात येते. आजमितीला लिक्विड हायड्रोजन हे इंधन हे जास्त वजनाला अवकाशात घेऊन जाण्यासाठी वापरण्यात येते. पण लिक्विड हायड्रोजनचं इंधन खर्च खूप जास्त आहे. त्या तुलनेत आर.पी.१ स्वस्त आहे. ह्यात फ्रोझन ऑक्सिजन साठवला जातो. त्यामुळे इंधन टाक्यांना जागा कमी लागते तसेच सॉलीड इंधनाचा वापर न करता सगळीकडे क्रायोजेनिक इंजिनाचा वापर केलेला आहे. ह्याच्या पुढच्या व्हर्जन मध्ये लिक्विड मिथेन चा इंधन म्हणून वापर करण्यात येणार हे ज्यामुळे ह्याची कार्यक्षमता अजून वाढणार आहे. ह्यावर ८ सुपर ड्रको इंजिन असून प्रत्येक इंजिन ७१ किलोन्यूटनचं बल निर्माण करण्यात सक्षम आहे.
आज सकाळी स्पेस ड्रॅगन ने नासा चे अंतराळवीर बॉब बेहनकें आणि डॉग हार्ले ह्यांना घेऊन आय.एस.एस. साठी उड्डाण केलं आहे. ह्या यशस्वी उड्डाणाने अवकाश क्षेत्रात एक नव्या युगाची सुरवात झाली आहे. नासा च्या ह्या दोन्ही अंतराळवीरांना स्पेस शटल चालवण्याचा अनुभव आहे. स्पेस शटल आणि स्पेस एक्स ड्रॅगन ह्या दोन्ही अवकाश सफारीच्या वाहनात काही प्रमुख बदल आहेत ते खालील प्रमाणे.
१) स्पेस शटल मध्ये ह्याचा आकार विमानासारखा होता. पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यावर एखाद्या विमानाप्रमाणे ग्लाइड करत ते जमिनीवर उतरत असे. त्याला ग्लाइड करणं आणि जमिनीवर अचूकरीत्या उतरवणं हे खूप कठीण काम होतं. स्पेस एक्स ड्रॅगन पृथ्वीच्या वातावरणात शिरताना त्याचे नको असलेल्या भाग विलग करते. पॅराशूट च्या साह्याने आपला वेग कमी करत ते समुद्रात पाण्यावर ठरलेल्या ठिकाणी कोसळते.
२) स्पेस शटल मध्ये सॉलिड इंधनाचा वापर केला जात होता. ह्याची अडचण अशी होती की ह्या इंधनाच्या प्रज्वलनावर नियंत्रण ठेवणं कठीण जाते ह्यामुळे इंधन जळत असताना रॉकेट खूप मोठ्या प्रमाणावर कंप पावत असे. ( ह्या कंपनांमुळे फोम निखळून चॅलेंजर चा अपघात झाला होता) पण स्पेस एक्स ड्रॅगन हे द्रवरूप इंधन वापरत असल्याने अतिशय कमी प्रमाणात कंप पावते.
३) स्पेस शटल च्या उड्डाणात काही 'ब्लॅक झोन' होते. ब्लॅक झोन म्हणजे जिकडे आत असलेल्या लोकांच्या जिवाला धोका निर्माण झाला तरी त्यांना कोणताच पर्याय जीव वाचवण्यासाठी उपलब्ध नव्हता. चॅलेंजर घटनेच्या वेळी नासा च्या आधीच लक्षात आलं होतं की फरशी निखळून त्याला एक भोक पडलं आहे पण आतल्या अंतराळवीरांना वाचवण्याचा कोणताच पर्याय त्यांच्याकडे नव्हता. स्पेस एक्स ड्रॅगन ची निर्मिती करताना स्पेस एक्स आणि नासा ह्या दोघांनी खूप वेळ हे ब्लॅक झोन पूर्णतः नसणाऱ्या मॉडेलसाठी खर्च केले होते. आज स्पेस एक्स ड्रॅगन नो ब्लॅक झोन असणारं वाहन आहे. ज्यात कोणत्याही क्षणी म्हणजे रॉकेट उड्डाण भरताना अथवा पृथ्वीच्या वातावरणात शिरताना अंतराळवीरांना रॉकेट अथवा इतर गोष्टींपासून विलग होता येतं आणि त्यांचा जीव वाचवता येतो.
४) स्पेस शटल मध्ये जवळपास २००० वेगवेगळी बटन होती. अंतराळयात्रींन कडून जर एखाद बटन चुकून दाबलं गेलं तर भलतच गोष्ट होऊन संपूर्ण मोहिमेला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. स्पेस ड्रॅगन मध्ये तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे टच स्क्रीन डिस्प्ले असून त्यामुळे अश्या चुका होण्याची शक्यता खूप कमी केली गेली आहे.
५) स्पेस शटल प्रोग्रॅम हा पूर्णतः नासा ने बनवला होता तर स्पेस एक्स ड्रॅगन ची निर्मिती एलोन मस्क च्या स्पेस एक्स आणि नासा ह्यांनी संयुक्तपणे केली आहे.
स्पेस एक्स ड्रॅगन च्या यशस्वी उड्डाणानंतर जवळपास १४ तासांनी ते आय.एस.एस. शी जोडलं जाईल. जेव्हा बॉब आणि डॉग आय. एस.एस. वर प्रवेश करतील तेव्हा मानवाच्या अंतराळ सफारीच एक नवीन वाहन त्यांनी अवकाशात जोडलेलं असेल. ड्रॅगन च्या यशस्वी उड्डाणासाठी स्पेस एक्स ची संपूर्ण टीम, अभियंते, वैज्ञानिक आणि नासा च्या टीम चं खूप खूप अभिनंदन आणि पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.
फोटो स्रोत :- गुगल, नासा - स्पेस एक्स
सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

व्वा,अभिमानास्पद ! अभिनंदनीय !
ReplyDelete