Sunday 6 October 2019

दुर्गाशक्ती भाग ९ (दिपा मलिक)... विनीत वर्तक ©

दुर्गाशक्ती भाग ९ (दिपा मलिक)... विनीत वर्तक ©

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात. पण हेच पाय जर कमकुवत असतील तर? नुसत्या विचाराने अंगावर काटा उभा राहतो. ३० सप्टेंबर १९७० ला दिपा मलिक ह्यांचा जन्म झाल्यावर त्यांच्या आई- वडिलांना हाच अनुभव आला. दिपा ५ वर्षाच्या झाल्यावर त्यांना पायऱ्या ही चढत्या येतं नव्हत्या. त्या काळात वैद्यकीय तंत्रज्ञान पुढे नसल्याने नक्की काय झालं आहे ह्याचा अंदाज डॉक्टरांना येतं नव्हता. अनेक चाचण्या पूर्ण केल्यावर त्यांच्या मणक्यात ट्यूमर असल्याचं निदान झालं. शस्त्रक्रिया आणि वर्षभर बिछान्यात खिळून राहिल्यावर दिपा मलिक चालायला शिकल्या. नुसत्या शिकल्या नाहीत तर त्यांच क्रिकेटचं वेड त्यांना राजस्थान महिला क्रिकेट संघात स्थान आणि त्यांचे जोडीदार कर्नल बिक्रम सिंग मलिक ह्यांची भेट देऊन गेलं. आयुष्य एका नव्या वळणावर जात असताना पुन्हा १९९९ ला ट्यूमरचं निदान झालं.  त्यांची तब्येत खूप खालावली. कर्नल बिक्रम सिंग तेव्हा देशाच्या संरक्षणासाठी कारगिल युद्धात लढत होते. अशा कठीण वेळी त्यांच्या मणक्यावर पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागली. पण शस्त्रक्रियेच्या वेळी गुंतागुंत वाढल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. मरणासन्न झालेल्या दिपा मलिक पुन्हा एकदा मृत्युच्या दाढेतून परत आल्या. परत येताना मात्र त्यांचा छातीखालील भागाला अर्धांगवायू झाला. ३ शस्त्रक्रिया १८३ टाके आणि आलेलं व्यंगत्व. आयुष्याच्या ह्या वळणावर सगळं संपलं असं कोणीही म्हटलं असतं;पण दिपा मलिक हार मानणाऱ्यातल्या नव्हत्या.

दिपा मलिक ह्यांना अर्धांगवायूमुळे त्यांना आता पूर्ण आयुष्यभर व्हील चेअर वर रहावं लागणार होतं. नियतिने त्यांच्या शरीराचे पंख कापले होते पण त्यांच्या जिद्दीचे पंख मात्र नियती छाटू शकली नाही. दिपा मलिक ह्यांनी नाउमेद न होता  खेळाची आणि साहसाची आवड  त्यांना लहानपणापासून होती. आपल्याकडे असलेल्या गोष्टींवर मेहनत घ्यायला सुरवात केली. मग जे झालं तो इतिहास आहे. एका मागोमाग एक दिपा मलिक ह्यांनी विक्रम करायला सुरवात केली. ज्यात ४ रेकॉर्ड हे लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सामाविष्ट झाले.

१) She completed the longest drive in India (3,278 kms from Chennai to Delhi) in 2013.

२) In 2011, she became the first paraplegic woman to drive to Khardunga La pass, the highest motorable pass in the world.

३) She rode a special bike for 58 kms in 2009.

४) In 2008, she crossed a 1 km stretch of the Yamuna river against the current.

दिपा मलिक ह्या पहिल्या भारतीय महिला आहेत ज्यांनी पॅरा ऍथलिट एशियन गेम्स मध्ये भारताला पदक जिंकून दिलेलं आहे. दिपा मलिक वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत. पॅरा ऑलम्पिक स्पर्धेत भारतासाठी पदक आणणाऱ्या दिपा मलिक पहिल्या महिला खेळाडू आहेत.  दिपा मलिक एकमेव भारतीय खेळाडू आहेत ज्यांनी ३ लागोपाठच्या एशियन  स्पर्धेत  पदक जिंकलेलं आहे. भाला फेक ह्या खेळात तर त्यांनी आशियायी विक्रम केलेला आहे. भाला फेक स्पर्धेच्या एफ ५३ ह्या प्रकारात जगातील क्रमांक १ च्या खेळाडू आहेत. नदीच्या पाण्यात पोहण्याचा विश्वविक्रम दिपा मलिक ह्यांच्या नावावर आहे. आजवर दिपा मलिक ह्यांनी २३ आंतरराष्ट्रीय तर ६८ राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पदकं जिंकलेली आहेत. पॅराप्लॅजिक असूनही पोहणे, बाईक चालवणे तसेच कार चालवण्यात प्राविण्य असलेल्या पहिल्या भारतीय महिला आहेत. हिमालयाच्या खडतर रस्त्यांवरून व्यंगत्व असताना पण बाईक,कार चालवण्याचा परवाना मिळवलेल्या त्या जगातील पहिल्या व्यक्ती आहेत.

ज्या वयात जगातील खेळाडू खेळातून सन्यास घेण्याचा विचार करतात तेव्हा दिपा मलिक ह्यांनी आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात जगायला सुरवात केली. वय वाढलं म्हणून स्वप्न थांबत नाहीत ह्याचा प्रत्यय त्यांनी पूर्ण जगाला आपल्या खेळातील नेत्रदीपक यशाने दाखवुन दिलं आहे. त्यांच्या खेळातील योगदाना बद्दल भारत सरकारने २०१२ साली 'अर्जुन' पुरस्कार, २०१७ साली 'पद्मश्री' पुरस्कार तर भारतातील कोणत्याही खेळाडूसाठी सर्वोच्च असलेल्या 'राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने' त्यांना २०१९ साली सन्मानित केलं आहे. ह्या शिवाय त्यांची निवडSir Edmund Hillary Prime Minister’s Fellow for New Zealand for 2019 by PM Jacinda Ardern, to strengthen bilateral friendly relations between the people of India and New Zealand.  साठी केली गेली आहे.

ह्याशिवाय अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार दिपा मलिक ह्यांना खेळातील त्यांच्या योगदानाबद्दल तसेच व्यंगत्वावर मात करून अनेक लोकांना आयुष्यात उभं राहण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी मिळालेले आहेत. आपला प्रवास हा खेळापुरती मर्यादित न ठेवता दिपा मलिक ह्यांनी ' Wheeling Happiness Foundation' ची स्थापना केली असुन त्याच्या माध्यमातून व्यंगत्व असलेल्या लोकांना खेळात पुढे येण्यासाठी शारीरिक तसेच मानसिक मदत केली जाते. ह्या शिवाय व्यंगत्वाबद्दल असलेले गैरसमज दूर करून अश्या लोकांना समाजात आपल्या पायावर उभं राहण्यासाठी ही संस्था काम करते. व्यंगत्व आलेल्या ५०० पेक्षा जास्त लोकांचं आयुष्य करण्यासाठी त्यांना लागणाऱ्या साधनांचा पुरवठा ही ह्या संस्थेच्या माध्यमातून दिपा मलिक ह्यांनी केला आहे.
एका सैन्य अधिकाऱ्याची मुलगी आणि बायको, एक आई, एक पत्नी, ह्या सर्व भूमिका समर्थपणे पुर्ण करताना आलेल्या व्यंगत्वावर रडत न बसता त्यालाच आपलं हत्यार बनवून खेळात, स्पर्धात आणि वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात आपल्या जिद्दीने नुसतं स्वतःच नाही तर पूर्ण भारताचं नाव आणि भारताचा तिरंगा जगात फडकवताना आपल्या अजोड जिद्दी, परिश्रम, मेहनतीने पूर्ण जगात भारतीय स्त्रीची एक परिपूर्ण प्रतिमा उभी करण्याचं काम दिपा मलिक ह्यांनी केलं आहे. 

दुर्गाशक्तीचा अवतार असणारी भारतीय स्त्री नुसतीच चूल आणि मूल नाहीतर कोणत्याही क्षेत्रात आपल्या सोबत आपल्या कुटुंबाचं, आपल्या देशाचं नावं आपल्या पराक्रमाने मोठं करू शकते त्याचवेळी येणाऱ्या अडचणी मग अगदी ते व्यंगत्व का असो तिची स्वप्न पूर्ण होण्यापासून रोखू शकत नाहीत हे दिपा मलिक ह्यांनी पूर्ण जगाला दाखवून दिलं आहे. त्यांच्या ह्या कर्तृत्वाला माझा साष्टांग नमस्कार आणि कडक सॅल्यूट....

जय हिंद!

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


No comments:

Post a Comment