एक अव्यक्त नातं... विनीत वर्तक ©
'मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाता'...... 'पिटर , तुम लोग मुझे वहा ढूंढ रहे थे और मैं तुम्हारा यहां इंतजार कर रहा था'.......
आजही हे डायलॉग ऐकले की एक वेगळं स्फुरण अंगात चढते. ह्या संवादाची नशा जितकी शब्दात आहे त्याहुन जास्ती त्या शब्दांच्या संवादफेकीत आहे. संवाद फेकीसोबत तो 'अँग्री यंग म्यान' च्या आवाजाचा बाज ह्या संवादांना अजरामर करून गेला. आज वयाची ७७ वर्ष झाली तरी ह्या आवाजाची नशा उतरलेली नाही. आजही तितक्याच जोशात हा आवाज नुसता भारत नव्हे तर पुर्ण जगाला आपली दखल घेण्यास भाग पाडतो ह्यात सगळं आलं.
१० ऑक्टोबर आणि ११ ऑक्टोबर दोन्ही दिवस दोन्ही व्यक्तींसाठी आणि त्यांच्या सिलसिला साठी प्रत्येक चित्रपट प्रेमींच्या लक्षात आहेत.
मैं और मेरी तन्हाई, अक्सर ये बातें करते हैं
तुम होती तो कैसा होता, तुम ये कहती, तुम वो कहती
तुम इस बात पे हैरां होती, तुम उस बात पे कितनी हँसती
तुम होती तो ऐसा होता, तुम होती तो वैसा होता
मैं और मेरी तन्हाई, अक्सर ये बातें करते हैं......
तन्हाई तेच एक अदृश्य नातं त्या दोघांनी पडद्यावर साकारलं आहे. लांब राहुन सुद्धा कोणाच्या तितकचं जवळ राहता येतं हे कदाचित आजच्या पिढीला कळणार ही नाही. आज वयाची ६५ वर्ष पुर्ण केलेली असो वा ७७ वर्षाचं आयुष्य जगलेलं असो पण तो ग्रेस, ते अव्यक्त प्रेम, ती नजर आणि त्या वलया भोवती असलेलं पडद्यावरचं रहस्य आजही करोडो लोकांना कळलेलं नाही. रेखा च्या शब्दात सांगायचं झालं तर,
' जो जितना दुर हो उतना ही पास रेहता है'
काळ पुढे गेला, नवीन पिढी आली, जगण्याचे संदर्भ बदलले पण आजही त्या पडद्यावर सादर केलेल्या अव्यक्त प्रेमाची जादु आजही प्रत्येक प्रेयसी आणि प्रेमविराला तितकचं वेड लावते.
कधी कधी काही न सांगता पण बरच काही सांगता येते तर कधी,
'अब आप सामने हैं तो कुछ नहीं है याद, वरना कुछ आपसे हमें कहना जरूर था.....'
'रेखा यही अच्छा है... ये ज़मीन पे तुम भी रहोगी, मैं भी रहूंगा... फर्क सिर्फ इतना हैं की हम दोनों के बिच एक फासला बना रहेगा.. और हैं फासला बहुत ज़रूरी है'......
शब्दातुन बरच काही सांगताना पण काहीच न सांगता प्रेम करता येणं कदाचित त्यांनी पडद्यावर साकारलेल्या एका वेगळ्या नात्याचं यश असेल. अनेक वर्ष गेली पण ते अव्यक्त नातं येणाऱ्या कित्येक पिढयांना हेच सांगत राहील....
'प्यार का मतलब हासिल करना नहीं होता'...
प्रेमाच्या एका अव्यक्त नात्याला इतकं सुंदर रूप देऊन ते पडद्यावर साकारणाऱ्या त्या दोघांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...
सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
Vinitji khup sunder. Really nno words to express.
ReplyDelete