Friday, 4 October 2019

दुर्गाशक्ती भाग ७ (लतिका नाथ)... विनीत वर्तक ©

दुर्गाशक्ती भाग ७ (लतिका नाथ)... विनीत वर्तक ©

पृथ्वीवरील सगळ्याच जमिनीवर मानव अतिक्रमण करत जात आहे. नैसर्गिक स्रोतांसोबत तिथल्या वन्य जीवसृष्टीला ही माणूस आजवर नष्ट करत आलेला आहे. ह्यामुळे आज काही प्रजाती ह्या अतिक्रमणाने आधीच नष्ट झालेल्या आहेत. काही नष्ट होणाच्या मार्गावर आहेत. त्यामुळेच ह्या नष्ट होणाऱ्या प्रजातींना वाचवणं आज मानवजाती पुढलं सगळ्यात मोठं आव्हान आहे. भारतात ह्याची जनजागृती आता होतं असली तरी काही वर्षापूर्वी ह्या बद्दल खूपच अनास्था होती. भारतात झालेल्या बेसुमार जंगलतोडीमुळे भारतातील वन्य जीवन धोक्यात आलं होतं. भारताची शान असलेल्या वाघाचं अस्तित्व धोक्यात आल्याची घंटा त्यांच्या घरावर झालेल्या मानवी आक्रमणामुळे. ह्या वर अभ्यास करून नष्ट होणाऱ्या वाघांच संरक्षण आणि जंगलांच्या त्या भागात राहणाऱ्या आदिवासी लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी घेऊन वन्यजीव आणि माणूस ह्यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं शिवधनुष्य उचलण्याचं काम एका स्त्रीने आपल्या खांद्यावर घेतलं. वन्यजिव संरक्षण सारख्या वेगळ्या क्षेत्रात ज्या क्षेत्रात महिला असणं हेच आश्चर्य समजलं जाते त्या क्षेत्रात उतरून भारतातील पहिली महिला वन्यजीव शास्त्रज्ञ आणि वाघांवर अभ्यास करून डॉक्टरेट मिळवणारी पहिली भारतीय असा दुहेरी मान मिळवणाऱ्या डॉक्टर 'लतिका नाथ' ह्यांनी एका वेगळ्या क्षेत्रात महिलांच्या पराक्रमाची पताका रोवली आहे.  (विनीत वर्तक ©)

लतिका नाथना जंगल, वन्यजीव ह्यांची आवड लहानपणापासून लागली. त्यांचे वडील प्रोफेसर ललित नाथ हे डॉक्टर असून भारताच्या वन्यजीव संरक्षणाच्या बोर्ड वर होते. लतिका नाथ ह्यांना वन्यजीव शास्त्रात आपलं करियर घडवायचं होतं. वाघांबद्दल त्यांच्या मनात अतिशय प्रेम होतं. त्यामुळेच त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांनी अगदी लहान वयात घेतली होती. एन्व्हर्मेंटल सायन्स मधून अंडर ग्रॅड्युएट डिग्री दिल्ली विद्यापीठातून मिळवल्यावर त्यांना School of Forestry at the University of Wales मधून पुढलं शिक्षण घेण्याची संधी मिळाली. जगातील प्रख्यात वन्यजीव शास्त्रज्ञ डेव्हिड मॅकडोनल्ड ह्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वाघांवर आपला डॉक्टरेट चा अभ्यास पूर्ण केला. वाघांवर डॉक्टरेट मिळवणाऱ्या त्या भारतातील पहिल्या महिला ठरल्या. पण इकडे संघर्ष संपला नव्हता तर सुरु झाला होता. वन्यजीव शास्त्रज्ञ झालो तरी पुढे येणार काम ज्या कठीण क्षेत्रात होतं ज्याचा विचार करूनही अंगावर काटा येईल. एक शास्त्रज्ञ म्हणून लतिका नाथ ह्यांना कित्येक आठवडे जंगलात राहावं लागलं. जंगली श्वापदांबरोबर तासानं तास घालवून नैसर्गिक रित्या ते कसे वागतात, जंगलातील बदलांना कसं स्वीकारतात ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास लतिका नाथ ह्यांना करावा लागत होता. त्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर,

“In the initial years, we had absolutely no access to civilisation – and often no company, no means of entertainment, and no means of communication either, so our family would not hear from us for weeks on end. There are days when you are alone in in a forest outpost, managing with dry rations and basic amenities. On the other hand – I spent years in some of the most beautiful places in the world. And then suddenly, when you least expect it you see something that you know very few people have the privilege of seeing, and it changes you forever,”

In Africa and other countries, one is allowed to carry protection with them – but India does not permit the use of anything, including pepper sprays. “You learn to adapt and live in sync with the other inhabitants of your habitat, and most importantly to protect and nurture the fragile ecosystems you’re part of.

वन्य जीवांसोबत काम करताना त्यांनी आपलं कार्यक्षेत्र त्या पलीकडे वाढवलं. भारतात वन्य जीवांसाठी संरक्षित असलेल्या पट्ट्यात अनेक आदिवासी लोकं राहतात. कान्हा वाघ संरक्षित क्षेत्रात त्यांनी 'Singinawa Foundation' ची स्थापना केली. ह्या फौंडेशन मार्फत फॉरेस्ट डिपार्टमेंट, भारत सरकारसोबत त्यांनी तिथल्या लोकांसाठी शिक्षण, कला, वैद्यकीय सेवांसाठी काम केलं. कान्हा वाघ संरक्षित क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाची नोंद 'National Geographic' ने घेताना डॉक्टर लतिका नाथ ह्यांचा उल्लेख 'The Tiger Princess' असा केला. त्यांच्या प्रवासावर त्यांनी एक डॉक्युमेंट्री ही प्रसारित केली. तसेच आपल्या प्रसिद्ध नियतकालिकात डॉक्टर लतिका नाथ वर 'Year of the Tiger' ह्या नावाने कव्हर स्टोरी केली. लतिका नाथ ह्यांनी जगातील वन्यजीव संरक्षण, संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या अग्रगण्य संस्था IUCN, UNDP, UNFPA and ICIMOD मध्ये काम केलेलं आहे. वाघांसोबत, आफ्रिकन हत्ती, डॉल्फिन, जंगली म्हैस ह्यासोबत भारताच्या कांचनजंगा सारख्या अतिउंच भागात आढळणाऱ्या वन्य जीवांचा अभ्यास आणि त्यांचा मानवजातीशी होणारा संघर्ष ह्यावर अभ्यास केला आहे. (विनीत वर्तक ©)

डॉक्टर लतिका नाथ ह्यांना त्यांच्या योगदानाबद्दल अनेक पुरस्कार आणि अनेक संस्थांनी नावाजलेलं आहे. ज्यात,

Chevening Award from the Foreign and Commonwealth Office, the Oxford and Cambridge Society of India, the Overseas Research Student (ORS) UK, and the Wildlife Institute of India. Adventure Tour Operators Association of India (ATOI) and the Karamveer Puruskar.

ह्याचा समावेश आहे. सप्टेंबर २००३ ला डॉक्टर लतिका नाथ ह्यांनी लहान मुलांसाठी वाघाचं आयुष्य दाखवणारं 'Takdir, the tiger cub' नावाचं पुस्तक लिहिलं आहे. जे आजवर २८ भाषांमधून जगाच्या अनेक देशात प्रसिद्ध झालं आहे. जवळपास २५ वर्षापेक्षा जास्त काळ वन्यजीव शास्त्रात त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे. पुरुषी वर्चस्व असणाऱ्या क्षेत्रात त्यांचा हा प्रवास अनेक स्त्रियांना प्रेरणा देणारा आहे. त्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर,

“It was a daunting prospect to break into primarily a male bastion, and work in the field shoulder to shoulder with men."

लहानपणापासुन असलेली आपली आवड जोपासत पुरुषी वर्चस्व असणाऱ्या क्षेत्रात पाऊल ठेवत, आपलं घर, आपला संसार सांभाळत भारताच्या नष्ट होणाऱ्या वन्यजीवांच्या संरक्षणात महत्वाची भूमिका बजावून सगळ्याच स्त्रियांसमोर आपल्या कर्तृत्वाने आदर्श ठेवणाऱ्या भारताच्या पहिल्या वन्यजिव शास्त्रज्ञ दुर्गाशक्ती डॉक्टर लतिका नाथ ह्यांना माझा सलाम!

फोटो स्रोत :- गुगल



सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


1 comment:

  1. My daughter is going on d same pathway, great story ती सुद्धा याच क्षेत्रात डॅशिंग ली काम करते आहे, i m proud of her, and congrts to latika mam thnx विनीत

    ReplyDelete