Saturday 5 October 2019

दुर्गाशक्ती भाग ८ (डॉक्टर शिवारामकृष्ण अय्यर पद्मावती)... विनीत वर्तक ©

दुर्गाशक्ती भाग ८ (डॉक्टर शिवारामकृष्ण अय्यर पद्मावती)... विनीत वर्तक ©

'हृदयविकार' आज प्रत्येक घरात ओळखीचा शब्द झाला आहे. हार्ट अटॅक, बायपास सर्जरी ते एन्जोग्राफी, एन्जोप्लास्टी असे शब्द प्रत्येक दिवशी आपल्या कानावर आदळत असतात. कारण बदलते राहणीमान, खायच्या सवयी, काम करणाच्या पद्धती मध्ये झालेले बदल हृदयरोगाला आमंत्रण देतं आहेत. एका अंदाजानुसार २०३० पर्यंत ३० मिलियन लोक हे हृदयरोगामुळे दगावणार आहेत. भारतातील ३२% पेक्षा जास्त प्रौढमृत्यू हे हृदयरोगामुळे होतं आहेत. आज त्यामुळे हृदयरोगतज्ज्ञ अनेकांसाठी देवापेक्षा कमी नाही. हृदयविकाराचा झटका आल्यावर हेच डॉक्टर देवदूत बनून अनेक लोकांना जिवनदान देत असतात. पण असाही एक काळ होता जेव्हा भारतात एकही हृदयरोगतज्ज्ञ नव्हता  त्याकाळी हृदयरोग इतका गंभीर आजार बनेल ह्याची कोणी कल्पना पण केली नव्हती. त्या काळात भारतातील पाहिली हृदयरोगतज्ज्ञ आणि आत्ताच्या क्षणाला देशातील सगळ्यात वयोवृद्ध हृदयरोगतज्ज्ञ असण्याचा बहुमान मिळवणाऱ्या डॉक्टर शिवारामकृष्ण अय्यर पद्मावती म्हणजे अनेक भारतीयांसाठी साक्षात देवाचं रूप आहे असं म्हंटल्यास वावगं ठरू नये.

डॉक्टर शिवारामकृष्ण अय्यर पद्मावती ह्यांचा जन्म १९१७ साली बर्मा (सध्याचं  म्यानमार) इकडे झाला. १९४१ ला दुसऱ्या महायुद्धात त्यांच्या कुटुंबाने भारतात कोईंबत्तूर इकडे शरण घेतली. लहानपणापासून अभ्यासात हुशार असणाऱ्या डॉक्टर शिवारामकृष्ण अय्यर पद्मावती ह्यांनी उच्च शिक्षण Johns Hopkins Hospital and Harvard Medical College USA मधून पूर्ण केलं. आपलं शिक्षण पूर्ण झाल्यावर अमेरिकेत पैसे कमावण्याच्या संधी उपलब्ध असताना पण भारतात परतण्याचा त्यांचा निर्णय आज समस्त भारतीयांसाठी आयुष्यमान देणारा ठरला. १९५२ साली भारतात परतल्यावर त्यांनी हृदयरोगावर इलाज करण्यासाठी एक चळवळ उभी केली. ज्याकाळी स्त्रीने शिकून डॉक्टर होणं हेच मुळी अप्रूप असायचं त्याकाळी त्यांनी भारतात हृदयरोगाशी सामना करण्यासाठी अनेक गोष्टींचा श्रीगणेशा केला. अनेक गोष्टी पहिल्यांदा भारतात सुरु करण्याचे विक्रम त्यांच्या नावावर आहेत ज्यात,

The establishment of the first cardiac clinic and cath lab at the Lady Hardinge Medical College, Delhi.

The initiation of India’s first Doctorate of Medicine in Cardiology.
In 1967 Setting up first cardiology departments at the prestigious

Maulana Azad Medical College, GB Pant Hospital.
Founding the All India Heart Foundation, Delhi.

त्यांच्या हृदयरोगावर भारतात केलेल्या संशोधन तसेच त्यावरील उपायांसाठी भारत सरकारने १९६७ साली पद्मभूषण हा नागरी पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. आपली सेवा दिर्घकाळ देऊन सेवानिवृत्त झाल्यावर डॉक्टर शिवारामकृष्ण अय्यर पद्मावती ह्यांनी National Heart Institute (NHI) under AIHF, in South Delhi ची १९८१ साली स्थापना केली. ह्यात त्यांनी आपलं कार्य पुढे सुरु ठेवलं. १९९२ साली भारत सरकारने त्यांना पदमविभूषण हा क्रमांक २ चा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. हृदयरोग झालेल्या रुग्णांची काळजी तसेच हृदयरोग होऊ नये ते हृद्यरोगा वरील उपचार ह्यावरील आपलं संशोधनचं कार्य त्याच जोमाने त्यांनी पुढे सुरु ठेवलं आहे. आज त्यांनी आयुष्याची १०२ वर्ष पूर्ण केल्यावर ही त्यांनी अवाहतपणे काम सुरु ठेवलेलं असून त्या आजही नवीन डॉक्टरना हृदयरोगावर लेक्चर्स देतात. ( Emeritus Professor of Medicine and Cardiology of the University of Delhi.) ह्या शिवाय आजही त्या National Heart Institute (NHI) च्या डायरेक्टर आहेत.

ज्या काळात स्त्री म्हणजे चूल आणि मूल असं समीकरण होतं त्या काळात हृदयरोगतज्ञ बनण्याचा त्यांचा प्रवास उलगडताना त्या सांगतात,

“I pursued cardiology because there were very few courses available to women when I went to college, unlike today.”

आज ज्या वेगाने भारतात हृदयविकार वाढले आहेत त्यामागचं कारण स्पष्ट करताना डॉक्टर शिवारामकृष्ण अय्यर पद्मावती म्हणतात,

“Things were different earlier. Physical activity and a healthy diet were the norms. Now, times have changed.”

डॉक्टर शिवारामकृष्ण अय्यर पद्मावती आजही आपला अनुभव येणाऱ्या पिढीशी शेअर करत आहेत. जेव्हा हृदयविकार म्हणजे काय? हा प्रश्न विचारला जायचा त्या काळापासून हृदयविकार हा घराघरात परावलीचा शब्द होण्यापर्यंतच्या प्रवासात लोकांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी आपलं योगदान दिलं आहे. आज वयाची १०० वर्षे उलटून गेली तरी हा प्रवास सुरु आहे. अमेरिका सारख्या देशात भरपूर पैसे कमावण्याची संधी असताना ती झुगारून भारतात आपलं ज्ञान, सेवा देण्याचा मार्ग त्याकाळी त्यांनी स्वीकारल्यामुळे आज अनेक भारतीयांचे प्राण वाचले आहेत. त्यांचं हे कार्य दुर्गाशक्तीचं एक प्रतीक आहे. भारतातील पहिल्या आणि सगळ्यात वयोवृद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर शिवारामकृष्ण अय्यर पद्मावती ह्यांना माझा साष्टांग नमस्कार!!

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


No comments:

Post a Comment