चंद्रयानाचा गृहप्रवेश... विनीत वर्तक ©
आज ठरल्या प्रमाणे भारताच्या चंद्रयान २ ने चंद्राच्या घरात प्रवेश केला. जवळपास ३.८४ लाख किलोमीटर च अंतर पृथ्वीपासून पार केल्यावर आज ही घटीका कोणत्याही विघ्नाशिवाय ठरलेल्या मुहूर्तावर संपन्न झाली. ह्यासाठी इसरो आणि चंद्रयान २ च्या पुर्ण टीम चे हार्दिक अभिनंदन. चंद्रयान २ च्या ह्या पुर्ण प्रवासाचे सारथ्य भारताच्या दोन महिला वैज्ञानिक एम. वनीथा आणि रितु करधाल करत आहेत. चंद्राच्या घरात प्रवेश केला म्हणजे नक्की काय केलं ह्यासाठी आपण नेमकं गृहप्रवेश म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे.
कोणत्याही ताऱ्या भोवती अथवा ग्रहाभोवती त्याच स्वतःच गुरुत्वाकर्षण क्षेत्र असते. ह्या क्षेत्राची तीव्रता आणि क्षेत्र प्रत्येक ग्रह व ताऱ्या प्रमाणे बदलत असते. जसं पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण आहे तसच चंद्राचं ही आहे. त्याच गुरुत्वाकर्षणाचा परीणाम म्हणजे आपण पृथ्वीच्या समुद्रात होणारी भरती,ओहोटी स्वरूपात बघु शकतो. तर जेव्हा एखादं यान,वस्तू ह्या कक्षेत येते तेव्हा चंद्र किंवा इतर कोणताही ग्रह/तारा त्याला आपल्याकडे खेचून घेतो. जर का वस्तूचा वेग किंवा त्या ग्रहाचे गुरुत्वाकर्षण ह्या पैकी आपण एक गोष्ट नियंत्रित केली तर आपण ते यान,वस्तु त्या ग्रहाभोवती फिरवत ठेवू शकतो नाहीतर, त्या ग्रहावर कोसळवू शकतो किंवा त्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीला भेदून पुढे जाऊ शकतो. अर्थात गुरुत्वाकर्षण शक्ती मानवी नियंत्रणातील नाही म्हणजे ज्यावर आपण नियंत्रण मिळवू शकतो तो म्हणजे त्या वस्तुचा वेग.
चंद्रयान २ जेव्हा पृथ्वीभोवती प्रक्षेपित केलं तेव्हा त्याचा वेग कमी असल्याने त्याला पृथ्वीच्या कक्षेत फिरवण्यात आलं. प्रत्येक वेळी त्याचा वेग फिरवत फिरवत वाढवला गेला. अशी एक वेळ आली की त्या वेगाच्या जोरावर आपण पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती भेदून चंद्रयान २ ने अवकाशात प्रवेश केला. अवकाशातून जाताना वातावरणाचा अडथळा नसल्याने चंद्रयान २ सुसाट वेगात चंद्राच्या दिशेने पुढे जातं होते. ह्याच वेगाने जर आपण जात राहिलो असतो तर जिकडे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण त्याला थांबवू शकलं नाही तर चंद्राचं ही थांबवु शकलं नसतं. आपलं चंद्रयान २ मग चंद्राचं यान सोडून अंतराळात अनंताच्या प्रवासाला निघुन गेलं असतं. जर आपल्याला त्याला चंद्रावर उतरवायचं आहे तर त्याला चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या अधिपत्याखाली येणं गरजेचं होतं.
अडचण अशी होती की पृथ्वीवरून लांब जाण्यासाठी बल देणार इंजिन हे चंद्रयानाच्या मागच्या बाजूला होतं. हे इंजिन जर तसच चालवलं तर आपण अजून वेग पकडला असता. ह्यावेळी वेग कमी करण्यासाठी इंजिन ला विरुद्ध दिशेने म्हणजे १८० डिग्री अंशात फिरवून पुढल्या बाजूने आणलं गेलं. चंद्रयानाने ह्या सुसाट वेगात अर्धी गिरकी स्वतःभोवती घेतली. मग हेच इंजिन चालू केल्यावर ते जाणाऱ्या दिशेच्या विरुद्ध दिशेने बल निर्माण करायला लागलं. ज्या इंजिनाने वेग दिला तेच इंजिन आता ब्रेक मारण्याचं काम करत होतं. आता हे सगळं वाचायला सोप्प वाटलं तरी प्रत्यक्षात ही सगळी कवायत पृथ्वीपासून एक, दोन नाही तर लाखो किलोमीटरवर रिमोट ने किंवा ऑटोमेशन ने घडवून आणणं गरजेचं असते.
पृथ्वीवर ऑफिस मध्ये केलेलं गणित आणि प्रत्यक्षात चंद्रयान २ चा वेग ह्यात प्रचंड तफावत होऊ शकते. तसेच ज्या रस्त्याने ठरवलं तो रस्ता डावीकडे, उजवीकडे कधीही सरकू शकतो. अश्या वेळेस ब्रेक कधी, कसा, कुठे आणि कोणत्या वेळेला मारायचा ह्यावर पुढे काय होणार हे अवलंबून असणार होतं. आधी दहा मिनिटांचा ब्रेक बरोबर असेल तर आता तो बारा मिनिटांचा किंवा आठ मिनिटांचा ही होऊ शकतो. म्हणून प्रत्येक क्षणाक्षणाला चंद्रयान २ चा वेग, त्याची दिशा ह्यांचं आकलन करून मग आपल्याला नक्की किती उंचीवर यान थांबवायचं आहे?, त्याची कक्षा कशी असेल? ह्या सगळ्यांची गणित मांडून मग त्या प्रमाणे आज चंद्रयान २ चे ब्रेक मारून त्याचा वेग इतका कमी केला की त्याचं आगमन बरोबर चंद्राच्या दरवाज्यासमोर वाजत गाजत होईल.
आज चंद्रयान २ चं इंजिन विरुद्ध दिशेने १७३८ सेकंद प्रज्वलन करून त्याला ११४ किमी गुणिले १८,०७२ किमी च्या कक्षेत चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीने पकडलं. आता हळूहळू पुन्हा इंजिन योग्य त्या वेळी प्रज्वलन करून त्याची कक्षा १०० किमी गुणिले १०० किमी अशी केली जाईल. ह्याच कक्षेत मग चंद्रयान २ चं ऑर्बिटर आपलं पुर्ण आयुष्य घालवेल. तर ल्यांडर आणि रोव्हर आपल्या पुढल्या ठरलेल्या मार्गावर निघतील आणि ७ सप्टेंबर रोजी पहाटे भारताचा तिरंगा चंद्राच्या मातीत आपलं अस्तित्व दाखवत असेल. आजच्या गृह्प्रवेशाने इसरो ने एक मोठा टप्पा पार केला असला तरी सगळ्यात कठीण वेळ अजून यायची आहे. घरात शिरल्यावर नेमकं काय असणार आहे ह्याचा अंदाज आपण बांधलेला आहे. तो जर योग्य निघाला तर चंद्राची ही स्वारी भारताच्या अवकाश कार्यक्रमाची दिशा बदलवणारी असेल. तूर्तास ह्या गृह्प्रवेशासाठी सर्व भारतीयांकडून इसरो चं अभिनंदन.
माहिती स्रोत:- इसरो
फोटो स्रोत :- गुगल

No comments:
Post a Comment