#टपरीवरच्या_बातम्या ९... विनीत वर्तक ©
असं म्हणतात की चांगला व्यापारी भविष्याचा विचार करतो. आज काय चांगल यापेक्षा उद्या काय चांगल होणार आहे याचा विचार करून पैसे गुंतवतो. त्यामुळेच भविष्यात त्याचा परतावा मिळायला लागला की तो आपोआप श्रीमंत होत जातो. आज जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तींची यादी बघितली तर त्यातील प्रत्येकाने काळाच्या पुढची पावलं टाकलेली होती त्यामुळेच आज जगात ते खूप श्रीमंत आहेत.
जगातील सगळ्यात श्रीमंत लोकांच्या यादीत एक भारतीय नाव सध्या धुमाकूळ घालते आहे. ते म्हणजे 'गौतम अदानी'. नुकतंच त्यांनी अल्फाबेट आणि गुगल चे लॅरी पेज यांना मागे टाकून जगात सर्व श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ५ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. कदाचित हे लिहिलं जाई पर्यंत त्यांनी एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून गणल्या गेलेल्या बिल गेट्स यांना मागे टाकलेलं असेल.
ज्यांना चष्मा घेऊन गोष्टी बघायच्या असतात ते याचा राजकीय दृष्टिकोनातून विचार करतील. पण जर त्यांनी व्यापारात टाकलेल्या पावलांचा आणि दूरदृष्टीचा विचार केला तर त्यांच्या संपत्तीत होणारी वाढ का होते आहे हे आपल्याला समजून येईल. आज हे सगळं लिहण्याच कारण की गेल्या काही दिवसात त्यांच्या अदानी समूहाने रोवलेले अटकेपार झेंडे बघितले की त्यांची दूरदृष्टी कुठे आहे हे समजून येईल. गेल्या काही दिवसात भारताच्या अदानी ग्रुप ने जागतिक मंचावर काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. ज्यामुळे येणाऱ्या काळात अदानी ग्रुप खूप मोठ्या पातळीवर सक्रिय होताना दिसणार आहे.
सगळ्यात पहिली घटना म्हणजे इस्राईल मधील सगळ्यात मोठं हैफा बंदर विकत घेतलं आहे. हा करार १.८ बिलियन (१८० कोटी) अमेरिकन डॉलर चा आहे. इस्राईल मधे होणारा जवळपास ८०% व्यापार हा याच बंदरातून होतो. चीन च्या नाकावर टिच्चून आता या संपूर्ण बंदराची मालकी अदानी ग्रुप आणि पर्यायाने भारताकडे आली आहे. इस्राईल आणि भारत यांच्यामधील संबंध या करारामुळे अजून घट्ट झाले आहेत. ( कारण द्विपक्षीय व्यापारावर यामुळे नक्कीच फरक पडणार आहे.) नुकत्याच झालेल्या I2U2 (stands for India, Israel, the UAE, and the US) देशांच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. या निर्णयाला अमेरिका सह यु.ए.इ. ने पाठिंबा दिला आहे. ( ते का? त्याचे परिणाम काय? या बद्दल विस्ताराने दुसऱ्या लेखात लिहेन)
दुसरी घटना म्हणजे फ्रांस च्या टोटल एनर्जी ने अदानी ग्रुप च्या Adani New Industries (ANIL) मधील २५% हिस्सा विकत घेताना येत्या १० वर्षात ५० बिलियन ( ५००० कोटी ) अमेरिकन डॉलर ग्रीन हायड्रोजन मधे गुंतवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. २०३० पर्यंत १ मिलियन मेट्रिक टन ग्रीन हायड्रोजन बनवण्याचं उद्दिष्ठ ठेवलं आहे. जगातील सगळ्यात मोठी ग्रीन हायड्रोजन बनवणारी कंपनी बनवण्याचं लक्ष्य गौतम अदानी यांनी आपल्या समोर ठेवलं आहे.
या दोन्ही घटना खूप महत्वाच्या आहेत. यातील ग्रीन हायड्रोजन काय आहे? त्याच येत्या काळात महत्व आणि कश्या पद्धतीने ऑइल आणि गॅस नंतर हायड्रोजन किंवा ग्रीन हायड्रोजन जगाचं आर्थिक गणित चालवणार आहे ते विस्ताराने लिहीनच. पण काळाची ही पावलं ओळखल्याने येणाऱ्या काळात अदानी ग्रुप जगातील एक मोठा व्यापार समूह झाला तर मला आश्चर्य वाटणार नाही.
तळटीप :- पोस्ट चा विषय जगातील घडामोडींवर आहे. कृपया करून त्याचा संबंध राजकारणाशी लावू नये. राजकारणाशी संबंधित कमेंट कृपया पोस्ट वर करू नये.
जय हिंद!!!
फोटो शोध सौजन्य :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment