Monday 11 July 2022

#ऐकावं_ते_नवलच भाग ३... विनीत वर्तक ©

 #ऐकावं_ते_नवलच भाग ३... विनीत वर्तक ©


मानवी कौशल्याचा एक अत्युच्य अविष्कार म्हणजे खाली असलेला फोटो. हा फोटो नासा ने आज म्हणजे १२ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध केला आहे. नासाच्या जेम्स वेब दुर्बिणीतून घेतलेला पहिला फोटो आहे. ही दुर्बीण पृथ्वीपासून तब्बल १५ लाख किलोमीटर अंतरावर साधारण तपमान ६.४ के ( उणे २६६.७ डिग्री सेल्सिअस) इतकं कमी झाल्यानंतर दिसणाऱ्या विश्वाचा अदभुत नजारा जेम्स वेब ने बंदिस्त केला आहे.

आजवर हबल ला ही पकडता न आलेल्या आणि विश्वाच्या प्रसारण पावण्याच्या स्थितीमुळे इन्फ्रारेड या प्रकाशाच्या तंरंग लांबीत लुप्त झालेल्या प्रकाशाच्या त्या रहस्यांना आता उलगडण्याची सुरवात जेम्स वेब ने केली आहे. जेम्स वेब ने घेतलेला हा फोटो SMACS 0723 या आकाशगंगेच्या समूहाचा आहे. 'गॅलॅक्सी क्लस्टर' म्हणजेच अनेक आकाशगंगांचा समूह. आपली सौरमाला आणि आपली आकाशगंगा मिल्की वे ही आणि त्याच्या सोबत इतर आणखी आकाशगंगा जश्या अँड्रोमेडा या व्हर्गो 'सुपर क्लस्टर' चा भाग आहेत. तसाच SMACS 0723 हे एक आकाशगंगेच जाळ आकाशात आहे. त्यावर जेम्स वेब वरच्या Near-Infrared Camera (NIRCam) ला १२ तास एकाच ठिकाणी खिळवून ठेवल्यानंतर त्याने विश्वाचा हा नजारा बंदिस्त केला आहे.

खालील फोटोत आपण बघत आहोत ते विश्व तब्बल ४५० कोटी वर्षापूर्वी च दिसत आहे. याचा अर्थ आहे की ४५० कोटी वर्षापूर्वी निघालेला प्रकाश आत्ता कुठे जाऊन आपल्या पर्यंत पोहचत आहे. हा फोटो विश्वाच्या स्वरूपाच्या मानाने किती छोटा आहे याच उदाहरण द्यायचं झालं तर वाळूचा एक कण आपल्या चिमटीत आपण पकडला तर तितकं छोट हे विश्व आहे. विचार करून आपल्या मेंदूला झिणझिण्या येतील पण इतक्या सूक्ष्म गोष्टी अवकाशात टिप्याची जेम्स वेब ची क्षमता आहे. अजून ही फक्त सुरवात आहे. जेम्स वेब वरील उपकरणं जेव्हा पूर्ण क्षमतेने काम करायला लागतील तेव्हा आपल्या समोर उलगडणारं विश्व किती नवीन दालन उघडणार आहे याचा अंदाज कोणाला नाही आहे.

१००० कोटी अमेरिकन डॉलरपेक्षा जास्ती खर्च, तब्बल २० वर्षांचा कालावधी बनवण्यासाठी तर १०,००० पेक्षा जास्त वैज्ञानिक, अभियंते यांच्या अथक परिश्रमातून जेम्स वेब जन्माला आली आहे. मानवाच्या तांत्रिक क्षमतेचा हा सर्वोत्तम अविष्कार आहे असं खुद्द अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष बायडेन यांनी आपल्या शब्दात म्हंटल आहे. ते म्हणतात,

"This telescope is one of humanity's great engineering achievements,"

यातील शब्द आणि शब्द खरा आहे. त्या वाळूच्या कणात लपलेलं एक असं विश्व जे आपल्यापासून इतके वर्ष लपून राहिलं होतं ते जेम्स वेब ने उलगडलं आहे. या फोटोत दिसणारे प्रत्येक नारिंगी, निळा, लाल, तांबूस, पांढरा टीपका हा एक आकाशगंगा आहे. ज्यात अब्जोवधी तारे, ग्रह लपलेले आहेत. त्यात पृथ्वी सारखे कित्येक ग्रह त्यांच्या पृष्ठभागावर सजीवांची किती निरनिराळी रूप घेऊन असतील याचा अंदाज आपण नाही लावू शकत. कारण आपण जे बघतो आहे ते ४५० कोटी वर्षापूर्वी असलेली विश्वाची स्थिती आहे. आत्ता तिथे काय असेल हे आपण बघूच शकत नाही. मानवाचा संपूर्ण प्रवास हा जवळपास २५ लाख वर्षापूर्वी सुरु झाला होता. तर ४५० कोटी वर्ष हा त्यामानाने किती प्रचंड मोठा आकडा आहे. त्यामुळे यातील प्रत्येक टिपक्यावर सजीव सृष्टीची कोणती रांगोळी साकारली असेल याचा अंदाज आपण लावू शकत नाही.

तूर्तास मानवाच्या तांत्रिक प्रगतीला आणि जेम्स वेब च निर्माण करणाऱ्या सर्व लोकांना माझा कडक सॅल्यूट.

फोटो शोध सौजन्य :- नासा

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



6 comments:

  1. Nice info. and photo

    ReplyDelete
  2. Absolutely Amazing.. Thank You Very Much Sir, for Sharing. 🙏🙏🙏

    ReplyDelete
  3. Very very nice Sir. In 21 th century this is a great Achievement.
    My Salutes to all scientists and technologists.

    ReplyDelete
  4. Very nice sir

    ReplyDelete
  5. Very very great achievement sir, my sincere salutes to all scientists.

    ReplyDelete