एक कप चहा... विनीत वर्तक ©
चहा म्हणजे माझा विक पॉईंट असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. कामाच्या धावपळीत असो वा घरी आराम करत असो. जगाच्या पाठीवर फिरत असो किंवा मुंबईत असो कुठेही असलो तरी एक कप चहा लागतोच. चहाच्या त्या एका घोटात मला पुन्हा एकदा ताजतवानं करण्याची ऊर्जा नक्कीच आहे. कामाच्या निमित्ताने फिरताना एक कप चहाचे अनेक स्वाद मी अनुभवले आहेत. अगदी मुंबईतल्या अतिशय प्रसिद्ध अश्या कटिंग चहा पासुन ते अगदी आसामच्या चहाच्या मळ्यात वसलेल्या चहाच्या टपरी पर्यंत. प्रत्येक चहाच्या कपाचा आपला एक स्वाद आणि बाज आहे. चहासाठी लागणाऱ्या गोष्टी एक असल्या तरी तो बनवण्याची पद्धत भारतातल्या भाषेप्रमाणे प्रत्येक १०० किलोमीटर ला बदलत जाते. प्रत्येक ठिकाणच्या चहाची एक खासियत असते. तो पिताना एक वेगळं स्वर्गीय सुख मिळते ते इकडे शब्दात मांडता येणार नाही त्यासाठी अनुभवायला हवा एक कप चहा.
मुंबईतला टपरीवरचा चहाचा जसा एक वेगळा रंग आहे तसाच जगातल्या प्रत्येक ठिकाणाच्या चहाचा आहे. जगात कोणत्याही कोपऱ्यात गेलो तरी जिकडे चांगला चहा मिळतो अश्या जागांचा शोध घेऊन तिकडे जाऊन त्याचा आस्वाद घेतलेला आहे. एकदा दक्षिण भारतात असताना बंटुमल्ली नावाच्या गावात जाताना एका टपरीवरचा चहा खुप प्रसिद्ध आहे असं माझ्या ड्राइवर ने मला सांगितलं. त्या चहावाल्याची चहा बनवण्याची पद्धत काही वेगळीच होती. चहाच्या पावडरीत उकळून झालेल्या ते लालसर रंगाच पाणी ग्लास मध्ये ओतुन मग त्यात साखर आणि दुध घालुन तो चहा बनवत असे. आसाम ला असताना चहाच्या मळ्यांच्या मध्यभागी आमची रीग होती. रीग च्या बाहेर एक टपरी होती त्यांच्याकडे एकदम स्पेशल लाल रंगाचा आसामी चहा मिळत असे. दुध नसलेल्या त्या आसामी चहा ची चव आजही जिभेवर आहे. अबुदाभी, दुबई ला असताना बकरीच्या दुधापासुन बनवलेला चहा ची चव आजही आठवते. अमेरीकेत खास चहा पिण्यासाठी २० डॉलर खर्च करून एका ठिकाणी गेलो होतो. आजही तो प्रसंग आठवला की चहाच माझं व्यसन किती आत भिनलेलं आहे ते जाणवते.
सध्या कामाच्या निमित्ताने मलेशिया इकडे आहे. इकडेही चहा हा भारताप्रमाणे इथल्या लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. खरे तर चहा ला मलेशियात प्रसिद्धी देण्यात भारतीयांचा हात आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतातुन आलेल्या मुसलमान लोकांनी इकडे बनणाऱ्या रबराच्या शेतापुढे चहाचे स्टॉल लावले होते. इथे काम करणारे कामगार लोकं विश्रांतीच्या काळात येऊन चहाचा आस्वाद घेऊ लागले. तेव्हापासुन इथल्या लोकांमध्ये चहा प्रसिद्ध झाला तो आजतागायत. चहा ला मलेशिया (इथल्या बोलीभाषेत म्हणजेच मलय भाषेत) मध्ये 'तेह तारीक' असं म्हणतात. 'तेह' चा अर्थ होतो चहा तर 'तारीक' चा अर्थ आहे 'खेचलेला'. चहा बनवताना वाफाळलेला असताना चहा कपात ओततात त्यासाठी त्याला 'तारीक' असं म्हंटल जाते. 'तेह तारीक' (चहा) हे मलेशियाच राष्ट्रीय पेय आहे.
मलेशियात अनेक ठिकाणी खूप सुंदर पद्धतीने बनवलेला चहा मिळतो. कामाच्या निमित्ताने एका ठिकाणी गेलो असताना तिथे अप्रतिम चहाचा आस्वाद घ्यायला मिळाला. चहाच्या स्वादासोबत त्याची देण्याची पद्धत मला खुप आवडली. इकडे चहा हा ज्या कपात देतात ते कप आकाराने खुप खोलगट असतात. भारतातला २-३ कप चहा म्हणजे मलेशिया मधला एक 'तेह तारीक'. इथल्या चहाला एक वेगळी चव आहे. चहा पिताना जिभेला ती अगदी जाणवते. कदाचित ती इथे तयार होणाऱ्या चहात असावी कारण मी अजून ५-६ ठिकाणी चहा प्यायलो पण प्रत्येक ठिकाणी ती वेगळी चव जिभेला सारखी जाणवली. चहा देण्याची पद्धत ही खुप मस्त आहे. मी जिकडे चहा प्यायलो त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने तो चहा समोर ठेवला की त्याचा फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. ह्या पोस्ट च्या खाली तो फोटो देतो आहे. एक कप चहा जरी सगळीकडे वेगळा असला तरी त्याने मिळणारा आनंद मात्र जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात सारखाच असतो. तेह तारीक हे नावं वेगळं असलं तरी त्या एक कप चहाची ओढ तशीच कायम आहे.
सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

No comments:
Post a Comment