हावभाव (Gesture)... विनीत वर्तक ©
गेल्या आठवड्यात मलेशियाच्या अनेक शहरांमध्ये माझं कामाच्या निमित्ताने फिरणे सुरु आहे. मलेशियाच प्रसिद्ध असं कौलालंपुर शहर असो वा मलेशियाच्या एका दुसऱ्या बेटावर वसलेलं सारावाक राज्यातील मिरी सारखं छोटं शहर असो काही हावभाव (Gesture) हे दोन्ही ठिकाणी जाणवले. सध्या कामानिमित्त मलेशियाच्या पुर्व किनाऱ्यावर वसलेल्या केरते ह्या शहरात आहे. प्रत्येक वेगवेगळ्या शहरात जाणवलेली एक गोष्ट मात्र इथल्या लोकांबद्दल खुप काही सांगुन जाणारी आहे. ती म्हणजे हावभावांची (Gesture ) जपणुक. अनेक छोट्या घटनांमधून आपल्याला जसं लोकांनबद्दल अंदाज येतो तसाच वेगळ्या देशात तिथल्या लोकांचे हावभाव (Gesture) आपल्याला खुप काही शिकवुन जातात. ह्या सगळ्या शहरांमधुन फिरताना प्रकर्षाने जाणवलेला एक हावभाव म्हणजे काही वस्तू खरेदी केल्यावर उरलेले पैसे देण्याची पद्धत.
एखादा मोठा मॉल असो वा एखादी छोटी टपरी, उरलेली रक्कम पुन्हा आपल्याला देण्याची पद्धत मलेशियात सगळ्या ठिकाणी सारखीच जाणवली. पैसे परत देताना देणाऱ्या हाताला दुसऱ्या हाताचा स्पर्श करून आपलं डोकं थोडं खाली झुकवून मग समोरच्याला ते पैसे परत केले जातात. ( सत्यनारायणाच्या पुजेवर अक्षदा टाकताना जसा आपण उजव्या हाताला डाव्या हाताने स्पर्श करतो अगदी तसंच काहीसं ). ते परतीचे पैसे घेताना का कोणास ठाऊक पण एक वेगळं समाधान मला प्रत्येकवेळी जाणवलं. पैसे हातात घेताना हा छोटासा हावभाव पण एक अदृश्य आपलेपण देऊन गेला. प्रत्येकवेळी चेहऱ्यावर एक स्मितहास्याची रेषा घेऊनच प्रत्येकवेळी दुकानाच्या बाहेर मी पडलो. पैसे परत देणारी व्यक्ती म्हातारी असो वा तरुण पण त्या हावभावांमध्ये मला फरक जाणवला नाही. ही खूप छोटी गोष्ट असली तरी ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नकळत, सहजतेने दिली गेली आहे. त्यात कुठेही येणारी पिढी ह्याला मागासलेपणा अथवा आदल्या पिढी ची गोष्ट मानत नाही. हे करताना एक आनंद त्यांच्या चाऱ्यावर तर असतोच पण तो आनंद आपसुक ह्या छोट्या हावभावातून समोरच्या पर्यंत ही पोहचतो.
भारतात एकमेकांना भेटल्यावर नमस्कार करण्याची पद्धत होती. पण नवीन पिढीला त्यात आज मागासलेपणा वाटतो आणि त्या बदली शेक हॅन्ड करण्याची पद्धत आज भारतात प्रचलित झाली आहे. खरे तर दोन्ही हात जोडुन नमस्कार करताना त्यातुन मिळणारा आपलेपणा आजच्या शेक हॅन्ड मध्ये जाणवतं नाही हे कोणी पण सांगेल. नमस्कार करताना समोर असलेल्या व्यक्तीला आपण स्वतःपेक्षा श्रेष्ठ अथवा कनिष्ठ न मानता प्रत्येकाच्यामध्ये देवाचा अंश आहे त्याला आपण एक प्रकारे सन्मान करतो असा एक अदृश्य संदेश आपल्या हावभावातून समोरच्या पर्यंत जातो. पण आपल्याच देशातील परंपरांना किंवा हावभावाच्या पद्धतींना मागासले पणाच लक्षण आहे असं आजची पिढी मानायला लागली आहे हा आपला एक पराभव आहे हे नक्की. खरे तर अश्या छोट्या छोट्या गोष्टीत आपल्या आयुष्याला कलाटणी देण्याची ताकद असते हे जेव्हा कोणीतरी विदेशी व्यक्ती आपल्याला सांगते तेव्हा ते आपल्याला पटायला लागते.
यु ट्यूब वर बेलिंडा गुडरीच चा एक व्हिडीओ आहे. पहिल्यांदा ही बेलिंडा गुडरीच कोण ते जाणून घेऊ. बेलिंडा गुडरीच एक लेखक, बिझनेस वूमन, शिक्षिका आणि एक स्पीकर अशी चतुरस्त्र स्त्री आहे. बेलिंडा जगातील पहिली स्री आहे जिने पाच प्रोजेक्ट मॅनेजमेण्ट चे क्रेडेन्टिअल्स केले आहेत.
(The first woman in the world to achieve the original five PMI Project Management Credentials: Project Management Professional (PMP), Program Management Professional (PgMP), Risk Management Professional (PMI-RMP), Scheduling Professional (PMI-SP), and Certified Associate in Project Management (CAPM))
बेलिंडा ने ७०० मिलियन अमेरिकन डॉलर चे प्रोजेक्ट १० पेक्षा अधिक देशात पुर्ण केले आहेत. ५०० पेक्षा जास्ती प्रोजेक्ट मॅनेजर तिच्या हाताखाली शिकलेले आहेत. बेलिंडा गुडरीच जगात तिच्या प्रोजेक्ट मॅनेजमेण्ट स्किल साठी खुप नावाजलेली व्यक्ती आहे.
हे सगळं बेलिंडा बद्दल सांगण्याचं कारण इतकचं की एकदा कामासाठी ती भारतात बंगळुरू इकडे आली असताना गर्दीने फुललेल्या बाजारातील एका गरीब, म्हाताऱ्या गजरा बनवणाऱ्या बाईच्या हावभावातून तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. आपला पैसा, स्टेटस, बिझनेस पोझिशन ह्याचा एक अभिमान बाळगुन त्यात रमणारी एक कॉर्पोरेट वूमन बेलिंडा गुडरीच बंगलोर च्या बाजारात आपल्या पॉकेट मधले पैसे काढून त्या गजऱ्या बनवणाऱ्या बाईला तिच्या बद्दल सहानभुती वाटुन भिक दिल्यासारखे द्यायला लागली. तेव्हा ती गरीब बाई दोन्ही हातानी नको म्हणुन आपल्या पुढ्यात असलेला सगळ्यात सुंदर गजरा तिच्या केसात माळते. बेलिंडा भिक देतं असताना त्याच वेळेस त्या गरीब स्री चे हावभाव (Gesture) बेलिंडा ला कळेनासे झाले. पुन्हा एकदा बेलिंडा आपल्या पॉकेट मधुन पैसे काढून तिला पैसे देण्याचा प्रयत्न करते. पुन्हा एकदा ती म्हतारी बाई दोन्ही हातानी नको, नको म्हणते. ह्या सर्व प्रसंगाने ओशाळलेली बेलिंडा आपल्या गाईड ला बोलवून तिच्याशी संवाद साधते. गाईड जे सांगतो ते ऐकल्यावर तिचा आयुष्याकडे बघण्याचा पुर्ण दृष्टिकोन बदलुन जातो.(गाईड तिला सांगतो की तिचे गजरे विकत घेण्याच्या तुझ्या इच्छेमध्ये तिला सगळं मिळालं. तिला पैसे नको आहेत. तुझा हिशोब चुकता झाला.). ह्या अनुभवानंतर एकेकाळी कॉर्पोरेट शिड्या, पगार, स्टेटस ह्या सगळ्यासाठी दिवस रात्र एक करणारी बेलिंडा आपला जॉब सोडुन आयुष्य जगण्याचा प्रयत्न करते. तिच्या शब्दात सांगायचं झालं तर,
I was defining my value by what i earn not by who i was serving, when we put money before honor we are not going to go too far, but when we honor people for there time, service and money we will be rich. A women who had nothing is the wealthiest person i ever met in my life.
गजरे माळणाऱ्या एका गरीब स्री ने आपल्या हावभावातुन आयुष्याचा अर्थ बेलिंडा ला समजावला असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही. अश्या छोट्या हावभावातुन आपण कधी कधी मोठे अडथळे पण बाजुला काढू शकतो. मलेशियात जाणवलेला हा एक छोटा हावभावाचा भाग मला खुप काही शिकवून गेला. कोणाला तरी आपलं करण्यासाठी मोठ्या मोठ्या शब्दांची गरज नसते आपल्या छोट्या छोट्या हावभावातुन ते आपण समोरच्या पर्यंत शब्दांपलीकडे पोहचवू शकतो. असं म्हणतात,
कुछ बातें ऐसीं होती है
जो कहीं नहीं जाती...
सिर्फ़ समझी जाती हैं.
खाली बेलिंडा गुडरीच च्या व्हिडीओ ची यु ट्युब लिंक शेअर करत आहे.
सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
https://www.youtube.com/watch?v=qWi9Z37AEuQ