Tuesday 9 March 2021

वसुधैव कुटुंबकम... विनीत वर्तक ©

 वसुधैव कुटुंबकम... विनीत वर्तक ©

"भारताने जगाला कोरोना (COVID-19) पासून वाचवलं"

डॉक्टर पिटर हॉटेझ, अमेरिका 

दोन दिवसांपूर्वी डॉक्टर पिटर हॉटेझ, अमेरिका यांनी कोरोना वरच्या वेबिनार मध्ये भारताचं कौतुक केलं आहे. शेती बद्दल किंवा एकूणच भारताबद्दल काडीचं ज्ञान नसलेल्या जगातील काही सामाजिक व्यक्ती आणि कलाकारांच्या मताला अवास्तव महत्व देणाऱ्या मिडिया आणि सोशल मिडिया वरील अनेकांना नक्की डॉक्टर पिटर हॉटेझ कोण आहेत आणि त्यांच मत किती महत्वाचं आहे ह्याचा अंदाज नसेल. 

डॉक्टर पिटर हॉटेझ हे प्रसिद्ध अमेरिकन डॉक्टर, वैज्ञानिक, संशोधक आहेत.National School of Tropical Medicine चे प्रमुख आहेत, याशिवाय बायलॉर कॉलेज ऑफ मेडिसिन मध्ये प्रोफेसर आहेत, American Society of Tropical Medicine and Hygiene या संस्थेच अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे.  PLOS Neglected Tropical Diseases.ह्या मासिकाचे संपादक आहेत, Texas Children's Hospital चे डायरेक्टर आहेत. 

एकूणच काय तर डॉक्टर पिटर हॉटेझ यांच वैद्यकीय क्षेत्रातील कर्तृत्व आणि विषयाचा अभ्यास हा त्यांनी भूषविलेल्या पदांवरून दिसून येतो. जेव्हा एखादी व्यक्ती जागतिक स्तरावरील वेबिनार मध्ये अश्या स्वरूपाचं व्यक्तव्य करते तेव्हा त्या शब्दांना खूप किंमत असते. अर्थात पैश्यासाठी कोणत्याही थराला  जाणाऱ्या तथाकथित ढोंगी लोकांच्या ट्विट ना डोक्यावर घेऊन नाचणाऱ्या भारतीयांना डॉक्टर पिटर हॉटेझ यांचे शब्द कधीच दिसणार नाहीत. 

डॉक्टर पिटर हॉटेझ यांनी भारताचा गौरव करताना जग भारताच्या प्रयत्नांना कमी लेखत असल्याचं मत ही  व्यक्त केलं आहे. ते म्हणतात, 

"India's huge efforts in combating global pandemic is a story that's not really getting out in the world."

भारतीयच भारताच्या प्रयत्नांना नावं  ठेवतात तिकडे जगाबद्दल काय सांगणार. गेल्या 24 तासात तब्बल 20 लाख भारतीयांनी कोरोना लस घेतलेली आहे. तरीसुद्धा भारतात बातम्या मात्र लस कमी पडते आहे अश्याच येणार. सगळं चांगलं आहे असं नक्कीच नाही पण ज्या पद्धतीने लसीकरण चालू आहे त्याचा आपण अभिमान आणि आदर बाळगायला हवा. 

डॉक्टर पिटर हॉटेझ यांच्या शब्दांसाठी त्यांचे आभार आणि आम्ही भारतीय नेहमीच 'वसुधैव कुटुंबकम' ह्या तत्वाला जागत राहू. 

जय हिंद!!!

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




No comments:

Post a Comment