Wednesday, 30 March 2016

मेमरीस्ट्रा आठवणींचा एक खजिना.... विनीत वर्तक
२४ डिसेंबर २०१५ ला मेमरीस्ट्रा च्या रूपाने एक अलिबाबा चा खजिनाच गवसला. निमित होते भूषण भन्साळी ह्यांनी लिहलेले मेमरीस्ट्रा ह्या पुस्तकाच प्रकाशन आणि शाळेतल्या गुरुजनांशी झालेल्या गाठीभेठी. शाळा हे दोन शब्द म्हंटले कि सगळ्यांच्या मनाचा एक कोपरा लगेच उघडून समोर येतो. रम्य ते बालपण अस म्हणत सुरु झालेला प्रवास पहिल्या प्रेमा पर्यंत कधी येऊन थांबतो कळतच नाही. म्हणून ह्या कार्यक्रमा बद्दल खूपच उत्सुकताहोती. कार्यक्रम संपल्यावर कधी एकदा ह्या खजिन्यात रमतो अस मला झाल होत. सर्व गुरुजन ,मित्र ,मैत्रिणी खूप सारे सिनियर मित्र,मैत्रिणी ह्यांना भेटल्याचा आनंद संपत नाही तोवर मेमरीस्ट्रा च्या रूपाने आठवणींचा एक खजिना समोर आला.
पुस्तकाबद्दल लिहिण्या इतपत मी मोठा नाही. कारण माझ्या दृष्टीने ते पुस्तक नाही तर आपल्यापेकी प्रत्येकाने अनुभवलेल्या, जगलेल्या आणि मनाच्या कोपर्यात बंदिस्त केलेल्या आपल्या शाळेच्या आणि गुरुजनाच्या आठवणीआहेत. भूषण च्या शब्दावर असलेल्या जादू ने त्याला फक्त जाग केल. मला वाटते प्रत्येक लेखकासाठी ह्याहून दुसरी मोठी पावती नसेल कि त्याच्या शब्दांनी वाचकाला पुन्हा एकदा हसवल , रडवल, डोळांच्या कडा ओल्या केला व मनातल्या मनात सगळ अनुभवल. मेमरीस्ट्रा माझ्या दृष्टीने अलिबाबाचा खजिना आहे. जो कधी न संपणारा आहे. फक्त आपल्याला त्यात डुंबता यायला हव. भूषण थान्क्स म्हणत नाही कारण आपल्या माणसांचे आपण आभार नाही मानत. फक्त ह्या मेमरीस्ट्रा साठी मनात आलेल्या भावना म्हणजे तुझ्या पुस्तकाला दिलेली पावती आहे.
अलीबाबाच्या गुहेत शिरायला सुद्धा पासवर्ड लागतोच. माझा पासवर्ड होता वृंदा देसाई. माझी आणि तिची ओळख फेसबुक वरची. विर्चुअल जगात फिरताना अश्याच एका टोकावर झालेली भेट. भेटीच रुपांतर एका छान मैत्रीत कधी झाल ते कळलच नाही. माउली ते राजकारण अश्या टोकांच्या गप्पा होताना आपण एकाच शाळेत होतो हे कळायला अनेक दिवस जावे लागले. मग तिकडून सुरु झालेला प्रवास इथवर येऊन पोचला. वृंदा नसती तर ह्या गोखले च्या सर्व स्टार्स न भेटताच आल नसत. सगळ्या गुरुजनाची भेट तर शक्यच नव्हती. वयाच , ब्याच अंतर आम्ही बोलताना कधीच जाणवलं नाही. वृंदा तुझेही आभार नाही मानत कारण तू नेहमीच एक मैत्रीण, गाईड आणि सखी म्हणून बरोबर आहेस ह्याची खात्री आहे.
जे तुम्हा लोकांना जमल तिथवर आम्ही, आमची ब्याच कधी पोहचू अस वाटत नाही. आमचा काळ हा परिवर्तनाचा होता. माणस आपुलकीतून , आपलेपणाच्या भावनेपेक्षा आकड्यांना, सर्टिफिकेट ला जास्ती महत्व द्यायला लागली होती. मला वाटते तुम्ही जो काळ अनुभवला तो सुवर्ण काळ होता. त्या नंतर लागलेली ओहोटी अजून थांबलेली नाही. गेले ते विद्यार्थी आणि त्यांना घडवणारे गुरुजन. राहिले ते बेंच आणि फळे. संवेदनशीलता हरवत चाललेल्या आजच्या आभासी जगात मेमरीस्ट्रा च्या रूपाने खूप काही हाती लागल. स्टार ऑफ गोखले ग्रुप हेमंत घाडी आणि टीम मला त्या खजिन्यात डुंबायला दिलत ह्यासाठी खूप खूप धन्यवाद.
२०१५ .... विनीत वर्तक
प्रत्येक वर्षाच्या शेवटच्या दिवशी त्या वर्षात आपण काय मिळवले ह्याचा लेखा जोखा घ्यायचा असतो. खूप काही गोष्टी हाताशी लागल्या. खूप चांगली माणस भेटली, जोडली गेली. काही दूर हि झाली. पण सगळ्याच गोष्टी अनुभव देऊन गेल्या हे मात्र खर.
लेह-लडाख ची ट्रीप ती पण अनु मावशी (अनुराधा प्रभुदेसाई) सोबत हा ह्या वर्षातला सगळ्यात जास्ती आनंद देणारा अनुभव होता. ठिकाण बघण्यापेक्षा भूस्तललाने रस्त्यावर काढलेले ते ३ दिवस कधीच विसरू शकत नाही. त्याच वेळी भारतीय जवानांनी केलेली मदत आणि त्यांच्या सोबत आलेले अनुभव खूप काही शिकवून, दाखवून गेले. भारतीय सेनेच कार्य बघितलं कि आपण किती सुष्म आहोत आणि किती फालतू गोष्टींचा अभिमान बाळगत असतो ह्याची जाणीव होते. माझी पोझिशन, स्टेटस, गाडी, बंगला, पैसा, डिग्री सगळ्या गोष्टी पत्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळून पडतात. निसर्गाच्या त्या रूपापुढे हतबल होताना कोणी आपल्या सोबत असते तर भारतीय आर्मी. त्यांच्या कर्तुत्वाला दंडवत.
२५ जुलै ला भर पावसात कारगिल - द्रास सेक्टर मध्ये तिरंगा डौलाने फडकत असतानाचा तो क्षण २०१५ सालातला सगळ्यात परिपूर्ण क्षण होता. आम्ही युद्धभूमी वर उभ होतो. समोर टायगर हिल, कारगिल- द्रास क्षेत्रातील पर्वत राजी आणि त्या सगळ्यांच्या पुढे डौलाने फडकत असणारा तिरंगा. एका बाजूला भारतीय सैन्यांच्या कामगिरीने ५६ इंच फुललेली छाती तर दुसर्या बाजूला ज्यांनी आपले प्राण गमावले असे असंख्य सैनिक. ""Ya toh Tiranga lehrake awunga, ya fir Tirange mein lipta huwa awunga, lekin awunga jaroor" हे क्यापटन विक्रम बात्रा चे शब्द मनात रुंजी घालत असताना समोर दिसत असलेले युद्ध मेमोरियल लिहिलेले शब्द " शहीदो कि चिताओ पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मिटने वालो का यहि बाकी निशा होगा" डोळांच्या कडा ओल्या करून त्यातून अश्रू भावनांना मोकळी वाट करून देत होते.
लेह-लडाख नंतर सगळ्यात जास्ती उत्सुकता होती ती २४ डिसेंबर ची मेमरीस्ट्रा पुस्तकाच प्रकाशन आणि स्टार ऑफ गोखले सोबत सर्व गुरुजनाची भेट. तब्बल २० वर्षाच्या काळानंतर पुन्हा सोनेरी दिवसात जाताना खूप काही आठवलं. पुस्तक वाचताना प्रत्येक शिक्षकांचे स्वभाव भूषण भन्साळी च्या लेखणीतून अनुभवताना पुन्हा ते दिवस जगलो. प्रत्येकाचे अनुभव वेगळे असले तरी ते सगळेच आपल्याला खूप आनंद देतात. तीळ- गुळ समारंभ ते शाळेच ग्यादरिंग सगळच कस शब्दांच्या पलीकडल. फक्त अनुभवायचं आठवणीत.
२०१५ चे हे दोन अनुभव मात्र पूर्ण आयुष्यभर सोबत राहतील ह्यात शंका नाही.
अणु चे इलेक्ट्रोन... विनीत वर्तक
माणसाला जर अणु मानल आणि त्याच्या भोवती असलेली नाती म्हणजे इलेक्ट्रोन. जसे इलेक्ट्रोन अणु भोवती फिरतात आणि न दिसणाऱ्या बंधनाने बांधलेले असतात तशीच नाती पण. जेव्हा हे बंध तुटतात किंवा बांधले जातात तेव्हा दोन्ही वेळेस प्रचंड उर्जा बाहेर पडते. नात्यांच्या बाबतीत हि हेच होत कि. जेव्हा ती जोडली जातात किंवा तुटतात तेव्हा दोन्ही वेळेस प्रचंड उर्जा आपल्याला जाणवते ती विधायकपण असते आणि विध्वंसक सुद्धा. अणु विखंडणातून निघणार्या उर्जे पेक्षा अणु बंधनातून निघणारी उर्जा अधिक शक्तिशाली असते. तसच नात्यांच्या जोडण्यातून जास्ती उर्जा मिळते नात्यांच्या तुटण्यापेक्षा.
एकाच अणुभोवती जसे अनेक इलेक्ट्रोन असतात तसे आपल्याभोवती हि अनेक नाती , व्यक्ती असतात. त्यामुळे कोणत एक नात आपल्याला परिपूर्ण करू शकत नाही हे वास्तव आहे. ते स्वीकारण्याची मानसिकता खूप कमी लोकांमध्ये असते. समाजाने बांधलेल्या बंधनात आपण इतके गुरफटून जातो कि वास्तवा पासून आपण सतत पळत रहातो. कोणत्याही नात्यात आपण दुसर कोणी हे सहन करू शकत नाही मग ते नात एका स्त्री पुरूषाच असो, मित्र - मैत्रिणीच असो , नवरा - बायकोच असो किंवा अगदी पालक आणि मुलाचं असो. सगळ्या गोष्टी एकाच नात्यातून आणि एकाच व्यक्तीकडून पूर्ण झाल्या असत्या तर मग आपण स्थिर कधी झालोच नसतो. आपल्या विविध गरजा अनेक वेगळ्या लोकांकडून पूर्ण होत असताना मग ते एकाकडून पूर्ण करून घेण्यासाठी अनेक बंध तोडायला लावतो किंवा तोडतो.
एका तुटलेल्या इलेक्ट्रोन ची अस्वस्तथा अणु ला स्वस्थ बसून देऊ शकत नाही तिकडे आपण कुठून सुटणार. त्यात ते जबरदस्तीने असेल त्यात सहजता नसेल तर विध्वंसक उर्जेचा स्त्रोत बाहेर येणे क्रमप्राप्त आहे. प्रत्येक इलेक्ट्रोन स्वताचे अस्तित्व घेऊन असतो. जो वर अणु जोडलेला असतो तेव्हा त्याच अस्तित्व जाणवत पण नाही. पण तेच जेव्हा तो तुटतो तेव्हा त्याचा अणु वर असलेला प्रभाव आपल्याला जाणवतो तसच नात्याचं असत नाही का? बंधनातून मुक्त सुद्धा तो राहू शकत नाही. त्याला सोबत लागतेच आज नाही तर उद्या.
आपण कोणता अणु बनायचं ते आपण ठरवायचं. स्थिर असलेला कि अस्थिर असलेला. आपण हि कोणाचे इलेक्ट्रोन असतोच. कोणाला तरी स्थिर करतोच. पण फक्त आपणच हा अट्टाहास कोणत्याही नात्यात नकोच कारण ते शक्य नाही हे कळून समजायला हव. शाळेत विज्ञानात शिकलेल्या गोष्टी आपल्या खर्या आयुष्यात वापरायच्या असतात ह्याच शिक्षण कोणत्याच शाळेत दिल जात नाही. अणु ते इलेक्ट्रोन हा प्रवास समजू शकलो तर कदाचित युरेनियम ते हायड्रोजन हा प्रवास उर्जेच्या सकारात्मक वाटेने करू शकू.
स्वातंत्र्या चे शनी मंदिर ... विनीत वर्तक
तीन , चार दिवस नुसत त्या शनी मंदिरावरून गदारोळ सुरु आहे. मानवी हक्क, न्याय, समानता ह्याची पायमल्ली होते आहे असा एक सूर तर दुसरीकडे परंपरा, रूढी आणि देव असा एक सूर. पण ह्या गोंधळात हाती काय लागणार आहे का ?
म्हणजे समजून चालू कि स्त्रियांना प्रवेश मिळाला, पूजा घालयला मिळाली तर स्त्रियांना न्याय मिळाला का? मानवी हक्का चा विजय झाला का ? समानतेचा अंकुर फुटला अस काही होणार आहे का? जिकडे अजून ३३% साठी अजून मारामारी करावी लागते तिकडे एका देवळात दर्शनाची , पुजेची परवानगी मिळाली तर हे सर्व प्रश्न सुटतील अस नक्कीच नाही. जिकडे स्त्री कडे संभोगाच साधन म्हणून बघितल जात. जिकडे अनेक क्षेत्रात स्त्री चा प्रवेश वर्ज्य आहे. तिकडे कोणत्या विजयाची पताका आपण मिरवणार आहोत.
समजा नाही दिला प्रवेश तर स्त्री च्या सगळ्या अधिकाराची पायमल्ली होणार आहे का? एक शनी देव निदान भारतातील सगळ्या स्त्रियांचं स्वातंत्र ठरवतो आहे का? स्वातंत्र्याची वाख्या जर देऊळ प्रवेशातून जात असेल तर नक्कीच आपल्याला विचार करायची गरज आहे. देवाला हात लावल्याने किंवा पूजा करायला मिळाल्याने जर देव प्रसन्न होऊन सगळ्या स्त्रियांना बंधमुक्त करणार आहे अस काही घडणार असेल तर नक्कीच तो प्रवेश हवा.
सगळे धावले कि आपण हि धावायचं कशाच्या पाठी आणि कशाला ह्याच काही सोयर सुतक नाही. आपल्याला काय मिळणार ह्याचा काही अंदाज नाही. तो म्हणतो न मग बरोबर. राजकारण आणि भावना ह्याना हात घातला कि विषयाला पुढे जायला वेळ लागत नाही. हे ज्यांना समजते तेच आज गादी चालवत आहेत. आपण किंवा आपल्यासारखे नुसतेच तोंडाच्या हवा आणि रक्त आटवतो आहोत.
खरच जर इच्छा आणि काही करायची तळमळ आहे तर असे कितीतरी अनेक गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या परीने करू शकतो. स्त्री ला सशक्त करण्यासाठी. ह्यात मी सुद्धा आहे. कारण मी काही कोणी मोठा नाही पण प्रश्न आहे कि आपण कोणत्या मुद्यांना किती महत्व द्यायचं. जर आपण काय विचार करायचा हे लोक ठरवणार असतील तर अशी अनेक शनीची देवळ आणि स्त्री स्वातंत्र्याच्या चळवळी आपली वाट बघत आहेत.
एअरलिफ्ट .. विनीत वर्तक
एअरलिफ्ट हा अक्षय कुमार चा चित्रपट बघण्याआधीच ह्या चित्रपटा बद्दल प्रचंड कुतूहल होत. व्हात्स अप वर फिरत असलेली माहिती. त्याच्या जोडीला विकिपीडिया ची माहिती व त्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकोर्ड ची जोड.
"The 1990 airlift of Indians from Kuwait was carried out from 13 August to 20 October 1990 after the Invasion of Kuwait. Air India holds the Guinness Book of World Records for the most people evacuated i.e 165,000 people by a civil airliner as a result of this effort in which 500 were sent through a ship. The operation was carried out during the Persian Gulf War in 1990 to evacuate Indian expatriates from Kuwait. It is believed to be the largest civilian evacuation in history."
सगळ्यात कुतूहल म्हणजे हि इतकी मोठी गोष्ट लपून होती. म्हणजे वाचनात किंवा कुठेही ह्यची पुसटशी पण कल्पना नव्हती. चित्रपट बघितल्यावर खूप काही मिळाल. एक हरवलेला भारतीय हिरो "सन्नी म्याथुस" ज्यांच्या प्रयत्नांवर व चित्रपट बेतलेला आहे. भारतीय विचार किती मुरलेले आहेत स्पेशली कौटुंबिक व्यवस्थेमुळे कि त्यामुळेच इतका वैश्विक विचार सन्नी म्याथ्युस करू शकले. माझ झाल ह्या पलीकडे मी ज्या देशातून आलो त्या देशासाठी करण्याचा विचार जेव्हा समोर येतो तेव्हा कुठेतरी आपल्या कौटुंबिक रचनेची मुळेच त्याला कारणीभूत असतात.
एका वेगळ्या देशात, प्रांतात काम करताना अचानकपणे समोर आलेल्या समस्या किती भयावह असू शकतात. जेव्हा पैसा, तुमच स्टेटस टराटरा फाटल जाते. त्या वेळेस आपल्याच समोर येणार आपल्याच व्यक्तिमत्वाच दारिद्र्य खूप काही शिकवून जाते. एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते कि भारतात नांदणाऱ्या सर्व धर्मियांमुळे आणि गेल्या १००० वर्षा पेक्षा हून अधिक कालावधी मध्ये भारताने कोणत्याच देशावर स्वताहून आक्रमण केल नाही आहे. माझ्या मते जगातील कोणत्याही कोपर्यात इतकी सहिष्णूता नसेल. हे सांगण्याच कारण इतकच कि कोणत्याही मुस्लीम देशा मद्धे भारताला मानाचे स्थान आहे. (अपवाद :- पाकिस्तान ) युद्ध केलेला इराक आणि बळी पडलेला कुवेत दोन्ही ठिकाणच्या राजवटीत भारतीयांना अभय मिळाल ते ह्याच साहिष्णूतेमुळे. सर्व धर्मियांना सामावून घेण्याची आपली संस्कृती हीच आपल गेम चेंजर आहे.
एअर इंडियाच्या नावाने आपण नेहमीच खडे फोडतो. पण ह्या सर्व ऑपरेशन मध्ये एअर इंडिया, इंडिअन एअर्लाइन्स आणि भारतीय वायू सेना ह्याच कार्य उच्च कोटीच आहे. तब्बल ४८८ विमान युद्ध क्षेत्रात उतरवून ६३ दिवसात १,११,७११ लोकांना मायदेशी घेऊन येण नक्कीच अभिमानास्पस्द आणि कौतुक कराव असच आहे. ह्याचा बोध भारत सरकारनी नक्कीच घेतला असावा म्हणून आत्ता येमेन मद्धे भारत सरकारने केलेल्या कारवायीच जागतिक कौतुक झाल. येमेन मधून अनेक इतर अनेक देशाचे नागरिक हि भारताने सुस्थळी हलवले होते.
चित्रपटाच्या बाबतीत बोलायचं झाल तर अक्षय कुमार रॉक्स. पण सगळ्यात जास्ती भाव खाऊन गेली असेल तर निर्मत कौर. खूप गुणवान अभिनेत्री आहे. लंचबॉक्स च्या वेळेसच तिचा अभिनय खूप आवडला होता. इकडेही ह्या गुणवान अभिनेत्रीने कोणतीच कसर सोडली नाही आहे. चित्रपटाच दिग्दर्शन , सवांद खूपच सुंदर आहेत. स्पेशली आपल्या नवर्याच्या जागलेल्या भारतीय अभिमानामुळे सतत कुरबुर करणाऱ्या पण जगापुढे नवऱ्याच्या बाजूने लोकांना चार खडे बोल सांगतानाचा प्रसंग. गाडीत कुवेती स्त्री ला बसायला देण्याचा प्रसंग क्लास आहेत. स्पेशली कौतुक निर्मत कौर च ह्या दोन्ही प्रसंगात तिने आपल्या अभिनयाने जान आणली आहे. २ तास खिळवून ठेवणाऱ्या ह्या चित्रपटात खूप काही आहे. जिकडे भारत सरकार, निद्रीस्त्र सरकारी अधिकारी, जनतेने निवडून दिलेले सेवक झोपेच सोंग करतीत असताना, त्याच सिस्टीम मधील एक अधिकारी पूर्ण सिस्टीम ला जाग करतो. ज्या वेळेला प्रसंगाची तमा न बाळगता मला असेच हवे , तसच हव आम्ही पैसे दिले आहेत म्हणून रडणाऱ्या केविलवाणी लोक बघताना त्याच लोकांसाठी स्वताचे घर , दार , पैसा सगळ देऊन त्यांना जेवणाची व्यवस्था करणारा भारतीय पण आपल्याला भेटतो. चातुर्य, मितभाषीपणा आणि हजरजवाबी पणा अंगी असेल तर कठीण परीस्तीथीत योग्य निर्णय घेऊ शकतो. ( अक्षय कुमार आणि इराकी अधिकारी ह्यातील जेवणाच्या टेबलावरील संभाषण ) हे खूप काही शिकवून जातात.
शेवटी एअरलिफ्ट सोडू नये असा सिनेमा. भारतातील काळाच्या ओघात लुप्त झालेल्या हिरोना पुढे आणणारा सिनेमा. तो जितका अक्षय आणि निर्मत साठी लक्षात राहील तितकाच सन्नी म्याथुस , एअर इंडिया, भारीतीय वायू सेना आणि मोजके सरकारी अधिकारी ज्याचं कार्य कार्यालयाच्या फायिली मद्धे लुप्त झाल. ह्या सर्व अनामिक हिरोंना सलाम. एअरलिफ्ट ने मला तरी नक्कीच लिफ्ट केल. तुम्हाला हि करेल ह्यात शंका नाही...
अव्यक्त प्रेम ... विनीत वर्तक
14 फेब्रुवारी आला जवळ कि प्रेम दिवसाचे मेसेज चालू होतात. प्रेम व्यक्त करण्याचा दिवस पण खरेच नेहमी प्रेम व्यक्त केलेच पाहिजे का? मनातील भावना नक्कीच ज्याच्या बद्दल वाटतात त्याला सांगायला हव्याच पण सगळ्यावेळी हे शक्य होईलच असे नाही ना. कधी परिस्तिथी, कधी वेळ. तर कधी ती व्यक्ती मुळे आपल्याला गप्प राहणे शहाणपणाचे असते नाही का? माझ तुझ्यावर प्रेम आहे अस सांगून ती व्यक्तीच जर दूर जाणार असेल तर न सांगता तिला सोबत केलेली काय वाईट.
प्रेम म्हणजे काही मिळवण नव्हे न मग जी गोष्ट मिळणार नसेल तर तिला सांगाच कशाला? नक्कीच कधी कधी गोष्टी बदलतात हि पण हि शक्यता धूसर असते. स्पेशली जेव्हा फिलिंग या एकतर्फी असतात. १४ फेब्रुवारीच्या निमित्ताने आपण डेरिंग करतो पण खरच तिथवर जातो का? आपल्याला वाटणाऱ्या गोष्टी सांगायला एकच दिवस पुरेसा असतो का? प्रेमाची भरती त्याच दिवशी येते का तर तसे हि नाही. मग नक्की काय आणि कोणासाठी कशासाठी वहात जातो आपण.
कधी कधी उंच हवेत विहारणाऱ्या पतंगाला तसच सोडून देण्यात पण खूप मज्जा असते न तो हि आनंद काही वेगळाच. आपल्याला काय हव पतंग कि त्याची उंच आकाशात घेतलेली भरारी आणि त्याला जोडणारी दोरी. दोरीने बांधल कि तो हवा तसा वळवता येतो पण वाऱ्यावर वहात नाही. तो आनंद तेव्हाच जेव्हा दोरी आपण सोडून देतो अलगद आणि एका क्षणाचे साक्षीदार होतो त्याला त्या वाऱ्यावर झोके घेताना. प्रेमाच हि असच असते नाही का? कधीतरी सोडून द्यावं. कधी शांत बसून बघावं तर कधी त्या भावना आपल्यात मिटून त्या वाऱ्यावर वाहणाऱ्या पतंगासारख जाऊ द्यावं आपल्याच प्रेमाला.
लपून ठेवण्यात पण एक मज्जा असते. न दाखवण्यात पण खूप कौशल्य लागते कारण प्रेम जर तितकच निर्व्याज, स्वच्छ असेल तर मिलनाची मज्जा न मिळता सुद्धा येते. आयुष्यभर लपवून ठेवलेल्या प्रेमाची मज्जा काही औरच. जस व्यक्त केल्याच समाधान असते न तस अव्यक्त राहून खूप काही मिळवल्याच सुद्धा. १४ फेब्रुवारी असेल कि प्रेम दिवस पण ह्या दिवशी सुद्धा ह्या अव्यक्त प्रेमाची मज्जा घ्यायला काय हरकत आहे. नाही का?
अबाउट टाईम... विनीत वर्तक
अबाउट टाईम नावाचा एक सुंदर चित्रपट बघितला. खरे तर नावातच सगळ काही आहे. भूतकाळात जाऊन गोष्टी बदलत्या आल्या असत्या तर खूप काही बदलता आल असत. सगळ्यांना हे नेहमीच वाटत असते नाही का? स्पेशली प्रेमात तर नक्कीच. न बोलता आलेल्या भावना, अजाणतेपणी निघालेले शब्द , आठवणीत राहिलेल्या दुखद आठवणी आणि विस्मरणात गेलेल्या सुखद आठवणी सगळच बदलवास वाटणार....
पण असे जाता आले तर खरेच इतक सुखद असेल का? ह्या प्रश्नाच उत्तर नक्की काहीच सांगता येणार नाही. चित्रपटात हि एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट आहे कि जे तुमच्या डेस्टिनी मध्ये नाही ते भूतकाळात जाऊन पण तुम्ही बदलू शकत नाही. मग नक्की काय?? हाच प्रश्न जेव्हा टीम ला पडतो तेव्हा तो त्याच्या वडिलांना विचारतो आणि दिलेले उत्तर खूप मार्मिक आहे.
" live each day twice in order to be truly happy: the first time, live it as normal, and the second time, live every day again almost exactly the same. The first time with all the tensions and worries that stop us noticing how sweet the world can be, but the second time noticing."
भूतकाळात जाऊन पण तू काही बदल करू नकोस. जे जस घडल तसच घे. बदल करून हाताशी काहीच लागत नाही. एक आल तर दुसर जाते. आत्ता आलेला प्रत्येक क्षण पूर्ण आनंदाने जग. तो अनुभव टीम च्या शब्दात सांगायचं झाल तर
" it is better to live each day once, and appreciate everything as if he is living it for the second time."
आत्ता येणारा प्रत्येक क्षण खूप काही घेऊन येतो. आपण त्यातून काय घ्यायचं ते आपण ठरवायचं नाही का? त्यात चांगल आहे , वाईट आहे, त्यात भूतकाळ आहे आणि त्यात भविष्यकाळ पण आहे. मग कशाला उद्याची बात गड्या आयुष्य खूप सुंदर आहे जस आहे तसच , हाताशी मिळेल तसच जागून घे. कल किसने देखा हे...........
न कळलेला भारतीय .... विनीत वर्तक
सहानभूती ची लाट आली आहे. अचानक सर्वाना विद्यार्थांच्या भविष्याची त्यांच्या स्वातंत्र्याची काळजी वाटायला लागली आहे. एका विद्यार्थाला अटक केल्यावर लगेच भेट देऊन जाहीर पाठींबा देणारे हुजरे नेते बघितले कि खरोखर तळपायाची आग मस्तकात जाते. भारताविषयी आपण बोलणारे कोण खरे तर?
काय केल आहे आपण भारतासाठी. पैसे कमावून ट्याक्स भरतो इतकच न?? तो हि आपल्याच सोयीसाठी. आंदोलन करून जे हव ते पदरात पडून घेतो ते आपल्याचसाठी न? आरक्षणाच्या कुबड्याना सोन्याचा मुलामा दिला आपणच न? पण आम्ही भारतीय का तर आमचा जन्म इकडे झाला म्हणून कि आम्ही इकडे राहतो म्हणून
ज्या संविधानाने स्वातंत्र्य दिल त्यासाठी आपण काय दिल फक्त आपले हक्क मागून घेतले. हुजरे राजकारणी असल्या संविधान आणि भारतासाठी सहिष्णू म्हणून ज्या लोकांनी प्राणांची पर्वा केली नाही त्यांची लक्तरे वेशीवर टांगताना आपण फक्त बघत आहोत तमाशा. लहानपणी जत्रेत बघायला मिळायचा आज काल मिडीयावर अश्या जत्रा रोजच भरताना बघतो.
" ए मेरे वतन के लोगो" ऐकल तरी शहारा येणारा भारतीय कुठे गेला? स्वातंत्र्या साठी पेटून उठणारा भारतीय कुठे गेला? लांब कशाला वयाच्या विशी मद्धे आपल्या पत्रात ""Either I will come back after hoisting the Tricolour (Indian flag), or I will come back wrapped in it, but I will be back for sure." " लिहिणारा विक्रम बात्रा कुठे गेला ?? सगळयांना आपण विसरलो का? आपले आदर्श भारताचे तुकडे होऊ दे म्हणणारे विद्यार्थी बनले आहेत का? त्याचं स्थान आणि त्यांना काय वाटते हे आजच्या सरकारच्या पुढील महत्वाचे प्रश्न आहेत का?
कोण बरोबर आणि कोण चुकीच ह्या पेक्षा आपण कोणाला किती महत्व द्यायचं ह्याच भान राजकारण्याना , मिडीया आणि सो कोल्ड भारतीय म्हणून घेणाऱ्या आपल्यासारख्यांना नको का? आपण हि धावत सुटायचं. वीरश्री प्राप्त झालेल्या त्या सैनिकांची नावे कोणालाच माहित नसतील पण जे एन यु मधील त्या सर्व विद्यार्थ्यांची नावे सर्व राजकारणी आणि भारतीय लोकांना पाठ असतील.
खूप खूप त्रास होतो. गेल्याच वर्षी कारगिल च्या त्या टोकावर तिरंगा फडकताना पाहून डोळ्यांच्या पापण्या ओल्या झाल्या होत्या. ज्या अधिकारांच्या कमांड खाली विक्रम बात्रा सारखे ऑफिसर घडले त्या ब्रिगेडियर वाय के जोशी सरांना भेटून खूप काही मिळवले असे वाटले होते. भारतीय म्हणजे काय?, देशभक्ती काय असते ते तेव्हा जाणवले होते... आज सगळा बाजार बघून खूप लाज वाटते स्वताची आणि भारतीय म्हणवून घेत सगळ्याची मूक पणे दखल घेण्याची. भारतीय म्हणजे काय आपल्याला कळलेले नाही म्हणून तर असल्या लोकांचे चोचले पुरवण्यासाठी मीडियापासून अख्खा देश पण अनाहूतपणे राबत आहे.
देऊळाचे द्वारी.... विनीत वर्तक
देऊळाचे द्वारी असा कार्यक्रम आहे तू ये. असा आदेश वजा मेसेज माउलीन (वृंदा देसाई) कडून माझ्या मोबाईल स्क्रीन वर झळकल्यानंतर कार्यक्रम अतिशय सुंदर असेल ह्याची शाश्वती होतीच. इंडोलोजी असा विषय, श्री उदयन इंदुरकर हे सादरकर्ते आणि देऊळ हा तसा वाचलेला, अनुभवलेला विषय. पण अनेक प्रश्न डोक्यात नक्की स्वरूप काय? ३ तास काय देवळांच ऐकणार? पण माउलीने सांगितल म्हणजे काहीतरी वेगळ असणार हा विश्वास होताच.
३ मंतरलेले तास झाल्यावर अदभूत अनुभूतीचा भास, आपण आपल्या संस्कृतीला किती ओळखतो ह्याची झालेली चिरफाड म्हणजे शरमेने मान खाली जाईल इतकी. आपली संस्कृती, धर्म, देश, साहित्य, कला, विज्ञान ह्यांना समजून घेण्यात दाखलेला निष्काळजीपणा हे सगळ समोर आल. आपले पूर्वज किती समृद्ध होते सगळ्याच बाबतीत. आता आपण फक्त भिकारी उरलो आहोत असच वाटत होत. विज्ञानाने आपल्याला समृद्ध केल, मानवी जीवनाची उत्क्रांती विद्नाने झाली अस म्हणतात. २१ वे शतक विज्ञानाचे असेल पण भारतात १०-१२ व्या शतकात हुग्स बोसान (दैव कण) ह्या बद्दल माहित होत अस कळल तर आपण स्वताला भिकारी म्हणणार नाहीतर काय करणार. न्युक्लीयर फिशन, अणु- इलेक्ट्रोन ह्या संकल्पना ज्ञात होत्या. त्या पुढल्या पिढी पर्यंत पोचवाव्या म्हणून सौंदर्य, कला, विज्ञान आणि स्थापत्य शास्त्र ह्याचा अदभूत मेळ राखून अत्युच्य अश्या कलाकृती जन्माला घालणाऱ्या संस्कृती मधील फक्त खजुराहो सारख्या ठिकाणी फक्त सेक्स शिल्लक राहतो. तर हा मनाचा भिकारडे पणा आपलाच आहे.
ज्या दैव कणांचा शोध सर्न प्रयोगशाळेने लावला त्या प्रयोगशाळेच्या प्रवेशद्वारावर नृत्य करणाऱ्या शंकराची प्रतिमा का लावली गेली ह्याचा आपण विचार तरी कधी केला का? हुग्स बोसान म्हणजे काय? हे समजायचं असेल तर त्या नटराजाला तुम्ही समजून घ्यायचं हे कोण आपल्याला सांगते तर सर्न प्रयोगशाळा. आता ते सांगतात म्हणजे नक्की काहीतरी असेल ह्यावर आपला विश्वास. पण तब्बल १०-१२ व्या शतकापासून ह्या सर्वांचा खजिना आपल्याच आजूबाजूला विखुरलेला आहे तो बघण्याची दृष्टी मात्र आपण गमावून बसलो आहोत. खजुराहो, वेरूळ, रानी कि वाव, अशी भारतातील तर हिंदू संस्कृतीच्या गणितातील अत्युच्य अश्या ज्ञानाची पताका समुद्रापार पेटवत ठेवणारे अंगकोर वाट सारखे कंबोडिया मधील मंदिर म्हणजे सर्न सारख्या अत्युच्य अश्या प्रयोगशाळा, स्थापत्य शास्त्राची विद्यापीठ, कलेची- संस्कृतीची माहेरघर आहेत. ह्या सर्वाना एकत्र आणणारे आपले पूर्वज किती मोठा भाग आपल्यासाठी मागे ठेऊन गेले आहेत. आम्ही मात्र त्यावर नाव कोरण्यात आपला मोठेपणा मानतो.
कलेला, संस्कृतीला, स्थापत्य शास्त्राला, विज्ञानाला आणि अभियांत्रिकीला एकत्र करणे सोप्पे आहे का? आमच्याकडे साधी एक मेट्रो रेल्वे बांधायला १०-१५ वर्षाचा कालावधी गेला. तर ५-६ वेगवेगळ्या विषयांना कोणत्याही विषयाला झुकत माप न देता एकत्र आणून, सर्व क्षेत्रातील विद्वान आणि विद्वत्ता ह्याचा योग्य तो मान राखून समतोल साधत जवळपास १००० वर्षापेक्षा अधिक काळ तेच सौंदर्य जपणारी कलाकृती साधायची म्हणजे विचार करून चक्कर येते. अंगकोर वाट ची प्रतिभा बघा. हे मंदिर अवघ्या ३५ वर्षात उभ केल गेल.
( Angkor Wat (Khmer: អង្គរវត្ត or "Capital Temple") is a temple complex in Cambodia and the largest religious monument in the world, with site measuring 162.6 hectares (1,626,000 sq meters). The outer wall, 1,024 m (3,360 ft) by 802 m (2,631 ft) and 4.5 m (15 ft) high, is surrounded by a 30 m (98 ft) apron of open ground and a moat 190 m (620 ft) wide. The outer wall encloses a space of 820,000 square metres (203 acres)).
जगातील सगळ्यात मोठ धार्मिक स्थान आजच्या दिवशी सुद्धा हिंदू संस्कृतीने उभारलेल १००० वर्षाहून अधिक काळ. जगातील गणिती, शास्त्रज्ञ ना अजून हि न कळलेल गणित आणि विज्ञान शिकवत तितक्याच दिमाखाने तग धरून असणार हे मंदिर हिंदू आहे हे भारतीयांनाच माहित नाही. ह्याहून मोठा आपला करंटेपणा काय असेल?
भारत माता कि जय बोलायचं म्हणून बोलण्यापेक्षा ह्या संस्कृतीत जन्माला आलो ह्याचा अभिमान म्हणून बोलण्यासाठी आपल्याच संस्कृतीला समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू शकलो तरी ते हि नसे थोडके. वृंदा Vrinda Desai माउली धन्यवाद. एका उत्कृष्ठ कार्यक्रमाला अनुभवण्याची संधी दिलीस. श्री उदयन इंदुलकर ह्यांचा अभ्यास, शैली, तळमळ अत्युच्य होती. कंबोडिया ला त्यांच्या सोबत अभ्यास सहल करण्याची इच्छा घेऊनच बाहेर आलो ह्यातच कार्यक्रमांच सार आल. एकच खंत. देऊळ हि म्हातारपणात बघण्याची गोष्ट नाही. आयुष्याच्या पूर्वार्धात ह्या गोष्टी समजून देणारे इंदुरकर सरांसारखे शिक्षक मात्र हवेत. तारुण्यात जर आपल्या संस्कृतीला समजून घेऊ शकलो तर ह्यावून वेगळ काय हव. मग तोंडातून आलेल भारत माता कि जय हे मनापासून आलेल असेल.
व पु आणि मी... विनीत वर्तक
पुस्तक वाचण्याची गोडी असली तरी नेमक काय वाचल कि आनंद मिळतो हे लक्षात येत नव्हत. म्हणजे वाचल कि आवडल पण अधाशासारख वाचून संपवावं अशी एखादी कलाकृती किंवा लेखक- लेखिका भिडत नव्हती. त्याच वेळी वपुर्झा हाती आल. सगळच कुठेतरी बदलून गेल. मग पार्टनर, आपण सारे अर्जुन ते तप्तपदी असा सगळाच प्रवास झाला. व पु न कडून ओशोची ओळख झाली. सगळ्याच गोष्टी कडे वेगळ्या दृष्टीने बघण्याची इच्छा झाली.
विचारांचा हा प्रवास फेसबुक आणि माझ्या जॉब मुळे कि प्याड वर कधी उमटला कळलाचनाही. पोस्ट पासून लिहित ब्लॉग पर्यंत जाऊन सुद्धा लेखक वगरे अशी बिरुदावली कधीच चिकटू न देता मनात आलेल फक्त व्यक्त करून द्यायची प्रेरणा मात्र व पु नि दिली.
कथा, कादंबरी, आत्मचरित्र ह्या आणि अश्या सारख्या पुस्तकानपेक्षा वर्तमान दाखवणाऱ्या आणि विचारांचं भविष्य घडवणारी पुस्तक मराठीत व पु काळे नि लिहिली. आजही फेसबुक वर सगळ्यात जास्त वाक्य व पू च्या लेखणीतून उतरलेली कित्येक जणांना वेगळ्या दृष्टीने बघण्याची प्रेरणा देत राहतात.
जीवनात आजूबाजूला घडणाऱ्या कित्येक घटना आपल्याच मनावर किती खोलवर परिणाम करतात. आपल्या नकळत सुद्धा आपल्या अनेक गोष्टींवर, विचारांवर, कृतीवर त्याचा एक रिमोट कंट्रोल असतो. तेच जर आपण समजू शकलो तर आपण स्वताला एका वेगळ्या पातळीवर, एका वेगळ्या दृष्टीने समजून घेऊ शकू. तेच जे समजलेल आणि उमजलेल मांडायची ताकद व पु च्या लिखाणातून मिळाली हे मला प्रांजळपणे मान्य करावेच लागेल.
एकच खंत मनात राहिली कि त्यांना भेटता आल नाही. माझ्या लिखाणावर प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष प्रभाव टाकण्याऱ्या व पु ना इतक जवळ असून सुद्धा भेटता आल नाही हे नेहमीच टोचत राहील. परवा त्यांचा ८४ वाढदिवस झाला. त्यामुळे त्यांची आठवण आली. त्यांच्यासाठी त्यांच्याच एका वाचकाने लिहिलेले हे शब्द.
"जगणं ही सुद्धा एक कला आहे हे उमगून जगणारा आणि सभोवताली माणूस म्‍हणून वावरणा-या सजीव वस्‍तूना जगण्‍याचा अर्थ समजावून जगण्‍यावर प्रेम करायला प्रवृत्‍त करणा-या माणसाच्‍या हातून लिहील गेलेली आयुष्यिका म्‍हणजे.......... वपूर्झा"