Thursday, 11 June 2015

    वेळेच महत्व....... विनीत वर्तक
    वेळेच महत्व सांगणारी एक गोष्ट लहान असताना वाचली होती. अगदी एका तपापासून ते एका शतांश सेकंदा पर्यंत. काल त्याच महत्व अजून अधोरेखित झाल. जेव्हा सगळे देश नेपाळ मध्ये झालेल्या भूकंपाच्या घटनेत नेपाळ ला सहानभूती देत होते तेव्हा भारतीय वायुसेनेच विमान काठमांडू मद्धे मदत घेऊन उतरल सुद्धा होत.
    माझ्या दृष्टीने हा खूप मोठा फरक आहे दृष्टिकोनाचा. सी-१७ ग्लोब्मास्तर जगातील एक अत्याधुनिक विमान जे अगदी मोजक्या जागेत अगदी कठीण परिस्तिथीत कुठेही उतरू शकते. प्...रचंड महाग असलेल हे अत्याधुनिक विमान युद्धासाठी वापरले जाते अश्या अत्यधुनिक विमानातून एन. डी. आर. एफ जे जवान ,सामुग्री , डॉक्टर, बाकी मदत जसे पाणी, फ्युल , ब्लान्केत , टेंट इत्यादी सामान काठमांडू मध्ये भारताने पाठवून पण दिल.
    भारतीय सेना , वायुसेना , नौसेना जगात अद्वितीय आहेतच त्यांच्या शौर्याला , देशाविषयीच्या निष्ठेबद्दल प्रचंड आणि खरच खूप प्रचंड आदर जनमानसात आहे. त्यांच्या ह्या कर्तुत्वाला सलाम आणि अगदी कुर्निसात आहेच. पण ह्या वेळेस कुठे तरी तो आदर राजकारण्यांविषयी वाटू लागला आहे.
    एखादी सेना कितीही चांगली असली तरी त्याला एक लीडर लागतो. तेव्हाच त्या सेनेच कर्तुत्व उजळून निघते. मोदींच्या रूपाने एक कणखर लीडर भारतीय सेनेला मिळाला आहे ह्यात कोणाच दुमत नसेल. येमेन मधील भारतीयांना परत आणण्याची कामगिरी असो वा आता नेपाळ मद्धे दिली जाणारी मदत ह्या मद्धे खास मोदि टच आहे हे आपण मान्य करायला हव.
    येमेन मधून भारतीयांना परत आणताना २ तासासाठी बॉम्ब वर्षाव आणि गोळीबारी बंद करावी ज्या योगे भारतीय विमानांना उडता येईल अशी रिक्वेस्ट मोदी नि सौदी अरेबियाच्या नेतृत्वाला केली होती. भारताच्या ह्या स्पेशल रिक्वेस्ट चा मान ठेवून सौदी अरेबियाने दोन तासांची मुभा दिली होती. त्या वेळेतच आपण भारतीय नागरिक तसेच ४१ देशांच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवू शकलो. ह्यात भारतीय सेनेच, जनरल व्ही. के . सिंग ह्याच कर्तुत्व आहेच पण सगळ्यात पुढे राहून लीडर प्रमाणे राजकारणातून मार्ग काढणाऱ्या मोदींच हि आहे.
    आज पर्यंत मला नाही आठवत कि भारताने कधी इतक्या प्रचंड वेगाने सूत्र हलवली आहेत. वर बघता ह्या सगळ्या गोष्टी एकदम सहज वाटत असल्या तरी अश्या गोष्टींसाठी प्रचंड प्लानिंग, अनेक संस्थांचा ताळमेळ तसेच राजकीय मनोबल लागते. सगळ्याच आघाड्यांवर मोदि आणि त्यांचे सहकारी प्रशंसेस पात्र आहेत. मनोहर पर्रीकर, सुषमा स्वराज, एस जयशंकर,राजनाथ सिंग तसेच अगदी सुरेश प्रभून पर्यंत सगळ्यांनीच आपला वाटा उचलेला आहे.
    भारतीय सेना, वायुसेना आणि नौसेना ह्याचं कार्य जितक उच्च कोटीच आहे त्याच लेवल पर्यंत राजकारण जाताना बघण हा ह्या दुखांच्या क्षणात एक सुखद अनुभव आहे. त्या लोकांवर जे दुख आल त्याची तुलना आपण करू शकत नाही किंवा सांत्वन सुद्धा पण ह्या दुःखाच्या आणि प्रचंड अडचणीच्या वेळेस भारताने , भारतीय सेनेने, भारतीय राजकारण्यांनी , भारताच्या लोकांनी जी तत्परता दाखवली आहे त्याला नेपाळ च नाही तर सगळ जग सलाम करते आहे.


    व्हाय आय स्टोप वाचिंग पोर्न .... विनीत वर्तक
    यु ट्यूब वरील एक विडीओ आपल्या सर्वानीच विचार करावा असा आहे. पोर्न हा सगळ्याचा आवडता विषय आहे पण कोणी त्यावर बोलायला तयार नसते. पोर्न मुवीज , ब्लू फिल्म्स आपल्या मनाच्या अंतरंगावर कसा परिणाम करतात. कळत नकळत आपल्या भावनांना कंट्रोल करतात आणि त्याचे काय परिणाम होतात इतक्या स्पष्टपणे प्रथमच जाणवले.
    सेक्स हे नेहमीच मनाशी संबंधित असलेली गोष्ट पण हळू हळू का होईना त्यातला मनाचा भाग बाजूला जाऊन शरीर आणि स्पेशली आपले जेनेटिक ऑर्गन जे ह...्या क्रियेत भाग घेतात तेच महत्वाचे बाकी सगळ काहीच मायने नसत असा समज हळू हळू मूळ धरू लागला आहे. त्याला कुठेतरी पोर्न इंडस्ट्री जबाबदार आहे.
    एक स्त्री आणि एक पुरुष जरी कुठल्याही स्वरूपाचे शरीरिक संबंध करत असले तरी त्यात बाकी सगळ बाजुला फक्त जेनेटिक ओरगन स्पेशली पुरुषांच्या बाबतीत किती मोठे असेल आणि सगळा फोकस तिकडेच म्हणजे स्पर्श , भावना , फोरप्ले हे काही महत्वाचे नाही फक्त आणि फक्त पेनीट्रेशन महत्वाचे हे दाखवण्याचा अट्टाहास. स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा भावना, स्पर्श , फोरप्ले सगळ बाजूला ठेवून पुरशाला आकर्षित करण्याचं तंत्र म्हणजे उन्नत्ता मग ती छातीच्या बाबतीत असो वा फिगरच्या बाबतीत. ह्या सगळ्याचा आपल्या मनावर होणारा परिणाम ह्याचा कधीतरी आपण विचार करतो का?
    रान गावरीली नि इतक्या सुस्पष्ट पद्धतीने इकडे सांगतो कि कश्या सगळ्या गोष्टी बलात्कार, विकृत मानसिकतेला जन्म देतात. हे घडल्यानंतर पुरुष आणि स्पेशली स्त्रीची होणारी घुसमट आणि त्यातून वाईट मार्गाचे अनुकरण ड्रग्स , एस्कोर्त , वैश्या व्यवसाय आणि एकूणच त्याची परिणीती एड्स , आत्महत्या आणि आयुष्याचा शेवट....
    आपण पोर्न बघतो म्हणजे आपण डिमांड करतो आहोत तर बाजारातून सप्लाय होणारच आणि सप्लाय हवा असेल तर अजून मुली , अजून स्त्रिया ह्या चक्रात फसत राहणार , ओढल्या जाणार. एका छोट्या गोष्टीतून २ क्षणांच्या आनंदासाठी आपण एक मोठी डिमांड बाजारपेठेत निर्माण करतो आणि त्यातून अश्या गोष्टीना हातभार लावतो.
    आपण बदलू शकतो का?? तर होय आणि समाज तर तो सुद्धा. सुरवात स्वतःपासून आणि सगळ्यांसाठी हि पोस्ट. इकडे एकही पुरुष नसेल आणि अगदी स्त्री सुद्धा कि कधी पोर्न बघितलं नसेल . पण ते सांगण्याच धाडस करणे म्हणजे स्वताच्या इमेज शी तडजोड करण अस सगळ्यांना वाटते कारण चांगले आणि वाईट ठरवण्याची आपली व्याख्या सेक्स ह्या स्टेशन वरून जाते. जिकडे सगळ्यांना उतरायचे असते पण उतरताना कोणी बघितले नाही पाहिजे अशी इच्चा असते. त्या उतरणाऱ्या आणि उतरू पाहणाऱ्या सगळ्यांसाठीच हि पोस्ट..
    रान गावरीली थ्यांक्स एक वेगळच विचार दिलास..
    ब्रेकिंग न्यूज...... विनीत वर्तक
    काल लागला बुवा एकदाचा निकाल. सगळ्यांचे जीव नुसते कासावीस होत होते. मिडीयाने पण भारतात सध्या ह्या खटल्या च्या निकालाशिवाय काहीच घडत नाही आहे. अस चित्र निर्माण केल. त्यात वृत्तपत्रे हि काही मागे नव्हती. लहानपणी वाटायचे कि आपल नाव टी व्ही किंवा वृत्तपत्रात यायला काहीतरी चांगले करावे लागते. मोठे व्हावे लागते. पण आजकाल वाईट कामाची प्रसिद्धी पहिल्या पानावर आणि ब्रेकिंग न्यूज मध्ये मिळते.
    त्यात पण शिक्षेचा निकाल ऐकून कस डोळ्यात पाणी आल. आणि त्याने... कपडे काय घातले. त्याच्या आईच सांत्वन कोणी कोणी केल. ह्यावर आपल्या मीडियाची मदार. ज्या निष्पाप लोकांचा बळी गेला. केस इथवर यायला किती तरी जणांची आयुष्य बरबाद झाली. त्याच्या डोळ्यातील अश्रून पर्यंत आपला मिडिया, आपली पत्रकारिता कधी पोहचू शकली नाही. कारण तिकडे गेले तरी ती ब्रेकिंग न्यूज होत नाही. ती फक्त एक बातमी असते.
    मला काल गम्मत वाटत होती कि काय लोक त्याच्या पुढे मागे धावतात. त्याने काय केल आहे तुमच्या आमच्या साठी?? एकवेळ अण्णा हजारे किंवा अजून कोणतेही सामाजिक कार्यकर्ते ह्यांच्या हाकेला असे लोक धावले असते. तर खरच खूप छान वाटल असत. पण तो दिवस कधी येणार नाही. कारण तिकडे सेलिब्रेटी नाही, पैसा नाही , मेन म्हणजे बाईट नाही. कोण आधी बातमी पोहचवते ह्यात सुद्धा स्पर्धा. शेवटी काय हजेरी लावून गोष्टी आहेत तश्याच.
    गिरे तो भी टांग उपर ह्या युक्ती प्रमाणे गोंजार्ण्यासाठी बरेच लोक लाईन लावून उभे होते. मग झोपलेले लोक कुत्रे काय ते रेल्वेचे मोटरमन इथपर्यंत सगळ्यांनीच आपले तारे तोडले. काय आहे वाहत्या प्रसिद्धीच्या गंगेत हात धुवायला फुकट मिळाले तर कोणाला नको आहे. पण शेवट काय आपण तरीही पिक्चर बघणार , शिट्या मारणार , ते दिसले कि सही घ्यायला मागे पुढे करणार. आता तर काय सेल्फी घेऊन कधी एकदा फेसबुक आणि व्हात्स अप वर टाकणार आणि एवरेस्ट सर केल्याच्या जल्लोषात सहभागी होणार.
    कायदा आपल्याला कधी समजलाच नाही. असला कायदा समजून घेण्याची माझी तरी मानसिक किंवा बौद्धिक पातळी नाही. जिकडे न्याय कोण कोणाला देत हे न्याय देवतेलाच ठाऊक. असो आता हे सगळ बिगुल संपून पुन्हा मिडिया आणि वुत्तपत्रे ब्रेकिंग न्यूज कडून बातम्यांकडे वळतील अशी भाबडी आशा बाळगूया.

Sunday, 8 March 2015

चाय पे चर्चा ...

चाय पे चर्चा .... विनीत वर्तक
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत कोन्ग्रेस चे जेष्ठ नेते मणिशंकर अय्यर ह्यांनी एक विधान केले होते, कि आम्ही चहावाल्याला लोकसभेत येऊन देणार नाही. हवी तर लोकसभेच्या बाहेर चहासाठी एक जागा देऊ. आज त्याच चहाला, त्याच चहावाल्याने जगाच्या नकाशावर इतक्या उंचीवर नेऊन ठेवल कि अमेरिकेच्या राष्ट्राधाक्ष्याना चाय पे चर्चा हे बोलण्याचा मोह टाळता आला नाही.
व्हाईट हाउस मध्ये अश्या चाय पे चर्चा व्हाव्यात इथवर हि बराक ओबामा बोलून मोकळे झाले. एकूणच काय आपलेच दात आपल्याच घशात ह्याच ह्याहून दुसर प्रातिनिधिक उदाहरण नसेल. बराक ओंबामा ना बोलवण्यापासून ते भारत- अमेरिका संयुक्त निवेदनात सगळ्या जगाच्या पत्रकार, मिडिया समोर त्यांना बराक म्हणे पर्यंत नरेंद्र मोदि नि जे टायमिंग साधल त्याला तोड नाही. सध्या आंतरराष्ट्रीय मिडिया मद्धे "मोदी-ओबामा ब्रोमांस" ह्या नावाने रकाने च्या रकाने भरून लेख लिहिले जात आहेत. कोणती गोष्ट कुठे , कधी, कोणासमोर केली कि जास्तीत जास्त त्याचा ठसा उमटेल ह्या राजकारणातील मोदी च्या चातुर्याला तोड नाही.
विमानतळावर प्रोटोकोल तोडून स्वतः भेटण्यापासून ते अगदी कालच्या बिझनेस मिटिंग पर्यंत बराक ओबामाच्या मनाचा ठाव घेण्यात मोदि ११०% यशस्वी झाले ह्यात शंका नाही. आपल वलय अस निर्माण करून त्यात ओबामा न गुंतवून ठेवण्याची चाणक्य नीती राबवण्यात मोदि नि हात आखडता घेतला नाही. ह्याचे फार दूरगामी परिणाम जगाच्या एकूणच परिस्थितीवर होणार आहेत. लोक लगेच विचारतील आपल्याला काय मिळाल? अमेरिका आपलाच फायदा बघते? ते फक्त विकण्यासाठी इकडे आले आहेत? आणि अजून बरच काही. मला सर्वाना दोन प्रश्न विचारायचे आहेत एक म्हणजे काल नवाज शरीफानी घाईघाईने संध्याकाळी भारताला दिलेल्या शुभेच्या हे कश्याच द्योतक आहेत?? दुसरा पाकिस्तान च्या आर्मी चीफ ने घाईघाईने चीन ची घेतलेली भेट आणि चीन ने पाकिस्तान ला दिलेल जुन्या मैत्रीच आश्वासन हे काय सांगते?
ह्या सगळ्या घटना योगायोग नाही आहेत. चीन भारताचा कधीच मित्र नव्हता न कधी होऊ शकेल. साऊथ चायना सी अस म्हणत अगदी हिंदी महासागरावर सुद्धा चीन आपला हक्क आहे अस सांगत सुटला आहे. चीनच्या आरमारी, सैन्य, राजकीय , आर्थिक सामर्थ्याला टक्कर देऊ शकेल असा एकच देश आशिया खंडात आहे आणि तो म्हणजे भारत. व्हियेतनाम, फिलिपिन्स, म्यानमार सारखे अनेक देश चीन च्या विरोधात भारताकडे बघत आहेत आणि अश्या वेळेस भारताला आपल स्थान मजबूत तसेच आपल्या सीमांच रक्षण करण्यासाठी , आधुनिक होण्यासाठी, सगळ्याच पातळ्यांवर अमेरिकेची किंवा रशियाची गरज आहे. नेमका हाच मुद्दा अमेरिका आणि भारत ह्या दोघांसाठी गरजेचा आणि महत्वाचा आहे.
अमेरिकेचा ह्यात फायदा असला तरी १२,००० कि मी वर मिळणाऱ्या फायद्या पेक्षा ज्या ठिकाणी अमेरिका मदत करते आहे करणार आहे तिकडे सगळ्यात जास्ती फायदा होणार हे निश्चित आहे. दुश्मन का दुश्मन अपना दोस्त होता हे मोदी च्या पुढच्या डिप्लोमसी च पाउल आहे आणि काल घडलेल्या ह्या दोन घटना नक्कीच कुठेतरी चायना आणि पाकिस्तान चे पहिले प्रतिसाद आहेत.
मोदी सगळ्यात बेस्ट राजकारणी वगरे अस म्हणत नाही, आणि त्यांनी केलेल्या सगळ्या गोष्टीनच समर्थन हि करत नाही. पण डिप्लोमसी मग अगदी ती ट्विटर वरून ओबामा यांना बोलावण्याची असो, गळाभेट करण्याची असो, आपल्यावर झालेल्या टीकेला शस्त्र बनवून जगात त्याचच ब्रान्डींग करणे असो कोन्ग्रेस काय भाजपा तील एकही नेता त्यांच्या आसपास नाही हे आपल्याला मान्य करावच लागेल.
तुमच्यात आणि बराक ओबामाच्या मद्धे काय केमिस्ट्री आहे हा प्रश्नाला उत्तर देताना अमेरिकेच्या राष्ट्राध्क्ष्याना एकेरी बराक असा उल्लेख करून पुढच्या सगळ्या गोष्टी पडद्यामागे राहून दे अस सांगत जो काही मास्टर स्ट्रोक खेळला आहे. त्याला तोड नाही. २ दिवस होऊन सुद्धा लोक , मिडिया , सोशल मिडिया ह्यांच्या बरोबर पाकिस्तान, चायना ह्या सारखे देश सुद्धा बुचकळ्यात पडली आहेत, कि नक्की भारत आणि अमेरिका ह्या मद्धे पुढील संबंध कसे असतील आणि त्याची व्याप्ती काय असू शकेल. ह्याच उत्तर आज तरी कोणाकडेच नाही.
एकूणच काय चाय पे चर्चा ने मणिशंकर तर आडवे पडले पण ज्या चहा ला आणि चहावाल्याला खिजवलं होत तो आज त्याच चहा ला अवघ्या ६ महिन्यात जगातील सगळ्यात ताकदवान देशाच्या सगळ्यात ताकदवान माणसाच्या घरात विराजमान करण्यात यशस्वी झाला हे यश निसंकोचपणे आपल्याला मान्य कराव लागेल.

रॉयल एन्फिल्ड एक दुमदुमणारा आवाज....

रॉयल एन्फिल्ड एक दुमदुमणारा आवाज.... विनीत वर्तक
काही नाव अशी असतात कि त्यांच्या नावावर वस्तू विकल्या जातात. जसे सीलबंद पाणी म्हंटल कि बिसलरी , टूथपेस्ट म्हंटली कि कोलगेट , किंवा झेरोक्स. असच बुलेट म्हंटल कि एकमेव नाव समोर येते एन्फिल्ड. तिचा तो अजरामर आवाज आज सुद्धा प्रत्येक बायकर ला प्रेमात पाडतो. अगदी लांबून सुद्धा एकू येणारी ती धक धक आजही प्रत्येक माणसाला बुलेट च अस्तित्व दाखवून देते. रॉयल एन्फिल्ड का रॉयल आहे तर १०० वर्षा पेक्षा जास्त वर्ष ती आपल अस्तित्व टिकवून आहे. १९०१ ते २०१५ इतका प्रचंड मोठा प्रवास आणि स्तीथंतर पाहिलेली दुसरी कोणती बाईक आज अस्तित्वात नसेल.
एकेकाळी ब्रिटीश साम्राज्याच प्रतिनिधित्व करणारी त्याच ब्रिटीशांनी अस्तित्व पुसून टाकल्यावर सुद्धा भारतात आपल अस्तित्व टिकवून ठेवून पुन्हा एकदा त्याच जोशात आणि जोमात जगातील सर्वाधील विकली जाणारी २०१४ साला मधील बुलेट ठरली आहे. तब्बल ३ लाख बाईक २०१४ साली विकल्या गेल्या आहेत. हि वाढ तब्बल ४३% टक्यांची आहे. बुलेट चा राजा म्हणून दिमाखात फिरणाऱ्या अमेरिकन संस्कृती च गोडव गाणार्या हर्ले डेविडसन च अढळपद रॉयल एन्फिल्ड ने मोडीत काढल आहे. रॉयल एन्फिल्ड ची विक्रीतील वाढ तब्बल ७०% ची आहे तर हर्ले डेविडसन ची ३%.
अगदी गेल्या आठवड्यात तोंडात बोटे घालून बी एस एफ च्या जवानांच कौतुक करणाऱ्या बराक ओबामांना हि बुलेट काय करू शकते ह्याच प्रत्यंतर आलच असेल. नक्कीच स्कील आणि त्यावरची प्रात्यक्षिक हा जरी त्या जवानांच्या शौर्याचा भाग असला तरी त्याच तोडीची बुलेट तयार करणे , ती तितक्याच दमदारपणे योग्य वेळी काम करणे हा हि तितकाच महत्वाचा मुद्दा आहे. मायकल शूमेकर हा जरी उत्कृष्ठ ड्राईवर असला तरी फेरारी ची गाडी हा त्याच्या पर्फोर्मंस चा ५०% भाग होती हे सगळेच मान्य करतील. म्हणूनच ते कर्तब दाखवणाऱ्या रॉयल एन्फिल्ड च हि कौतुक तितकच महत्वाच आहे.
१९५५ साली पोलीस आणि लष्करी अधिकार्यांसाठी भारत सरकार एक चांगली बाईक शोधात होती जी भारताच्या सीमेवर अगदी सियाचेन पासून कच्छ च्या रणा पर्यंत उपयोगी असू शकेल. रॉयल एन्फिल्ड जी पायामुळ त्या वेळी रोवली ती आजतागायत. १९७१ साली ब्रिटीशांनी बंद केल्यावर रॉयल एन्फिल्ड च अस्तित्व भारतात उरल. १९९४ साली आयशर कंपनीने ह्यावर ताबा मिळवला आणि खर्या अर्थाने एका नवीन वळणावर बुलेट ने प्रवास सुरु केला. पुन्हा एकदा भारतीयांच्या आणि आता जगाच्या मानावार अधिराज्य गाजवायला सुरवात केली आहे.
हर्ले डेविडसन ची भारतातील कमीत कमी किंमत २ लाख रुपये आहे. तर रॉयल एन्फिल्ड ची सगळ्यात जास्त किंमत २ लाख रुपये आहे. किमतीतला हाच फरक रॉयल एन्फिल्ड ला प्रचंड वेगाने वर घेऊन जातो आहे. भारतीय नेहमीच जुगाड किंवा फ्रुगल इंजिनियरिंग साठी प्रसिद्ध राहिले आहेत मार्स मिशन तर त्याच एक अप्रतिम उदाहरण आहे. रॉयल एन्फिल्ड येत्या काही काळात अमेरिका , युरोप मद्धे आपली पायामुळ रोवत आहे. येत्या काही काळात तोच दमदार धक धक चा आवाज अमेरिकन रस्त्यावर आला तर भारतीयांच्या अटकेपार झेंड्याचे अजून एक उदाहरण इतिहासात लिहिले जाईल.

कायच्या काय ....

कायच्या काय .... विनीत वर्तक
परवा अचानक मळभ दाटून आल आणि पावसाला सुरवात पण झाली. मार्च महिन्यात पाउस अस कोणी म्हंटल असत तर माझ उत्तर हेच असत कायच्या काय. येड बीड लागल आहे का आत्ता आणि पाउस?? घरी फोन वरून झालेल संभाषण संपते न संपते तोच इकडेही आभाळाने आपले रंग बदलेले होते आणि काही वेळात जलधारांनी पाण्याकडे धाव घेतली.
समुद्र इतका सुंदर वाटत होता कि बस हेच काय ते आयुष्य अस उत्तर मिळाव. अगदी क्षितिजाच्या टोकाच्या पलीकडे दिसेल इतक मोकळ आकाश आणि वातावरण त्यात काळ्या मेघांनी केलेली धावपळ आणि शांत समुद्र. आज उलट दिसत होत. निळ्या रंगाची जागा पाण्याने घेतली होती तर जमिनीचा काळा रंग आकाशाने. मंद वारा वाहत होता आणि नकळत मंगेश पाडगावकरांच्या ओळीनी मनाचा ताबा घेतला.
शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातूनी
चंद्र आहे स्वप्न वाहे धुंद या गाण्यातूनी
आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा
तू अशी जवळी रहा ॥ १ ॥
मी कशी शब्दांत सांगू भावना माझ्या तुला?
तू तुझ्या समजून घे रे लाजणाऱ्या या फुला
अंतरीचा गंध माझा आज तू पवन वाहा
तू असा जवळी रहा ॥ २ ॥
काश इथे मस्त पेकी एखादि अशी स्वताची बोट घेऊन मस्त पेकी डेकवर निसर्गाच्या त्या अप्रतिम रुपात स्वताला विरघळून टाकाव असच मनात चालू होत. हनिमून साठी सगळ्यात चांगल डेस्टीनेशन कोणत असावं, तर माझ्या मते ह्या निळ्या समुद्रात निरव शांततेत दोघांनी स्वताला विसरून जाव हेच ते एक अदभूत ठिकाण. जागा कोणतीही असो पण त्या निळ्या समुद्रात त्या शांततेत स्वताला विसरण्यासाठी काही कराव लागत नाही. जस
"Love isn't planned or projected. True love just happens to us when we are not even looking or searching. That's what makes it so undefined"
ह्या धुंदीत हरवताना रिग च्या आवाजाने पुन्हा जमिनीवर आलो. मित्राशी मनात झालेल्या विचारांचं तांडव शेअर केल तर त्याच्या चेहऱ्यावर तेच भाव होते जे मी मगाशी घरी बोलताना होते. कायच्या काय . काहीही बोलतोस...

Change इज एवरीथिंग...

Change इज एवरीथिंग..... विनीत वर्तक
आयुष्यात काहीतरी नवीन करावे असे वाटणे स्वाभाविक आहे पण नवीन साठी आधी आपल्या बेसिक गोष्टींची तरी पूर्तता व्हायला हवी. आपल सर्व आयुष्य बेसिक गोष्टी मिळवण्यात आणि त्या मिळवण्यासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडण्यात जाते नाही का? कार लोन, होम लोन, आणि लिस्ट गो ऑन.
वयात येताना आई वडिलांची बेसिक शिक्षण देण्यासाठी चाललेली धावपळ ते अगदी नोकरीला लागून मुलांच्या शिक्षणासाठी चाललेली धावपळ ह्यात ५० वर्षांचा कालावधी जातो पण आपण बेसिक गोष्टींमध्ये अडकून असे पडतो कि श्वास घ्यायला उसंत नसते. आयुष्य म्हणजे काय? आयुष्य कसे जगावे ह्याचे वाचन करत आयुष्य आपल्या हातून कधी निसटून जाते कळत नाही. नक्की काय हवे आहे? काय करतो आहोत ? कुठे जाणार आहोत ? कुठे येऊन पोहचलो आहोत सगळ्याच गोष्टी सापेक्ष. त्याची नक्की उत्तर कधीच मिळत नाहीत आणि मिळाली तर ती स्वीकारून बदल करण्याची आपली क्रयशक्तीच संपलेली असते.
अमेरिकेत असताना आपल्या आणि त्यांच्या जगण्यातील मुलभूत फरक मला जाणवला तो हाच. बेसिक गोष्टींच्या पलीकडे हि आयुष्य आहे ते जगण्यासाठी आपले प्रयत्न हवेत. अस अजिबात नाही कि तिकडे सगळ आरामात मिळते पण मोठे होताना अस सांगितल जाते.
' Stop waiting for things to happen, Go out and make them happen'
आणि आपल्याकडे सांगितल जाते
' Wait for things to happen, let them happen then you Go'
ह्या दोन वाक्यानमधला फरक जितका प्रचंड आहे तितकाच मानसिकतेमधला फरक प्रचंड आहे. आपल्या आवडी निवडी काय हे कळेपर्यंत पुलाखालून इतक पाणी वाहून जाते कि आता जे आहे तेच छान आहे इथेच आपली मजल राहते. बर त्या वेळी इतक्या जबाबदार्या असतात कि परत सुरवात करणे सगळ्यांना जमतेच असे नाही. शिवाय योग्य वेळेची वाट बघण्याची सवय असतेच आपल्याला त्यामुळे ती कधी येतच नाही. चाकोरी बाहेर जाऊन काही करावे तर सगळे मुद्दे बेसिक गोष्टीन वर येऊन थांबतात आणि मग आपणच सांगत सुटतो आयुष्य गेल फक्त एक फ्ल्याट घेण्यात.
कुठेतरी सगळाच गोंधळ आहे. काही महिन्यांपूर्वी कोकणात गेलो होतो तिकडे एक जर्मन कपल सायकल घेऊन येत मुंबई -गोंवा व्हाया कोकण सायकल वरून फिरते का तर आयुष्य जगायची, बघायची एक वेगळी इच्छा. मनात विचार आला आपण कधी करू शकू का असे ? फिजिकल आणि मेंटल स्ट्रेन्थ भरपूर आहे पण गोष्टी बदलण्याची धमक माझ्यात आहे? ह्या प्रश्नाच उत्तर शोधतो आहे.
'If you spend too much time thinking about a thing, You will never get it done"
Bruce Lee
ब्रूस ली ने म्हंटल्याप्रमाणे होऊ नये इतकीच इच्छा....... 

प्रवास आणि नाती ..

प्रवास आणि नाती ... विनीत वर्तक
प्रवासातील ओळख कशी नवीन असते. कोण कोणाची ओळख नसताना आपले कधी होऊन जाते समजत हि नाही. नात्यांचे हि असे नाही का ? अनोळखी वाटणार माणूस कधी आपल्यात मिसळून जाते कळत नाही. ओढ , आपुलकी , आर्तता सगळ्याच बाजूने आपण जवळ येतो आणि एका सुंदर स्वनांचा प्रवास सुरु होतो.
काटेरी रस्त्यावरून गाडी हायवेवर आली कि कशी वेग पकडते तसच आपल नात नाही का वेगात किती अंतर गेल ह्याच अंदाजच येत नाही. ह्या वेगाच्या शर्यतीत आपण फक्त पुढे बघतो. बाजूने काय निघून जाते ह्याचा अंदाज आपल्याला येत नाही आणि मागे बघायला काही सोयच नसते कारण येणारा पुढे आपली वाट बघत असतो.
गाडी त्या हायवेवर कधी मार्गिका बदलते ते कळतच नाही. अचानक असा सुसाट झालेला प्रवास एका अवघड वळणापाशी येतो. नात्याचं हि तसच नाही का चांगल म्हणत चाललेली गाडी एखाद्या प्रसंगात अशी काही वेळ येते कि काय करायच सुचत नाही. अश्याच वेळी खरे कौशल्य ते गाडी हळू करायचे आणि योग्य त्या वेगात पुढे जायचे.
ड्रायवर चे जसे हे कसब तसच त्याला साथ देणाऱ्या क्लीनरचे हि. तो किंवा ती जोडीदारा शिवाय प्रवास सुरूच होऊ शकत नाही तसा संपू हि शकत नाही. केलेल्या प्रवासातील आठवणी ह्या पण त्याच्या बरोबर शेअर केलेल्या वेळेचे गणित असते न. अश्या वळणावरती साथ द्यायची का सोडायची हा ज्याचा त्याचा निर्णय ज्याने त्याने घ्यायचा असतो नाही का?
गाडी खूप जोरात नेली म्हणजे जिंकल अस होत नाही. टायर फुटतो अतिवेगाने नियंत्रण जाते त्याला हि कारण तेच. आपल्याला झेपते तितकच जोरात जाव. मर्सिडीज आणि मारुती ची तुलना नाही होत तसी नात्यांची कशी होणार. मारुती असली म्हणजे खराब आणि मर्सिडीज चांगली अस नसतेच. मारुती चे नखरे कमी तर मर्सिडीज चे जास्ती. दोन्ही आपापल्यापरीने चांगल्याच कसब हे आपण कसे चालवतो त्याचच.
नात्यांची गणित हि ह्या प्रवासा सारखीच असतात. एकदा हायवे संपला कि आपला वेग कमी होतो मग अश्या वेळेस आपले गियर पण आपण बदलायला हवेत. गाडी चे गियर बदलले नाहीत तर अपघात होणार. नाहीतर गाडी बंद पडणार मधेच नात्याचं हि तेच कि. गियर बदलणे हीच तर मोठी कला. ते जर जमले तर अर्धा प्रवास झालाच.
कधी अशी वेळ येते कि आपली चुकी नसताना सगळच संपते. तो प्रवास नकोसा वाटू लागतो तो जोडीदार नकोसा वाटू लागतो. रस्ते बदलावेसे वाट्तात. नवीन जोडीदार , नवीन रस्ते सगळा खुणावत असतात. नवीन क्षितीजांची चाहूल असते पण म्हणून कोणी झालेल्या प्रवासाला वाईट म्हणत बसत नाही. तो संपला आणि हा सुरु झाला बस.
नात्यात अस करतो का आपला अर्धा वेळ तर हे अस झालच कस ह्यात जातो बर मी हा प्रवास सुरु केलाच का ह्याच मंथन. ज्या प्रश्नांना उत्तर नाहीत तेच आपण शोधात बसतो आणि ह्यात बाकीचा पेपर राहून जातो. समोर आलेले प्रश्न न सोडवताच आपण प्रवास करतो. न त्या रस्त्याच समाधान न ह्या रस्त्याच समाधान. कोठून आलो . कुठे जायचं आहे सगळच प्रश्नार्थक.
इतक कठीण आहे सगळ? झालेल्या प्रवासाची ओढ , आनंद , अनुभव गाठीशी बांधून पुढे जाउच शकतो कि पण इतका विचार करतो आपण कि करून सुद्धा आपल्याला नको असते ते सगळ. प्रश्न आपलेच उत्तरही आपलीच मग झालेला प्रवास का नको. कदाचित तोच एका नव्या क्षितिजाची सुरवात असेल... ओशो सांगतात तस...
Rather than clinging to each other in anger, in frustration, in rage, and being violent to each other and destructive, it is better to depart with grace.
One should know how to fall in love and one should also know how to fall out of it gracefully...

सवांद ते विसंवाद ...

सवांद ते विसंवाद ... विनीत वर्तक
फेसबुक ने माझ्यातील काही गुणांचा शोध मलाच लावून दिला आणि नकळत का होईना त्याची सवय लागली हे मान्यच कराव लागेल. प्रत्येक गोष्टीच्या अनेक पातळ्या असतात सुरवात मग उच्चतम पातळी आणि मग हळू हळू पुन्हा शेवट. शेवट येईलच असे सांगता येत नाही ती एक सुरवात हि असू शकते पण ह्या गोष्टी घडतात ह्याच क्रमाने बहुतेकवेळी.
आता फेसबुक ची जागा व्हात्स अप ने घेतली आहे.उद्या अजून कोणी ती जागा घेईल माणसा माणसामधील सवांदाची जागा एक एक नवीन माध्यम घेते आहे. त्याची खोली किती असावी हे मात्र आपण ठरवायला हवे. आजच एक पोस्ट वाचली. घरातील कोणी तरी गेल्याची बातमी म्हणजे अगदी सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणजे एखाद्या बायकोने नवरा गेल्याची बातमी टाकावी आणि नवर्याने बायको गेल्याची ती हि अवघ्या एका तासात.
हे कुठे तरी सुन्न करणारे आहे. फेसबुक हे जरी माध्यम असले तरी माणूस इतक्या तीव्र वैचारिक वादळाच्या आणि मानसिक स्तिथी योग्य नसताना फेसबुक चा विचार करू शकतो हेच खूप मला विचित्र वाटल. अश्या दुखद घटनेची माहिती सर्वांपर्यंत पोचावी हा एक हेतू जरी त्या मागे असला तरी त्या जवळच्या व्यक्तीने कोम्पूटर चालू करून स्टेटस अपडेट करून त्यावर सहानभूती व्यक्त करावी हे कुठेतरी सवांद नाही तर विसावंदाच लक्षण आहे.
आपण आत्ता काय करतो? कोणा बरोबर आहोत? आज जेवायला काय केल ? ते घरातील पाळीव प्राणी काय करतात म्हणजे कुत्रा , मांजर ? सर्वच एका क्षणाला योग्य वाटल तरी ते खरच सवांदाच माध्यम आहे का हा विचार मी आणि सर्वानीच करायला हवा. फेसबुक , व्हात्स अप किंवा अजून काही जरी आपल्या जीवनाचा मुलभूत अंग बनले असले तरी ते आपल्या मुलभूत रचनेलाच आतून पोखरत आहेत.
आज वाचलेल्या पोस्ट ने लागलेल्या वाळवीची चाहूल दिली आहे. आता योग्य तो फवारा करावाच लागणार आहे. पण प्रत्येकाने तडा जाण्याआधीच औषध केल तर सवांदाच हे सुंदर माध्यम अजून सुंदर होईल ह्यात शंकाच नाही.
"Never do something permanently foolish just because you are temporarily upset"