Tuesday 2 November 2021

ओसोवोग... विनीत वर्तक ©

 ओसोवोग... विनीत वर्तक ©

ओसोवोग (OSOWOG) One Sun, One World, One Grid या भारताने मांडलेल्या भूमिकेवर युनायटेड नेशन च्या क्लायमेट कॉन्फरन्स मधे इंग्लंड ने भारतासोबत येण्याचं मान्य करून आंतरराष्ट्रीय ग्रिड मधला आपला सहभाग निश्चित केला. मुळातच ओसोवोग (OSOWOG) हा काय प्रकार आहे? त्यात भारताची भूमिका आणि एकूणच या प्रयत्नांमुळे भारताच्या प्रतिमेत आंतरराष्ट्रीय स्तरावर काय फरक पडणार आहे हे लक्षात आपण घ्यायला हवं. 

पृथ्वीच्या कोणत्याही भागावर कोणत्याही क्षणी सूर्य हा तळपत असतो. एकीकडे सूर्यास्त होतो त्याचवेळी दुसरीकडे सूर्योदय झालेला असतो. सूर्य हा हिट च्या रूपात पृथ्वीवर सतत ऊर्जेचा पुरवठा करत असतो. जर ही ऊर्जा आपण सोलर पॅनल वापरून इलेक्ट्रिसिटी मधे रूपांतरित केली तर आपला ऊर्जेचा प्रश्न सुटेल.  आता हे सगळं आपण शाळेत शिकलो असलो तरी भारताने २०१८ साली International Solar Alliance (ISA) च्या मिटिंग मधे एक वेगळाच प्रस्ताव ठेवला. तो प्रस्ताव म्हणजेच ओसोवोग (OSOWOG). 

ओसोवोग (OSOWOG) म्हणजे जर आपल्याला हे माहित आहे की सूर्य नेहमीच कुठेतरी जगाच्या पाठीवर तळपत असतो तर त्या अक्षयपात्र ऊर्जेचा संपूर्ण जगाने एकत्र येऊन वापर करावा. जर संपूर्ण जगाने एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय ग्रीड ची स्थापना केली तर सर्व जगाला नेहमीच ऊर्जेचा पुरवठा हा अखंडितपणे सुरु राहील. उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा भारतात सूर्य तळपत असेल तेव्हा भारतात तयार झालेली वीज ही अमेरिकेला दिली जाईल आणि जेव्हा भारतात अंधार असेल तेव्हा अमेरिकेत तयार होणारी वीज भारताला दिली जाईल. जर सोलर पॅनल च असं आंतरराष्ट्रीय जाळ आपण निर्माण केलं तर सर्व जगाला आपण क्लीन ऊर्जेचा पुरवठा करू शकू. 

जेव्हा सर्व जग संपत जाणाऱ्या इंधन साठ्यांमुळे हैराण झालेलं आहे. इंधन प्रदूषणाचे दुष्परिणाम आता स्पष्टपणे दिसून येत आहेत. निसर्गाची घडी विसकटली आहे. त्यावेळी अश्या प्रकारची कल्पना मांडणे हाच एक मैलाचा दगड होता असं म्हंटल तर चुकीचं ठरणार नाही. जेव्हा छोट्या छोट्या गोष्टींवरून देशादेशात वाद होतात. तेव्हा संपत चाललेले इंधन साठे, प्रदूषण या सर्वांवर मात करायची असेल तर सर्व देशांनी एकत्र येण्याची गरज आहे अशी स्पष्ट भूमिका भारताने या निमित्ताने मांडली होती. २०१९ आणि २०२० साली कोरोना च्या प्रकोपात जगाला कधी नव्हे ते एकत्र येण्याची गरज दिसून आली. भारताने २०१८ सालीच क्लीन ऊर्जेच्या निमित्ताने मांडलेली भूमिका किती दूरदर्शी आणि शाश्वत आहे याची सुद्धा जाणीव जगाला झाली. 

ओसोवोग (OSOWOG) च्या पहिल्या टप्यात भारताची ग्रीड ही आखाती राष्ट्र आणि साऊथ ईस्ट एशिया देशांशी जोडली जाईल. दुसऱ्या टप्यात हाच विस्तार युरोप ते आफ्रिका पर्यंत नेला जाईल. तर तिसऱ्या टप्यात हा विस्तार संपूर्ण जगात नेला जाईल. ही योजना पूर्णपणे सुरु झाल्यावर संपूर्ण जगात शाश्वत ऊर्जेचा पुरवठा सुरु राहील. भारताने मांडलेली आणि भारताने जगाला दखल घ्यायला लावलेली योजना यामुळे जागतिक मंचावर निश्चितपणे भारताचं स्थान आणि प्रतिमा मजबूत झाली आहे यात शंका नाही. 

जय हिंद !!!

फोटो शोध सौजन्यः- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 

23 comments:

  1. Faarach chaan oopakram aahe. Sampoorn Vishwaalaa tyachaa faaydaa hoil. Vasudhaiv Kootoombakam - her Bhartiyanchi ( Hindu n chi) sankalpanaa pratyakshaat yewoo shkate. Jay Shri Ram

    ReplyDelete
  2. Nice.If implemented it will be superb

    ReplyDelete
  3. Fabulous idea of using solar power by sharing worldwide network. That would begormifable step ahead once implemented for mankind's survival.

    ReplyDelete

  4. क्षितीज विचारांचं अनुभवांचं ...

    Tuesday, 2 November 2021
    ओसोवोग... विनीत वर्तक ©

    ओसोवोग... विनीत वर्तक ©

    ओसोवोग (OSOWOG) One Sun, One World, One Grid या भारताने मांडलेल्या भूमिकेवर युनायटेड नेशन च्या क्लायमेट कॉन्फरन्स मधे इंग्लंड ने भारतासोबत येण्याचं मान्य करून आंतरराष्ट्रीय ग्रिड मधला आपला सहभाग निश्चित केला. मुळातच ओसोवोग (OSOWOG) हा काय प्रकार आहे? त्यात भारताची भूमिका आणि एकूणच या प्रयत्नांमुळे भारताच्या प्रतिमेत आंतरराष्ट्रीय स्तरावर काय फरक पडणार आहे हे लक्षात आपण घ्यायला हवं.

    पृथ्वीच्या कोणत्याही भागावर कोणत्याही क्षणी सूर्य हा तळपत असतो. एकीकडे सूर्यास्त होतो त्याचवेळी दुसरीकडे सूर्योदय झालेला असतो. सूर्य हा हिट च्या रूपात पृथ्वीवर सतत ऊर्जेचा पुरवठा करत असतो. जर ही ऊर्जा आपण सोलर पॅनल वापरून इलेक्ट्रिसिटी मधे रूपांतरित केली तर आपला ऊर्जेचा प्रश्न सुटेल. आता हे सगळं आपण शाळेत शिकलो असलो तरी भारताने २०१८ साली International Solar Alliance (ISA) च्या मिटिंग मधे एक वेगळाच प्रस्ताव ठेवला. तो प्रस्ताव म्हणजेच ओसोवोग (OSOWOG).

    ओसोवोग (OSOWOG) म्हणजे जर आपल्याला हे माहित आहे की सूर्य नेहमीच कुठेतरी जगाच्या पाठीवर तळपत असतो तर त्या अक्षयपात्र ऊर्जेचा संपूर्ण जगाने एकत्र येऊन वापर करावा. जर संपूर्ण जगाने एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय ग्रीड ची स्थापना केली तर सर्व जगाला नेहमीच ऊर्जेचा पुरवठा हा अखंडितपणे सुरु राहील. उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा भारतात सूर्य तळपत असेल तेव्हा भारतात तयार झालेली वीज ही अमेरिकेला दिली जाईल आणि जेव्हा भारतात अंधार असेल तेव्हा अमेरिकेत तयार होणारी वीज भारताला दिली जाईल. जर सोलर पॅनल च असं आंतरराष्ट्रीय जाळ आपण निर्माण केलं तर सर्व जगाला आपण क्लीन ऊर्जेचा पुरवठा करू शकू.

    जेव्हा सर्व जग संपत जाणाऱ्या इंधन साठ्यांमुळे हैराण झालेलं आहे. इंधन प्रदूषणाचे दुष्परिणाम आता स्पष्टपणे दिसून येत आहेत. निसर्गाची घडी विसकटली आहे. त्यावेळी अश्या प्रकारची कल्पना मांडणे हाच एक मैलाचा दगड होता असं म्हंटल तर चुकीचं ठरणार नाही. जेव्हा छोट्या छोट्या गोष्टींवरून देशादेशात वाद होतात. तेव्हा संपत चाललेले इंधन साठे, प्रदूषण या सर्वांवर मात करायची असेल तर सर्व देशांनी एकत्र येण्याची गरज आहे अशी स्पष्ट भूमिका भारताने या निमित्ताने मांडली होती. २०१९ आणि २०२० साली कोरोना च्या प्रकोपात जगाला कधी नव्हे ते एकत्र येण्याची गरज दिसून आली. भारताने २०१८ सालीच क्लीन ऊर्जेच्या निमित्ताने मांडलेली भूमिका किती दूरदर्शी आणि शाश्वत आहे याची सुद्धा जाणीव जगाला झाली.

    ओसोवोग (OSOWOG) च्या पहिल्या टप्यात भारताची ग्रीड ही आखाती राष्ट्र आणि साऊथ ईस्ट एशिया देशांशी जोडली जाईल. दुसऱ्या टप्यात हाच विस्तार युरोप ते आफ्रिका पर्यंत नेला जाईल. तर तिसऱ्या टप्यात हा विस्तार संपूर्ण जगात नेला जाईल. ही योजना पूर्णपणे सुरु झाल्यावर संपूर्ण जगात शाश्वत ऊर्जेचा पुरवठा सुरु राहील. भारताने मांडलेली आणि भारताने जगाला दखल घ्यायला लावलेली योजना यामुळे जागतिक मंचावर निश्चितपणे भारताचं स्थान आणि प्रतिमा मजबूत झाली आहे यात शंका नाही.

    जय हिंद !!!

    फोटो शोध सौजन्यः- गुगल

    सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

    vartakvinit at 19:59
    Share
    4 comments:

    mukund3 November 2021 at 04:05

    Faarach chaan oopakram aahe. Sampoorn Vishwaalaa tyachaa faaydaa hoil. Vasudhaiv Kootoombakam - her Bhartiyanchi ( Hindu n chi) sankalpanaa pratyakshaat yewoo shkate. Jay Shri Ram
    Reply

    Unknown3 November 2021 at 07:05

    Nice.If implemented it will be superb
    Reply
    gaja vartak3 November 2021 at 07:35

    Fabulous idea of using solar power by sharing worldwide network. That would be formidable step ahead once implemented for mankind's survival.
    ReplyDelete

    Home
    View web version
    About Me
    My photo

    vartakvinit

    View my complete profile
    Powered by Blogger.

    ReplyDelete
  5. It's a very good idea but will need big money to implement it. How the underdeveloped countries will be able to contribute towards it.Such ideas can come only from India who advocates for सर्वेऽत्र सुखिनः संतु सर्वे संतु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यंतु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् ।

    ReplyDelete
  6. हया विश्वाला देण्यासरख माझ्या देशाकडे भरपुर काही आहे केवळ संपुर्ण जगाने हिदुंच्या धर्म ग्रंथ, वेद,गीता याचा अभ्यास करण्याची आवश्क्ता आहे. विश्वाचे कल्याण फक्त भारत देश च करु शकतो.

    ReplyDelete
  7. संदेश दांडेकर

    ReplyDelete
  8. सुंदर कल्पना व उपक्रम 🙏👍

    ReplyDelete
  9. छान माहिती मिळाली.

    ReplyDelete
  10. हिरण्यगर्भाय नमः

    ReplyDelete
  11. ह्या सुंदर कल्पनेमुळे संपूर्ण जग सतत प्रकाशमान राहील आणि अशा नवनवीन कल्पना भारतच सुचित करु शकतो.धन्य तो भारत, मेरा भारत महान . भारत देशाचा आम्हाला अभिमान आहे.

    ReplyDelete
  12. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  13. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  14. मेरा भारत महान

    ReplyDelete
  15. वैश्विक पातळीवर विचार केला तर Solar power ही 24 X 7 अशी मिळणारी ऊर्जा आहे. "आपल्यापुरता वापर‌" अशी संकुचित मनोवृत्ती न ठेवता विचार केल्यास संपूर्ण विश्वाला त्याचा फायदा होईल. कोणाला वंचित करून किंवा कोणाच्या वाटेचे हिसकावून घेण्याचा प्रश्नच येत नसल्याने "वसुधैव कुटुंबकम" खऱ्याअर्थाने साध्य होईल.

    ReplyDelete
  16. अगदी यथार्थ योग्य व दूर दृष्टी चा विचार आणि योजना आहे

    ReplyDelete
  17. विश्वची माझे घर या उक्तीप्रमाणे भारताचे हे पाऊल खरच वंदनीय आहे.

    ReplyDelete
  18. दिवसेंदिवस natural resources संपत आहेत.
    Pollution वाढत ahe👆त्यामुळे osowog हे शास्वत ऊर्जास्रोत दूरदृष्टीचा विचार करता आवश्यक आहे.

    ReplyDelete
  19. Nice Idea,must Implement by All Countries.Solar Energy has no limit.It is abundant source to end Electric Power Supply problem.

    ReplyDelete
  20. It is certainly a unique concept & if possible for implementation, it will be are volition for ever. The solar electricity generated all over the world will have to be connected to a global grid. The transmission losses will have to be estimated. The distribution logic will have to be worked out. If we consider Bharat Desh for this concept, we have problems, misunderstandings in working with the national grid. In the new horizon, the world power consumption will need to be controlled/ co ordinated by a Vaishvik shakti. This certainly will be a herculean task.

    ReplyDelete