गेट रेडी फॉर अनादर फायर... विनीत वर्तक ©
येत्या २३ सप्टेंबर पासून पुढल्या २४ तासापेक्षा अधिक काळ भारताने नोटॅम म्हणजेच 'नोटीस टू एअरमॅन' प्रसिद्ध केल्यावर सर्व जगाचं लक्ष आता या तारखांकडे लागलं आहे. कारण भारताने प्रसिद्ध केलेला नोटॅम हा ३००० किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर जाणारा आहे. साहजिक बंगालचा उपसागर ते हिंद महासागर हा संपूर्ण पट्टा एकप्रकारे या काळासाठी नो फ्लाय झोन राहणार आहे. भारत नक्की काय करणार? कोणत्या क्षेपणास्त्राची चाचणी घेणार? असे अनेक प्रश्न विचारण्यात येत असताना या दिवशी भारत काय करणार हे भारतानेच स्पष्ट केलं आहे.
येत्या २३ सप्टेंबर २०२१ नंतर भारत कधीही आपल्या भात्यातील अग्नी ५ या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची वापर करण्यासाठी चाचणी करणार असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे. अग्नी ५ या क्षेपणास्त्राच्या आत्तापर्यंत ७ वेळा उत्पादन करण्या आधीच्या चाचण्या झाल्या आहेत. २०१८ मधे शेवटची चाचणी झाल्यानंतर हे क्षेपणास्त्र २०२० पर्यंत भारताच्या सैन्य दलात कार्यरत होणे अपेक्षित होते. पण कोरोनामुळे त्याला उशीर झाला. आता होणाऱ्या चाचणी नंतर अग्नी ५ हे उत्पादन करण्याचा मार्ग मोकळा होईल. या वेळेस भारत आपल्याकडे असलेल्या एका तंत्रज्ञानाची ओळख जगाला करून देणार आहे. या तंत्रज्ञानाचं नावं आहे multiple independently targetable reentry vehicle (MIRV) एम.आय.आर.व्ही. या तंत्रज्ञानाची भारताने आधीच गुप्तपणे २०१३ साली इसरो च्या साह्याने चाचणी घेतली असल्याचं बोललं जाते. पण आता भारत हे तत्रंज्ञान आपल्या क्षेपणास्त्रात उघडपणे जगाला दाखवणार असल्याचं बोललं जात आहे.
अग्नी ५ हे भारताचं आत्तापर्यंतचे सगळ्यात शक्तिशाली आणि सगळ्यात दूरवर जाणारे क्षेपणास्त्र आहे. अग्नी ५ चा पल्ला हा ५००० किलोमीटर असल्याचं भारताने जागतिक पातळीवर स्पष्ट केलेलं आहे. पण हा पल्ला ८००० किलोमीटर पर्यंत असल्याचा अनेक संरक्षण क्षेत्रांशी संबंधित संस्थांचा आणि लोकांचा दावा आहे. भारत जाणून बुजून हा पल्ला कमी भासवत असल्याचं अनेकांच म्हणणं आहे. अग्नी ५ हे आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. बॅलेस्टिक म्हणजे काय तर हे क्षेपणास्त्र गुरुत्वाकर्षणाचा वापर आपल्या प्रवासात करते. बॅलेस्टिक हा ग्रीक शब्द आहे जो एखाद्या वस्तूच्या प्रोजेक्टाईल शी संबंधित आहे. हे क्षेपणास्त्र प्रक्षेपित केल्यानंतर हवेत खूप उंचावर जाते आणि पुन्हा खालच्या दिशेने प्रवास करते. खाली येताना गुरुत्वाकर्षणामुळे त्याचा वेग प्रचंड वाढतो. अग्नी ५ जेव्हा लक्ष्याच्या जवळ पोहचते तेव्हा त्याने मॅक २४ म्हणजेच २९,४०० किलोमीटर/ तास इतका प्रचंड वेग गाठलेला असतो. त्यामुळे याच्या पासून टर्मिनल फेज मधे याच्यापासून स्वतःला वाचवणं अशक्य आहे.
अग्नी ५ जवळपास १५०० किलोग्रॅम वजनाची न्यूक्लिअर वॉरहेड नेऊ शकते. ५००० किलोमीटर अंतरावर असलेल्या लक्ष्याला ८० मीटरपेक्षा कमी क्षेत्रात अचूकतेने वेध घेऊ शकते. भारताने यात (MIRV) एम.आय.आर.व्ही. हे तंत्रज्ञान बसवलेलं आहे. एम.आय.आर.व्ही. म्हणजे नक्की काय? तर याच नाव सांगते त्या प्रमाणे हे एकाचवेळी अनेक लक्ष्यांचा भेद करणे. एकाच अग्नी ५ मधून आपण जवळपास २ ते १० वेगवेगळ्या लक्ष्यांवर आण्विक हल्ला करू शकू. अग्नी ५ प्रक्षेपित केल्यावर त्याने अपेक्षित उंची गाठली की त्यातून २-१० वेगवेगळ्या लक्ष्यांवर जाणारी रॉकेट वेगळी होतील. ती रॉकेट्स त्यांना दिलेल्या लक्ष्याचा भेद करतील. ही सगळी रॉकेट आपापल्या लक्ष्यावर जाण्यास स्वतः सक्षम असतील. याचा अर्थ अग्नी ५ एकाचवेळेस १० वेगवेगळ्या ठिकाणी आण्विक हल्ला करण्यास सक्षम असेल. असं तंत्रज्ञान असणारा भारत काही मोजक्या देशांपैकी एक आहे.
भारताने २८ जून ला अग्नी प्राईम या नवीन पद्धतीच्या क्षेपणास्त्र चाचणीत भारताने एम.आय.आर.व्ही. हे तंत्रज्ञान वापरून एकाचवेळी दोन लक्ष्यांचा यशस्वीरीत्या लक्ष्यभेद केला होता. अग्नी ५ मधे अश्या पद्धतीचं तंत्रज्ञान वापरल्यामुळे भारताच्या आंतरखंडीय आण्विक क्षमतेत खूप वाढ होणार आहे. अग्नी ५ हे १७ मीटर लांब २ मीटर व्यास आणि ५० टन वजन असलेलं ३ स्टेज असलेलं क्षेपणास्त्र असून त्याच्या कॅनिस्टर डिझाईनमुळे ट्रक वरून भारताच्या कोणत्याही कोपऱ्यातून डागता येऊ शकते.
येत्या २३ आणि २४ सप्टेंबर ला 'गेट रेडी फॉर अनादर फायर' जे भारताला संरक्षण सिद्धतेत पुन्हा एकदा आत्मनिर्भर करणार आहे. डी.आर. डी.ओ. च्या वैज्ञानिकांना खूप साऱ्या शुभेच्छा...
जय हिंद!!!
फोटो स्त्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
Jai Hind
ReplyDeleteHave a warm regards to INDIAN MILITARY ! Keep it up !
ReplyDeleteProud of India scientists
ReplyDeleteProud of scientists of DRDO.
ReplyDeleteवाह!!!! उत्तम लेख
ReplyDeleteजन मन गण अधिनायक जन हे भारत भाग्य विधाता !
ReplyDeleteProud of the indian scientists and drdo
ReplyDeleteJai Bharat Mata ki. congratulations great scientists, Engineers and those involved in this project.
ReplyDeleteभारत माता की जय,या प्रोजेक्ट मध्ये असलेल्या सर्व सदस्यांना मनाचा मुजरा, आणि अभिनंदन, आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे
ReplyDeleteसही में ' मेरा भारत महान ' जय हिंद
ReplyDeletesmonline2312@gmail.com
ReplyDeleteजय भारत , जयहिंदुस्थान.
ReplyDeleteJay hind
ReplyDeleteसारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा 🙏🏻
ReplyDeleteHume garv hai bhartiya hone pe.salute to our all respective scientists and soilders.jay Hind.
ReplyDeleteही काळाची गरज आहे. मध्यंतरी आपण लष्करी दृष्ट्या खूप मागे पडलो होतो. या प्रकल्पात सहभागी असलेले शास्त्रज्ञ तसेच इतर संबंधितांचे अभिनंदन आणि पुढील कार्यक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा. जय हिंद
ReplyDeleteही काळाची गरज आहे. मध्यंतरीच्या काळात लष्करी दृष्ट्या आपण खूप मागे पडलो होतो. या संकल्पनेत शास्त्रज्ञ तसेच इतर संबंधितांचे अभिनंदन आणि पुढील कार्यक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा.
ReplyDeleteCongratulations
ReplyDeleteProud to be Indian
Jai Hind
जय हिंद....INDIA IS GREAT
ReplyDeleteCongratulations to the team of ISRO, DRDO, Indian Army & All those involved in bringing the AGNI 5 ��
ReplyDeleteA warning to all those who are targeting Bharat ����
Shakti shali bharat
ReplyDeleteVande Mataram. Hearty congratulations to DRDO staff. We are proud of them.
ReplyDeleteसारे जहाँसे अच्छा हिंदुसता हमारा !
ReplyDeleteजय हिंद!
Proud feeling. Congratulations to team DRDO, ISRO.
ReplyDeleteJay Hind, Bharat Mata ki Jai.
मोदी है तो मूमकीन है..
ReplyDeleteGreat Thanks all of you and congratulations to improve Hindustan
ReplyDeleteWhat is the source of information. Authenticity of the information depends on the soy
ReplyDeleteSource of information is Internet. You can search for all above information. There are many links explaining and validating what i have pen down.
DeleteAuthenticity of the source of information is required
ReplyDeleteबल सागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो!
ReplyDeleteअपनी ताकत दुनिया को दिखाने का और एक अवसर.
ReplyDeleteभारतीय वैज्ञानिकों का अभिनंदन और अभिवादन।
Please sir . Can you translate in English or Hindi
ReplyDeleteSare Jahan se achha Hindosta humara
ReplyDeleteJai Hind
जय हिंद
ReplyDeleteJai Hind. Let's make India the strong country.
ReplyDeleteDelighted to read this news, congratulations to all the concerned scientists.
ReplyDeleteजय अखंड हिंदुस्थान,भारत माता की जय,बलशाली भारत होवो विश्वात शोधूनी राहो.
ReplyDeleteसहयाद्रीचा सिंह गरज तो ऐसा भारत देश हमारा
ReplyDeleteमेरा भारत महान .... अभिमानाच अत्युच्च पाऊल ....
ReplyDeleteJAY HIND. INDIA IS GREAT.
ReplyDeleteमला अभिमान आहे मी हिंदुस्थानी आहे
ReplyDeleteजय हिंद जय भारत सर्वानचे अभिनंदन आणि शुभेच्छा भारत माताकी जय
ReplyDeleteJai हिंद..proud to indian scientist
ReplyDeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDeleteProud of our scientist jai hind
ReplyDeleteBest of luck, proud of u all who contributed, Jai hind
ReplyDeleteJai hind
ReplyDeleteAryabhatta sahi hai..
ReplyDeleteप्रसन्न.हु
तुमच्या पोस्ट रेग्युलर वाचावयास मिळण्यासाठी काय करावे लागेल,आपले लिखाण सुंदर असते,डॉ दिलीप कदम
ReplyDeleteMazyablog la follow kara athwa facebook wall la
DeleteJay Hind & salut all team'
ReplyDeleteबाप बाप होता हैं हम किसीको कभी कम नही मानते पर इसका मतलब ये कभी नही होता कीं हम पीछे हैं because Hindusthan हैं ye और हम सब इस राष्ट्र का हिस्सा हैं पहले देश फिर हम 🙏🙏जयहिंद 🙏🙏
ReplyDeleteCongratulates to entire team we all are proud of you the same way create some instrument which can avoid outerside attack without human I mean robotic protection on boarder which will our save our soldiers life,,,, the unnecessary attack by some usless human animals so that they will think that ki इन्सान का होना सही था मगर मशीन तो सांस भी लेणे का मौका नही देती तब पता चलेगा उन दरींदो कीं जिंदगी भी कितनी किमती हैं हैं ना
ReplyDeleteHats off to DRDO.
ReplyDeleteThank you all. For so many comments.
ReplyDeleteबलवान हिंदुस्थान ...! आता हिंदुस्थान कडे वाकड्या नजरेने
ReplyDeleteबघण्याची कोणाची हिम्मत होणार नही...!
बलशाली भारत भारत होवो..विश्वात शोभोनी राहो....
जय हो.....!!!
Proud to be indian. जय हिंद. खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. फक्त विनंती एवढीच आहे कि याचे काम 2014 पूर्वीपासून होत आहे, त्यामुळे यांच्या लाँचिंग वेळी, टेस्ट वेळी कुणाचे फोटो किंवा सध्याची जास्तच उगाचच चर्चेत असणारी नावे देवू नयेत. हल्ली दिखाऊपणा फोटो मीडियाबाजी उगाचच चालली आहे, सगळीकडे फोटो फोटो जसे काही 2014पूर्वी काहीच नव्हते असा दिखावा होत आहे तो करु नये.जय हिंद.
ReplyDeleteएक हजार साल लुटा गया भारत दिन पर दिन और जादा बलशाली बन रहा है. कुछ बात जरूर है इस धरती मे.
ReplyDeleteBharat mata ki jai
ReplyDeleteअखंड भारतका सपना पूरा होगा! भारत माताकी जय!!
ReplyDeleteबलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो
ReplyDeleteHappy and proud feeling of being an Indian, congratulations to all the people who made this dream come true
ReplyDeleteJai Hind Proud of my country and scientist
ReplyDeleteWe have proud of ISRO & DRDO
ReplyDeleteDon't waste in trial, make it sure that it will directly go to Islamabad but you have reduce range
ReplyDeleteJay Hind
ReplyDeleteबल सागर भारत होवो
ReplyDeleteJai hind
ReplyDelete🙏
ReplyDelete