Thursday 4 April 2019

पाण्याखाली वार करणारं रोमिओ सी हॉक... विनीत वर्तक ©

पाण्याखाली वार करणारं रोमिओ सी हॉक... विनीत वर्तक ©

अमेरिकेने बहुचर्चित अश्या एम.एच. ६० रोमिओ सी हॉक हेलिकॉप्टर च्या खरेदीसाठी मंजुरी दिली आहे. अमेरिकेकडून अत्याधुनिक असणारी २४ रोमिओ सी हॉक हेलिकॉप्टर भारत २.६ बिलियन अमेरिकन डॉलर च्या मोबदल्यात खरेदी करत आहे. नुकतचं दाखल झालेलं चिनूक हेलिकॉप्टर त्याच्या जोडीला लवकरच दखल होणारं आपाचे हेलिकॉप्टर व आता अमेरिकेकडून रोमिओ सी हॉक हेलिकॉप्टर ला मिळालेल्या हिरव्या कंदिलामुळे भारताच्या संरक्षण सिद्धतेत कमालीची वाढ झालेली आहे. ह्या रोमिओ सी हॉक मध्ये असं काय आहे? की ज्यामुळे भारताच्या नौदलाला एक वेगळीच धार येणार आहे हे बघणं सामान्य माणसाच्या दृष्ट्रीने महत्वाच आहे.

रक्षा विशेतज्ञांच्या मते एम.एच. ६० रोमिओ सी हॉक हेलिकॉप्टर आता जगात नौदलासाठी उपलब्ध असलेल्या सगळ्या हेलिकॉप्टर तंत्रज्ञानामधील सर्वश्रेष्ठ हेलिकॉप्टर आहे.

“Currently deployed with the US Navy as the primary anti-submarine warfare anti-surface weapon system for open ocean and littoral zones, the helicopters are considered the world's most advanced maritime helicopter”

हे हेलिकॉप्टर पाणबुडी विरोधी, लढाऊ जहाजांन विरोधी, समुद्रात लक्ष ठेवण्यासाठी, समुद्रातील संवाद, मदत किंवा युद्ध अश्या सगळ्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये कोणतही लक्ष्य पूर्ण करण्यास समर्थ आहे. ही हेलिकॉप्टर जुन्या झालेल्या ब्रिटीश सी किंग हेलिकॉप्टर ची जागा घेतील. चीन च्या हिंद महासागरातील वाढत्या वर्चस्वाला शह देण्यासाठी भारताच्या नौदलाला अश्या हेलिकॉप्टर ची गरज कित्येक वर्ष भासत होती. ऑगस्ट २०१८ ला संरक्षण मंत्रालयाने २४ रोमिओ सी हॉक हेलिकॉप्टर च्या खरेदी ला मंजुरी दिली. एप्रिल २०१९ ला अमेरिकेच्या संसदेने ही अतिशय प्रगत हेलिकॉप्टर भारताला विकणाच्या कराराला मान्यता दिली.

एम.एच. ६० रोमिओ हेलिकॉप्टर हे ड्युअल कंट्रोल म्हणजे दोन पायलट नी उडवता येणार हेलिकॉप्टर असून ह्याच कॉकपिट काचेने वेढलेलं आहे. ह्याचे डिसप्ले हे रात्रंदिवस कोणत्याही क्षणाला पायलट ला आखून दिलेल्या लक्ष्याची खडानखडा माहिती देण्यात सक्षम आहेत. ह्या साठी ह्या हेलिकॉप्टर चे स्वतःचे कॉम्प्यूटर असून ते कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीसाठी सज्ज आहेत. हे हेलिकॉप्टर आपल्यासोबत पाणबुडी चा लक्ष्यभेद करण्यासाठी एका उड्डाणात तीन ए.टी.के. एम.के. ५० / एम.के. ४६ टॉरपिडो घेऊन जाऊ शकते तसेच ७.६२ मी,मी. ची मशीनगन ही ह्यावर स्वतःचा बचाव करण्यासाठी बसवण्यात आली आहे. ह्यावर ए.एन / ए.पी.एस.- १५३ मल्टीमोड रडार जे ( automatic radar periscope detection and discrimination (ARPDD) capability) ने युक्त असून शत्रूला शोधण्यासाठी बसवलेलं आहे. ह्याची पाती २३ मी.मी. च्या गोळ्या लागल्यावर ही हेलिकॉप्टर ला उडवण्यात सक्षम आहेत.

ह्याची दोन T700-GE-401C turboshaft engines १४२५ किलोव्याट शक्ती निर्माण करतात ज्यामुळे हेलिकॉप्टर ८.३८ मीटर/ सेकंद ह्या वेगाने हवेत उंची गाठू शकते. हवेतून २६७ किमी/ तास ह्या वेगाने जवळपास ८३४ किलोमीटर अंतर कापू शकते. आपल्यासोबत उड्डाण भरताना १० टना पेक्षा जास्ती वजन घेऊन उड्डाण भरू शकते. ह्याची इंधन टाकी इंधनाची गळती झाल्यावर स्वतःच इंधनाची गळती बंद करू शकण्याच्या तंत्रज्ञानाने बनवली गेली आहे.

जगातील प्रगत अश्या हेलिकॉप्टर च्या भारतीय नौदलात येण्याने जवळपास ७००० किलोमीटर पेक्षा भारताच्या सागरी किनाऱ्यांची, अरबी समुद्र आणि बंगाल चा उपसागर तसेच हिंद महासागरावरील दळणवळणाची रक्षा करणाऱ्या भारताच्या नौदलाला एक सामर्थ्य प्राप्त होणार आहे. पाण्याखाली शत्रूचा खात्मा करण्यास सक्षम असलेलं एम.एच. ६० रोमिओ हेलिकॉप्टर भारताच्या नौदलाचा एक प्रमुख अंग पुढील काही दशके असणार आहे.


जय हिंद!

माहिती स्रोत :- गुगल

फोटो स्रोत :- गुगल


No comments:

Post a Comment