गुन्हेगाराच्या मनातलं... विनीत वर्तक ©
काही दिवसांपासून सोशल मिडिया, मिडिया आणि एकूणच संपूर्ण समाज घडलेल्या घटनेने सुन्न झाला आहे. या घडलेल्या घटनेचे अनेक पैलू अनेकांनी मांडले आहेत. त्याला धर्माचा, संस्करांचा, जातीचा, राजकीय प्रवृत्तीचा सगळ्याचा रंग लावून झाला आहे. नक्की काय घडलं, कसं घडलं किंवा एकूणच त्याचे संदर्भ काय लावायचे याचा अंदाज आणि मत अनेकांनी याआधीच मांडली आहेत. मला त्यात जायचं नाही. पण या घटनेच्या निमिताने एका वेगळ्या दृष्टिकोनातून मी विचार करतो आहे. अर्थात तो किती बरोबर अथवा चुकीचा किंवा किती लोकांना तो पटेल याबद्दल माझ्या मनात साशंका आहे. पण एकूणच वेगळ्या दृष्टिकोनातून प्रवृत्ती समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे.
वसईतल्या मुली सोबत दिल्ली मधे घडलेली घटना ही खून, अत्याचार, नातेसंबंध किंवा धर्मातील रितीरिवाज यापुरती मर्यादित नाही असं मला वाटते. कोणाचा तरी खून करणं अथवा बलात्कार कारण ही एक वाईट, पाशवी प्रवृत्ती असते. पण मला जी भिती वाटली ती त्या नंतर केलेल्या कृत्याची. ज्या थंड डोक्याने अमानुषतेची परिसीमा गाठली गेली, ते कुठेतरी विचलित करणारं आहे. किती थंड डोक्याने त्याने आपल्या प्रेयसीचे ३५ तुकडे केले. ते करत असताना त्याला काहीच वाटलं नसेल का? ते केल्यानंतर ते फ्रिज मधे ठेवणं त्या तुकड्यांची एकेक करत विल्हेवाट लावणं. हे करत असताना त्याच थंड डोक्याने वेगवेगळ्या स्त्रियांसोबत आनंदाचे क्षण अनुभवणं? हे कसं शक्य झालं असेल? हा प्रश्न मला विचलित करतो आहे. मुद्दा हा नाही को तो कोणत्या धर्माचा आहे? मुद्दा हा नाही की ती इतक्या त्रासानंतर त्याच्यासोबत का राहत होती? मुद्दा हा नाही की त्याने तिचा खून का केला? तर माझ्यामते मुद्दा हा आहे की इतकी अमानुषतेची पातळी गाठण्याची वृत्ती त्यात कशी काय निर्माण झाली? काय अशी कारणं आहेत की ज्यामुळे अश्या मानवतेला काळिमा फासणाऱ्या टोकाला जाताना आपण काय करत आहोत याचा विचार किंवा त्याबद्दल कोणताच पश्चाताप दिसून येत नाही.
सर्वसामान्य माणसं याकडे धर्माच्या, संस्काराच्या किंवा व्यक्तिमत्वाच्या दृष्टिकोनातून बघतील पण या गोष्टी या थराचा गुन्हा करण्यास तितक्या कारणीभूत नसतात. शांत डोक्याने असे गुन्हे करण्यासाठी त्या गुन्हेगाराच्या आयुष्यात अश्या काही घटना घडाव्या लागतात ज्याचा त्याच्या आयुष्यावर विपरीत प्रभाव पडलेला असतो अथवा पडत असतो. अश्या गुन्हेगारांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचं इतक्या टोकाला जाताना पण त्याची झळ किंवा त्याबद्दल पश्चातापाची भावना गुन्हेगारात जागृत करत नाही. आपल्याला ऐकताना अंगावर शहारे येतात, डोळ्यातून टचकन पाणी बाहेर येते, रागाने आपण लालबुंद होतो. पण तो गुन्हा करणारा मात्र काही घडलं नाही अश्या अविर्भावात एक सामान्य आयुष्य जगू शकतो हीच सगळ्यात घातक प्रवृत्ती आहे असं मला वाटते. ती निर्माण होण्यासाठी अथवा रुजण्यासाठी ज्या घटना कारणीभूत आहेत त्याचा उपापोह झाला पाहिजे असं मला व्यक्तिशः वाटते.
आपण जर त्या घटना रोखू शकलो तर असे गुन्हेगार तयार होण्यापासून रोखू शकतो. या प्रवृत्तीमागे अनेक कारण असतील. अगदी रोज टी.व्ही. वर सुरु असणाऱ्या क्राईम पेट्रोल, डेक्स्टर सारख्या मालिका ते स्त्रीकडे वस्तू म्हणून बघण्याचा भोगी दृष्टिकोन. पण त्या पलीकडे आपण एखाद्या व्यक्तीच्या शरीराचे तुकडे करताना त्याबद्दल कोणत्याच प्रकारच्या संवेदना निर्माण न होणं ही बाब जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. यालाच वैज्ञानिक भाषेत 'बिहेव्हिअर सायन्स' असं म्हणतात. या विज्ञानाच्या शाखेत अनेक उपप्रकार आहेत जसे की मानसशास्त्र, मानसवंशशास्त्र , संज्ञात्मक विज्ञान ज्यात मानवाच्या वर्तणूक, विचार, प्रेरणा, सामाजिक प्रभाव, संदर्भ प्रभाव आणि सवयी यासारख्या घटकांच्या प्रभावाचे प्रायोगिकपणे परीक्षण करून विशिष्ट वर्तनात कधी आणि का गुंततात याचा अभ्यास केला जातो. मला वाटते की यातील तज्ञ लोकांनी या घटनेचा वरच्या दृष्टिकोनातून विचार करायला हवा. कारण जर यातून नेमकं कारण कळलं तर अश्या पद्धतीच्या घटना पुढे टाळता येतील.
एखाद्या घटनेला कोणी कोणता मुलामा द्यायचा हा प्रत्येकाचा दृष्टिकोन आहे. मी याकडे धर्म, राजकारण, संस्कृती या चष्म्यातून न बघता वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघतो आहे. याचा अर्थ बाकीचे दृष्टीकोन चुकीचे आहेत, त्यांचा संबंध नाही असं माझं मुळीच म्हणणं नाही. पण मला यापेक्षा घटनेच्या मुळाशी नक्की काय घडलं आहे ते जाणून घेण्यात स्वारस्य आहे. कारण ही घटना अनेक अर्थाने वेगळी आहे. सध्या ज्या दृष्टिकोनातून तिच्याकडे पाहिलं जात आहे त्यातून काही निष्पन्न होईल असं मला तरी दिसत नाही. कुठेतरी काहीतरी या गुन्हेगाराच्या बाबतीत वेगळं घडलं आहे ज्यामुळे इतक्या टोकाचा विचार आणि इतक्या टोकाची प्रवृत्ती ज्यात सारासार विचार करण्याची बुद्धी पण तो हरवून बसला असं मला तरी निश्चित वाटते. अर्थात हे माझे विचार आहेत. सर्वांनी पटवून घ्यावेत असा माझा अट्टाहास नाही.
तळटीप :- या पोस्टवर धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कमेंट करू नयेत ही नम्र विनंती. माझ्या पोस्टचा आशय वेगळा आहे. कोणालाही पाठीशी घालण्याचा अथवा कोणालाही गुन्हेगार ठरवण्याचा यात उद्देश नाही.
फोटो शोध सौजन्य :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
पण अशा गुन्ह्यात बहुतेक वेळी मुसलमान का असतात? अशाच काय सर्व प्रकारच्या गुन्ह्यात मुस्लिम अग्रेसर आहेत. त्यांचे शिक्षण कमी, बेरोजगारी ही तकलादू कारणे आता खूप झाली. चांगले शिकलेले व श्रीमंत मुस्लिम यात दिसून येतात. औरंगाबादला मुलीने धावत्या रिक्षातून उडी मारली तो रिक्षावाला मुस्लिम, मनवा नाईकला ज्या कॅब चालकाचा भयावह अनुभव आला तो मुस्लिम आणि मुस्लिम नसेल तर परप्रांतीय up वाले जसा तो विरार मधील कुशवाहा. मटा, सामना उघडुन गुन्हेगारी च्या बातम्यात शेख, अन्सारी, खान अशीच नावे का दिसतात? अलीकडेच विनयभंग करणारा डिलिव्हरी बॉय मुसलमान. यूपी मध्ये तर यांचे प्रमाण कित्येक पट अधिक असेल . मोबाईल मारणारे हेच, फटका गँग यांचीच, लोकलवर दगड भिरकवले जातात यांच्याच वस्तीतून.खोट्या नोटा, नकली atm, मादक पदार्थ तस्करी , स्मगलिंग करणारे हेच. खाद्यपदार्थ बनवताना त्यावर थुंकणे हेच जाणोत.थोडक्यात काय तर लोकसंख्येत अल्पसंख्य (२५ कोटी तरी अल्पसंख्य ) पण गुन्ह्यात बहुसंख्य अशी ही जमात आहे.पण यावर संपादक पत्रकार एक अवाक्षर काढत नाहीत. याचे सखेद आश्चर्य वाटते.
ReplyDelete