Saturday 9 February 2019

चुंबकीय उत्तर ध्रुव बदलतो आहे... विनीत वर्तक ©




चुंबकीय उत्तर ध्रुव बदलतो आहे... विनीत वर्तक ©



गेल्या काही दिवसांपासून जगभरातील वैज्ञानिकात चिंतेच वातावरण आहे. ह्याला कारण आहे ते पृथ्वीचा चुंबकीय उत्तर ध्रुव अतिशय वेगाने बदलतो आहे. ह्याचा परिणाम आपल्यावर काय होतो? असा प्रश्न सामान्य माणसाच्या मनात येणं स्वाभाविक आहे. मुळात उत्तर ध्रुव, चुंबकीय उत्तर ध्रुव म्हणजे काय? चुंबकीय उत्तर ध्रुव बदलण्याने सामान्य माणसाच्या आयुष्यात काय बदल होणार आहे हे जाणून घेणं आपल्यासाठी खूप महत्वाच आहे.

पृथ्वीचे ध्रुव अनेक आहेत. आपली पृथ्वी सरळ नसून थोडी कललेली आहे. पृथ्वी स्वतःभोवती ज्या अक्षाभोवती फिरते त्या अक्षाच उत्तर कडचं टोकं म्हणजे जिओग्राफिक उत्तर ध्रुव व त्याच दक्षिण टोकं म्हणजे जिओग्राफिक दक्षिण ध्रुव. हे दोन्ही ध्रुव हे नेहमी सारखे असतात. त्यांच्यात बदल होतं नाही. आता पृथ्वीवरील होकायंत्र किंवा इतर जी दिशादर्शक उपकरण आहेत ती ज्या धृवाशी संल्गन असतात त्याला चुंबकीय ध्रुव असं म्हंटल जाते. हा चुंबकीय ध्रुव स्थिर नसतो. त्याची सतत हालचाल होतं असते. तो प्रत्येक दिवशी साधारण ८० किमी. च्या पट्यात फिरत असतो. तर प्रत्येक वर्षी साधारण ४० किमी. ह्या वेगाने गेल्या १५० वर्षात चुंबकीय ध्रुवाने ११०० किमी. च अंतर पार केलं आहे. चुंबकीय ध्रुव हा आत्ताच बदलत नसून कित्येक वर्ष त्याचा हा प्रवास चालू आहे. हा प्रवास इतका आहे की दोन्ही ध्रुव उलटे होतात. उत्तर ध्रुव दक्षिण आणि दक्षिण ध्रुव उत्तर असं ही पृथ्वीवर झालेलं आहे. ह्या आधी जवळपास ७,८०,००० वर्षापूर्वी असं घडलेलं आहे. तर ३३० मिलियन वर्षात ४०० वेळा पृथ्वीचे चुंबकीय ध्रुव फ्लिप म्हणजे उलट सुलट झालेले आहेत. अर्थात ही प्रक्रिया होण्यासाठी साधारण १००० वर्षाचा कालावधी लागत असतो. काही वैज्ञानिकांच्या मते आता त्याची सुरवात झालेली आहे. कारण गेल्या १५० वर्षात चुंबकीय क्षेत्राची सरासरी १०% घट झालेली आहे.

चुंबकीय ध्रुव असा का बदलतो? हे समजण्यासाठी आपल्याला पृथ्वीच्या पोटात जावं लागेल. पृथ्वीचा गाभा ह्या चुंबकीय बदलांसाठी कारणीभूत आहे. पृथ्वीच्या अगदी मध्यभागी (इनर कोअर ) लोखंडाचा गोळा घनरूपात (Solid Iron) आहे. त्याच्या भोवती आउटर कोअर ही द्रवरुपात आहे. ह्याच्या भोवती जो भाग आहे त्याला मंटल (Mantle) असं म्हंटल जाते. हा भाग घन असून पण प्लास्टिक प्रमाणे मऊ असतो. जो भाग आपण बाहेर बघतो त्याला क्रस्ट असं म्हणतात. पृथ्वी जेव्हा स्वतःभोवती फिरते तेव्हा हे सगळे भाग पण गोलाकार फिरतात. ह्यातला इनर कोअर आणि आउटर कोअर असणारे भाग वेगवेगळ्या वेगाने फिरतात. त्यांच्या वेगळ्या वेगामुळे डायनामो इफेक्ट तयार होतो. डायनामो मुळे प्रवाह आत तयार होतो. ह्या सगळ्या आतल्या उलथापालथी मुळे पृथ्वी एक प्रचंड मोठ्या अश्या चुंबकात परावर्तीत होते.

चुंबक म्हंटल की चुंबकीय क्षेत्र आणि चुंबकीय लहरी आल्या. ह्या लहरी जिकडून निघून जिकडे आत शिरतात त्याला चुंबकीय ध्रुव असं म्हणतात. चुंबकीय क्षेत्राची व्याप्ती किंवा त्याचे ध्रुव हे चुंबकीय लहिरी वर अवलंबून असतात. ह्या लहरींच निर्माण हे पृथ्वीच्या पोटात होणाऱ्या डायनामो इफेक्ट वर अवल्माबून असते. हा डायनामो इफेक्ट कसा बदलतो आणि का? ह्या बद्दल आपण अजूनही अनभिज्ञ आहोत. पृथ्वीच्या पोटातील भूगर्भ हालचाली, भूकंप ह्या सगळ्या गोष्टी पृथ्वीचा चुंबकीय ध्रुव बदलू शकतात.

आत्ता ज्या वेगाने उत्तर चुंबकीय ध्रुवात बदल होतं आहेत त्याने शास्त्रज्ञ बुचकळ्यात पडले आहेत. कारण चुंबकीय ध्रुव बदलल्याने जी.पी.एस. प्रणाली जी आज सर्वत्र अगदी फोन पासून ते विमानापर्यंत आणि जहाजापासून ते क्षेपणास्त्र पर्यंत सगळीकडे वापरली जाते. त्यात बदल करण गरजेच बनलं आहे. अन्यथा भलत्याच ठिकाणी आपल्याला आपलं स्थान ह्या प्रणाली दाखवतील आणि सगळा गोंधळ उडेल.

उत्तर चुंबकीय ध्रुवाच स्थान बदलणं हे नवीन नसलं तरी ज्या वेगाने ते बदलत आहे तो वैज्ञानिकांसाठी एक न सोडवता आलेला प्रश्न आहे. तूर्तास त्यावर संशोधन चालू आहे. असं का होते आहे ह्याची उत्तर मिळेपर्यंत वाट बघण्याशिवाय आपल्या हातात दुसरं काही नाही. कारण निसर्गाच्या ह्या ताकदीपुढे माणूस अजून निष्प्रभ आहे. 

    


No comments:

Post a Comment