स्कॅरी बार्बी... विनीत वर्तक ©
'स्कॅरी बार्बी' हे नावं वाचून आपल्याला कदाचित लहान मुलांच्या खेळण्यातल्या बार्बी बाहुलीची आठवण होईल. पण या नावाचा आणि बाहुलीचा तसा काही सरळ संबंध नाही. मग बार्बी हे नाव कशासाठी? त्या नावाच्या पुढे घाबरावणारं स्कॅरी कशासाठी? तर यासाठी आपल्याला अवकाशात जावं लागेल. २०२० मधे विश्वाच्या पटलावर सुपरनोव्हा चा अभ्यास करताना एका दुर्बिणीने ध्रुव ताऱ्याच्या पूर्वेला एक प्रकाशाचा ठिपका टिपला. पण त्यात काही वावगं न वाटल्याने वैज्ञानिकांनी त्याची दखल घेतली नाही. त्याला नाव दिलं "ZTF20abrbeie". या विश्वाच्या पटलावर प्रत्येक दहा सेकंदाला एखाद्या ताऱ्याच सुपरनोव्हा मधे विनाश होत असतो. त्यामुळे तशीच एखादी ही घटना आहे असं वाटून याकडे दुर्लक्ष केलं गेलं. २०२१ मधे एका आर्टिफिशियल इंटीलिजन्स सॉफ्टवेअर ने अवकाशातील सुपरनोव्हा किंवा तश्या घटनांचा अभ्यास करत असताना पुन्हा या घटनेकडे वैज्ञानिकांच लक्ष वेधलं. याचा अभ्यास केल्यावर जे पुढे आलं ते हादरवून टाकणारं होतं.
ZTF20abrbeie या घटनेच्या प्रकाशाची तीव्रता एखाद्या सुपरनोव्हा च्या घटनेपेक्षा एक हजार पटीपेक्षा जास्त होती. यातून निघणारी ऊर्जा सूर्य आपल्या संपूर्ण आयुष्यात म्हणजे १० बिलियन वर्षात देईल त्यापेक्षा जास्त ऊर्जा या घटनेत बाहेर पडत होती. या स्फोटाची तीव्रता वैज्ञानिकांना बुचकळ्यात टाकत होती. जर हा स्फोट आपल्या सूर्यमालेत झाला असता तर या स्फोटाने जवळपास ४ प्रकाशवर्षं इतक्या अंतराचे क्षेत्रफळ व्यापलं असतं म्हणजे आपल्याला सगळ्यात जवळचा असणाऱ्या मित्र ताऱ्या इतकं हे अंतर असतं. या स्फोटातून निघालेली विकीरण इतकी शक्तिशाली आहेत की आपली पृथ्वी जर ७०० प्रकाशवर्ष अंतरावर असती तरी या विकिरणांच्या माऱ्यामुळे वितळून गेली असती. त्यामुळेच आजवर मानवाला दिसलेल्या किंवा ज्ञात असलेल्या कोणत्याही घटनेपेक्षा ही घटना सगळ्यात जास्त तीव्रतेची अवकाशीय घटना म्हणून नोंदली गेली.
ZTF20abrbeie असं अडचणीचं नाव सोप्प करण्यासाठी म्हणून याला 'स्कॅरी बार्बी' असं नाव देण्यात आलं. पण वैज्ञानिकांना कोड सुटत नव्हतं की विश्वाच्या पटलावर इतका मोठा स्फोट आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर ऊर्जा उत्पन्न व्हायला नक्की काय कारणीभूत असेल? वैज्ञानिकांना आधी वाटलं की हा एखादा सुपरनोव्हा असेल पण जेव्हा इतर सुपरनोव्हा सोबत याची तुलना केली गेली तेव्हा असं लक्षात आलं की एखाद्या सुपरनोव्हा ची तिव्रता ही काळाच्या ओघात कमी होते पण स्कॅरी बार्बी ची तीव्रता मात्र गेल्या ८०० दिवसापासून कायम आहे. तसेच अभ्यासावरून असं लक्षात आलं की येणारी कित्येक वर्ष ती तशीच राहू शकेल. त्यामुळेच सुपरनोव्हा ची शक्यता फेटाळली गेली.
वैज्ञानिकांनी विश्वाच्या पटलावरील आत्तापर्यंत माहित असलेल्या अनेक महाकाय उर्जा निर्माण करणाऱ्या घटनांशी याच साधर्म्य शोधण्याचा प्रयत्न केला जसे की जी.आर.बी. (गॅमा रे बर्स्ट), क्वेझार किंवा सुपरनोव्हा. पण अश्या कोणत्याही घटनांशी त्याच साधर्म्य आढळून आलेलं नाही. वैज्ञानिकांनी अजून अधिक शोधासाठी जेव्हा या स्रोताचा अधिक अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की की घटना तब्बल ८ बिलियन (८०० कोटी) वर्षापूर्वी घडलेली आहे. त्याचा प्रकाश आत्ता आपल्यापर्यंत पोहचत आहे. वैज्ञानिकांनी सुपर मॅसिव्ह कृष्णविवराची संकल्पना पडताळून बघितली त्यासाठी त्यांनी त्या कृष्णविवराच्या वस्तुमानाचा अभ्यास केला. जेव्हा याच्या वस्तुमानाचा अंदाज बांधला तेव्हा ते निघालं आपल्या सूर्याच्या तब्बल १०० मिलियन ( १० कोटी) पट. आपल्या सूर्याचं वस्तुमान ३,३३,००० पृथ्वीच्या वस्तुमाना इतकं आहे. यावरून आपण अंदाज लावू शकतो की तिकडे काय हाहाकार घडलेला असेल. या कृष्णविवराने सूर्यापेक्षा १४ पट मोठा तारा गिळंकृत केला असेल त्यातून त्या ताऱ्याच्या ठिकऱ्या उडून इतक्या प्रचंड प्रमाणात ऊर्जा आणि प्रकाश बाहेर फेकला गेलेला असेल.
पण इकडेही अडचण आली की या कृष्णविवराच्या (ब्लॅकहोल) आजूबाजूला कोणतीच दीर्घिका नव्हती. साधारणपणे अशी महाकाय कृष्णविवरे ही दीर्घिकेच्या मध्यभागी आढळतात. पण याच्या आजूबाजूला कोणतीच दीर्घिका आढळून आली नाही. याचा तर्क असा वैज्ञानिकांनी लावला की हे कृष्णविवर विश्वाच्या पटलावर प्रवास करत असताना एखादा महाकाय तारा याच्या रस्त्यात आला आणि त्याला याने गिळंकृत केलं असावं. अर्थात आजच्या क्षणाला पण यातील सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळालेली नाहीत. त्यामुळे आजही भौतिक आणि खगोल शास्त्राच्या परिभाषेत स्कॅरी बार्बी च गूढ वैज्ञानिकांना उकलता आलेलं नाही. इतका प्रचंड आणि महाकाय विस्फोट विश्वाच्या पटलावर आजवर बघितला गेलेला नाही. काही वैज्ञानिकांच्या मते तर यानंतर अशी घटना होण्याची शक्यता ही खूप कमी आहे. त्यामुळेच 'स्कॅरी बार्बी' आपल्या सोबत अनेक अनुत्तरित प्रश्न घेऊन विश्वाच्या पटलावर एक अदभूत नजारा मानवाला दाखवत आहे.
फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
उत्तम माहिती... तुमच्या लेखांमुळे नवनवीन माहिती कळत असते
ReplyDelete