छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे व्हिक्टोरिया क्रॉस मिळालेले नामदेव जाधव... विनीत वर्तक ©
मराठा साम्राज्याची किर्ती त्या काळात अटकेपार पोहचली होती. मराठी साम्राज्याची मुहुर्तमेढ रोवणारे छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचा पराक्रम आजही लोकांना स्फूर्ती देतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध नितीत आमुलाग्र बदल करताना गनिमी काव्यात हुशार असणाऱ्या पराक्रमी अश्या मावळ्यांची फौज उभी केली. हे मावळे कोणी लढाई शिकलेले नव्हते तर सामान्य घरातील लोकांमध्ये पराक्रम, शौर्य, निष्ठा हे गुण निर्माण करून त्यांनी मराठा साम्राज्य उभे केले. काळाच्या ओघात युद्ध बदललं पण छत्रपती शिवाजी महाराजांनी तेवलेली पराक्रमाची ज्योत आजही तशीच आहे. ह्याच मुर्तीमंत उदाहरण म्हणजे भारतीय सेनेतील 'मराठा पायदळ' (Maratha Light Infantry). महाराष्ट्रातील ह्याच मावळ्यांनी बनलेलं १७६८ मध्ये भारतीय सेनेचा भाग झालेलं मराठा पायदळ हे भारतीय सेनेचं सर्वात जुनं पायदळ आहे. आपल्या शौर्याने, पराक्रमाने भारतीय सेनेत सगळ्यात जास्ती ६० पेक्षा जास्ती युद्ध पदकं मराठा पायदळाला मिळालेली आहेत.
१९४५ चा तो काळ होता. जगात दुसऱ्या महायुद्धाचे पडघम वाजत होते. ब्रिटिश इंडियाचा भाग म्हणुन भारतीय सेनेतील ५ मराठा पायदळाला जर्मनी विरुद्ध लढण्याचा आदेश मिळाला. नामदेव जाधव हे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निमज गावचे. अतिशय गरीब कुटुंबात जन्माला आल्यामुळे शिक्षण ही त्यांना घेता आलं नव्हतं. पैसे कमावण्यासाठी इतर लोकांप्रमाणे त्यांनी सैन्य भरतीत भाग घेतला. शेतीत काम केल्यामुळे कसलेले शरीर आणि प्रवरेच्या पात्रात पट्टीचा पोहणारा हे गुण त्यांना ५ मराठा पायदळात शिपाई म्हणुन नियुक्त करून गेले. ५ मराठा पायदळाचा भाग म्हणुन त्यांना इटली ला जर्मनीच्या सेनेचा प्रतिकार करण्यासाठी पाठवलं गेलं. ९ एप्रिल १९४५ ला नामदेव जाधव ह्यांच्या तुकडीला सिनोई नदीकाठच्या जर्मन तळावर हल्ला करण्याचा हुकूम मिळाला. सिनोई नदीच्या दोन्ही बाजुला ४० फुट उंच काठ. पात्रात ४ ते ५ फुट खोलीच पाणी त्यात एका बाजुला जर्मन सेनेचे तिन बंकर होते तर दुसऱ्या बाजुला ५ मराठा पायदळ त्यात तिसऱ्या बाजुने जर्मन सेनेने सगळीकडे सुरुंग पेरून समोरा समोर लढाईचा एकच मार्ग खुला ठेवला होता.
समोरून हल्ला करण्या पलीकडे ब्रिटिश सेनेला दुसरा पर्याय नसताना त्यांनी नदी ओलांडण्याचा आदेश आपल्या सेनेला दिला. जर्मन सेनेच्या तिन्ही बंकर मधुन मशिनगन आग ओकायला लागल्या. शिपाई नामदेव जाधव ह्यांच्या तुकडीतील अनेकजण मृत्युमुखी पडले. जर्मन सेनेच्या मशिनगन यमाच्या रूपात त्यांच्यावर बरसत होत्या. आपला कंपनी कमांडर आणि इतर अनेक सहकारी जखमी होऊन युद्धभूमीवर पडले असताना ही शिपाई नामदेव जाधव विचलित झाले नाहीत. जखमी अवस्थेत पडलेल्या आपल्या कमांडर आणि सहकाऱ्यांना वाचवण्यासाठी शिपाई नामदेव जाधव ह्यांनी गोळ्यांच्या वर्षावात पाण्यात घेतली. आपल्या कंपनी कमांडर ला त्यांनी आपल्या पाठीवर घेऊन अलीकडच्या काठावर आणलं. त्या काठावर जर्मन सैनिकांनी सुरुंग पेरले होते. त्या सुरुंगातून रांगत त्यांनी आपल्या कमांडर ला सुरक्षित स्थळी पोहचवले. त्या नंतर पुन्हा एकदा पलीकडच्या तटावर त्यांनी कुच केले. तिथुन आपल्या एका जखमी सहकाऱ्याला पाठीवर घेऊन पाण्यात उडी घेतली. ह्या वेळेस जर्मन सेनेने त्यांच्यावर तुफान गोळीबार केला. पाण्यात त्यांच्यावर अनेक मोर्टार टाकले पण सगळ्या माऱ्यापासून आपला आणि आपल्या जखमी सहकाऱ्याला वाचवत त्यांनी सुरक्षित स्थळी नेलं. आपल्या सहकाऱ्यांची अशी क्रुरपणे केलेल्या हत्येचा बदला म्हणुन नामदेव जाधव एकटे जर्मन सेनेच्या एका बंकरवर तुटून पडले.
नामदेव जाधव ह्यांच्याकडे एक साधी टॉमी गन होती तर समोरून मशिनगन आणि मोर्टार चा वर्षाव चालू होता. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा गनिमी काव्या प्रमाणे ह्या बंकर तुटून पडला. अतीतटीच्या लढाईत शिपाई नामदेव जाधव ह्यांनी बंकर वर कब्जा मिळवला. पण ह्यात त्यांच्या हाताला गोळ्या लागल्या. एका बंकर वर कब्जा मिळवला तरी अजुन दोन बंकर आग ओकत होते. हाताला लागलेल्या गोळ्यांमुळे त्यांना आपल्या बंदुकी मधुन गोळ्या चालवणं अशक्य झालं होतं. पण हा मावळा डगमगला नाही. जर्मन सेनेचे दोन्ही बंकर नष्ट करण्याचा चंग त्यांनी बांधला. आपल्या जवळ असलेल्या ग्रेनेड ने त्यांनी उरलेल्या बंकरवर हल्लाबोल केला. आपल्या कडचे ग्रेनेड संपत आहे हे बघुन पुन्हा रांगत जाऊन त्यांनी आपल्या पोस्ट वरून ग्रेनेड आणले. आपल्या पराक्रमाने त्यांनी दोन्ही बंकर नेस्तनाबुत केले. तिन्ही बंकरवर कब्जा केल्यावर शिपाई नामदेव जाधव ह्यांनी पोस्टच्या एका उंचीवर उभं राहुन "बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय" अशी आरोळी ठोकली. शिवगर्जनेचा तो आवाज इटली च्या सिनोई नदीच्या आसमंतात गरजला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका मावळ्याने पुर्ण जर्मन सेनेचा खात्मा केला होता. पलीकडच्या तिरावर मागे असलेल्या ब्रिटिश सेनेच्या कानात ती शिवगर्जना विजेसारखी कडाडली. ५ मराठा पायदळाचे ब्रिदवाक्य हे तेच असल्याने आपल्या सैनिकाने लक्ष्य पुर्ण केल्याची ती गर्जना होती. ह्या विजयाने पुर्ण युद्धाचा रोख पालटला. ब्रिटिश सेनेने जर्मन सैन्याला माघार घ्यायला लावताना इथल्या पुर्ण परिसरावर आपला कब्जा केला.
शिपाई नामदेव जाधव ह्यांना त्यांच्या अतुलनीय पराक्रम, शौर्यासाठी ब्रिटिश सेनेच्या सर्वोच्च सैनिकी पुरस्काराने गौरवण्यात आलं. शिपाई नामदेव जाधव ह्यांनी नुसत्या आपल्या सहकाऱ्यांचा जीव वाचवला तर आपल्या एकट्याच्या पराक्रमाने पुर्ण युद्धाचं स्वरूप त्यांनी बदलवलं. ब्रिटीश राज्यकर्ते त्यांच्या पराक्रमाने अवाक झाले होते. १९५३ ला ब्रिटिश राणी एलिझाबेथ हिच्या राज्यरोहण सोहळ्यात त्यांना "शाही पाहुणे" म्हणुन अगत्याचं आमंत्रण होतं. ह्या शिवाय दर दोन वर्षांनी त्यांना राणीच्या स्वागत सोहळ्यासाठी इंग्लंड वरून खास आमंत्रण येत असे. महाराष्ट्रातल्या एका गरीब कुटुंबात जन्माला येऊन इटली मध्ये आपल्या पराक्रमाने त्यांनी आपल्या सोबत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जगात अजरामर केलं. अश्या ह्या पराक्रमी सैनिकाचा, मावळ्याचा २ ऑगस्ट १९८४ ला पुणे इथे वृद्धापकाळाने मृत्यू झाला. त्यांच्या अतुलनीय पराक्रमाची आठवण म्हणुन ९ एप्रिल २०१७ ला इटली सरकारने त्याच सिनोई नदीच्या काठी जिकडे शिपाई नामदेव जाधव ह्यांनी आपला भिमपराक्रम केला तिकडेच त्यांच्या स्मारकाच उदघाटन केलेलं आहे. खंत एकच ज्या मातीत ते जन्माला आले त्याच मातीतील किती लोकांना त्यांचं नाव आणि त्यांच्या भिमपराक्रमाची माहिती आहे हा अभ्यासाचा विषय असेल. आपल्या पराक्रमाने छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव साता समुद्रापार पोहचवणाऱ्या ह्या मावळ्यास माझा कडक सॅल्यूट आणि साष्टांग नमस्कार..
(खाली लंडन गॅझेट मधील काही अंश. कंसात लिहलेलं ब्रिद वाक्य समजण्यासाठी लिहिलं आहे. लंडन गॅझेट चा ते भाग नाही. )
The KING has been graciously pleased to approve the award of the VICTORIA CROSS to:—
No. 18706 Sepoy Namdeo JADHAO, 5th Mahratta Light Infantry, Indian Army.
In Italy, on the evening of the 9th April, 1945, a Company of the 5th Mahratta Light Infantry assaulted the east floodbank of the Senio river, north of S. Polito.
Having silenced all machine gun fire from the east bank, he then climbed on to the top of it and, in spite of heavy mortar fire, stood in the open shouting the "Mahratta war cry" ( बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय) and waving the remainder of the Companies across the river.
This Sepoy not only saved the lives of his comrades, but his outstanding gallantry and personal bravery enabled the two Companies to hold the river banks firmly, and eventually the Battalion to secure a deeper bridgehead, which in turn ultimately led to the collapse of all German resistance in the area.
— London Gazette, 15 June 1945.
सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
फोटो स्रोत :- गुगल, लोकमत

No comments:
Post a Comment