न लिहिलेली एक आठवण,,
आज खूप दिवसांनी तुझी आठवण आली. कारण काहीच नव्हते. कधीतरी भूतकाळात
शिरला कि तुझा स्पर्श झाल्याशिवाय मन पुढे जातच नाही. काय न ते मंतरलेले दिवस होते.
मला आठवतो आहे तो ट्रेक जिकडे तुझी आणि माझी भेट झाली. तुझे स्यान्दल तुटले आणि त्यात
तुझा पहिलाच ट्रेक. ट्रेक चे एक्स्पर्ट म्हणून आम्ही आपले शेवटी सगळ्यांना घेऊन
बरोबर पोहचत करणारे. सगळे निघून गेले. तुझा रडवेला चेहरा मला बघवेना. मग काय आमचे
पादत्राणे आपल्या पायात आणि आम्ही अनवाणी. अख्खा ट्रेक उतरलो तसाच अनवाणी. पायात
किती दगड लागले त्याची मोजदात नाही. तू मात्र थ्यांक्स म्हणून जास्ती काही बोललीस
नाहीस. तुझ ते गप्प राहाण मला त्या दिवशी उमगलच नव्हत. त्या नंतरचे ते ३ दिवस कधीच
विसरू शकत नाही.
रोज आपण भेटत होतो कधी फोटो देण्याच्या निमिताने तर कधी घेण्याच्या
अख्खा वेळ फोन वर आणि संध्याकाळी भेटून सुद्धा मन भरतच नव्हत. ३ दिवशी तू सांगितलस
जे तुला पहिल्याच दिवशी जाणवल होत आणि तू का बोलली नाहीस हे मला तेव्हा कळल. मग
काय मंतरलेले दिवस असेच जात राहिले आणि आयुष्याच्या एका वेगळ्याच वाटेवर एका
वेगळ्याच धुंदीत आपण उडत होतो. कधीतरी परतायचं हे ठाऊक असून सुधा आपण ती धुंदी
अनुभवत होतो.
शेवटी आलाच तो दिवस जिकडे आयुष्याच्या प्रत्येक क्षणांची बेरीज
वजाबाकी करू लागलो. शेवटी व्हायचं होत तेच झाल. ह्या बेरीज वजाबाकीत बाकी शून्य
कधी झाली ते आपल्याला समजलच नाही. त्या देवळाच्या बाकावर तू मला शेवटची भेटलीस मी
म्हणालो तू ला जा बाई तुझ्यासारख्या मला हजार मिळतील. मनात म्हंटल बघणार एकीकडे पण
नाही पण तुझ्या भल्यासाठी दगड मनावर ठेवावा लागणारच होता. तू गेलीस दुसर्या दिवशी
मला फोन केला ऑफिस मध्ये कि तू नाही जगू शकत माझ्याशिवाय आणि २-३ अस्पिरीन च्या
गोळ्या घेतल्या. तुला समजावण्यात माझा पूर्ण दिवस गेला मी आतून पूर्ण कोलमडलो होतो
पण काय सांगू आणि दाखवू तुला.
आज ज्याच्यासाठी तू मला सोडून गेलीस ते सर्व माझ्याकडे आहे पण तू
नाहीस. आयुष्याच्या त्या क्षणांची स्वप्न तू मला सर्वप्रथम दाखवलीस आणि मला समजून
घेतलस त्या साठी नेहमीच ऋणी आहे. आज तू तुझ्या आयुष्यात तर मी माझ्या आयुष्यात
सुखी आहे. पण आठवणीच्या गारांचा पाउस कधी तरी येतो आणि सगळ काही बदलून जाते. पुन्हा
त्या गारा विरगळतात आणि पाण्याच अस्तित्व ठेवतात......................
विनीत वर्तक ...
No comments:
Post a Comment