Tuesday, 5 May 2020

एका शिपाई सैनिकाची गोष्ट... विनीत वर्तक ©

एका शिपाई सैनिकाची गोष्ट... विनीत वर्तक ©

१९७१ चं भारत पाकीस्तान युद्ध सुरु होतं शिख रेजिमेंट ला जम्मू आणि काश्मीर मध्ये तुतमारी गली आणि नास्ताचून पास इथल्या काईन दरी ताब्यात घेण्याची जबाबदारी देण्यात आली होतीहा सगळा प्रदेश समुद्रसपाटी पासून जवळपास ११,००० फूट उंचीवर होताथंडीचे दिवस चालू झाले होते आणि रात्रीच इथलं तपमान शून्याच्या खाली सरकत होतं- डिसेंबर १९७१ ला भारताने शत्रूवर हल्ला करून जवळपास ४६ किलोमीटर क्षेत्रफळाचा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला होताभारताचं ह्या भागावर सार्वभौमत्व दाखवण्यासाठी भारतीय सैनिकांनी ह्या भागात अनेक ठिकाणी रस्ते बंद केले होतेभारतीय सैनिक ह्या भागात अचानक गनिमी हल्ला करून शत्रूला नामोहरम करत होते१४-१५ डिसेंबर च्या रात्री असाच अचानक हल्ला करण्यासाठी कॅप्टन करम सिंग विर्क ह्यांच्या नेतृत्वाखाली  शिख चे सगळ्यात तरुण कमांडो निघाले होतेजिकडे हल्ला करायचा होता त्या ठिकाणी जाण्याआगोदर त्यांच्याच टीम वर शत्रूने हल्ला केलाझालेल्या गोळीबारात भारतीय सैनिकांनी शत्रूला तर पिटाळून लावलं पण एका सैनिकाचा प्राण गेला आणि त्यांच्या टीम मधील सगळ्यात तरुण कमांडो शिपाई बलदेव सिंग ह्यांच्या हातापायात गोळ्या लागल्या.

शिपाई बलदेव सिंग ह्यांना अश्या अवस्थेत पुढे घेऊन जाणं अशक्य होतं आणि तिकडून माघारी फिरणं म्हणजे आपल्या उद्दिष्ठापासून दूर होणंअश्या कठीण वेळी  कॅप्टन करम सिंग विर्क ह्यांनी निर्णय घेतला की शिपाई बलदेव सिंग ह्यांना इकडेच सोडून मिशन फत्ते करायचं आणि परत येताना जखमी असलेल्या त्यांना परत बेसकॅम्प ला घेऊन जायचंशत्रूच्या नजरेत येऊ नये म्हणून त्यांनी शिपाई बलदेव सिंग ह्यांना झुडपात एका दगडाला टेकून बसवलंत्यांना आपल्या जवळचं पाणीदोन संत्री आणि काही इमर्जन्सी राशन दिलंशिपाई बलदेव सिंग ह्यांची अवस्था खूप वाईट होती त्यांना अश्या अवस्थेत आपली रायफल चालवता येणं शक्य नव्हतं म्हणून त्यांना कमांडर ने कार्बाईन बंदूक दिलीह्यात फक्त ट्रिगर दाबायचा असल्याने एखाद्या बिकट परिस्थितीत त्यांना आपलं रक्षण करता येईल ह्याची काळजी कमांडर विर्क ह्यांनी घेतली  ते पुढच्या मिशनसाठी रवाना झालेमिशन फत्ते केलं पण शत्रूंच्या गोळीबारामुळे आणि दबावाखाली त्यांना आपल्या ठरलेल्या रस्त्याने परत येणं अशक्य झालंते दुसऱ्या रस्त्याने परत बेस ला आलेपण कमांडर करम सिंग विर्क ह्यांना चिंता लागली होती ती आपल्या शिपायाची ज्याला आपण वचन दिलं होतं.

शिपाई बलदेव सिंग दगडाला टेकून बसले होतेरात्रीच तपमान शून्याच्या खाली उतरत होतंपायालाहाताला लागलेल्या गोळ्यांच्या जखमेतून रक्त वहात होतं पण निश्चय होता की मरायचं नाहीकाही वेळ अतिशय सतर्क असणाऱ्या शिपाई बलदेव सिंग ह्यांची सतर्कता कमी होतं होतीतासांमागून तास जात होते आणि तासांचे दिवस झालेत्यांच्याकडील पाणी आणि खाणं संपलेलं होतंनियतीने त्यांच शरीर कमजोर केलं पण त्यांची खंबीरताजिद्द तशीच कायम होतीआता भुकेनेरक्तस्त्राव झाल्याने तसेच हाडं गोठवणाऱ्या थंडीत शरीर साथ देतं नव्हतंत्यांची ही अवस्था तिकडे असणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या लक्षात आलीबघता बघता भटके कुत्रे त्यांच्या आजूबाजूला जमा होतं होतेते वाट बघत होते की कधी एकदा शिपाई बलदेव सिंग ह्यांचा प्राण जातो आणि ते हल्ला करतातत्यांना दूर ठेवण्यासाठी काही वेळा त्यांनी बंदुकीतून गोळ्या ही झाडल्या- दिवस झाले तरी कोणतीच मदत येतं नव्हतीहातापायातलं सगळं त्राण निघून गेलं होतंडोळ्यांच्या पापण्या पण उघडायची शक्ती शिल्लक नव्हती.

इकडे १७ डिसेंबर १९७१ ला युद्धबंदी जाहीर झालीजिकंलेला भाग पाकीस्तान ला परत देऊन लाईन ऑफ कंट्रोल सन्मान करण्याचं ठरलंअडचण अशी झाली की ज्या भागात शिपाई बलदेव सिंग ह्यांना कमांडर करम सिंग विर्क ह्यांनी सोडलं होतं तो भाग आता पाकीस्तान चा भाग होतात्यांनी पाकीस्तानी लेफ्टनंट कर्नल हक नवाझ कयानी ह्यांना विनंती केलीपाकिस्तानी सैनिकांची एक तुकडी त्यांचा शोध घेण्यासाठी पाठवण्यात आली पण त्यांचा ठावठिकाणा लागला नाहीइकडे शिपाई बलदेव सिंग ह्यांची अवस्था खूपच बिकट होतीभटके कुत्रे त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी तयारीत होतेत्यांनी खूप लहानपणी ऐकलं होतं की काही झालं तरी जिवंत असलेल्या प्राण्याचं मास कुत्रे खात नाहीतत्यामुळे कुत्र्यांना लांब ठेवायचं असेल तर आपण जिवंत आहोत हे त्यांना कळायला हवं अथवा आपल्यावर ते कधीही हल्ला करतीलहातांच्या बोटाची हालचाल शक्य होतं नसताना त्यांनी आपली तर्जनी नाकाला लावून त्याचा आधार घेतला होताजेव्हा जेव्हा कुत्रे त्यांच्या जवळ हुंगायला यायचे तेव्हा आपली तर्जनी सरळ करत असतह्यामुळे कुत्र्यांना ते जिवंत असल्याचं कळत असे आणि ते हल्या पासून वाचलेतब्बल साडेसहा दिवस शिपाई बलदेव सिंग त्याच अवस्थेत होतेजेव्हा पाकीस्तानी सैनिकांना ते दिसले तेव्हा कुत्र्यांनी त्यांना घेरलं होतं आणि त्यांचा श्वास चालू होता.

त्यांना तिथून रावळपिंडी इथल्या सैनिकी हॉस्पिटलला नेण्यात आलंथंडीमुळे आणि रक्त गेल्यामुळे त्यांची अवस्था खूप वाईट होतीडॉक्टरांना त्यांच्या दोन्ही पायाची बोटे कापायला लागली महिने हॉस्पिटल मध्ये राहील्यानंतर पाकीस्तान ने त्यांना भारताच्या हवाली केलंभारतात आल्यावर त्यांची अवस्था खूप वाईट होतीहाता - पायांना गँगरीन झालं होतंजीव वाचवण्यासाठी त्यांचे दोन्ही पाय आणि उजवा हात कापावा लागलाह्यातुन बरं झाल्यावर शिपाई बलदेव सिंग ह्यांना एकदा विचारण्यात आलं की कसे काय तुम्ही . दिवस जिवंत राहिलातत्यावर त्यांचं उत्तर होतं,

"मला पाकीस्तानी कुत्र्यांच्या भक्षस्थानी पडायचं नव्हतंमला पाकीस्तानी कुत्र्यांचा स्पर्श सुद्धा माझ्या मेलेल्या शरीराला नको होता."

कुठून येतो हा देशाभिमानकुठून येते हे धैर्यदृढनिश्चयताएक दोन दिवस नाही तर तब्बल . दिवस हाता पायात गोळ्या घुसलेल्या असतात अन्नपाणी ह्यांच्याशिवाय उणे तपमानात जिवंत राहण्याची पराकाष्ठा का तर पाकीस्तानी कुत्र्यांनी सुद्धा आपल्याला स्पर्श करू नयेशिपाई बलदेव सिंग ह्यांची जिद्द बघून जिद्दीला सुद्धा नवीन धुमारे फुटले असतील असं म्हंटल तर वावगं ठरणार नाहीभारत मातेचे असे अनेक सैनिक इतिहासाच्या पानात असे लुप्त झाले की त्याची जाणीव  कधी देशाला झाली  देशवासियांना ज्यांच्यासाठी त्यांनी रक्त सांडलंशिपाई बलदेव सिंग ह्यांच नाव तर सोडाच पण त्यांची साधी माहिती ही उपलब्ध नाहीअश्या शूर आणि पराक्रमी विरांच्या रक्ताने आज भारत देश अखंड आहेत्यांच्या स्मृतीस माझा कडक सॅल्यूट आणि त्यांच्या चिकाटी आणि धैर्याला माझा साष्टांग नमस्कारभारत आणि भारतीय तुमच्या सारख्या सैनिकांच्या ऋणातून कधीच मुक्त होणार नाहीत.

जय हिंद !!!

फोटो स्रोत :- गुगल   

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


Monday, 4 May 2020

काही गोष्टी... विनीत वर्तक ©

काही गोष्टी... विनीत वर्तक ©

विसरायच्या तरी विसरता येत नाही काही गोष्टी
समजून घ्यायच्या म्हंटल तरी समजून घेता येत नाही काही गोष्टी

आपण ठरवतो की आता नाही पडायचं
आपण ठरवतो की आता नाही हरायचं
आपण ठरवतो की आता नाही रडायचं
आपण ठरवतो की आता नाही थांबायचं

पण सगळच थोडीच आपल्या हातात असते
काही गोष्टींमध्ये आपलं काही स्थान नसते.

गेलेले क्षण परत येत नाही
तोंडातून निघालेला शब्द परत मागे येतं नाही
अनुभवलेल्या आठवणी परत येत नाही
पण तरीही काहीतरी निसटल्याची जाणीव समोरच्याला होतं नाही.

आपला जपलेला स्व खूप मोठा होतो
आता काय बदलायचं म्हणून आपण सोडून देतो
कोणी आलं काय गेलं काय आपल्याला काय फरक पडतो
काही गोष्टींचा आपल्याला काय फरक पडतो.

हाताशी आलेल्या गोष्टी कधीतरी जपायच्या असतात
तडा गेलेल्या भेगा बुंजवायच्या असतात
सगळच सोडून चालत नाही
मोडलेलं घर पुन्हा उभं रहात नाही.

काही गोष्टी खूप लहान असल्या तरी मोठ्या असतात
राखेतून उडणाऱ्या फिनिक्स सारख्या असतात
'पणनेहमीच आपला आडवा येतो
काही गोष्टींना आपण सोडून देतो....... 

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

Sunday, 3 May 2020

जगाला वेड लावणाऱ्या दोन तरुणांची गोष्ट... विनीत वर्तक ©

जगाला वेड लावणाऱ्या दोन तरुणांची गोष्ट... विनीत वर्तक ©

१९८० च्या दशकात रशियाच्या विभाजनाआधी युक्रेन देशाच्या एका गावात एक गरीब कुटुंब आपल्या मुलासह रहात होतंहाडं गोठवणाऱ्या युक्रेन च्या थंडीत त्यांच्या घरी साधी इलेक्ट्रिसिटी सुद्धा नव्हतीउणे तपमानात गरम पाण्याने अंघोळ करण्याची सोय सुद्धा नव्हतीसरकार आपलं संभाषण ऐकेल आणि आपल्यावर दडपशाही करेल ह्या भितीने एकमेकांशी संवाद करण्याचं फोन सारखं साधन सुद्धा त्यांनी वापरणं बंद केलं होतंकुठेतरी ह्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी अमेरीका गाठली१९९२ च्या त्या काळात तो मुलगाआई आणि आजीसह अमेरीकेच्या केलिफोर्निया मध्ये दाखल झालादोन बेडरूम च्या खोली मध्ये त्यांनी आपलं घर उभं केलंहा मुलगा एका दुकानात सफाई कर्मचारी म्हणून काम करायला लागलात्याचवेळेस त्याची आई आया म्हणून काम करायला लागलीदोन वेळच्या जेवणाची कशीतरी सोय त्यातून होतं होतीरद्दीवाल्याकडे जमा होणारी पुस्तके हा मुलगा फावल्या वेळात वाचायला लागलात्यात त्याला कॉम्प्युटर नेटवर्किंग ची गोडी लागलीपुढल्या दोन वर्षात त्याने ह्या क्षेत्रातली सगळी माहिती जमा केली होतीआता सगळं व्यवस्थित होते आहे असं वाटत असताना त्याच्या आईला कॅन्सर असल्याचं निदान झालं.

आपलं कॉम्प्युटर मधला अभ्यास त्याने आता एक पायरी वर नेला आणि त्याला कॉम्प्युटर प्रोग्रामिंग ची गोडी लागलीह्याच काळात त्याने विद्यापिठात शिकण्यासाठी प्रवेश घेतला त्याच सोबत एका कंपनीत सिक्युरिटी टेस्टर म्हणून नोकरी सुरु केलीहे करत असताना आयुष्यातील सगळ्यात मोठी संधी चालून आलीयाहू नावाच्या एका कंपनीने त्याला आपल्याकडे नोकरीला घेतलंयाहू हळूहळू वाढत गेलीत्याला ते काम आवडत असल्याने त्याने शिक्षण सोडून दिलं आणि आपल्या कामात स्वतःला जुंपून घेतलंह्याच काळात त्याचे वडील गेलेआईसुद्धा कॅन्सर च्या लढ्यात हरलीअचानक त्याच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झालीत्याच काळात त्याला आधाराची गरज होती जो आधार त्याला त्याच्या एका मित्राने दिलाहा मित्र कॉम्प्युटर सायन्स चा पदवीधारक होतायाहू मधला ४४ वा कामगार होतायाहू मध्ये त्याची ओळख ह्या युक्रेन मधल्या तरुणाशी झाली होतीह्याने करोडो डॉलर डॉट कॉम च्या बूम मध्ये गुंतवले आणि तो पूर्णपणे लुटला गेला होतापण तरीही ह्या दोघांनी एकमेकांना साथ दिलीजवळपास  वर्ष नोकरी केल्यावर ह्या दोघांनी एकाच वेळेस याहू ला २००७ मध्ये रामराम ठोकलाह्या काळात दोघांनी खूप पैसा कमावला होताएक वर्ष त्यांनी फक्त मज्जा करायचं ठरवलंसाऊथ अमेरीका इकडे जाऊन ह्या दोघांनी एक वर्ष फक्त मज्जा आणि मज्जा केलीह्या काळात दोघांनी फेसबुक ला नोकरीसाठी अर्ज केलाह्या दोघांनाही फेसबुक ने बाहेरचा रस्ता दाखवलाएकाने तर ट्विटर मध्ये पण अर्ज केला पण तिकडेही त्याला नोकरीत घेतलं गेलं नाही.

२००९ मध्ये ह्यातल्या एकाच्या डोक्यात सुपीक कल्पना आलीआपल्या कल्पनाशक्ती आणि आपलं ज्ञान वापरून त्याने एक ऍप तयार केलं२४ फेब्रुवारी २००९ ला त्याने ह्या ऍप ला नाव दिलं 'व्हाट्स ऍप'. सुरवातीला ह्या ऍप मध्ये अनेक अडचणी येत होत्यापण त्याच्या पुढल्या व्हर्जन मध्ये त्याने खूप सुधारणा केल्यालगेच हे ऍप अमेरीकेत लोकप्रिय व्हायला सुरवात झालीत्याचवेळेस आपल्या जुन्या मित्राची आठवण त्याला झालीअजूनही तो नोकरी शोधतं होताकुठेतरी त्याची गाडी तिकडेच अडकलेली होतीत्याने आपल्या मित्राला सोबत बोलावलंएक काळ असा होता जेव्हा ह्याच मित्राने त्याच्या एकटेपणात त्याला साथ दिली होतीआज त्याची परतफेड त्याला करायची होतीदोघांनी मिळून ह्या ऍप ला अजून लोकांपर्यंत नेण्याचा चंग बांधलापण पहिल्यापासून त्या दोघांनी ठरवलं होतं की काही झालं तरी आपल्या ऍप मध्ये,

“No ads! No games! No gimmicks!“

हे ऍप बनवणारा युक्रेन/अमेरीकेचा तरुण ज्याने व्हाट्स ऍप ची संकल्पना मांडली तो म्हणजे 'जॅन कॉमआणि त्याला मदत करणारा त्याचा मित्र म्हणजेच 'ब्रायन ऍक्टन'.  
  
इकडून सुरु झाला एक असा प्रवास ज्याने जगाची संभाषण आणि संवाद करण्याची परीभाषा पूर्णपणे बदलवून टाकलीव्हाट्स ऍप ची लोकप्रियता वाढत असताना त्याच वेळा फेसबुक ची लोकप्रियता कुठेतरी कमी होतं होतीअशातच फेसबुकच्या 'मार्क झुकेरबर्गचं लक्ष २०१२ ला व्हाट्स ऍपकडे गेलंत्याने बोलणी सुरु केली आणि शेवटी २०१४ ला फेसबुक ने तब्बल १९ बिलियन अमेरीकन $ ला व्हाट्स ऍप खरेदी केलंहे करताना सुद्धा जॅन आणि ब्रायन ने त्यांच्या तत्वाशी कोणतीही तडजोड होणार नाही तसेच व्हाट्स ऍप चे सर्व हक्क हे त्या दोघांकडे राहतील ह्या अटीवर ज्या फेसबुक ने त्यांना नाकारलं होतं त्यांना आपल्या पायाखाली नाक घासायला लावून इतके पैसे फेसबुक ला मोजायला लावलेफेसबुक कडे हे पैसे मोजण्याशिवाय आणि त्यांच्या अटी स्विकारण्याशिवाय कोणताच पर्याय शिल्लक नव्हता कारण व्हाट्स ऍप ची लोकप्रियताज्या वेगाने ते वाढत होतं तो वेग थक्क करणारा होता.

२०१६ मध्ये  बिलियन लोक (१०० कोटीलोकं व्हाट्स ऍप वापरत होती२०१८ मध्ये हाच आकडा (१५० कोटीवर पोहचला१२ फेब्रुवारी २०२० ला व्हाट्स ऍप ने (२०० कोटीलोकांचा टप्पा पार केला आहेव्हाट्स ऍप वापरणाऱ्या सगळ्या लोकांपैकी १०हुन अधिक लोकं एकट्या भारतात आहेतभारतात जवळपास ३० कोटी लोकं व्हाट्स ऍप वापरत आहेतप्रत्येक दोन वर्षात व्हाट्स ऍप जवळपास ५० कोटी नवीन लोकांपर्यंत पोहचते आहेहा वेग आजही कोणत्या ऍप ला गाठता आलेला नाहीएकेकाळी सफाई काम करणारा जॅन कॉम आणि एकेकाळी फेसबुक आणि ट्विटर ने डावललेला ब्रायन ऍक्टन ह्यांनी आपल्या प्रतिभेने पूर्ण जगाची संभाषण करण्याची परीभाषा बदलवून टाकलीह्या दोन्ही विभूतींना माझा सलामतुमचा हा थक्क करणारा प्रवास येणाऱ्या कित्येक पिढयांना आपलं स्वप्न खरं करण्यासाठी प्रोत्साहित करेल.         

फोटो स्रोत :- गुगल
    
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.