Tuesday, 28 April 2020

भारताच्या एडीसन ची गोष्ट... विनीत वर्तक ©

भारताच्या एडीसन ची गोष्ट... विनीत वर्तक ©

२९ एप्रिल १८६७ ह्या दिवशी म्हणजेच आजपासून जवळपास १५३ वर्षापूर्वी त्या काळाच्या बॉम्बेब्रिटिश इंडिया (आजच्या मुंबईतएका मुलाचा जन्म झालाजात्याच तो मुलगा खूप हुशार होतालहानपणापासून त्याला काहीतरी नवीन शोधण्याचं वेड लागलंतो काळ ब्रिटिश राजवटीचा होताभारतासारख्या मागासलेल्या देशात इंग्रजांनी कारकून तयार करण्याची पद्धत अवलंबिली होतीत्यामुळे भारतातून कोणी संशोधक तयार होतील अशी अपेक्षा  ब्रिटिशांना होती  भारतीयांना (खेदाची गोष्ट अशी की आज १५० वर्षानंतर ही आपण कारकून बनण्याचं शिक्षण देतो आहोत आणि १००मिळवणारे कारकून घडवत आहोत.) पण तरीही तो मुलगा मात्र काहीतरी वेगळं करण्याची आपली स्वप्न जगत होताह्या मुलाने त्या काळात मुंबईमध्ये आपल्याच सारख्याच संशोधनाची आवड असणाऱ्या लोकांचा एक गट स्थापन केलाब्रिटिशांसाठी असणाऱ्या स्पर्धेत भाग घेऊन सातासमुद्रापार जाण्याचं आपलं स्वप्न त्याने पूर्ण केलंतिकडे जाऊन आपल्या वेगळ्याच संशोधनाने आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक त्याने जगाला दाखवली आणि जगाने त्यांचं नामकरण 'भारताचा एडीसनअसं केलंह्या संशोधकाने आपल्या हयातीत २०० पेक्षा जास्त शोध लावले त्यापेकी ४० शोधांचं पेटंट ( स्वामित्व हक्क ) त्यांच्याकडे होतेनेहमीप्रमाणे ज्याला जगाने भारताचा एडीसन म्हंटल त्याला आपलेच भारतीय विसरून गेलेपूर्ण जगात भारताचे झेंडे अटकेपार रोवणारे ते भारतीय एडीसन आणि मराठी संशोधक म्हणजेच 'शंकर आबाजी भिसे'.

लहानपणीच त्यांना अमेरीकेहुन येणारी मासिक वाचायचं वेड लागलंह्या सगळ्या मासिकात अमेरीकेत चालू असणाऱ्या तांत्रिक प्रगतीचा परामर्श घेतला जात असेह्या मासिकातील माहिती वाचून त्यांनी मुंबई मधेच आपलं संशोधन करायला आणि लहान कामासाठी उपयोगी पडणारी यंत्र बनवायला सुरवात केलीअश्या बॉटल्स ज्यांच्यात छेडछाड करता येणार नाहीह्याशिवाय इलेक्ट्रीक वर चालणाऱ्या सायकल चे गिअरतसेच मुंबई च्या लोकल ट्रेन साठी स्टेशन इंडीकेटर अश्या वेगेवेगळ्या गोष्टी शंकर आबाजी भिसे ह्यांनी वयाच्या २० वर्षापर्यंत तयार केल्या होत्यात्यांना आपलं संशोधन पुढे सुरु ठेवायला पैश्याची गरज होती त्यासाठी त्यांना लंडन ला आपलं संशोधन न्यायचं होतंअशी एक संधी त्यांना १८९० साली चालून आलीसंशोधना संबंधित असणाऱ्या एका नियतकालिकाने एक स्पर्धा आयोजित केली होतीसामानाचे वजन मोजण्याचं यंत्र बनवण्याची ती स्पर्धा होतीसर्व ब्रिटिश संशोधकांना मागे टाकत शंकर आबाजी भिसे ह्यांनी तयार केलेल्या मॉडेल ने स्पर्धा जिंकलीही स्पर्धा जिंकल्याने त्यांना युरोपचे दरवाजे खुले झाले.

शंकर आबाजी भिसे लंडन ला आले ते दिनशा वाचा ह्यांचं पत्र सोबत घेऊनत्यांनी ते पत्र लंडन मध्ये त्याकाळी औद्योगिक क्षेत्रात मोठं नावं कमावलेल्या दादाभाई नौरोजी ह्यांना दिलंपत्र वाचल्यावर दादाभाई नौरोजींना शंकर आबाजी भिसेंच्या अंगी असलेली चुणूक लक्षात आली होतीत्यांनी लगेच भिसेंना आपल्यासोबत घेऊन त्यांना संशोधन करायला सांगितलंभारताच्या एडीसन चा प्रवास इकडून सुरु झालाभिसेंनी इलेक्ट्रॉनिक साइन बोर्ड तयार केले जे युरोपात लगेच लोकप्रिय झालेत्यांनी स्वयंपाक घरासाठी वेगवेगळी यंत्रे बनवलीदुखणार डोकं थांबवणारे यंत्र बनवलं होतंअपोआप फ्लश होणारं टॉयलेट ते अगदी पुश अप ब्रा सारखे अविष्कार त्यांनी केलेपण भिसेंचा सगळ्यात मोठा अविष्कार ठरला 'भिसोटाइप'. प्रिंटिंग तंत्रज्ञानाला एका वेगळ्या पातळीवर नेणारा हा अविष्कार होताजेव्हा प्रिंटिंग मध्ये काही शे अक्षर प्रिंट करायला जगातले शास्त्रज्ञ धडपडत होते त्याकाळी भिसेंनी एका मिनिटात १२०० अक्षर प्रिंट करणारं यंत्र तयार केलंत्यांच्या ह्या संशोधनाला आजही प्रिंटिंग क्षेत्रात एक मैलाचा दगड मानण्यात येतेपण आपल्या संशोधनाला बिझनेस मॉडेल मध्ये परावर्तीत करण्यात ते कुठेतरी कमी पडलेकाळाच्या ओघात त्यांच्या संशोधनाला पैसा पुरवणारा उद्योजक उरला नाहीनाईलाजाने त्यांना पुन्हा एकदा भारताची वाट पकडावी लागली.

भारतात परत येताना त्यांची गाठ गोपाळ कृष्ण गोखल्यांशी झालीत्यांना भिसेंनी आपलं संशोधन दाखवलंत्यांच्या संशोधनाने प्रभावित झालेल्या गोखल्यांनी त्यांची ओळख रतनजी टाटा ह्यांच्याशी करून दिली. ( आत्ताचे टाटा समूहाचे रतन टाटा नाहीत.) भिसे आणि टाटांनी एकत्र येऊन काम करायचं ठरवलं पण ती बोलणी मधेच फिस्कटलीपण ह्या भागिदारीने भिसे ह्यांना अमेरीकेचे दरवाजे उघडे झालेत्यांनी सरळ अमेरीका गाठलीतिकडे आपलं संशोधन करायला सुरवात केलीअमेरीकेत शंकर आबाजी भिसे हे नावं प्रसिद्ध झालं ते त्यांनी लावलेल्या आयोडीन उपायामुळेहे उपाय केल्याने माणसाची मानसिक शक्ती वाढते असा दावा त्यांनी केलाह्या दाव्याला त्या काळचा अमेरीकेचा प्रसिद्ध गूढ आणि मानसिक तत्ववेत्ता एडगर कायसे ने उघड पाठिंबा दिलापण ह्या सगळ्यात भिसेंच लक्ष संशोधनकडून जादूटोणा आणि गूढ गोष्टींकडे वळलं ज्याने त्यांच्या प्रतिमेला तडा गेलाआपल्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसात त्यांनी स्पिरीट टाईपरायटर यंत्र बनवलं पण तोवर त्यांची तब्येत खालावली होतीभारताचा एडीसन १९३५ ला इतिहासाच्या पानात लुप्त झाला.

आजही मोठ्या अभिमानाने एडीसन ची गोष्ट सांगणारे अनेक भारतीय आपल्याच एडीसन ला विसरून गेले आहेतशंकर आबाजी भिसे ह्यांचं संशोधन आणि कार्य इतिहासाच्या त्या काळात लुप्त झालंआजही अनेक भारतीयांना हे नाव अपरीचीत आहेएडीसन भारताचा असला किंवा अमेरीकेचा तो प्रसिद्ध झाला आपल्या अंगभूत वेगळा विचार करण्याच्या शैलीमुळेजिकडे शाळेत मुलांना कारकून बनवण्यासाठी जुंपलं जातेजिकडे १००मिळवणे म्हणजे हुशारी असते तिकडे असे एडीसन पुन्हा तयार होण्याची शक्यता दुर्मिळच असतेभारताच्या त्या काळात आपल्या स्वतःच्या संशोधनाने भारताच नाव मोठं करणाऱ्या भारताचे एडीसन 'शंकर आबाजी भिसेह्यांच्या स्मृतीला माझा कडक सॅल्यूटआज भारतीय तुम्हाला विसरले असतील तरी ह्या पोस्ट च्या निमित्ताने तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी तुमची आठवण नक्की काढतील अशी माझी अपेक्षा आहेपुन्हा एकदा तुमच्या स्मृतीस माझं वंदन.

जय हिंद!!!

माहिती स्रोत :- बी.बी.सी., गुगलविकिपिडीया 

फोटो स्रोत :- गुगल
    
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


Monday, 27 April 2020

काय करू?... विनीत वर्तक ©

काय करू?... विनीत वर्तक ©

घड्याळाच्या काट्यावर प्रत्येक सेकंदाच गणित मांडणाऱ्या आपल्यापैकी प्रत्येकाला अचानक मिळालेल्या जवळपास महिन्यांच्या ब्रेक मुळे आता काय करूअसा प्रश्न निर्माण झाला आहेआधी मज्जा वाटणारा हा काळ जवळपास प्रत्येकाला कुठेतरी नकोसा झाला आहेप्रत्येकाच्या मनात सलत असलेला काय करूहा प्रश्न आता मानसिक रोगात रूपांतर व्हायला सुरवात झालेली आहेएकेकाळी तणावडेडलाईनबॉस चं प्रेशरप्रेझेंटेशन ते आजचा गल्ला कितीआणि आजचा दिवस सुटला असं म्हणत एकएक दिवस काढणारे आपण सगळेच ह्या अचानक लागलेल्या ब्रेकमुळे एका वेगळ्याच तणावाखालून जात आहोत.

जसजशी आपली प्रगती होतं गेलीतसतसं आपण अजून अजून स्वतःला जुंपवत गेलोजास्ती पैसाजास्त समृद्धीजास्त समाधान ते सगळचं जास्त मिळवण्याच्या नादात आपण उर फुटेस्तोवर धावत सुटलोह्या धावण्याच्या शर्यतीत आपण धडपडलोवेळ प्रसंगी लागलं सुद्धाकाहींना आपण मागे टाकलं तर काहींनी आपल्याला पण आपण धावणं सोडलं नव्हतंकधीतरी एक दिवस माझा असेल ह्याच आशेवर एका नवीन समृद्ध भविष्यासाठी बस पळत राहिलोत्याची इतकी सवय आपल्याला झाली की सुट्टीचा एक दिवस पण आपल्याला गमावणं काहीतरी गुन्हा केल्यासारखं वाटायलं लागलंसुट्टीचा तो काळ ही आपण जिकंलेल्या समाधानाचं कौतुक म्हणून कधी लोकांना दाखवण्यासाठी तर कधी आपल्या कुटुंबाला दिलेल्या कमी वेळेची कसर भरून काढण्यासाठी तर कधी स्वतःच समाधान शोधण्यासाठी वेगळ्या देशात अथवा आपल्याच देशात पिकनिक आणि रिसॉर्ट ला जाऊन दारू पिऊन किंवा धमाल करण्यात आपलं सुख मानायला लागलोपण ह्या सगळ्यात आपल्या आवडीनिवडी आणि छंद ह्या शर्यतीत लुप्त झाल्या.

जगाच्या धावण्याच्या शर्यतीत इतका मोठा अडथळा येईल असा विचार  आपण कधी केला होता  जगातील कोणत्या तत्ववेत्याने केला होतादोन जागतिक महायुद्ध झाली तरी जगात शर्यत कधीच थांबली नव्हतीत्यामुळे अशी काही अडचण उभी राहील ज्याच्यामुळे पूर्ण जगाला इच्छा नसताना ही शर्यत थांबायला लागेल ह्या परिस्थितीसाठी कोणीच तयार नव्हतंअचानक ब्रेक लागलासुरवातीचा काळ जे झालं ते छान वाटलं कदाचित दोनचार दिवसपण जेव्हा ह्याचा परीणाम आपल्या सुखाच्या कल्पनेवरपण झाला आहे हे लक्षात जसंजस यायला लागलं तसतसं ह्या अडथळ्यामुळे आपण काय गमावलं ह्याचा अंदाज यायला सुरवात झालीदिवस वाढत होते पण कधी हे चक्र संपेल ह्याची शाश्वती येतं नव्हतीदारू  मिळाल्यावर दारुड्या ची जी अवस्था होते ती आपली हळूहळू का होईना व्हायला सुरवात झालीआधी काहीतरी कमी असल्याची भावना मग कधी संपणार हेह्याचे विचारमग अस्वस्थता आणि चिडचिडत्याच प्रतिबिंब आपल्या नात्यात आणि सोशल मिडियावर उघडपणे दिसायला लागलंकारण आपण आपल्याच वेळेचं काय करायचं ह्याच नियोजन कायविचारच कधी केला नव्हता.

आपल्या आवडी निवडीआपले छंदआपल्या मुड बदलणाऱ्या गोष्टी आपण कधी जोपासल्या नव्हताकित्येक वर्षात आपण आपल्याच गोष्टींचा शोध घ्यायला विसरून गेलो होतोसतत विविध माणसात वावरणारे आपण एकटेपणाला आणि एकाच ठिकाणी रहायला विसरून गेलो होतोपक्ष्याप्रमाणे आकाशात विहाराची स्वप्न बघणारे आपण हे विसरून गेलो की उडणारा तो पक्षी पण सतत उडत नसतोत्याच्या उडण्यावर पण मर्यादा असतातबराच काळ तो पक्षी आपलं घरटं बनवण्यात तर अन्न शोधण्यात त्याचा काळ व्यतीत करतोपण मानवाला अजून एक भूक असते ती मानसिक सुखाचीजी आजवर तो ह्या शर्यतीत विसरून गेला होता किंबहुना त्याची भूक त्या शर्यतीत भागत होतीपण अचानक शर्यत थांबल्यावर त्या भुकेला कसं भागवायचं ह्याचा नकळत तणाव यायला लागलाकारण ती भुक शमवणाऱ्या गोष्टी आपण जोपासल्याच नव्हत्याआता एका दिवसात त्या निर्माण करता येतील अशी ही परिस्थिती नाही.

चित्रकला आवडते म्हणून एकाच दिवशी चित्र काढायला सुरवात केली तर त्यात समाधान  मिळते असं नसतेत्याला पण सराव लागतोजेव्हा सराव करू तेव्हा गोडी निर्माण होते आणि एकदा गोडी निर्माण झाली की ती जोपासायची असतेहेच सगळ्याच आवडीत आणि समाधानात लागू आहेअचानक एके दिवशी उठून तुम्ही लिहायला लागला तर कदाचित एखादा लेख लिहाल ही पण पुढल्या लेखाला आता काय लिहूहा प्रश्न समोर आला की आपल्या आवडीचा आपल्याला त्रास होईलकारण असं सगळं एकदम इन्स्टंट होतं नसतेप्रत्येक गोष्टी मग त्या आपल्या आवडीनिवडीछंद का नसोत प्रत्येकाला जोपासावं लागतेत्यातल सार जाणवायला कधी कधी वर्ष जावं लागतेपाण्यात उडी मारली की पोहायला शिकता येते पण जर पोहण्याची मज्जा घ्यायची असते तर त्या पाण्यात अनेकवेळा उड्या मारायच्या असतातहेच सूत्र आपल्या समाधानाला आणि आपल्या छंदाला लागू आहे.

ह्या शर्यतीत आपण आपले छंद कधी जोपासले नाहीतवेळ येईल तेव्हा बघू असं करत आणि आपल्याला आवडते मग कायअसा विचार करत त्याला अडगळीत टाकत राहिलोअचानक जेव्हा आठवण झाली तेव्हा हे छंद आपण बाहेर काढले पण त्यातही काही हाताशी लागतं नाही बघून आपल्यासमोर तोच प्रश्न उभा राहिला काय करूह्या काय करूला जर बाजूला काढायचं असेल तर आपले छंद जोपासायला लागा कदाचित हीच मोठी शिकवण ह्या अडथळ्याने दिली आहेकारण आपण ते जोपासले की धावणाच्या शर्यतीत ही ते आपल्याला ऊर्जा देतं राहतातएक वेळ अशी येते की तुम्ही शर्यतीत भाग घ्या अथवा घेऊ नका पण ते नेहमीच तुम्हाला तो मानसिक आनंद आणि सुख देतातअसं होतं तेव्हा काय करूअसा प्रश्न उभा रहात नाही.    
    
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.